शब्द समानार्थी व्याख्या
क्वाडका न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
क्वाडके न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोरडी आग स्त्री. भयंकर मोठी आग.
कोरडी ओकारी स्त्री. १. घशात बोटे घालून मुद्दाम काढलेली ओकारी. सकाळी तोंड धुताना घशात बोटे घालून काढलेले खाकरे. (क्रि. देणे, काढणे.) २. ओकारी येतेसे वाटणे; (क्रि. येणे.). पोटात ढवळल्याप्रमाणे होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते, हृदयात पीडा होते, ओकारी येते परंतु अन्न पडत नाही अशा वेळी म्हणतात.
कोरडी खाकरी स्त्री. १. घशात बोटे घालून मुद्दाम काढलेली ओकारी. सकाळी तोंड धुताना घशात बोटे घालून काढलेले खाकरे. (क्रि. देणे, काढणे.) २. ओकारी येतेसे वाटणे; (क्रि. येणे.). पोटात ढवळल्याप्रमाणे होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते, हृदयात पीडा होते, ओकारी येते परंतु अन्न पडत नाही अशा वेळी म्हणतात.
कोरडीक स्त्री. बैलाला बांधलेला दोर. पहा : बैला, बैली, कोरडिके ४
कोरडी किटाळ स्त्री. १. (शब्दशः) कोरडी ठिणगी. २. (ल.) तोहमत; आळ. (क्रि. घालणे, उठवणे, घेणे.)
कोरडी किरकिर स्त्री. विनाकारण त्रास, कटकट, तक्रार, पिरपिर, भुणभुण.
कोरडी जागा स्त्री. वरकड कमाई नसणारी अधिकाराची जागा.
कोरडी जांभई स्त्री. श्रमामुळे आलेली (झोपेमुळे नव्हे) जांभई.
कोरडी जांभळी स्त्री. श्रमामुळे आलेली (झोपेमुळे नव्हे) जांभई.
कोरडी दारू   वायबाराची दारू; वायबार.
कोरडी पद्धत स्त्री. (कृषी.) केवळ पावसाच्या पाण्यावर केलेली शेती.
कोरडी भिक्षा   तांदूळ, गहू वगैरे धान्याची भिक्षा.
कोरडी मेजवानी स्त्री. अन्नाशिवाय मेवामिठाईची आणि तळणावळणाची मेजवानी; उपाहार.
कोरडी सवाशीण स्त्री. जेवणाखेरीज ओटी भरून कुंकू लावून जिची बोळवण करतात अशी सवाष्ण. ब्राह्मणेतरांच्या घरी ब्राह्मण सवाष्ण बोलावतात तेव्हा तिचा याप्रकारे सत्कार करतात.
कोरडे अंग   वांझपणा; वांझ कूस.
कोरडे कष्ट पुअव. विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत.
कोरडे श्रम पुअव. विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत.
कोरडे काम न. १. विटाळशेपणी व पाचव्या दिवशी न्हाऊन शुद्ध होण्यापूर्वी करायचे काम. २. वेळ घालविण्याकरिता केलेले सटरफटर काम.
कोरडे तप न. श्रद्धाहीन, भक्तिहीन तपश्चर्या, आराधना.
कोरडे बोलणे न. वरकांती, मनापासून नव्हे असे भाषण, बडबड.
कोरडे भाषण न. वरकांती, मनापासून नव्हे असे भाषण, बडबड.
कोरडे ब्रह्मज्ञान न. आचरण नसताना सांगितलेला वेदांत, परमार्थविद्या; बकध्यान; भोंदूपणा, ढोंग.
कोरडे वैर न. निराधार द्वेष, मत्सर.