शब्द समानार्थी व्याख्या
कोरफड स्त्री. कडू गर असलेल्या जाड, कडेला काटे असलेल्या पातीची औषधी वनस्पती. ही वनस्पती पाण्याशिवाय वाढते. जुन्या पात्या सुकल्या म्हणजे नव्या पात्या फुटून ही वनस्पती नेहमी ताजी राहते. म्हणून हिला कुवारी, कुमारी, कुवारकांडे म्हणतात. हिच्या रसापासून कडू (काळा) बोळ तयार करतात.
कोरफड न. कोरफडीपासून तयार केलेला पदार्थ : औषध : ‘कोरफडीच्या पानाचे औषधी उपयोग पुष्कळ आहेत.’ - वनश्री ४००. [सं. कुमारी]
कोरबंद वि. चिडखोर; त्रासिक.
कोरबंदी स्त्री. १. बरकस; द्वेष. २. एका ओळीत सैन्याची रचना करणे : ‘त्या बाबा फडक्याची कोरबंदी न्यारी ।’ - ऐपो २८१.
कोरबी स्त्री. झिंगा; एक प्रकारचा मासा. (को.) [क. कोरव]
कोरबू पु. गावातील एक बलुतेदार. ही धनगर जात आहे. कोरबूची कामे पुष्कळ आहेत. पैकी प्रवाशांची बडदास्त ठेवणे, त्यांची ओझी वाहणे, रयतेपासून सरकार देणे-घेणे वसूल करणे इ. : ‘मंगळवेढेकर कोरबूचे कांहीं खटले होते...’ - हरिवंब ११.
कोरभू पु. गावातील एक बलुतेदार. ही धनगर जात आहे. कोरबूची कामे पुष्कळ आहेत. पैकी प्रवाशांची बडदास्त ठेवणे, त्यांची ओझी वाहणे, रयतेपासून सरकार देणे-घेणे वसूल करणे इ. : ‘मंगळवेढेकर कोरबूचे कांहीं खटले होते...’ - हरिवंब ११.
कोरभारण न. (स्था.) चंद्रकोरीच्या आकाराचे घातलेले भरवण.
कोरम वि. पहा : कोरंब. १. (लाकूड किड्याने पोखरून पोकळ केले म्हणजे त्याला कोरम म्हणतात. त्यावरून लक्षणेने) पोकळ; पोखरलेले : ‘आतून जीर्ण व कोरम झालेले हें जुनें खोड.’ - महादजी चरित्र १. २. क्षीण; दुर्बल; निःसत्व : ‘वाढत्या खर्चाची धोंड आधींच कोरम झालेल्या शेतकऱ्यांवर पडता कामा नये.’ - के ७·१·१९४१. [सं. कृमि]
कोरम पु. न. सभेस आरंभ करण्यासाठी अवश्य ठरवलेली सभासदांची संख्या; गणपूर्ती. [इं.]
कोरमा पु. एक मांसयुक्त खाद्य.
कोरमेनचे क्रि. पोखरणे. (गो.)
कोरला पु. कांचनाच्या जातीचा एक रानटी वृक्ष. याची भाजी चवदार असते. गंडमाळा व अदची रोगात सालीचा काढा गुग्गुळाबरोबर देतात.
कोरवट वि. नव्यासारखे; कोरे. पहा : कोरवाण
कोरवडा पु. कोहळ्याचा कीस घालून केलेला उडदाच्या पिठाचा वडा. (व.) : ‘सहित पापडे कथिकवडे, आणिक कोरवडे ।’ -अमृतसुदाम १४.
कोरवण न. घर शाकारणीचे गवत.
कोरवाण न. १. अगदी नवे कोरे दिसणारे कापड. २. हलक्या प्रतीचे कापड.
कोरवाण वि. १. (वस्त्रोद्योग) मागावरून काढलेले परंतु पांजणी न केलेले (वस्त्र अगर तागा). हा अर्थ कोमटी लोकांत रूढ आहे. २. (सामा.) अगदी कोरे करकरीत; ताजे; नवे (कापड, मोती, भांडी, दागिने वगैरे).
कोरवान न. १. अगदी नवे कोरे दिसणारे कापड. २. हलक्या प्रतीचे कापड.
कोरवान वि. १. (वस्त्रोद्योग) मागावरून काढलेले परंतु पांजणी न केलेले (वस्त्र अगर तागा). हा अर्थ कोमटी लोकांत रूढ आहे. २. (सामा.) अगदी कोरे करकरीत; ताजे; नवे (कापड, मोती, भांडी, दागिने वगैरे). ३. कपाळावर केसांची कोर ठेवली आहे किंवा ठेवण्याचे वय झाले आहे असे. (दहा बारा महिन्यांचे मूल). पहा : कोर धरणे
कोरसी वि. वक्रदृष्टी : ‘तो कोरसीया कोनाडी : परिछेदाचे सीर पाडी.’ - मूप्र २१५३.
कोरष्टाण   पहा : कोरटाण
कोरसाण   पहा : कोरटाण
कोरळ पु. एक झाड. पिवळा कांचन. [क. करले]
कोरळा पु. समुद्राच्या कडेला मासे खाऊन राहणारा, पिवळ्या पायाचा व चोचीचा, पांढऱ्या रंगाचा एक पक्षी. (कुलाबा)