शब्द समानार्थी व्याख्या
कोळऊ स्त्री. कोळ उवा; अंगावरील ऊ (म्हैस, डुक्कर इत्यादींच्या). पहा : कोळवू
कोळउंदीर पु. घूस. [सं. कोल]
कोळकुंदूर पु. घूस. [सं. कोल]
कोळकांदा पु. एक जंगली औषधी कांदा. (गो.)
कोळख स्त्री. ऐरणीचे लाकूड. (गो.)
कोळखण स्त्री. सोनाराचे सामान ठेवण्याचे लाकडी पात्र. (गो.)
कोळखंड न. बैलाचे वशिंड. (को.)
कोळखांदा न. बैलाचे वशिंड. (को.)
कोळगंड पु. (कोळी जातीला) तुच्छतेने म्हणतात.
कोळगा पु. भ्रमर : ‘उदैजेति परबिंबीं कळि कोळिगा राहिला कोंभीं ।’ - ऋ ९०. [सं. कुळिंग]
कोळिगा पु. भ्रमर : ‘उदैजेति परबिंबीं कळि कोळिगा राहिला कोंभीं ।’ - ऋ ९०. [सं. कुळिंग]
कोळगे न. तांब्याचे किंवा पितळेचे पिंप. हे लहान मोठ्या आकाराचे असते. (बे.) [क. कोळगा]
कोळणे   १. सक्रि. कालवणे; कुस्करून सार काढून घेणे : ‘जाड कोंडा वापरणे शक्य नसेल तर तो पाण्यात तास - दोन तास घालून कोळावा.’ - पाक ६२.
कोळणे उक्रि. कुसकरणे; (पाण्यात) हाताने चुरडणे; गर काढणे; पिळणे (चिंच, आंबा); सार, सत्त्व काढून घेणे.
कोळदांडा   पहा : कोलदांडा
कोळपणी स्त्री. कोळप्याने बेणणे; पेरलेल्या जमिनीतील तण काढणे; खुरपणी.
कोळपणे स्त्री. कोळप्याने बेणणे; पेरलेल्या जमिनीतील तण काढणे; खुरपणी.
कोळपणे अक्रि. करपणे; काळवंडणे; वरवर जळून काळे होणे; उन्हाने काळे पडणे (झाड, शरीर); चुलीत पेटलेले निखारे राखेने झाकले जाणे; जाळ न होता लाकूड काळे पडणे; धुमसणे; जळणे : ‘करीना शांत कांत ही कांत म्हणुन कोळपत्यें ।’ - प्रल २१८. [क. कोळ्ळि]
कोळपाट पु. पोळपाट. (तंजा.)
कोळपुटी स्त्री. माशांच्या डोक्याच्या तुकड्यांचे केलेले पक्वान्न, पदार्थ. (गो.)
कळपुटी स्त्री. माशांच्या डोक्याच्या तुकड्यांचे केलेले पक्वान्न, पदार्थ. (गो.)
कोळपुरुख पु. कुलदैवत : ‘मज कोळपुरुखु : उधारूनि देयावा’- लीचपू १४५.
कोळपे न. पु. वीतभर पीक उभे असताना उपयोगात आणायचे अवजार. याने पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हलविणे, भुसभुशीत करणे, आतील तण काढणे, पिकाला मातीची भर देणे ही कामे होतात. शेतीचे एक अवजार. [क. कोळ = फाळ, दात]
कोळप न. पु. वीतभर पीक उभे असताना उपयोगात आणायचे अवजार. याने पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हलविणे, भुसभुशीत करणे, आतील तण काढणे, पिकाला मातीची भर देणे ही कामे होतात. शेतीचे एक अवजार. [क. कोळ = फाळ, दात]
कोळमसणे अक्रि. कोळपणे : ‘मला हिरवा करायचा बेत केला हुता, त्यो असा कोळमसून चालला होता.’ - खळाळ १६०. [क.]