शब्द समानार्थी व्याख्या
कोपरी स्त्री. १. तळहातापासून कोपरापर्यंत ४० अगर जास्त वेढे देऊन सुंभासारख्या दोरीची केलेली गुंडाळी : ‘त्या दिवशी सुंभाची कोपरी आणून छपराची डागडुजी करीत होता.’ - रथ २५५. २. गोट्यांच्या खेळातील एक संज्ञा. - डाव लागला म्हणजे नियमित स्थळापासून गोटी कोपराकोपराने उडवीत गल्लीमध्ये आणून टाकणे. ३. कोपराजवळ येणारी सूज; एक रोग. ४. कोपरापर्यंत बाह्या असलेली बंडी, अंगरखा : ‘अंगांत रेशमी कोपरी.’ - हाकांध २११. [सं.], ५. नखुरडे. [सं.]
कोपल न. एक प्रकारचे तेल, वार्निश : ‘रोगणाचा उपयोग करणें झाल्यास कोपल रोगणाचा उपयोग करावा.’ - मॅरट २५.
कोफल न. एक प्रकारचे तेल, वार्निश : ‘रोगणाचा उपयोग करणें झाल्यास कोपल रोगणाचा उपयोग करावा.’ - मॅरट २५.
कोपळी स्त्री. काटेरी झुडूप. (व.)
कोपी स्त्री. काटेरी झुडूप. (व.)
कोपळे न. कोपळी तोडण्याचे हत्यार. (व.)
कोपान्नल पु. क्रोधाग्नी.
कोपायमान वि. रागवलेला; संतप्त. [सं. कुप्यमान]
कोपिष्ट वि. ज्याला लवकर राग येतो असा; शीघ्र संतापी.
कोपी वि. ज्याला लवकर राग येतो असा; शीघ्र संतापी.
कोपी स्त्री. १. शेतातील झोपडे; खोपट. पहा : कोप, कोपट : ‘आश्रमासी स्थान कोपी गुहा ।’ - तुगा २७२५. २. वृक्षाची ढोली : ‘अन्न कोपीसी ठेवी.’ - गोप्र ७७.
कोपीण न. स्त्री. लंगोटी. (क्रि. नेसणे.) : ‘नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण ।’ - तुगा २८३०. [सं. कोपीन]
कोपीन न. स्त्री. लंगोटी. (क्रि. नेसणे.) : ‘नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण ।’ - तुगा २८३०. [सं. कोपीन]
कोफता पु. गोळा (स्वयंपाकातील) : ‘खेम्याचे कोफते म्हणजे गोळे करून...’ - गृशि २·२१०. [फा. कोफ्ता = कुटलेला गोळा (मांसाचा)]
कोफेहाट पु. एकप्रकाचे दुकान, बाजार : ‘कोफेहाट... धनगरहाट’ - स्थापो ८१.
कोबरी पु. मातीचे एक भांडे. (कु.) [सं. खर्पर]
कोबले न. आंबे काढण्याकरिता काठीला बांधले जाणारे जाळे; घळ; झील; झेलगे; झेला.
कोबलेबारक न. टिन. पहा : कोपरबरास
कोबरब्राक न. टिन. पहा : कोपरबरास
कोबा : पु. (वास्तु.) चुना, माती, कांक्रीट, सिमेंट, शेळीच्या लेंड्या इ. चे मिश्रण. ह्याने जमीन, गच्ची तयार करतात.
कोबाया स्त्री. कलकल करणाऱ्या बाया, स्त्रिया. (व.)
कोबाळ पु. १. फारसे काम न करणारा मुलगा, म्हातारा इ. निरुपयोगी लोकांचा समुदाय (चि.). २. सटरफटर वस्तू.
कोबी स्त्री. पानांचा एक गड्डा; भाजी. ही युरोपीय लोकांनी आणलेली असून हिचे तीन-चार प्रकार आहेत. ही थंडीच्या दिवसात व चांगल्या जमिनीत तयार होते. कोबू. (गो.) [इं. कॅबेज]
कोब स्त्री. पानांचा एक गड्डा; भाजी. ही युरोपीय लोकांनी आणलेली असून हिचे तीन-चार प्रकार आहेत. ही थंडीच्या दिवसात व चांगल्या जमिनीत तयार होते. कोबू. (गो.) [इं. कॅबेज]
कोबीट न. फाळ नसून बोंडशी असलेला बाण, तीर.