शब्द समानार्थी व्याख्या
कोणिष्ठी पु. कोष्टी; विणकाम करणारा : ‘दसिण दिसें कोणिष्ठिआचि वाडी’ - नागावशीला १·२१.
कोणी प्र. सना. १. कुणी; कोणी एक; कोणीतरी; कोणीही : ‘नये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी ।’ - राम १२१. नकारवाचक विधानात पूर्ण अभावदर्शन. २. कोणतीही : ‘हातीचा बाण जाई तव कोणी तजवीज?’ - ऐकोपुर.
कोणी वि. कोणी एखादा; वाटेल तो; हवा तो.
कोणीकडणे क्रिवि. १. कोणत्या ठिकाणाहून - दिशेहून - बाजूकडून. २. कसेही; कोणत्याही प्रकारे.
कोणीकडून क्रिवि. १. कोणत्या ठिकाणाहून - दिशेहून - बाजूकडून. २. कसेही; कोणत्याही प्रकारे.
कोणीकडे क्रिवि. कोणत्या बाजूला, दिशेला, ठिकाणी.
कोणीका सना. १. हवा तो; पहिजे तो. २. भिकार; यःकश्चित; उपेक्षणीय.
कोणीतरी सना. १. कोणीही; कुणीतरी. २. यःकश्चित; नालायक; भिकार.
कोणीही सना. १. वाटेल तो, त्याने. २. पहा : कोणीच
कोणे न. १. खोली; अंतर्गृह. [क.], २. गुरांच्या कानात होणारा एक रोग. यामुळे गुरांच्या कानातून पाण्यासारखा पू वाहत असतो.
कोणेकवजा वि. कोणत्याही प्रकारचा.
कोणेकोणी क्रिवि. प्रत्येक कोपऱ्यात; अडचणीत. पहा : कोनी
कोण्या प्र. सना. कवण्या; कोणत्या : ‘विरक्तें असावें कोण्या गुणें ।’ दास ६·९·१. (वा.) कोण्या, कोणत्या झाडाचा पाला असणे - कसपटाप्रमाणे लेखणे : ‘नवरा म्हणजे कोणत्या झाडाचा पाला?-’ खु २५.
कोत पु. १. भाला; त्याचे पाते : ‘घायीं कोंत न जिरे ।’ - ज्ञा १३·५३८. २. वेळूचा, बांबूचा कोंब. (बे.).
कोत न. १. माडाच्या किंवा ताडाच्या पोयीचे अग्र; गाभ्याचे टोक (टोक कापून नंतर त्यातून रस काढण्यासाठी तेथे मडके लावतात.) २. अणकुचीदार टोक. [को.]
कोत स्त्री. कुवत; शक्ती. (कु.) [फा. कुव्वत]
कोतकार पु. भालाईत.
कोतकांती स्त्री. भाला; एक शस्त्र : ‘लांगूल सागर कटारें । कोतकांती ईट तोमरें । - कथा २·११·१४.
कोतमीर   पहा : कोथिंबीर (कुण.)
कोतरखळ्या स्त्री. घळी; भेगा : ‘... यमुनेच्या संगमीं दीस धरून रहावे, तरी ते जागा जबून. कोतरखळ्या फार.’ - ब्रच २३.
कोतरा पु. नदीच्या किनाऱ्याला प्रवाहामुळे पडलेले खोल खड्डे.
कोतारा पु. नदीच्या किनाऱ्याला प्रवाहामुळे पडलेले खोल खड्डे.
कोतल वि. १. रिकामे; राखीव. (व.) २. जरुरीपेक्षा जास्त.
कोतल पु. कोतवाली घोडा; शृंगारलेला घोडा (मिरवणुकीचा) : ‘कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किस्त करित ।’ - ऐपो २००. [हिं.]