शब्द समानार्थी व्याख्या
कोधळे न. भांडे : ‘मग इंद्रभटासरिसे एक तुपाचें कोधळे घेउनि एत होते :’ - लीचउ ८९.
कोन पु. १. (भूमिती) दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात ती आकृती. याचे लघुकोन, काटकोन, विशालकोन असे प्रकार आहेत. २. कोपरा. ३. पागोट्याचा एक प्रकार : ‘कोन पाठविला आहे. घेणे.’ - ब्रच २९. ४. जागा; जमिनीचा लहान तुकडा; ‘कान द्यावा पण कोन देऊ नये.’ - एहोरा ९·२९. ५. प्रसूती, बाळंतपण (ह्या प्रसंगी स्त्री घराच्या कोपऱ्यात - बाजूला जाते यावरून) ६. बाळंतिणीची वस्त्रे, खाटले, भांडीकुंडी इ. सामान; बाळंते. ७. ठेवण्याची राहण्याची जागा. उदा. देवाचा कोन = देवघर (बे.) [सं. कोण] (व.) कोन , कोण होणे, निघणे - बाळंत होणे, प्रसूत होणे. (वि. प्र.) कोनी निघणे, कोन येणे - बाळंत होणे. हे प्रयोग सर्वमान्य आहेत. : ‘मग ते गरोदर होऊनि कोनी निघाली’ - पंच ३.
कोण पु. १. (भूमिती) दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात ती आकृती. याचे लघुकोन, काटकोन, विशालकोन असे प्रकार आहेत. २. कोपरा. ३. पागोट्याचा एक प्रकार : ‘कोन पाठविला आहे. घेणे.’ - ब्रच २९. ४. जागा; जमिनीचा लहान तुकडा; ‘कान द्यावा पण कोन देऊ नये.’ - एहोरा ९·२९. ५. प्रसूती, बाळंतपण (ह्या प्रसंगी स्त्री घराच्या कोपऱ्यात - बाजूला जाते यावरून) ६. बाळंतिणीची वस्त्रे, खाटले, भांडीकुंडी इ. सामान; बाळंते. ७. ठेवण्याची राहण्याची जागा. उदा. देवाचा कोन = देवघर (बे.) [सं. कोण] (व.) कोन, कोण होणे, निघणे - बाळंत होणे, प्रसूत होणे. (वि. प्र.) कोनी निघणे, कोन येणे - बाळंत होणे. हे प्रयोग सर्वमान्य आहेत. : ‘मग ते गरोदर होऊनि कोनी निघाली’ - पंच ३.
कोन   पहा : कोंडा (व.)
कोन पु. एक कंद व त्याची वेल. हा कांदा गोराडूसारखा असतो : ‘(गोराडूचे कंदास) कोकणात कोनफळ व नारमिगे म्हणतात.’ - फचि ८४.
कोनकर   पहा : कोतकर
कोनकार   पहा : कोतकर
कोनकोपरा पु. १. सांधीकोंदी; एका कडेची बाजू; अडगळ; सहज लक्षात न येणारी जागा. २. टेंगूळ; पुढे आलेला फुगीर भाग.
कोनाकोपरा पु. १. सांधीकोंदी; एका कडेची बाजू; अडगळ; सहज लक्षात न येणारी जागा. २. टेंगूळ; पुढे आलेला फुगीर भाग.
कोनकोपरा पु. आवडनिवड : ‘तैसा कोनकोपरा । नेणे जीउ ।’ - ज्ञा १३·३६.
कोन खिळण   (यंत्र) सरळ आणि लांब कोनातील बाजू तपासणीचा मापक.
कोनगे न. दरीतील तुटलेल्या कड्याला वा मोठ्या फांदीला लागलेले मधाचे पोळे; कोंगे; मधाच्या पोळ्याची एक जात; कोणगे. (गो.)
कोनट पु. कुणब्यासाठी वापरला जाणारा निंदाव्यंजक शब्द. (को.)
कोना पु. कुणब्यासाठी वापरला जाणारा निंदाव्यंजक शब्द. (को.)
कोन्या पु. कुणब्यासाठी वापरला जाणारा निंदाव्यंजक शब्द. (को.)
कोनटा पु. १. कोपरा. २. घरातील अंधारी जागा : ‘देऊळाची दक्षिण कोनटा आसन - स्थापो ३८ (व. ना.)
कोणटा पु. १. कोपरा. २. घरातील अंधारी जागा : ‘देऊळाची दक्षिण कोनटा आसन - स्थापो ३८ (व. ना.)
कोनटोपर न. कानटोपी; कान्होळे. (व.)
कोनडा पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनडे पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनाडा पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनाडे पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनपट न. (कोनचे हीनत्वदर्शक रूप.) १. कोपरा. २. (ल.) एकीकडची, एकान्ताची जागा; आड बाजू.
कोनपडा   पहा : कोनपट
कोनपालट पु. १. दुखणेकऱ्यास आराम पडण्यासाठी निजण्याची जागा बदलणे. २. व्यालेल्या मांजरीने आपल्या पिलांचे स्थलांतर करणे. (क्रि. करणे.)