शब्द समानार्थी व्याख्या
कृताकृत न. केवळ संभवनीय स्थिती; घडण्याची किंवा न घडण्याची संभवनीयता ज्यात सारखी आहे अशी स्थिती. अल्पस्वल्प सत्त्व, अस्तित्व. [सं.]
कृतान्न न. शिजविलेले अन्न, (विशेषतः) भात. [सं.]
कृतापराध पु. १. केलेला गुन्हा. २. गुन्हा केला आहे अशी व्यक्ती. [सं.]
कृतार्थ वि. १. ज्याने आयुष्यातील साध्य किंवा हेतू साधला आहे असा; ज्याला काही करायचे उरले नाही असा. २. कृतकृत्य; तृप्त; धन्य; समाधान पावलेला; संशय फेडलेला (धर्मशास्त्र इ. संबंधी). [सं.]
कृतावस्था स्त्री. आपला हेतू तडीला नेल्याची स्थिती; आपल्याकडून आटोकाट प्रयत्न केल्याची स्थिती.
कृतावस्था क्रिवि. आटोकाट; शेवटपर्यंत; कमीत कमी, जास्तीत जास्त. [सं.]
कृतांजलि वि. हाताची ओंजळ पसरलेला; ज्याने दोन्ही हात जोडले आहेत असा; अगदी नम्र; आज्ञाशील. [सं.]
कृतांजली वि. हाताची ओंजळ पसरलेला; ज्याने दोन्ही हात जोडले आहेत असा; अगदी नम्र; आज्ञाशील. [सं.]
कृतांत पु. १. मृत्यू; यम; काळ : ‘जैसें महाप्रलयीं पसरलें । कृंतातमुख ॥’ - ज्ञा १·८८. २. दैव; नशीब. ३. सिद्ध केलेला निर्णय, सिद्धांत. [सं.]
कृति स्त्री. १. कर्म; काम; कृत्य; काही कार्य करण्याचा व्यापार. २. क्रिया; रीत; पद्धत; युक्ती; प्रकार (उद्योग, धंदा इत्यादीचा) : ‘देशी धंद्यांच्या कृतीत व यंत्रात काही एक सुधारणा कोणास सुचवितां आली नाहीं.’ - सेंपू १·१०. ३. केलेले काम; साधलेली गोष्ट, कार्य. ४. ख्याती; पराक्रम : ‘शाण्णव कुळीचे भूप मिळाले सांगाया झाल्या कृती ।’ - ऐपो १७८.
कृति वि. कुशल; हुषार : ‘व्यसनीं सहाय होउनि आप्ताला होय जो परासु कृती ।’ - मोद्रोण ११·१५. [सं.]
कृती स्त्री. १. कर्म; काम; कृत्य; काही कार्य करण्याचा व्यापार. २. क्रिया; रीत; पद्धत; युक्ती; प्रकार (उद्योग, धंदा इत्यादीचा) : ‘देशी धंद्यांच्या कृतीत व यंत्रात काही एक सुधारणा कोणास सुचवितां आली नाहीं.’ - सेंपू १·१०. ३. केलेले काम; साधलेली गोष्ट, कार्य. ४. ख्याती; पराक्रम : ‘शाण्णव कुळीचे भूप मिळाले सांगाया झाल्या कृती ।’ - ऐपो १७८.
कृती वि. कुशल; हुषार : ‘व्यसनीं सहाय होउनि आप्ताला होय जो परासु कृती ।’ - मोद्रोण ११·१५. [सं.]
कृति स्त्री. (ग.) संख्येचा वर्ग; द्विघात. [सं.]
कृती स्त्री. (ग.) संख्येचा वर्ग; द्विघात. [सं.]
कृतिअंक पु. (ग्रंथ.) साहित्याचे वर्गीकरण करताना लेखकाच्या कलाकृतीचा दिलेला क्रमांक.
कृतिचातुर्य न. अडचणीच्या प्रसंगात मार्ग सुचणे; हुषारी.
कृतिप्रधान वि. ज्यात घटनांना, कृतीला प्राधान्य दिले आहे अशी (साहित्यकृती).
कृतिसमर्पण   (ग्रंथ) पहा : अर्पणपत्रिका
कृतिस्वाम्य न. साहित्य, कला, संगीत, नाट्य यांसारखी कलाकृती प्रकाशित करण्याचा, विशिष्ट काळापुरता एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कायद्याने दिलेला अधिकार.
कृतीचा वि. कृत्रिम; करणीचा; बनावट : ‘कृतीची आयाळें जडवुनि गळा, पुष्ट करुनी ।’ - सिंहान्योक्ति, मराठी ६ वे पुस्तक पृ. १२५ (१८९६).
कृतोपकार पु. केलेला मोठा उपकार; कृपा; मेहेरबानी. [सं.]
कृत्त वि. कापलेला. [सं.]
कृत्ति न. १. चामडे; कातडे; मृगचर्म. २. कात. [सं.]
कृत्ती न. १. चामडे; कातडे; मृगचर्म. २. कात. [सं.]