शब्द समानार्थी व्याख्या
केदारनाट पु. (संगीत) बिलावल थाटाचा राग. केदार आणि नट या रागांचा जोडराग. गानसमय रात्र.
केदारयोग पु. (ज्यो.) पत्रिकेत सातही ग्रह चार स्थानांमध्ये किंवा एकसारख्या चारी स्थानांमध्ये असतील तर हा योग होतो. या योगावर माणूस श्रीमंत, आळशी, बुद्धिमान, आप्तांवर उपकार करणारा असा असतो.
केदारी स्त्री. नैवेद्य : ‘पिराचे केदारीस तांदूळ, केळी.’ - बाबारो २·१०१.
केदो वि. केवढा. (गो. कु.)
केद्वा क्रिवि. केव्हा; कधी; कोणत्या वेळी : ‘तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवा पांडुरंगा ॥’ - तुगा ८४६. [सं. कदा]
केधवा क्रिवि. केव्हा; कधी; कोणत्या वेळी : ‘तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवा पांडुरंगा ॥’ - तुगा ८४६. [सं. कदा]
केन   आऊत; नांगर.
केनशी स्त्री. १. बुरशी; बुरा. (को.) पहा : केंडशी २. लोणा.
केनसावणे अक्रि. (अन्न इत्यादी पदार्थ) बुरसणे; बुरशी येणे. (को.)
केना   पहा : केणा (वाई)
केनाइट न. (भूशा.) खनिज क्षारांपैकी एक.
केनाळ न. एक प्रकारचे भाताचे बी; करगुंट; कोळपा. (गो.)
केनी   पहा : केना, केणी
केनी   पहा : केनशी
केप स्त्री. १. बंदुकीच्या घोड्याचा ज्यावर आघात होऊन बार उडतो ती तांब्याची लहान टोपी. २. दिवाळीत मुलांच्या पिस्तुलात घालायची दारू भरलेली कागदी चकती. [इं. कॅप]
केपगुजबरी स्त्री. एक फळझाड; ढोलांबा. [इं.]
केबरा पु. १. शेतातून कोठारात भात नेत असताना येणारी तूट भरून निघावी म्हणून दिलेली सूट, भत्ता. २. विक्रीसाठी साठवलेल्या सरासरी पिकाची नुकसानभरपाई करण्यासाठी बसवलेली पट्टी.
केबल स्त्री. १. तारांच्या जुडग्यांचा दोर; तारेचा जाड मजबूत दोर. २. समुद्रपार तारेने पाठवलेला संदेश. [इं.]
केबल   उपग्रहाद्वारे संदेश पोहोचविणारी यंत्रणा.
केबिन स्त्री. १. आगबोटीतील प्रवाशांची खोली. २. कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी असलेली स्वतंत्र लहान खोली. [इं.]
केम न. (भूशा.) हिमनदी वितळल्यामुळे तिच्या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ, रेती इत्यादींनी बनलेले लांबट टेकाड. [इं.]
केम न. यंत्राच्या विशिष्ट प्रकारच्या गतीचे दुसऱ्या प्रकारच्या गतीत रूपांतर (वाटोळ्या गतीचे मागे पुढे होणाऱ्या गतीत) करायचे साधन. [डच कॅम]
केमटा वि. हेमटा; चिक्कू; कृपण; पहा : केड
केमण स्त्री. काव; हुरमुंज; गेरू. (बे.)
केमर   पहा : केंबरे : ‘डबक्यातून आणि हिरवळीतून आसरा घेणाऱ्या केमरांनी (घुंगुरट्यांनी) तो आसरा सोडला.’ - माचू ३२१.