शब्द समानार्थी व्याख्या
कोनफळी स्त्री. दोन भिंतींच्या कोपऱ्यात बसविलेली फळी : ‘घरातल्या अंधाऱ्या कोनफळीवरचा डबा काढताना’ - काजवा ४. (को.)
कोनबिंदु पु. (भूमिती) त्रिकोणाचा शिरोबिंदू पहा : कोणबिंदु , कोणबिंदू
कोनबिंदू पु. (भूमिती) त्रिकोणाचा शिरोबिंदू पहा : कोणबिंदु, कोणबिंदू
कोनमापक पु. (भूमिती) कोन मोजण्याचे उपकरण. हे आकृत्या काढणे आणि जमिनीचे भाग पाडणे यासाठी उपयोगात येते.
कोनमापी पु. (भूशा.) स्फटिकाच्या कोणत्याही दोन बाजूंमधील कोन मोजण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण. भूमितीत वापरल्या जाणाऱ्या कोनमापकापेक्षा हे वेगळे असते. याचे अनेकविध प्रकार असतात.
कोनवासा पु. घराच्या दोन पाख्यांच्या सांध्यावर आढ्यापासून छपराच्या कोपऱ्यापर्यंत घातलेला मोठा वासा : ‘कोनवाशाचा कठीण सर त्याने ताकदीने नि कसबाने बसवला.’ - तोरण ३६५. (को.)
कोनवृत्त न. (ज्यो.) ईशान्य किंवा वायव्य वेधवलय किंवा वेधवृत्त.
कोनशिला स्त्री. १. इमारतीच्या बांधकामाला आरंभ करण्यापूर्वी तिच्या जागेवर समारंभपूर्वक ठेवलेला पहिला दगड; पायाचा दगड. (वा.) कोनशिला बसवणे - समारंभपूर्वक इमारतीच्या पायाचा दगड बसवणे. २. महत्त्वाचे तत्त्व; आधारभूत तत्त्व. उदा. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही भारतीय घटनेची कोंनशिला आहे.
कोनसो पु. कोपरा; कोन. (गो.)
कोना पु. १. कोनशिला. २. कोपऱ्याचा घडीव दगड. ३. कोपरा : ‘गोसावी... कोनेसी दडले’- गोप्र २८०. ४. घराच्या आढ्यावर किंवा कोनवाशावर घालण्याचे चापट कौल. ५. कोनवासा. [सं. कोण], ६. (यंत्र.) बोथटीकरण; कुठलीही कड लागू नये म्हणून बोथट करण्याची क्रिया.
कोना वि. एक प्रकारचा झंझावात : ‘हवाई भागात दक्षिणेकडून वाहणारे झंझावती वारे आहेत. त्यांना कोना वारे असे म्हणतात.’- महासागर ४५.
कोनाइड वि. (ग.) शंकूच्या आकाराचा (पदार्थ, आकृती).
कोनात्मक वि. कोनासंबंधी; कोनाचे.
कोनात्मक अंतर   वर्तुळाच्या भागामध्ये मोजायचे अंतर; वर्तुलखंड.
कोनाचे अंतर   वर्तुळाच्या भागामध्ये मोजायचे अंतर; वर्तुलखंड.
कोनासन न. आसनाचा एक प्रकार. उभे राहून दोन पायांमध्ये अंतर ठेवणे. उजवा हात वर करून डाव्या पायाच्या अंगठ्याला लावणे तसेच या उलट करणे. [सं. कोण + आसन]
कोनांक पु. (ज्यो.) सूर्य, तारे किंवा इतर ग्रह हे क्षितिजाच्या ज्या बिंदूत उगवतात किंवा मावळतात तो बिंदू आणि क्षितिजावरील पूर्व किंवा पश्चिम बिंदू ह्यांच्यामध्ये सापडणारा कंस; दिगंश.
कोनिता स्त्री. १. सकोन असण्याची स्थिती, कोनीयता. २. (भूशा.) संशकली खडकातील कणांच्या पृष्ठभागाची गोलाई किंवा खडबडीतपणा दर्शवणारी संज्ञा.
कोनी स्त्री. मासे धरण्याकरिता निमुळती विणलेली बांबूची नळकांडी. (ही कोनासारखी असते म्हणून.) [सं. कोण]
कोनी वालुकाश्म   बारीक, काटेरी, टोचणारी वाळू.
कोनीय संदेश   (ग.) चक्रीय गतीची तीव्रता मोजण्याचे चलनत्रिज्या परिमाण.
कोने न. १. हत्ती, उंट, म्हैस, गाय इ. जनावरांच्या पायांना, कानाला किंवा एखाद्या सांध्यात होणारा एक रोग. पहा : कोणे [सं. कोण], २. अंबाडीच्या काड्यांची जुडगी, बिंडे (माण.) [क. कोने = झाडाची फांदी, काटकी]
कोनेपिछाने पु. कोनेकोपरे : ‘कोनेपिछाने देखील तो अक्षरशः वाचून पाहिला.’ - ऐलेसं १७५२.
कोनोलिथ पु. (भूशा.) सापेक्षतः लहान पण आकारहीन अंतर्वेशी अग्निज खडक.
कोन्टा पु. कोपरा. (मा.) पहा : कोनटा