शब्द समानार्थी व्याख्या
कोंडणे उक्रि. १. चोहीकडून बंदिस्त करणे; अडकवून ठेवणे; अडविणे; बंद करणे (माणूस खोलीत घालून, नदीला बांध घालून इ.). २. (ल.) घोटाळ्यात घालणे, आणणे, गांगरविणे; कुंठित करणे; निरुपाय करणे (वाद इ. मध्ये). ३. गुंतणे; अडकून पडणे : ‘न कोंडे रसनेचिया चाडा । न पडे क्षुधेचा पांगडा ।’ - एभा ११·९३६.
कोंडपाणी न. (भूगोल) १. गुंफित प्रवाहांच्या परिसरातील साचलेले पाणी. २. अत्यंत अरुंद नागमोडी वळणाच्या व चंद्रकोराकृती सरोवरांच्या परिसरात अधूनमधून साचणारे पाणी. ३. नद्यांवरील धरणांच्या उगमस्थानाकडील भागात अडवलेले, कृत्रिम जलाशयातील पाणी.
कोंडबार पु. कुंचबणा; कोंडमारा : ‘कुमारां कीजे कोंडबार ।’ - उगी ६१४.
कोंडमार पु. १. कोंडून ठेवून मारणे; लहान खोलीत घालून गुदमरविणे. २. भांडणात, वादात, चढाओढीत प्रतिपक्षीयाने केलेली अडवणूक, कोंडी, ३. संकटात, अडचणीत आणून नकोसे करणे. ४. चहूकडून कोंडल्यामुळे होणारी अवस्था; अगतिकत्व; कुचंबणा.
कोंडमारा पु. १. कोंडून ठेवून मारणे; लहान खोलीत घालून गुदमरविणे. २. भांडणात, वादात, चढाओढीत प्रतिपक्षीयाने केलेली अडवणूक, कोंडी, ३. संकटात, अडचणीत आणून नकोसे करणे. ४. चहूकडून कोंडल्यामुळे होणारी अवस्था; अगतिकत्व; कुचंबणा.
कोंडली स्त्री. गाडगे; मडके. (चंद्रपुरी)
कोंडले न. पातळ पदार्थ राहण्यासाठी सभोवार भात इ. पदार्थ लावून जे ताटात (जेवताना) करतात ते अळे; कुंड (कु.) [सं. कुंड]
कोंडवरा वि. खोल; खोलगट (भांडे इ.). (राजा.) [क. कोडे]
कोंडवाड न. स्त्री. पु. गुरांचा गोठा. (को.) गुरे कोंडण्यासाठी केलेली कोंडी; गावात अगर शेतात शिरून नासाडी करणारी गुरे कोंडून ठेवण्याची सरकारी जागा; गधेघाट. ह्यांच्या सुटकेसाठी मालकाला रोजचा त्याचा खर्च व दंड भरावा लागतो.
कोंडवाडा न. स्त्री. पु. गुरांचा गोठा. (को.) गुरे कोंडण्यासाठी केलेली कोंडी; गावात अगर शेतात शिरून नासाडी करणारी गुरे कोंडून ठेवण्याची सरकारी जागा; गधेघाट. ह्यांच्या सुटकेसाठी मालकाला रोजचा त्याचा खर्च व दंड भरावा लागतो.
कोंडळी स्त्री. लाकडी फावडे; धान्य मळताना पातीतून उडून गेलेली कणसे गोळा करण्याचे साधन.
कोंडळे न. कडे; वर्तुळ; कोंडाळे : ‘मग जमदग्नीनें विचारिलें । मृत्तिकेचे कोंडळें केलें ।’ - कालिकापुराण २२·२६.
कोंडा पु. १. धान्याचे मूळ, सालपट, तूस इ. : ‘देवा कळणा अथवा कोंडा ।’ - तुकाराम (नवनीत ४४८). २. (ल.) ताप निवाल्यानंतर अंगावरून निघणारा एक प्रकारचा भुसासारखा पदार्थ, सालपटे, मळ (क्रि. जाणे.) २. खपली, पापुद्रा. (वा.) कोंड्याचा मांडा करणे - १. सुगरणपणा अंगी असणे. २. अगदी निकृष्ट परिस्थितीतही चांगले कार्य करून दाखविणे; साध्या गोष्टीच्या मदतीनेही चांगल्या गोष्टी करणे. ३. (ल.) अडून न बसणे; गोड करून घेणे; समाधानी राहणे. ४. चिवा; एक प्रकारचा लहान बांबू. [क.], ५. पहा : कोयंडा. ६. मल्याळी तऱ्हेची वेणी व तिचा साज. (तंजा.)
कोंडाउर पु. एका जातीचा साप.
कोंडा पाऊस   पावसाची बुरबुर, रिपरिप; तुषारयुक्त पाऊस.
कोंडापाणी न. अन्नपाणी : ‘नका देऊ तिळमात्र कोंडापाणी ।’ - ऐपो २३५.
कोंडाभोंडा पु. १. कोंडा, भूस इ. पदार्थ. २. (ल.) कोरडे, नीरस, वाळलेले अन्न; कदान्न.
कोडामांडा पु. कोंडा, भूस यांसारखे बारीकसारीक पदार्थ : ‘माशांना खाऊ घालायचा कोंडामांडा भरलेला असे.’ - किरिस्ताव १२.
कोंडाळणे अक्रि. १. गरगर फिरणे; सैरावैरा धावणे; कोंडलेल्या जागेत इकडे तिकडे फिरणे; वाहणे (वारा). २. घिरट्या घेत जाणे; वाताहात होणे; उधळणे (गवताच्या काड्या, धूळ). ३. भोवरे करीत वाहणे; गिरक्या घेत जाणे (नदी). ४. घोटाळणे; गांगरणे (मन). ५. पुढेमागे जाणे; सैरावैरा धावणे (निबिड अरण्यातल्याप्रमाणे.) ६. कोंदणे; गुदमरणे. (ना.)
कोंडाळे न. १. वर्तुळ; वेटोळे; वाटोळी जागा; आळे. २. माणसांनी वर्तुळाकृती बसणे; भोवती बसणे. ३. थालीपीठ; कोंडोळे. ४. आळे (क्रि. करणे.) (गो.) ५. गट; टोळके.
कोंडी पु. खोंडा; दोन ओढ्यातील जमिनीचा भाग [सं. कुंड]
कोंडी स्त्री. १. जिच्यात काही व्यवहार होऊ शकत नाही अशी परिस्थिती : ‘एका धनाढ्य व्यापाऱ्याने बाजारात कोंडी निर्माण केली.’ - विजी १५. २. जाच; बंधन; कडक शिस्त : ‘जातींची संख्या व कोंडी बेसुमार वाढली.’ - गांगा १७. ३. कोंडलेली जागा; कोंडवाडा. ४. ब्राह्मणांना दक्षिणा देण्याच्या वेळी त्यांना बसण्याकरिता केलेले आवार; रमणा. ३. (आट्यापाट्या) गडी जेथे दोन्हीकडून अडवून धरतात ती पाटी (पाटीवरचा गडी व मुरदुंग्या यांनी अडविलेली.) ४. नदीच्या बंधाऱ्याची जागा. ५. मीठ बनविण्याची लहान मिठागरे. (को.) ६. अडचणीची परिस्थिती. (वा.) कोंडी करणे - कोंडणे; वेष्टणे; घेरणे : ‘पहिल्या बाजीरावाने भोपाळवर कोंडी करून निजामाच्या घोड्यांना पळसाचा पाला खाण्याची पाळी आणली.’ - के १९·३·१९४०. कोंडी फुटणे - अडचणीची परिस्थिती संपणे; संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग किंवा उपाय सापडणे : ‘ही कोंडी फुटणार कशी तेच मला कळत नव्हते.’ - पिंपेर २५. कोंडी फोडणे - अडचणीतून बाहेर पडणे. कोंडी येणे - कोंडून ठेवणे. कोंडीत पकडणे - पेचात धरणे; अडचणीत आणणे : ‘एकट्याला कोंडीत पकडून त्याच्याकडून त्यांनी होकार मिळविला.’ - रथ १३५.
कोंडी   स्त्री. (सोनार) सरीचा अथवा ठुशीचा भाग. (बे.)
कोंडीव वि. १. कोंडलेले; बंद केलेले (पाणी, वारा, जागा). २. बंदीत ठेवलेला (माणूस, प्राणी).
कोंडुली स्त्री. दही विरजण्याचे लहान मडके : ‘सदानंदाची लहान कोंडुली धुतली.’ - शाआ १११.