शब्द समानार्थी व्याख्या
कोणकोष्टक न. (ग्रंथ). कोलन वर्गीकरणात वापरले जाणारे संकेतचिन्ह, चौकोनी कंस.
कोणगे न. पहा : कोनगे
कोणचा वि. १. दोन वस्तूंपैकी कोठला. २. जो तो; विवक्षित.
कोण जाणे   कोणास ठाऊक, माहीत; न कळे बुवा.
कोणताका सना. हवा तो; पाहिजे तो; कोणताही. (एकवचनी व अनेकवचनी प्रयोग)
कोणचाका सना. हवा तो; पाहिजे तो; कोणताही. (एकवचनी व अनेकवचनी प्रयोग)
कोणत्या तोंडाने क्रिवि. न शरमता; न लाजता, उघडपणे, उजळमाथ्याने; कसा (प्रश्नार्थक).
कोणत्या नाकाने क्रिवि. न शरमता; न लाजता, उघडपणे, उजळमाथ्याने; कसा (प्रश्नार्थक).
कोणत्यासी   कोणास : ‘येणें कोणत्यासी रोख दिलें ।’ - ब ५०३.
कोणदंड पु. खांबाचा वाटोळा दांडा.
कोणप न. १. कुणप; प्रेत. २. (ल.) तुच्छ, गलिच्छ वस्तू : ‘वरीते कश्मला कोणपा या ।’ - आसी २८. [सं. कुणप = प्रेत]
कोणपदार्थ वि. यःकश्चित; निंद्य; त्याज्य; क्षुद्र : ‘कोणपदार्थ स्त्रियांच्या जाती । अपवित्रा दुष्टिणी । पति असतां व्यभिचारिणी ।’ - पला ४३.
कोणपा पु. कोपरा, कोना. (बे.)
कोणपिका वि. कोपऱ्यात अगर घरात पिकलेला (आंबा, फणस इ.).
कोणबिंदु पु. कोनाच्या दोन बाजू ज्यात मिळतात तो बिंदू. [सं.]
कोणबिंदू पु. कोनाच्या दोन बाजू ज्यात मिळतात तो बिंदू. [सं.]
कोणय सना. कोणीही.
कोणय क्रिवि. कसाही. (गो.)
कोणव सना. कोणीतरी; कोणीहीं.
कोणसा वि. कोणीतरी; फलाणा; बोलणाऱ्याला माहीत नसलेला.
कोणाइत वि. पु. कोपऱ्यामधील; कोनाश्रित : ‘कोणाइत मार्कंडे उत्तरे वाडी’ - स्थापो ११.
कोणाक सना. कोणाला. (कु.)
कोणाचा कोण सना. (अज्ञात माणसासंबंधी, त्यांच्या नात्यागोत्यासंबंधी माहिती विचारताना) लांबचा नातेवाईक; बळेबळे संबंध जोडलेला. (यःकश्चित, फालतू माणसासंबंधी योजतात.)
कोणाच्या केरवळ्या   एक खाद्य; कोणफळ सोलून व उकडून त्यात मीठ घालून वाटून त्याच्या लाट्यात खोबऱ्याचा कीस, भुईमुगाचे दाणे यांचे पुरण भरून तळून काढतात.
कोणाश्म पु. (भुशा.) दीर्घकालीन खडकांचे अनेक कोचदार खंड नैसर्गिक लुकणक्रियेने एकत्र सांधले जाऊन बनणारा एकसंध खडक.