शब्द समानार्थी व्याख्या
कोथिरे न. एक प्रकारचे गवत : ‘आकाशात तारे कोथिराच्या आणि पोह्याच्या तुऱ्याप्रमाणे चमकू लागले.’ - सराई ६२.
कोथेरे न. एक प्रकारचे गवत : ‘आकाशात तारे कोथिराच्या आणि पोह्याच्या तुऱ्याप्रमाणे चमकू लागले.’ - सराई ६२.
कोथी स्त्री. लाकडी कुदळ. (ठा.)
कोथेमेथे न. धने, हिंग, मेथी इ. जिन्नसांचा समुच्चय. (को.)
कोद पु. तीळगूळ.
कोदया पु. कुंड (भांडे). (व.)
कोदरणे स्त्री. उकरणे. (बे.) [सं. कु. = पृथ्वी + दृ = विदारणे.]
कोदरा वि. चोरटा. (नंद)
कोदरू   पहा : कोद्रव : ‘कोंबड्याने लवकर आरवू नये म्हणून त्याला कोदरू खायला घालू लागली.’ - ओदे ६०.
कोदवा पु. एक प्रकारचा दगड : ‘सीरसाळा : कोदवा : मुरुंबाळा’ - लीचउ ३३५.
कोदळे न. थालीपीठ. पहा : कोडोळे
कोदंड न. १. धनुष्य : ‘आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं ।’ - ज्ञा ३·१८९. २. (ल.) भुवई. ३. (ल.) मोठे संकट (रावणाच्या छातीवर शिवकोदंड पडल्याने तो कासावीस झाला त्यावरून). पहा : रामकोदंड [सं.]
कोदंड वि. उद्धट; दांडगा; भांडखोर; बेपर्वा.
कोदा पु. हलके व घाणीचे काम; काबाडकष्टाचे काम; कुत्तेघाशी. बहुधा अव. प्रयोग - कोदे (क्रि. करणे, निपटणे, उपसणे, पडणे.).
कोदवणे अक्रि. गुदप्रक्षालन करणे; ढुंगण धुणे. २. कोदा उचलणे, करणे. (कु. राजा.) पहा : कोदा
कोदावणे अक्रि. गुदप्रक्षालन करणे; ढुंगण धुणे. २. कोदा उचलणे, करणे. (कु. राजा.) पहा : कोदा
कोदुणे अक्रि. गुदप्रक्षालन करणे; ढुंगण धुणे. २. कोदा उचलणे, करणे. (कु. राजा.) पहा : कोदा
कोदील वि. ठिसूळ.
कोदे न. एक धान्य : ‘कोदेया भातेया (उड्या) पडतील.’ - लीचउ ४४८.
कोदो न. एक धान्य : ‘कोदेया भातेया (उड्या) पडतील.’ - लीचउ ४४८.
कोदेभाते पु. अव. हलकीसलकी, कष्टाची कामे : ‘रायाचीया राणिया कोदेभाते पडतील.’ - लीचउ १८९.
कोद्रव पु. एक प्रकारचे हलके धान्य; हरीक. सर्व धान्यातील हे हलके धान्य असून गरिबांशिवाय ते दुसरे कोणी खात नाहीत. कितीही निकस जमिनीत हे पिकते. [सं. कोद्रव]
कोद्रू पु. एक प्रकारचे हलके धान्य; हरीक. सर्व धान्यातील हे हलके धान्य असून गरिबांशिवाय ते दुसरे कोणी खात नाहीत. कितीही निकस जमिनीत हे पिकते. [सं. कोद्रव]
कोद्रा पु. एक विषारी तृणधान्य : ‘खळ्यातले विषारी हरीक (कोद्रा या नांवाचे धान्य) त्याच्या गाढवांनी खाल्ले नि त्यातली दोन गाढवें..... मेली.’ - सोबत ११७.
कोद्री   लहान खडा. (पूर्वविदर्भातील विवाह १८२३)