शब्द समानार्थी व्याख्या
केळांबा पु. १. आंब्याची एक जात. या झाडाला केळीच्या फळासारखे लांबट फळ येते. २. या झाडाचे फळ.
केळ्या आंबा पु. १. आंब्याची एक जात. या झाडाला केळीच्या फळासारखे लांबट फळ येते. २. या झाडाचे फळ.
केळी स्त्री. १. जोंधळ्याची-ज्वारीची एक जात. २. केळीचे झाड. पहा : केळ
केळीकदंब स्त्री. कदंबाची एक जात.
केळीक्रीडा स्त्री. १. परमेश्वरावताराने जड वस्तूशी केलेली क्रीडा : ‘या श्री प्रभूचीया केळीक्रीडा’ - लीचपू १६६. २. शृंगारक्रीडा : ‘श्रीकृष्णचक्रवर्ति केळीक्रीडा करीति’ - श्रीकृष्णच २८.
केळीचा कांदा   केळीचा गड्डा. हा वातनाशक व स्त्रियांच्या प्रदर रोगावर औषधी आहे.
केळे न. अर्धवट पिकलेली, गाभुळलेली चिंच. (कु.)
केळ्याचा हलवा   राजोळी केळ्यांपासून तयार केलेला एक गोड पदार्थ.
केंकरे न. फावडे; खोरे; केगरे. (राजा.)
केंकावणे   पहा : केकटणे : ‘(कुत्रा) दुःखाने शब्द करतो त्यास केंकावणे म्हणतात.’ - मराठी ३ रे पु (१८७३) पृ. १२१. [ध्व.]
केंजणे अक्रि. विनवणे; ‘हां जी हां जी करणे.’ - (तंजा.)
केंजळ   पहा : किंजळ १.
केंड न. हरिकातील फोल; धान्यावरील आवरण.
केंड पु. १. निकृष्ट माशाची एक जात. हा मासा वाटोळा असतो. २. जळालेल्या गवऱ्यांचा ढीग. ३. ज्वाळा. (गो.) [क. केंड = जळता निखारा.], ४. कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज.
केंडणी स्त्री. अवहेलना.
केंडणे उक्रि. १. अडवणे; रोधणे; अडथळा करणे. २. (सर्व अर्थी) कोंडणे. उदा. अडवून ठेवणे, बांधून टाकणे, खिळून ठेवणे. ३. खुंटणे; बरोबर वाढ न होणे. (व.) [क. केडिसु, केडु], ४. दोषारोप ठेवणे; दूषण देणे; तुच्छ लेखणे; टोचून बोलणे : ‘कोणाही केंडावें हा आम्हां अधर्म ।’ - तुगा ४२४५. ५. धुडकावून देणे; हिडीसफिडीस करणे; अव्हेर करणे; लाथाडणे : ‘जरि केंडिला तरी हिरा स्तविलाचि शिरीं चढे न शिरगोळा ।’ - मोआदि २७·४४.
केंडशी स्त्री. बुरा; बुरशी.
केंडावणे अक्रि. वेडावणे; खट्टू करणे.
केंडूस वि. बुरसलेले; केंडशी आलेले.
केंडूसणे अक्रि. बुरसणे.
केंदरावणे अक्रि. वेडावणे. (कु.)
केंदाळ न. पाण्यात वाढणारी एक वनस्पती; एक प्रकारचे गवत. (कर.)
केंद्र न. (शाप.) १. दीर्घवर्तुळातील ज्या दोन बिंदूंपासून परीघावरील कोणत्याही बिंदूंपर्यंत अंतरांची बेरीज सारखी येते अशा बिंदूंपैकी प्रत्येक. २. वर्तुळाचा मध्यबिंदू; ३. नाभी. ४. (ज्यो.) ग्रहाच्या कक्षेच्या प्रथमबिंदूपासून त्याचे चवथ्या, सातव्या अथवा दहाव्या अंशापर्यंतचे अंतर. ५. समीकरणविषय. ६. मध्यवर्ती महत्त्वाचा भाग. ७. भारतीय घटनेनुसार सर्व भारताचे मिळून असणारे एक मध्यवर्ती सरकार. [सं.]
केंद्रक न. केंद्रस्थान; कोणत्याही वस्तूचा मध्यभाग; विशेषतः अणूचे केंद्रस्थान; अणुगर्भ. [सं.]
केंद्रक द्रव्य   पेशींच्या केंद्रामध्ये असलेले एकजातीय पेशीद्रव्य. [सं.]