शब्द समानार्थी व्याख्या
कोतल अंदीशी   अदूरदर्शित्व.
कोतवार   पहा : कोतवाल ३
कोतवाल पु. १. मराठी साम्राज्यातील नगररक्षकांचा मुख्याधिकारी; शहराचा मुख्य संरक्षक अधिकारी; फौजदार; पोलिस अधिकारी; कोकणात पोलिस-उपनिरीक्षकाला कोतवाल म्हणत असत. मराठी राज्यात याला कज्जे तोडणे, बाजारातील वस्तूंचे भाव ठरविणे, खरेदी विक्रीचे दस्त ऐवज नोंदणे इ. कामे असत. २. गावात जेवणाचे अथवा इतर समारंभाचे आमंत्रण करणारा अधिकारी; बोलावणेकरी : ‘-निमंत्रणे करण्यास कोतवालास द्यावी.’ - ऐरापुत्र ९·४५९ (बडोदे-काशी). सरकारी काम करणारा गावमहार. (व.) ३. (ल.) कायद्याचा बडगा : ‘पुढाऱ्यांनीं त्यांच्यावर कोतवाल फिरवल्यानंतर’ - के ६·२·१९४०. [फा.], ४. नित्योपयोगापेक्षा जास्त संग्रह केलेला पदार्थ. [हिं.], ५. पोपटाएवढा एक काळा पक्षी. याला कोळसा असेही म्हणतात. याची शेपटी दुभागलेली असते. हा पक्षी लहान असून कावळा, घार वगैरे पक्ष्यांनाही हाकून देतो.
कोतवालघोडा पु. १. मिरवणुकीपुढे शृंगारून चालविलेला घोडा : ‘कोतवालतेजी धावा घेती ।’ - ऐपो. पहा : कोतल. २. (ल.) शोभेसाठी वापरावयाचे अलंकार, ठेवणीतील कपडे इ.
कोतवाली स्त्री. १. कोतवाल कचेरी; कोतवालाचा कारभार, खाते. २. शहर जकात; बाजारपट्टी. ३. पोलिसचौकी; नाके; चावडी : ‘सहा महिने पायात बिड्या ठोकून एकेक महिना एकएक कोतवालीवर त्यास बसविला-’ - विक्षिप्त १·८८. (बा.) ४. कोतवालाचा खर्च भागविण्यासाठी बसविलेले कर.
कोतवाली वि. कोतवालासंबंधी; फौजदारी.
कोतवालीचा पोषाख   सणासुदीला घालायचा उंची, ठेवणीतील पोषाख.
कोतवाली पिंजरा   कैदखाना; तुरुंग : ‘कोणास बेशुद्ध होईपर्यंत मार देण्यांत आला व कोतवाली पिंजऱ्याची भरती करण्यांत आली’ - विक्षिप्त १·७३.
कोतळे   आतडे; कोथळा : ‘घाई वाटती कोंतळी ।’ - उह १४०६.
कोता वि. जरुरीपेक्षा आखूड; अपुरा; लांडा; त्रोटक; लहान; तुटका; कमती; तुटपुंजे; संकुचित : ‘आमचें ज्ञान किती कोतें आहे पहा.’ - गीर २४६. [फा.]
कोताई स्त्री. आखूडपणा; अपुरेपणा; कमताई; कोतेपणा : ‘वसूल घेण्यास सख्ती करिता कोताही केली नाही.’ - ऐटि ५·११. [फा.]
कोताही स्त्री. आखूडपणा; अपुरेपणा; कमताई; कोतेपणा : ‘वसूल घेण्यास सख्ती करिता कोताही केली नाही.’ - ऐटि ५·११. [फा.]
कोतान्देसी वि. अदूरदृष्टी; अविचारी : ‘परंतु रांगडे कोतांदेसी आहेत.’ - पेदभा २९·१६९.
कोते अंदेशा वि. अदूरदृष्टी; अविचारी : ‘परंतु रांगडे कोतांदेसी आहेत.’ - पेदभा २९·१६९.
कोतायरक न. कोते हत्यार; आखूड पल्ल्याचे हत्यार. (क.) कोते हतेरा पोचणे - प्रत्यक्ष हाताला हात भिडवून लढाई होणे : ‘दोन वेला पठाण चालोन कोते हातेरास पोहोचले.’ - हिंदखं १·४१.
कोतार न. वैर; भांडण. (कु.)
कोतासिला पु. तरवार, भाल्यासारखे आखूड पल्ल्याचे हत्यार.
कोतिक   कौतुक : ‘देवने कोतिक पुरीन ।’ - कला १५.
कोतियाळ वि. कोयता (शस्त्र) घेतलेला (वीर) : ‘येक धावती आगळें । लोहागळे कोतियाळ । फरशधर ।’ - कालिका २२·७.
कोती स्त्री. वरईची एक जात. हिचा दाणा पांढरा असतो; एक तृणधान्य.
कोती अंदेशा   अदूरदृष्टीपणा; अविचार : ‘कोती अंदेशा करून तुम्ही निजाम हस्तीखान यांस जाऊन भेटला.’ - पेद २०·१३३.
कोतेकर पु. भालाईत. पहा : कोतकारू : ‘पैले कोतेकारा । जवळिके चाला ।’ - शिव ५६४; ‘सेले साबळे कोतेकर । धनुर्धर पायाचे ।’ - एरुस्व ८·१३. [सं. कुंत + कार]
कोतेकार पु. भालाईत. पहा : कोतकारू : ‘पैले कोतेकारा । जवळिके चाला ।’ - शिव ५६४; ‘सेले साबळे कोतेकर । धनुर्धर पायाचे ।’ - एरुस्व ८·१३. [सं. कुंत + कार]
कोतो पु. पाणी काढण्याच्या लाठीचा कोळंबे अडकविण्याचा बांबू. (कु.) [क. कोट्ट = बांबूची नळी]
कोत्त पु. जुडगा; घोस. (तंजा.) [क. कोत्तु]