शब्द समानार्थी व्याख्या
कूसनिकुरणीचा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कूसनिखवणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कुसधुणीचा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कुसधुवणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कुसधुणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कूसधुणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कूहरी स्त्री. कैरीसारखा सोन्याचा अलंकार. पहा : कुइरी : ‘ल्याली राकडि मूद बोरकळि ते शोभे तळीं कूहरी ।’ - अक अनंत – सीता - स्वयंवर ४५.
कूळ न. १. कौलदार; खंडकरी; पट्ट्याने जमीन धारण करणारा (सरकारची किंवा शेतमालकाची) २. धनकोचा (सावकाराचा) ऋणको; आरोपीचा जामीन; वैद्याचा रोगी; वकिलाचा पक्षकार; आश्रयदात्याचा पोष्य; ज्याने द्रव्यादी देणे द्यायचे आहे तो; आश्रित (म्हणजे ऋणको, जामीन, रोगी इ.) २. सामान्यतः सरकारला सारा देणारा असामी, असाम्या. ४. गिऱ्हाईक; इसम; व्यक्ती. (गो.) ५. शेतकरी इतर अर्थ व सामासिक शब्द पहा : कुळ [क. कुळ = कर देणारी व्यक्ती]
कूळ न. १. गोत्र; वंश; जात; कुटुंब. २. लग्नात ठेवायचे देवक (मराठा समाजात रूढ). प्रत्येकाच्या कुळात चाल असेल त्याप्रमाणे कळंब, मारवेल, वड इ. झाडाची फांदी आणून ती तुळशीवृंदावनात लावतात व तिची पूजा करतात.) [सं. कुल] (वा.) कूळ उद्धरणे - १. कुळाची कीर्ती वाढविणे. २. (उप.) कुळातील माणसांना (विशेषतः जवळच्या नातलगांवरून) शिव्याशाप देणे. कूळ ठेवणे - (काही जातीत) देवकप्रतिष्ठा, देवदेवक बसवणे (गो.)
कूळ स्त्री. नारळीच्या हीरांचे केलेले जाळे. (गो.)
कूळकट न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकत न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकथा न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकहाणी न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकरंटा वि. कुळातील हतभागी; भद्र्या; कुळाचे नाव घालविणारा; मुख्यत्वे चिक्कू.
कूळकायदा पु. जमीनमालकांपासून कुळांना न्याय मिळावा, त्यांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून करण्यात आलेला कायदा.
कूळघडणी स्त्री. प्रत्येक कुळाची जमीन, साधनसामग्री, लाग - लागवड व सारा इ. चे दर्शक, कुळकर्ण्याने तयार केलेले सरकारी पत्रक, तक्ता.
कूळजमा स्त्री. १. गाव किंवा जिल्ह्यातील कुळांपासून येणाऱ्या साऱ्याची रक्कम. २. सावकाराने कुळाला किंवा शेतकऱ्याला कर्जाऊ दिलेली रक्कम.
कूळझाडा पु. गावातील खंडकरी किंवा कौलदार यांचा तक्ता.
कूळटिळक पु. वंशाचे भूषण; कुळाला भूषणभूत अशी व्यक्ती. [सं. कुलतिलक]
तिलक पु. वंशाचे भूषण; कुळाला भूषणभूत अशी व्यक्ती. [सं. कुलतिलक]
कूळपट पु. कौलनामा; खंडपत्र.
कूळपट्टा पु. कौलनामा; खंडपत्र.
कूळपर्वत   पहा : कुलाचल, सप्तपर्वत
कूळपैसा   पहा : कुळजमा २