शब्द समानार्थी व्याख्या
कोवळणे अक्रि. आलिंगणे. पहा : कवळणे
कोवळलूस वि. अतिशय कोवळा; मऊ : ‘कोवळलूस गवत...’ - जैत ३१४.
कोवळसर वि. १. जरा कोवळा (नारळ, सुपारी इ.) २. लहानसर; अपक्व; नाजूक.
कोवळा वि. १. लहान; कच्चा; अपक्व; हिरवा. २. ताजा. ३. (ल.) नाजूक; सौम्य (सकाळ, सूर्यकिरण, ऊन). ४. कच्ची; अडाणी; अप्रगल्भ (ग्रहणशक्ती, समजूत). ५. अर्धवट; कोता; अप्रौढ; अपूर्ण (सल्लामसलत, विचार). ६. कमी बळकट; नाजूक; कोमल. ७.ज्याची नुकतीच सुरुवात झाली आहे असा. [सं. कोमल]
कोवळा पु. भोपळा; कोहळा : ‘काही बेसनाची, काही मुगाची, काही कोवळ्याची अशी गोडखारी भजी घेतली.’ - वानगी २२५.
कोवळा किरळा वि. लहान आणि नाजूक (अंकुर फुटलेला).
कोवळीक स्त्री. १. कोवळेपणा; (अप्रौढतेतील) नाजूकपणा, अशक्तपणा. २. तारुण्याचा बहर; नवेपणा; टवटवीतपणा. ३. मृदुपणा : ‘आणि महाबोधीं कोंवळीक दुणावली ॥ - ज्ञा १·३४.
कोवळीक वि. कोवळी.
कोवा पु. कोका; किनरी (कानफाट्याची); एकतारी. [क. कोवा]
कोवा स्त्री. (भिक्षुक लोकात सांकेतिक) विधवा.
कोवाडी वि. जादूगार.
कोवारी वि. कोवळी : ‘चंदनाची आवघी कोवारी : बाणें कापली राहे वरिचां वरी :’ - रुस्व ३४४.
कोवारीण स्त्री. पहा : कुवारीण. (बायकी) जिला बोडणात अगर देवीच्या पूजेला (नवरात्रात) बसविंतात व जेवायला घालतात अशी लग्न न झालेली आठ अगर त्याहून कमी वयाची मुलगी. (वा.) कोवारीण जाणे - पूजा, उत्सव इ. प्रसंगी कुमारिका म्हणून जेवायला जाणे.
कोवासा पु. कोवसा; कैवारी : ‘ऐसा देवो माहाबळी । भक्तांचा कोवासा ।’ - क्रिपु १७·५१.
कोवाळी पु. कोहळा. (चि. कु.)
कोव्हाळी पु. कोहळा. (चि. कु.)
कोहाळी पु. कोहळा. (चि. कु.)
कोविद वि. विद्वान; पंडित; ज्ञाता; सूज्ञ; कुशल : ‘सांगी काय तुज तुझ्या पौत्रांचें युद्ध कोविदा राया ।’ - मोभीष्म ३·४९. [सं.]
कोविदार पु. एका जातीचे झाड; कोरल; कांचन; शिसू : ‘तुळसी करवीर कोविदार ।’ - हरि १०·१५९. [सं.]
कोवी स्त्री. पोखरलेला नारळ; बेले. (को.) [क. कोवि = पोकळ नळी]
कोव्हरी क्रिवि. कुठवर, किती वेळपर्यंत; कोठपर्यंत. (ना.)
कोव्हाळा पु. कोहाळा. याची भाजी, सांडगे इ. करतात. याचा पाकही करतात. तो पौष्टिक असतो. पहा : कोहळा (वा.) कोव्हाळा, कोव्हाळे रासणे - देवीप्रीत्यर्थ कोहळा कापणे. पाठारे प्रभू लोकांत देवक स्थापनेच्या वेळी कोहळा कापतात.
कोव्हाळे पु. कोहाळा. याची भाजी, सांडगे इ. करतात. याचा पाकही करतात. तो पौष्टिक असतो. पहा : कोहळा (वा.) कोव्हाळा, कोव्हाळे रासणे - देवीप्रीत्यर्थ कोहळा कापणे. पाठारे प्रभू लोकांत देवक स्थापनेच्या वेळी कोहळा कापतात.
कोव्हाळी स्त्री. कोहळ्याचा वेल.
कोव्हाळे न. तांबडा भोपळा.