शब्द समानार्थी व्याख्या
कोमाळणे   प्रेमाने अंगावरून हात फिरवणे; कुरवाळणे; गोंजारणे. (व.) : ‘कोम्हायता फुटे पान्हा’ - बगा १. [सं. कोमल]
कोम्हायणे   प्रेमाने अंगावरून हात फिरवणे; कुरवाळणे; गोंजारणे. (व.) : ‘कोम्हायता फुटे पान्हा’ - बगा १. [सं. कोमल]
कोम्हाळणे   प्रेमाने अंगावरून हात फिरवणे; कुरवाळणे; गोंजारणे. (व.) : ‘कोम्हायता फुटे पान्हा’ - बगा १. [सं. कोमल]
कोमेणे   पहा : कोमणे, कोमजणे : ‘वदनेंदु कोमेला कळाहीन वाटे सुखसंपत्ती ।’ - पला ४४.
कोमेतुला पु. १. समुद्रातील एक प्राणी. २. सपक्ष, सकेश तारा.
कोय स्त्री. १. आंब्याच्या फळातील बाठ, आठी, अठळी; बीज. २. बाठीतील गर; बाठांच्या पोटी असणारा दोन अवयवरूपी अंश. ३. (ल.) अंडकुली. ४. ताड फळाच्या गिरावरील कवची. ५. आंब्याच्या अर्ध्या बाठीची भिंगरी. [क. काई]
कोय पु. डोंगर. (आगरी) [फा. कोह = पर्वत]
कोयकमळ न. श्वेतकमळ; कुवलय. [सं. कुवलय]
कोयका पु. गुन्हेगार जातीतील पोलीस या अर्थाचा शब्द.
कोयकानाई पु. पोलीस शिपाई.
कोयकोय स्त्री. कुत्र्याचे किंवा त्याच्या पिल्लांचे भुंकणे; ओरडणे; क्यांव-क्यांव करणे.
कोंयकोंय स्त्री. कुत्र्याचे किंवा त्याच्या पिल्लांचे भुंकणे; ओरडणे; क्यांव-क्यांव करणे.
कोयडे   पहा : कुवेडे
कोयडेबार न. विटीदांडूचा खेळ. (गो.)
कोयतट न. आंब्यातील कोयीला तिरस्कारार्थी म्हणतात.
कोयतपट्टी स्त्री. जी जमीन नांगरटीस करायला योग्य नसल्याने हातांनीच कसतात, अशा जमिनीवर कोयतांच्या संख्येनुसार बसविण्यात येणारी पट्टी.
कोयता पु. १. लाकूड तोडण्याचे एक हत्यार. कोयतो : ‘मी हिवाने मेलो घे माझो कोयतो.’ - भज ८ (गो.) २. केस काढण्याचे हत्यार. (ढोर) [क. कोयित = विळा]
कोयताड न. कोयतीसारखे मोठे कणीस; मोठी आकडेदार चिंच वगैरे.
कोयताल न. शेताच्या कडेची जमीन. (बे.)
कोयती स्त्री. लहान कोयता; कोकणात भात कापण्याच्या कोयतीला करवतीसारखे दाते असतात. तिला दाती कोयती असेही म्हणतात.
कोयते न. लहान कोयता, कोयती. (राजा)
कोयतूल न. लहान कोयता, कोयती. (राजा)
कोयतेवाल पु. कोयतीच्या आकाराच्या शेंगा असणारे वाल; खरसांबळ.
कोयतो   एक अलंकार.
कोयनळ पु. दोन रुखांवर खुंट्या मारून त्यावर एक आडवे लाकूड मारतात त्यास कोयनळ म्हणतात. कोयनळावर कोळंब्याची एक बाजू टेकलेली असते. (को.)