शब्द समानार्थी व्याख्या
कौडळ   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडा   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडागहू   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडी   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडीचुंबक   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडीटंक   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडीपूत   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौड्या घोणस   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौड्या साप   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटाळ्यविद्या स्त्री. कौटाळ; जादू; जारणमारण; चेटूक. (कुण.)
कौटिल्य न. १. वाकडेपणा; वक्रता. २. (ल.) कपट; दुष्टपणा; कवटाळ; ठकबाजी : ‘राणीचें आनंदीबाईच्या सवाई निष्ठुराचरण व कौटिल्य; खंडूजीचा मत्सरी स्वभाव...’ - नि ५४४. ३. चाणाक्षपणा; धूर्तता ४. चाणक्य ऋषी - चंद्रगुप्त मौर्य या राजाचा मंत्री. याचा अर्थशास्त्रावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे.
कौटुंबिक वि. कुटुंबाचा; कुटुंबाशी संबंध असलेला. जसे :- कौटुंबिक सुख.
कौठीचाफा पु. एक सुगंधी फुलझाड; त्याचे फूल.
कौतिक न. १. आश्चर्य; कुतूहल; जिज्ञासा; नवल; विस्मय; आश्चर्य उत्पन्न करणारी कोणतीही गोष्ट (मनुष्य, वस्तू, कृत्य, गोष्ट, देखावा इ.). २. प्रेम; ममतेने, आनंदाने धरणे; लाड करणे; कुरवाळणे (मूल किंवा वस्तू); अतिशय प्रीती, अभिमान धरणे; लालनपालन; नाजूक रीतीने वागविणे; फार काळजी घेणे. (क्रि. (कौतुकाने) राखणे, ठेवणे, करणे, असणे.) ३. मौज; खेळ; विनोद; प्रदर्शन; गाणे, नाचणे इ. : ‘उत्तर निज तुरगांतें द्याया अरुणासी कौतुक पिटाळी ।’ - मोविराट ४·८१. ४. मनोरंजन; करमणूक; ख्यालीखुशाली. [सं.]
कौतुक न. १. आश्चर्य; कुतूहल; जिज्ञासा; नवल; विस्मय; आश्चर्य उत्पन्न करणारी कोणतीही गोष्ट (मनुष्य, वस्तू, कृत्य, गोष्ट, देखावा इ.). २. प्रेम; ममतेने, आनंदाने धरणे; लाड करणे; कुरवाळणे (मूल किंवा वस्तू); अतिशय प्रीती, अभिमान धरणे; लालनपालन; नाजूक रीतीने वागविणे; फार काळजी घेणे. (क्रि. (कौतुकाने) राखणे, ठेवणे, करणे, असणे.) ३. मौज; खेळ; विनोद; प्रदर्शन; गाणे, नाचणे इ. : ‘उत्तर निज तुरगांतें द्याया अरुणासी कौतुक पिटाळी ।’ - मोविराट ४·८१. ४. मनोरंजन; करमणूक; ख्यालीखुशाली. [सं.]
कौतुकास्पद वि. कौतुक करावे असे वाटण्यासारखा; आनंदमिश्रित अभिमान वाटावा असा.
कौतुकी वि. खेळ्या; मौज करणारा; आनंदी; उल्हासी.
कौतूहल   पहा : कौतुक १, २, ३, कुतूहल [सं.]
कौदरी स्त्री. चवेणीचे झाड : ‘मोह, साग, कौदरी, पळस... वगैरे झाडे गर्द लागली असून...’ - मंजु १२७.
कौन वि. (दलाली) नऊ ही संख्या.
कौनट पु. कोपरा : ‘म्हणोनि माहालक्षमिचा कौनटावरि आले’ - लीचउ १२.
कौनबौ वि. १.चमत्कारिक; भीतिदायक; भयंकर; हिडिस परंतु अगम्य व अनिश्चित असा (पदार्थ, माणूस वगैरे). २. पहा : काण्णूबाण्णू
कौनी पु. (कुस्ती) दस्त उतारावरील तोड. प्रतिपक्षाचा आपल्या मानेवरील हात आपल्या डाव्या हाताने खाली दाबून मान उचलणे.
कौपीन न. स्त्री. १. लंगोटी; छाटी; (क्रि. नेसणे.) : ‘मुळीं मुडले मुंडन । बंदी बंदाची कौपीन ।’ - तुगा ४०२०. २. कफनी : ‘माझ्या खोलीत दुसरी एक कौपीन आहे ती घालून इकडे ये.’ - सूर्योदय १५९. [सं.] (वा.) कौपीन करणे - लंगोट बंद होणे.
कौबेरी स्त्री. उत्तर दिशा. [सं. कुबेर]