शब्द समानार्थी व्याख्या
कोरडे सुख न. उपभोगाशिवाय सुख; नाममात्र आनंद.
कोरड्या गाथा स्त्रीअव. बनावट बातम्या; भुमका; कंड्या.
कोरड्या टाकाचा हिशेब   ज्यात यत्किंचितही फेरबदल करण्यासाठी लेखणी शाईत बुडविली गेली नाही असा स्वच्छ, बिनचूक लिहिलेला जमाखर्च; तक्ता; चोख हिशोब. (क्रि. देणे, करणे.)
कोरड्या टाकाचा हिशोब   ज्यात यत्किंचितही फेरबदल करण्यासाठी लेखणी शाईत बुडविली गेली नाही असा स्वच्छ, बिनचूक लिहिलेला जमाखर्च; तक्ता; चोख हिशोब. (क्रि. देणे, करणे.)
कोरड्या टाकाचा हिसाब   ज्यात यत्किंचितही फेरबदल करण्यासाठी लेखणी शाईत बुडविली गेली नाही असा स्वच्छ, बिनचूक लिहिलेला जमाखर्च; तक्ता; चोख हिशोब. (क्रि. देणे, करणे.)
कोरड्यास न. भात, भाकरी इत्यादीच्या जोडीला खायचा कालवणासारखा पदार्थ; कालवण : ‘चूल पेटली, वांग्याचे कोरड्यास गाडग्यात रटरटू लागले.’ - हपा २१.
कोरण न. १. कोरान्न; कोरडी भिक्षा : ‘कोरणें मागुन झोळी भरली ।’ - भज ४२, २. (रसा.) द्रावककोरण; रासायनिक क्रियेमुळे होणारे कोरण, खड्डा. ३. धातूच्या पत्र्यावर आम्लाने नक्षी किंवा अक्षरे कोरणे.
कोरणे न. कोरान्न; कोरडी भिक्षा : ‘कोरणें मागुन झोळी भरली ।’ - भज ४२
कोरण स्त्री. खोबण; खाच; (खिडकीच्या झडपांच्या खालच्या पट्टीतील) कोरून काढलेला भाग.
कोरणचिन्ह न. (भूशा.) विशिष्ट द्रावणाने विशिष्ट जातीच्या स्फटिकावर उमटणाऱ्या खुणा.
कोरणछिन्नी स्त्री. (स्था.) दगड कोरण्याचे हत्यार.
कोरणमुद्रक पु. कोरणारा; कोरीव काम करणारा.
कोरणी स्त्री. (स्था.) कोरीव कामासाठी वापरले जाणारे हत्यार.
कोरणी स्त्री. न. १. कोरणेपासून धातुसाधित नाम. कोरण्याची क्रिया; खोदणी. २. कोरण्याचे साधन; शस्त्र (मूर्ती, कान, नालबंदी करताना घोड्याचे खूर) कोरण्याच्या कामी उपयोगी; मातीच्या चित्राच्या कामी लागणारी करणी. ही पितळी, लोखंडी किंवा लाकडाची असून गुळगुळीत, सभोवार चपटी व निमुळती गोलटे मारलेली असते. चुनाळ्याची कोरणी त्याला साखळीने अडकवलेली असते. ती काडीसारखी पण तोंडाला चापट असते. ३. दुकानाच्या फळ्या काढघाल करण्यासाठी खालच्या व वरच्या उंबरठ्याला खोबण पाडलेली असते ती सर्व रचना.
कोरणे स्त्री. न. १. कोरणेपासून धातुसाधित नाम. कोरण्याची क्रिया; खोदणी. २. कोरण्याचे साधन; शस्त्र (मूर्ती, कान, नालबंदी करताना घोड्याचे खूर) कोरण्याच्या कामी उपयोगी; मातीच्या चित्राच्या कामी लागणारी करणी. ही पितळी, लोखंडी किंवा लाकडाची असून गुळगुळीत, सभोवार चपटी व निमुळती गोलटे मारलेली असते. चुनाळ्याची कोरणी त्याला साखळीने अडकवलेली असते. ती काडीसारखी पण तोंडाला चापट असते. ३. दुकानाच्या फळ्या काढघाल करण्यासाठी खालच्या व वरच्या उंबरठ्याला खोबण पाडलेली असते ती सर्व रचना.
कोरणे उक्रि. १. एखाद्या पदार्थावरील थोडा थोडा अंश नाजूक रीतीने काढणे; पोखरणे; खोदणे; नकसणे (आकार देण्यासाठी किंवा आतील भाग काढण्यासाठी) : ‘तो काष्ठें कोरूं धांवे ।’ -ज्ञा १८·७१९. २. कान, दात यातील मळ काढणे. ३. एखाद्याचे द्रव्य त्याच्या नकळत थोडे थोडे युक्तिप्रयुक्तीने बळकावण्याचा व्यापार, उद्योग. [क. कोरे = खोदणे, भोक पाडणे] (वा.) दात कोरून पोट भरणे - अतिशय कंजूषपणा करणे.
कोरदार वि. कंगणीदार : ‘मृदुतर थिरमे त्या कोंचक्या कोरदारा ।’ - सारुह ३·४०.
कोरदृष्टी स्त्री. तिरपी नजर; चोराची नजर; चोरून पाहणे; न्याहाळणे : ‘कोरदृष्टीने असावें पहात ।’ - कथा १·६·१९६.
कोरनगटी   पहा : कोरनाड : ‘पीतवसन परिधान कोरनगटी त्यावर भरजरी ।’ - मला २३५.
कोरनाड वि. या पेठेच्या साड्या व लुगडी (रेशमी, जरीची), (तंजा.) [क. कोरे = लग्नप्रसंगीचे वस्त्र; भारी वस्त्र + नाड = देश, पेठ]
कोरनितकोर वि. भाकरी, पोळीचा लहानसा तुकडा; अगदी थोडासा : ‘कुणी कोरनितकोर (भाकरी) दिली ती घेऊन ओढ्याकाठी गेला.’ - गागो ४७.
कोरप न. १. गोवऱ्यांची आगटी; झगरे. (को.), २. बंदुकीचा काना.
कोरपट्टी स्त्री. वेलबुट्टी व कशिदा काढलेला काठ. ही कापडाला स्वतंत्रपणे जोडतात.
कोरपणा स्त्री. रुखरुख. (कर.)
कोरपा वि. वाळून शुष्क झालेला (पदार्थ). (व.)