शब्द समानार्थी व्याख्या
कोठिवळा   पहा : कोठनीस : ‘दाटी पुढील दारीं मागिल दारीं आहे कोठिमध्यें कोठवळा ।’ - प्रला २६७.
कोठंबा   पहा : कोटंबा
कोठ्या   पहा : कोटंबा
कोठंबी स्त्री. पाण्याची डोणी; हंडा.
कोठमी स्त्री. पाण्याची डोणी; हंडा.
कोठा पु. १. कोठार; संग्रहालय; वखार; आगर; साठवण (धान्य, पाणी इत्यादीची). २. पोट; पक्वाशय : ‘कोठ्यामाजी संचरे ।’ - ज्ञा ६·२१७. ३. (शिवणकाम) छातीपोटाचा भाग (शिवायच्या कपड्याचा). ४. बंदुकीतील दारू, कारंजाचे पाणी इत्यादीचा साठवणीचा कप्पा, साठा. ५. पक्ष्याचे घरटे. ६. गुरांचा गोठा : ‘बैलु वीकूनि कोठा ।’ - राज्ञा १३·२२३. (व. ना.) ७. हुंडीच्या ज्या घरात रकमेचा आकडा लिहितात ते घर. ८. निळीचा रंग तयार करताना निळीची झाडे ज्यात भिजत टाकतात तो हौद. ९. पानाच्या डब्यातील पाने ठेवण्याचे पूड; खण, कप्पा. १०. कोष्टक; सदर; स्तंभ; रकाना. ११. (जंबिया) जंबियाच्या खेळात आपल्या हातातील जंबियाने जोडीदाराच्या बरगडीच्या खड्यांतून (शिंपीतून) बेंबीकडे फाडत येणे. [सं. कोष्ठ], १२. बांबूच्या काठीच्या खेळामधील बरगडीवर मार. १३. गलबताचा एक प्रकार.
कोठा   पहा : कोटा ‘त्यांना तालुक्याचे ठिकाणाहून कोठाच कमी मिळतो...’ - गांगा २.
कोठिवा पु. गलबताचा एक प्रकार.
कोठार न. १. धान्यागार; कोठडी; खोलीतील किंवा भिंतीतील बळद; वखार; साठवणीची जागा : ‘कीं विश्वबीजाचें कोठार -’ ऋ ३८. २. पक्ष्यांचे घरटे. [त. कोट्टगारम] [सं. कोष्ठागार]
कोठारी न. १. धान्यागार; कोठडी; खोलीतील किंवा भिंतीतील बळद; वखार; साठवणीची जागा : ‘कीं विश्वबीजाचें कोठार -’ ऋ ३८. २. पक्ष्यांचे घरटे. [त. कोट्टगारम] [सं. कोष्ठागार]
कोठारली स्त्री. घोणीच्या वर्गातील एक लहान प्राणी. (कु.)
कोठारी   पहा : कोठनीस
कोठारे न. १. पहा : कोठार. २. भूस बाहेर येऊ नये म्हणून त्यावर लावलेल्या कडब्याच्या पेंड्या.
कोठावगणे उक्रि. कोठे जाता किंवा कोठून आलात असे विचारणे.
कोठाविगणे उक्रि. कोठे जाता किंवा कोठून आलात असे विचारणे.
कोठिंबर न. (वन.) गोडे कारिंट. ही गुजराथेत पुष्कळ होतात. यांची भाजी करतात.
कोठिंबा   पहा : कोटंबा
कोठिंबी   पहा : कोटंबा
कोठिंबे   पहा : कोटंबा
कोठी स्त्री. १. धान्यागार; संग्रहालय; वखार; खजिना; हौद; रांजण : ‘पाण्याची कोठी एक मातीची’ - ऐरापु, विवि. २९७. २. कारखाना; पेढी; दुकान; खोली. ३. कोठीवरचा कामगार; कोठीवाला : ‘तरी स्वामींनी कोठी लवकर पाठवून तांदूल नेले पाहिजे.’ - पेद २७·१३०. ४. सैन्याची दाणागोट्याची बेगमी. ५. नळाचे पाणी साठवून किंवा बंदुकीतील बाराची दारू साठवून ठेवायची जागा. ६. शरीरातील भाग (हे ७२ आहेत) : ‘आता बाहत्तर कोठ्यांतील शुद्धि पिंडामध्यें’ - मोल्स्व. ७. (गौरीपूजन) धड; गौरीचा मुखवटा ज्यावर बसवतात तो भाग : ‘कनिष्ठेच्या कोठीवर नीट मुखवटा बसवून दिला.’ - मुखवटे १७५·८. साळी वगैरे ठेवण्याकरिता केलेली बांबूची लांबट व मोठी कणगी; लोखंडी पत्र्याची पाटी, पिंप. ९. मिठागरातील चौकोन, खाचर. १०. एक प्रकारचे गलबत. ११. गुरांचा गोठा : ‘वासरुवांची कोठी’ - स्थापो ७५. १२. धान्यादी सामग्री घेऊन येणाऱ्या बैलांचा तांडा किंवा पठारा. [क.], १३. (संगीत) भोपळा. (वीणा, सतार, तंबोरा इ. साठी वापरण्यात येणारा.), १४. सरकारी वाडा, घर; मोठ्या सरदार जहागीरदाराचा इमला; कचेरी : ‘साहेबांनीं महाराजांस देवासकरांचे कोठीवर तुम्ही कां गेला होता - म्हणून विचारले.’ - विक्षिप्त ३·१७१. १५. नाचगाणे करणाऱ्या स्त्रियांचे राहण्याचे ठिकाण. १६. चिलखताचा एक प्रकार.
कोठी खांबपद्धती   (भूशा.) खाणीतून चौकोनी खोल्या व आधारभूत खांब खोदून कोळसा काढण्याची पद्धत.
कोठीकरा पु. वखारीतील तांदळाच्या नासधुशीबद्दल अजमास करून जास्त वसूल केलेले धान्य.
कोठीभाडे न. १. रयतेने किल्ल्यावर धान्य नेऊन देण्याऐवजी त्यांच्यावर बसवलेला कर. २. धान्य किल्ल्यावर स्वतः पोचवण्याऐवजी दिलेली नेणावळ.
कोठीमहाल पु. सरकारी धान्याची वखार, कोठार.
कोठील वि. कोणत्या ठिकाणचा; कोठचा. [सं. क्व]