शब्द समानार्थी व्याख्या
कोलाकोली स्त्री. १. टोलवाटोलवी; एकमेकांवर टाकणे (धंदा इ.); इकडून तिकडे असे. (क्रि. मारणे, उडविणे.) २. चुकवाचुकव; अनास्था; टाळाटाळ. [कोलणेचे द्वि.]
कोलवे न. अगदी लहान खोली, कोचके. [हिं. कोल, कौल]
कोलंगी स्त्री. अग्नीची ठिणगी : ‘एक लालचुटुक कोलंगी त्या जागी उमटली.’ - पेरणी ११७. (क्रि. उडणे.) [क. कोळ्ळि = कोलित]
कोलंबी स्त्री. खाऱ्या किंवा गोड्या पाण्यातला एक कवचधारी चवदार मासा : ‘ही संगीत कोलंबी तडतड नाचती पांई’ - संगीत घोटाळा ६.
कोला पु. १. कुत्रा. (बे.), २. जळता निखारा. (व.) [क. कोळ्ळा]
कोलाटी   पहा : कोल्हाटी [क. कोलु = काठी + अटिंग = खेळणारा]
कोयिटी   पहा : कोल्हाटी [क. कोलु = काठी + अटिंग = खेळणारा]
कोलाडा पु. हरळीसारखे गवत. (वाई)
कोलावण स्त्री. जहाजावरील जकात; संरक्षणाबद्दलचा, राज्यातून सुरक्षितपणे जाऊ देण्याबद्दलचा कर : ‘इंग्रजांस कोलावण माफ करून त्यांशी सख्य संपादावें.’ - ब्रच ५२.
कोलाहल पु. १. मोठा गलबला; गोंगाट; कलकलाट; ओरडा; गोंधळ; संमिश्र आवाज : ‘(त्या) कोलाहलात एवढी एकच गोष्ट न विसरण्याचा आपण प्रयत्न करू या.’ - भाआसं ३०. २. अनेक विचारांचा गोंधळ : ‘मनात खूप कोलाहल चालला होता.’ - निअ ३६७. [सं.]
कोलाहळ पु. १. मोठा गलबला; गोंगाट; कलकलाट; ओरडा; गोंधळ; संमिश्र आवाज : ‘(त्या) कोलाहलात एवढी एकच गोष्ट न विसरण्याचा आपण प्रयत्न करू या.’ - भाआसं ३०. २. अनेक विचारांचा गोंधळ : ‘मनात खूप कोलाहल चालला होता.’ - निअ ३६७. [सं.]
कोलांटी स्त्री. एक विशेष प्रकारची उडी; खाली डोके करून उलटी उडी मारणे. (वि. प्र.) कोलांटी उडी. [क.] (वा.) कोलांटी उडी मारणे - राजकारणात वा अन्यत्र सोयीनुसार आपली मूळ भूमिका बदलणे, टोपी फिरवणे.
कोलित वि. रक्षणकर्ता. [सं. कुल = आप्ताप्रमाणे वागणे]
कोलिसा पु. कोळसा : ‘कोलिसा कालेपणें घडिला जैसा ।’ - राज्ञा १८·७४६.
कोलिसे न. १. रेशमासारखे पांढऱ्या अंगाचे कोळी वगैरे किड्यांनी बनविलेले जाळे किंवा घरटे. याचे बंदुकीसाठी वेष्टन करतात. २. तोड्याच्या बंदुकीला रेशमाचे दिलेले वेष्टन.
कोलिस्त न. सूक्ष्म शेष; तालीमखाना; इक्षुगंधा; कोकिलाक्ष; इक्षुर.
कोली कोलूक स्त्री. कुत्री; कोलगे. (गो. बे.)
कोली स्त्री. विटीदांडू, गोट्या इ. खेळण्यास करतात ती खळी, गल. पहा : कोल
कोली पु. कोळी : ‘तेणें कोलियें त्रिजगती । एकावट केली ॥’ - राज्ञा १८·१७०.
कोलीत न. पहा कोलती
कोलीत काकण न. आलातचक्र; पेटते लाकूड गरगरा फिरवले असता दिसणारी कंकणाकृती आकृती.
कोलीस न. कुंडीत वाढणारी एक वनस्पती.
कोलू पु. १. घाणा. २. पहा : कोलदांडा [क.] ३. विटी. ४. घरावरचे जुने शाकार (चुडते, गवत इ.). (गो. कु.) पहा : कोलवा
कोलेती स्त्री. खाजकुयली नावाची वनस्पती.
कोलो पु. कोल्हा. (खा. को.)