शब्द समानार्थी व्याख्या
कोलडे न. १. एक प्रकारच्या गवताचे बी. कबुतरे हे बी खातात. २. एक प्रकारचे बारीक धान्य.
कोलणे उक्रि. १. (विटीदांडू) गलीवरची विटी दांडूने उडविणे : ‘रावबानें प्रथम कोललें व त्याची विटी झेलली गेली.’ - सुदे ६. २. आपणावरची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे. (कामाची, देण्याघेण्याची इ.) : ‘निकड कार्य करणें आल्या दुसऱ्यावर कोलत्यें ।’ - प्रल १७०. ३. लोटणे; झिडकारणे; दूर फेकणे; नाकारणे; हडहड करणे; उडविणे. ४. पराजित करणे (वादविवादात). [क. कोलु = काठी] (वा.) कोलून मारणे - १. लाथेने झुगारून देणे; उडवून फेकणे, वर करणे; उचकणे. २. एका अंगावरून दुसऱ्या अंगावर वळविणे.
कोलवणे उक्रि. १. (विटीदांडू) गलीवरची विटी दांडूने उडविणे : ‘रावबानें प्रथम कोललें व त्याची विटी झेलली गेली.’ - सुदे ६. २. आपणावरची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे. (कामाची, देण्याघेण्याची इ.) : ‘निकड कार्य करणें आल्या दुसऱ्यावर कोलत्यें ।’ - प्रल १७०. ३. लोटणे; झिडकारणे; दूर फेकणे; नाकारणे; हडहड करणे; उडविणे. ४. पराजित करणे (वादविवादात). [क. कोलु = काठी] (वा.) कोलून मारणे - १. लाथेने झुगारून देणे; उडवून फेकणे, वर करणे; उचकणे. २. एका अंगावरून दुसऱ्या अंगावर वळविणे.
कोलता पु. निखारा. पहा : कोलित
कोलती स्त्री. १. मशाल; कोलीत जळता निखारा; पेटलेले लहान लाकूड : ‘पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचे हिरवेपण असे ।’ - ज्ञा १८·७९०. २. (ल.) द्वेष - मत्सर - दुष्ट बुद्धीने रचलेले कुभांड; खोटा आरोप. (क्रि. वर ठेवणे.) (वा.) कोलती, कोलेता लावणे - (ल.) कुभांड रचणे; दुष्ट आरोप करणे; कलागत लावणे : ‘लावूनि कोलित । माझा करितील घात ।’ - तुगा १००७.
कोलेता स्त्री. १. मशाल; कोलीत जळता निखारा; पेटलेले लहान लाकूड : ‘पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचे हिरवेपण असे ।’ - ज्ञा १८·७९०. २. (ल.) द्वेष - मत्सर - दुष्ट बुद्धीने रचलेले कुभांड; खोटा आरोप. (क्रि. वर ठेवणे.) (वा.) कोलती, कोलेता लावणे - (ल.) कुभांड रचणे; दुष्ट आरोप करणे; कलागत लावणे : ‘लावूनि कोलित । माझा करितील घात ।’ - तुगा १००७.
कोलदंडा पु. १. द्वाड कुत्र्याच्या गळ्याला बांधतात ते दांडके अगर गज. (क्रि. बांधणे.) २. (शिक्षेचा प्रकार) उकिडवे बसवल्यानंतर हातामध्ये पाय अडकवून व हात बांधून कोपरे व गुडघे यांच्या मधून घातलेला दांडा : ‘जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड ।’ - स्वादि २·३·३८. ३. विघ्न; अडथळा : ‘साम्यवादी पक्षाच्या कोलदांड्यामुळे जर्मनीतील समाजवादी पक्ष अधिकार ग्रहण करू शकला नाही.’ - लोस ४० (ल) पेच; अडचण; कोडे : ‘म्हणून आदि पुरुष कर्तृक म्हणजे ईश्वरकर्तृक असा कोलदांडा पडतो.’ - के २५·१०·१९४०. [क. कोलु = काठी + दंड] (वा.) कोलदंडा, कोलदांडा, कोलदांड घालणे - अडथळा आणणे; दुसऱ्याचे काम यशस्वी होऊ न देणे : ‘नाना प्रकारचे कोलदांडे घालून...’ - ज्योफु १२७.
कोलदांडा पु. १. द्वाड कुत्र्याच्या गळ्याला बांधतात ते दांडके अगर गज. (क्रि. बांधणे.) २. (शिक्षेचा प्रकार) उकिडवे बसवल्यानंतर हातामध्ये पाय अडकवून व हात बांधून कोपरे व गुडघे यांच्या मधून घातलेला दांडा : ‘जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड ।’ - स्वादि २·३·३८. ३. विघ्न; अडथळा : ‘साम्यवादी पक्षाच्या कोलदांड्यामुळे जर्मनीतील समाजवादी पक्ष अधिकार ग्रहण करू शकला नाही.’ - लोस ४० (ल) पेच; अडचण; कोडे : ‘म्हणून आदि पुरुष कर्तृक म्हणजे ईश्वरकर्तृक असा कोलदांडा पडतो.’ - के २५·१०·१९४०. [क. कोलु = काठी + दंड] (वा.) कोलदंडा, कोलदांडा,कोलदांड घालणे - अडथळा आणणे; दुसऱ्याचे काम यशस्वी होऊ न देणे : ‘नाना प्रकारचे कोलदांडे घालून...’ - ज्योफु १२७.
कोलदांड पु. १. द्वाड कुत्र्याच्या गळ्याला बांधतात ते दांडके अगर गज. (क्रि. बांधणे.) २. (शिक्षेचा प्रकार) उकिडवे बसवल्यानंतर हातामध्ये पाय अडकवून व हात बांधून कोपरे व गुडघे यांच्या मधून घातलेला दांडा : ‘जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड ।’ - स्वादि २·३·३८. ३. विघ्न; अडथळा : ‘साम्यवादी पक्षाच्या कोलदांड्यामुळे जर्मनीतील समाजवादी पक्ष अधिकार ग्रहण करू शकला नाही.’ - लोस ४० (ल) पेच; अडचण; कोडे : ‘म्हणून आदि पुरुष कर्तृक म्हणजे ईश्वरकर्तृक असा कोलदांडा पडतो.’ - के २५·१०·१९४०. [क. कोलु = काठी + दंड] (वा.) कोलदंडा, कोलदांडा, कोलदांड घालणे - अडथळा आणणे; दुसऱ्याचे काम यशस्वी होऊ न देणे : ‘नाना प्रकारचे कोलदांडे घालून...’ - ज्योफु १२७.
कोलदेव पु. करकोचा किंवा कुदळपक्षी. (कुलाबा)
कोलन न. (भूशा.) वनस्पतिजन्य पदार्थांचे कोळशामध्ये रूपांतर होण्याची क्रिया.
कोलन पु. अगदी लहान खड्डा. (व.) [क. कोळ = डबके, तळे]
कोलन वर्गीकरण   (ग्रंथ.) रंगनाथन यांनी रूढ केलेली वर्गीकरणपद्धती; द्विबिंदू वर्गीकरणपद्धती.
कोलनाडॉ   पहा : कोलदांडा (गो.)
कोन्नाडॉ   पहा : कोलदांडा (गो.)
कोलबोल पु. कौल; संरक्षण : ‘मुलखास कोलबोल देऊन बंदोबस्त करणें.’ - ऐच ८९.
कोलभांड वि. भांडकुदळ; भांडणात पटाईत.
कोलम न. १. तांबडे जाडे शाकारणीचे गवत. २. एक प्रकारचे भात; तांदूळ.
कोलम पु. पोहरा; पाणी पाजण्यासाठी किंवा आंबोण ठेवण्यासाठी उपयोगी असणारे मातीचे रुंद तोंडाचे भांडे : ‘म्हस्के धनगर याने राखीचा कोलम चोरिला सबब...’ - पेसा ३८.
कोलमडणे उक्रि. १. अडखळणे; ठेचकळणे; मागे ओढणे; दुसऱ्या बाजूवर पडणे, उलटणे. २. खाली कोसळून पडणे; पाडणे (सोसाट्याच्या वाऱ्याने झाड इ.). [क. कोला + माड = आडकाठी]
कोलमाडणे उक्रि. १. अडखळणे; ठेचकळणे; मागे ओढणे; दुसऱ्या बाजूवर पडणे, उलटणे. २. खाली कोसळून पडणे; पाडणे (सोसाट्याच्या वाऱ्याने झाड इ.). [क. कोला + माड = आडकाठी]
कोलमाडा पु. १. एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाणे; एका कुशीवरून दुसऱ्या कुशीला वळणे. (क्रि. देणे.) २. उलटणे; ठेचाळणे; अडखळणे; कोलांटी खाणे; मागे ओढणे; कलाटणी. (क्रि. देणे). ३. (ल.) लांबणीवर टाकणे; टाळाटाळ; दिरंगाई. (क्रि. देणे.) [क. कोले + माडु]
कोलवा पु. घरावर घालायचा गवताचा जुना शाकार; सुपारी, नारळ इ. चा चूड. (राजा. गो.)
कोलवाकोलव स्त्री. १. टोलवाटोलवी; एकमेकांवर टाकणे (धंदा इ.); इकडून तिकडे असे. (क्रि. मारणे, उडविणे.) २. चुकवाचुकव; अनास्था; टाळाटाळ. [कोलणेचे द्वि.]
कोलाकोल स्त्री. १. टोलवाटोलवी; एकमेकांवर टाकणे (धंदा इ.); इकडून तिकडे असे. (क्रि. मारणे, उडविणे.) २. चुकवाचुकव; अनास्था; टाळाटाळ. [कोलणेचे द्वि.]