शब्द समानार्थी व्याख्या
कोल्ही वि. कोल्ह्याच्या रंगाची (तोंड, पोट, पाय काळे बाकी सर्व पांढरे असलेली) मेंढी.
कोल्ही स्त्री. जोंधळ्यांची एक जात. याचा दाणा वर दिसून येत नाही.
कोल्हू पु. उसाचा चरक; तेल्याचा घाणा. [हिं.]
कोल्हे न. भोपळ्याच्या आकाराचा, बियाणे ठेवण्याचा भाताण्याचा (पेंढ्याचा) मुडा, भांडे. [क. कोळवी = तेल इ. ठेवण्याचा नळा]
कोल्हेल न. भोपळ्याच्या आकाराचा, बियाणे ठेवण्याचा भाताण्याचा (पेंढ्याचा) मुडा, भांडे. [क. कोळवी = तेल इ. ठेवण्याचा नळा]
कोल्हेकुई स्त्री. १. कोल्ह्यांची आरडाओरड; हुकी. २. (ल.) क्षुद्र लोकांची एखाद्याच्या विरुद्ध निरर्थक बडबड; क्षुद्र अडथळा : ‘जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार?’ - प्रेमसंन्यास.
कोल्हेखोक स्त्री. डांग्या खोकला. (आयुर्वेद आश १८५४)
कोल्हेटेकण न. मावळण्यास येणे (सूर्य, दिवस). कोल्हा मागच्या पायावर बसला म्हणजे जमिनीपासून जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सूर्य मावळताना क्षितिजापासून असला म्हणजे म्हणतात. विशेषतः चतुर्थी विभक्तीत बसणे किंवा येणे बरोबर उपयोग. (वा.) कोल्हे टेकण्यास बसणे - कोल्ह्याप्रमाणे दबकून बसणे. कोल्हे टेकण्यास येणे - वयामुळे अशक्तपणा येणे.
कोल्हेटेकणे न. मावळण्यास येणे (सूर्य, दिवस). कोल्हा मागच्या पायावर बसला म्हणजे जमिनीपासून जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सूर्य मावळताना क्षितिजापासून असला म्हणजे म्हणतात. विशेषतः चतुर्थी विभक्तीत बसणे किंवा येणे बरोबर उपयोग. (वा.) कोल्हे टेकण्यास बसणे - कोल्ह्याप्रमाणे दबकून बसणे. कोल्हे टेकण्यास येणे - वयामुळे अशक्तपणा येणे.
कोल्हेबुद्धी स्त्री. हलकी बुद्धी; लबाडी : ‘...अशा कोल्हेबुद्धीची गोष्ट करीत असतील’ - ऐलेसं ५१६.
कोल्हेभूंक स्त्री. १. कोल्ह्याची हुकी, ओरडा; कोल्हेकुई. २. मोठी पहाट; प्रभात.
कोल्हेभोंक स्त्री. १. कोल्ह्याची हुकी, ओरडा; कोल्हेकुई. २. मोठी पहाट; प्रभात.
कोल्हेर न. लाकूड.
कोल्हेशाही स्त्री. लुच्चेगिरी : ‘असला कोल्हेशाई प्रश्न कशाला?’ - लोटिकेले १·२६.
कोल्हेशाई स्त्री. लुच्चेगिरी : ‘असला कोल्हेशाई प्रश्न कशाला?’ - लोटिकेले १·२६.
कोल्हेहूक स्त्री. १. कोल्ह्याची हुकी; कोल्हेकुई. २. (ल.) मोठमोठ्याने ओरडून हल्ला करणे.
कोल्हौर न. भुयारातील देऊळ : ‘- किं श्रृंघार कोल्हौरीची महाकाळी ।’ - उगी ४२३.
कोल्हौरी स्त्री. मातीचे चित्र; पुतळा : ‘देखौनि स्थानी कोल्हौरीचि जाली ।’ - रुस्व १०९.
कोवणे उक्रि. १. जुने होणे; (मडके इ. ची वाईट अथवा कोरेपणाची) घाण नाहीशी होणे; कोरेपणा जाणे. २. (ल.) रुळणे; सरावणे; निर्ढावणे (वाईट गोष्टीत).
कोवरी स्त्री. १. फणसाची कुयरी. २. फणसाची बी; आठळी.
कोवला वि. कोमल; ताजा; नाजूक; मृदुभाव असलेला : ‘विरुढे कोवलां अंकुरीं तैसे । रोमांच आले ॥’ - राज्ञा ११·२४३.
कोवली वि. कोमल; ताजा; नाजूक; मृदुभाव असलेला : ‘विरुढे कोवलां अंकुरीं तैसे । रोमांच आले ॥’ - राज्ञा ११·२४३.
कोवले वि. कोमल; ताजा; नाजूक; मृदुभाव असलेला : ‘विरुढे कोवलां अंकुरीं तैसे । रोमांच आले ॥’ - राज्ञा ११·२४३.
कोवसप अक्रि. मुरणे. पहा : कोवणे
कोवसा पु. १. आधार; आश्रय. (क्रि. देणे, करणे.) २. कैवारी; आश्रयदाता. पहा : कंशा : ‘जो भक्तांचा कोंवसा ।’ - दास २·७·४. ३. रेशमी किडा. [क. वस = आच्छादणे]