शब्द समानार्थी व्याख्या
कूळबुडव्या वि. स्वतःच्या कुटुंबाचा नाश करणारा; कुलकलंक.
कूळभरणा पु. (व्यापक) शेतकरी किंवा कुळे. याच्या उलट अडाणकबाड.
कूळरुजुवात स्त्री. १. कुळाने सरकारी खजिन्यात भरलेल्या पैशाची चौकशी करून रुजुवात घालणे. २. अशा रीतीने रुजुवातीस मिळालेली पुष्टी.
कूळवर्ग पु. कुळघडणीच्या अनुरोधाने कुळे अथवा रयत यांच्या जमीनजुमल्यासंबंधीचे किंवा त्यांच्याकडून येणे असलेल्या पैशाबद्दलचे वर्गीकरण दाखविणारे वार्षिक पत्रक-तक्ता. (समासात) कुळवर्गपट्टी - जमाबंदी - वसूलबाकी इ. पहा : कुळारग.
कूळवंत वि. कुलीन; अभिजात; कुलवंत; चांगल्या कुळात जन्मलेला.
कूळवार क्रिवि. कुळाच्या अनुक्रमाप्रमाणे दर किंवा दर कुळागणिक. कुळवार पत्रक - झाडा. (समासात) कुळवार पावत्या - पाहणी - फाजील - वसूल - बाकी - रुजुवात.
कूळवारी स्त्री. कुळीचा तक्ता.
कूळशील न. कूल आणि शील; वाडवडिलांची परंपरा व व्यक्तीची दानत; कुलातील आचारविचार, चालरीत, स्थितिरीती. लग्न जुळविताना ज्या बाबी पाहायच्या त्यातील एक यावरून.
कूं अ. एखादी व्यथा झाली असताना मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चं, हू, इस्, उस्, हुश् याप्रमाणे). (क्रि. म्हणणे, करणे) पहा : हाय [ध्व.]
कूं अ. एखादी व्यथा झाली असताना मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चं, हू, इस्, उस्, हुश् याप्रमाणे). (क्रि. म्हणणे, करणे) पहा : हाय [ध्व.]
कूंचा   पहा : कुंचा : ‘ब्रह्मतेजाचा कूंचा ढळें । मुगुटावरी ।’ - शिव १११.
कूंजणे अक्रि. शब्द करणे (पक्षी वगैरेंनी) : ‘जे कूंजते कोकिल वनीं ।’ - ज्ञा ६·४५. [सं. कूजन्]
कूंजद स्त्री. दोन्ही बाजूंना तीळ लावून तयार केलेली पोळी.
कूंस   पहा : कुसूं १, २, ३ (को.)
कृक पु. घाटी; गळा; घसा; कंठनाल. [सं.]
कृकर पु. १. ढेकराच्या वेळचा वायू. पंच उपप्राणांपैकी एक. पहा : कूर्म : ‘आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादी होय ॥’ - ज्ञा १८·३४१ [सं.]
कृकल पु. १. ढेकराच्या वेळचा वायू. पंच उपप्राणांपैकी एक. पहा : कूर्म : ‘आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादी होय ॥’ - ज्ञा १८·३४१ [सं.]
कृकलास पु. सरडा : ‘दान देता नहुषां कूषी जाहला कृकलास ।’ - एभा ६·९५. [सं.]
कृच्छ्र न. १. एक प्रायश्चित्त; २. शारीरिक दुःख; कष्ट; तप : ‘माझे नि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिक ।’ - एभा १७·४२०. ३. पाप. ४. पहिल्या दिवशी एकदा जेवण, दुसऱ्या दिवशी सायंकाळी जेवण, तिसऱ्या दिवशी न मागता आपोआप मिळेल ते खावे व चौथे दिवशी उपोषण याप्रमाणे क्रमाने १२ दिवस करण्याचे व्रत : ‘अथवा एकांतरा कृच्छ्रीं ।’ - ज्ञा १७·३३४. [सं.]
कृच्छ्र न. मूत्रकृच्छ्र; मूत्रावरोध.
कृच्छ्रचांद्रायण न. चंद्रकलेप्रमाणे चढउताराने जेवणातील घास खाण्याचे कृच्छ्र. प्रायश्चित : ‘कृच्छ्रचांद्रायणें झालीं वेडीं ।’ - एभा १२·२७. [सं.]
कृच्छ्रेंकरून किव्रि. नाखुशीने, कष्टाने (येणे, करणे इ.).
कृत न. कृत, त्रेता, द्वापार व कली या युगांपैकी पहिले; सत्ययुग. [सं.]
कृत वि. ज्याने केलेले आहे या अर्थाने समासाच्या पूर्वी जोडतात. उदा. कृतभोजन-ज्याने जेवण केलेले आहे असा.
कृत वि. उप. कृतकृत्य; ज्याने आपला हेतू साध्य केला आहे असा; ज्याला काही करायचे उरले नाही असा; तृप्त.