शब्द समानार्थी व्याख्या
केंद्रकील पु. हलणाऱ्या भागाचा आस ज्यात बसवलेला असतो तो भाग.
केंद्रगामी वि. वेगवेगळ्या ठिकाणांहून एका बिंदूकडे येणारा. [सं.]
केंद्रच्युति स्त्री. (ज्यो.) केंद्रापासूनचे अंतर; दीर्घवर्तुळाच्या मध्यापासून एका केंद्राच्या अंतराला बृहदक्षाच्या अर्ध्याने भागले असता येणारे गुणोत्तर. [सं.]
केंद्रच्युती स्त्री. (ज्यो.) केंद्रापासूनचे अंतर; दीर्घवर्तुळाच्या मध्यापासून एका केंद्राच्या अंतराला बृहदक्षाच्या अर्ध्याने भागले असता येणारे गुणोत्तर. [सं.]
केंद्रबिंदू पु. १. मध्यबिंदू. २. ज्या ठिकाणी उद्योगधंदे, व्यापार, संस्कृती, शिक्षण इ. गोष्टी प्रामुख्याने एकवटल्या आहेत असे ठिकाण : ‘मुंबई शहर हे उद्योगधंद्यांचा केंद्रबिंदू आहे.’ - खाअ ९१. [सं.]
केंद्रयोजन न. (स्था.) सिमेंट काँक्रिटची घरे बांधताना खांब, तुळया व जमिनी यांसाठी तयार केलेले लाकडी साचे. [सं.]
केंद्रशासन न. (राज्य.) कोणत्याही स्वतंत्र देशातील राज्यशासन-व्यवस्थेमधील मध्यवर्ती सरकार; भारताच्या संघ राज्यात केंद्रस्थानी असलेले सरकार. अनेक राज्ये किंवा स्वायत्ता घटक असणाऱ्या देशातील विशेष अधिकार असलेली मध्यवर्ती शासनव्यवस्था.
केंद्रशासन सरकार न. (राज्य.) कोणत्याही स्वतंत्र देशातील राज्यशासन-व्यवस्थेमधील मध्यवर्ती सरकार; भारताच्या संघ राज्यात केंद्रस्थानी असलेले सरकार. अनेक राज्ये किंवा स्वायत्ता घटक असणाऱ्या देशातील विशेष अधिकार असलेली मध्यवर्ती शासनव्यवस्था.
केंद्रशासित वि. केंद्राच्या प्रत्यक्ष प्रशासनाखालील (प्रदेश); ज्याला स्वायत्त राज्याचा दर्जा नाही असा (प्रदेश) [सं.]
केंद्रावरण न. केंद्राभोवती असलेले आच्छादक द्रव्य.
केंद्रांकनी स्त्री. (यंत्र.) धातूवर अथवा लाकडावर बिंदूत्मक ठोका देण्यासाठी वापरात येणारा कठिणाग्र दांडा.
केंद्रित वि. केंद्राला मिळालेला; एकत्र आलेला. (वा.) केंद्रित करणे - (मन) स्थिर करणे. [सं.]
केंद्रीकरण न. १. एकाच मध्यवर्ती बिंदूकडे आकर्षिले जाणे. २. सर्व सत्ता एकाच ठिकाणी, एकाच व्यक्तीकडे येणे. एकवटणे. ३. एकीकरण; ऐक्य : ‘लोकमताचे केंद्रीकरण करण्याकरिता राष्ट्रीय सभा आहे.’ - लोटिकेले ३·९५. [सं.]
केंद्रीकरण भवन न. १. एकाच मध्यवर्ती बिंदूकडे आकर्षिले जाणे. २. सर्व सत्ता एकाच ठिकाणी, एकाच व्यक्तीकडे येणे. एकवटणे. ३. एकीकरण; ऐक्य : ‘लोकमताचे केंद्रीकरण करण्याकरिता राष्ट्रीय सभा आहे.’ - लोटिकेले ३·९५. [सं.]
केंद्रीकृत वाहतूक नियंत्रण   (यंत्र.) प्रत्येक चौकातील नियंत्रण एकमेकांशी संबंधित ठेवण्याची योजना.
केंद्रीभूत वि. एकाग्र; एकाच गोष्टींवर स्थिर झालेले : ‘त्याचे विचार माधव ज्यूलियनच्या काव्यावर केंद्रीभूत झाले.’ - ब्राह्मण ५६. [सं.]
केंद्रीय वि. केंद्र सरकारातला; मध्यवर्ती. [सं.]
केंद्रीय द्रव पु. केंद्रस्थानीचा प्रवाही पदार्थ.
केंद्रीय धमन्या   (वै.) सजीवांच्या शरीरात हृदयातून बाहेर पडून रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमन्या, रक्तवाहिन्या.
केंद्रीय बधिरण   (वै.) केंद्रस्थानातून झालेले संमोहन.
केंद्रीय वाचाघात   (वै.) मेंदूतील बोलण्याच्या केंद्रास धक्का बसल्याने बोलण्याची क्रिया थांबणे.
केंद्रोत्सारक वि. मध्यबिंदूपासून दूर जाणारे (किरण, शक्ती).
केंद्रोत्सारगति स्त्री. केंद्रापासून दूर जाणारी किंवा एखाद्या पदार्थाला दूर नेणारी गती. [सं.]
केंद्रोत्सारगती स्त्री. केंद्रापासून दूर जाणारी किंवा एखाद्या पदार्थाला दूर नेणारी गती. [सं.]
केंद्रोत्सारी वि. केंद्रापासून दूर जाणारा. [सं.]