शब्द समानार्थी व्याख्या
केकी कोळसा   (भुशा) ऊर्ध्वपतनानंतर कोकमध्ये रूपांतरित होणारा दगडी कोळशाचा प्रकार.
केकें उद्गा. केकटणे; केकणे. (क्रि. करणे.) [ध्व.]
केगई स्त्री. भांडकुदळ, भांडखोर, दुष्ट स्त्री; हट्टी स्त्री.
केघई स्त्री. भांडकुदळ, भांडखोर, दुष्ट स्त्री; हट्टी स्त्री.
केगद स्त्री. केवडा. पहा : केतक, केतकी [सं. केतक]
केगादी स्त्री. केवडा. पहा : केतक, केतकी [सं. केतक]
केगया   पहा : केकया, केकयी
केगामती   पहा : केकया, केकयी
केगरे न. फावडे; खोरे.
केचित वि. काही; काही लोक. [सं. कश्चित् (अव.)]
केचिन्मत न. सर्वांना मान्य नसणारे मत; काही लोकांचे मत.
केज न. मालाच्या मोबदल्याचे धान्य, नारळ इ. पदार्थ; विनिमयार्थ दिलेली वस्तू. उदा. माळणीकडून भाजी घेऊन धान्यरूपाने दिलेली किंमत. (क्रि. घालणे.) (माण. व.) : ‘आदरासी मोल नये लावू केजें ।’ - तुगा ३४०४. २. मोबदला; मालाची देवघेव. [सं. क्रेय] (वा.) केज्यास कापूर होणे - भारी किमतीचा पदार्थ हलक्या किमतीला विकला जाणे.
केजी न. मालाच्या मोबदल्याचे धान्य, नारळ इ. पदार्थ; विनिमयार्थ दिलेली वस्तू. उदा. माळणीकडून भाजी घेऊन धान्यरूपाने दिलेली किंमत. (क्रि. घालणे.) (माण. व.) : ‘आदरासी मोल नये लावू केजें ।’ - तुगा ३४०४. २. मोबदला; मालाची देवघेव. [सं. क्रेय] (वा.) केज्यास कापूर होणे - भारी किमतीचा पदार्थ हलक्या किमतीला विकला जाणे.
केजे न. मालाच्या मोबदल्याचे धान्य, नारळ इ. पदार्थ; विनिमयार्थ दिलेली वस्तू. उदा. माळणीकडून भाजी घेऊन धान्यरूपाने दिलेली किंमत. (क्रि. घालणे.) (माण. व.) : ‘आदरासी मोल नये लावू केजें ।’ - तुगा ३४०४. २. मोबदला; मालाची देवघेव. [सं. क्रेय] (वा.) केज्यास कापूर होणे - भारी किमतीचा पदार्थ हलक्या किमतीला विकला जाणे.
केजणे उक्रि. नारळ, धान्य इ. देऊन त्याबदल्यात मासळीचा कुट्टा अगर भाजीपाला घेणे. (को.)
केटर वि. अंगाने किरकोळ (जनावर). (व.)
केटा वि. किडका; कुजका; सुमार (माल). (माण.) [क. केटट् = वाईट]
केड वि. कद्रू; कृपण; चिक्कू.
केड   नासणे; नास. (बे.) [क. केडिसु = नाश करणे]
केडगा वि. कळ, भांडण लावणारा. (कर.) [क. केडिसु]
केडणार वि. अवहेलना करणारा. (गो.)
केडला क्रिवि. केव्हा. (चि.) [सं. कियत + वेला]
केडलावणे   वेडावणे. (कु.) [सं. कटु]
केडशी स्त्री. बुरशी; बुरा. [क. केडु = नासणे]
केडूळ क्रिवि. एवढा वेळ; कितीतरी वेळ; फार वेळ. [सं. कियत्‌वेला]