शब्द समानार्थी व्याख्या
कोन्याकोपऱ्याचा वि. १. सांधीकोंदीतला; कोठला तरी. २. (ल.) क्षुद्र; हलका.
कोन्हे न. मधाचे पोळे. पहा : कोनगे
कोन्हेक   कोणी एक : ‘कोन्हेकें वानरें फळे खाउं लागली.’ - पंचो ४·२२.
कोप पु. १. दुसऱ्याच्या अपराधामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी रागीट वृत्ती; राग; क्रोध : ‘तुमच्या कोपें कोठें जावें ।’ - तुगा ११६५. २. पहा : प्रकोप. (वा.) कोपास चढणे - रागावणे; कोप येणे; संतापणे : ‘गांगेय कोपा चढला कसा रे ।’ - वामन भीष्मप्रतिज्ञा १०.
कोप पु. न. १. कुजलेली, गंजलेली, किडलेली व्रणाची जागा (फळ, काष्ठ, पाषाण इत्यादीची). २. (सामा.) दोष; विकार; व्यंग. [सं. कुप्]
कोप स्त्री. न. १. झोपडे (शेतातील गवत, पानांचे); वृक्षाची ढोली; खोपटी; कुटी; मांडव; मंडपी : ‘तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥’ - ज्ञा १३·७८६. २. (ल.) घर : ‘लावि आंत ठाऊनि कोपट ।’ - अमं ४·४ : ‘म्हणौनि मठाचे दारिं कोंपि करुनि असावें ।’ - पंच १·२८. ३. (ल.) शरीर : ‘काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥’ - तुगा ६८२. [क. कोप्प = खोपटी, खेडे]
कोपी स्त्री. न. १. झोपडे (शेतातील गवत, पानांचे); वृक्षाची ढोली; खोपटी; कुटी; मांडव; मंडपी : ‘तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥’ - ज्ञा १३·७८६. २. (ल.) घर : ‘लावि आंत ठाऊनि कोपट ।’ - अमं ४·४ : ‘म्हणौनि मठाचे दारिं कोंपि करुनि असावें ।’ - पंच १·२८. ३. (ल.) शरीर : ‘काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥’ - तुगा ६८२. [क. कोप्प = खोपटी, खेडे]
कोपट स्त्री. न. १. झोपडे (शेतातील गवत, पानांचे); वृक्षाची ढोली; खोपटी; कुटी; मांडव; मंडपी : ‘तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥’ - ज्ञा १३·७८६. २. (ल.) घर : ‘लावि आंत ठाऊनि कोपट ।’ - अमं ४·४ : ‘म्हणौनि मठाचे दारिं कोंपि करुनि असावें ।’ - पंच १·२८. ३. (ल.) शरीर : ‘काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥’ - तुगा ६८२. [क. कोप्प = खोपटी, खेडे]
कोपट वि. कोपिष्ट; रागीट; चिडखोर. [सं. कोप]
कोपणे अक्रि. रागावणे. [सं. कोप]
कोपर पु. भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्याचे मागील टोक. [सं. कूर्पुर] (वा.) कोपराढोपराने करणे - (बायकी) कसे तरी करून कष्टाने, आयासाने (घरकाम) करणे. कोपराढोपराने चालणे, जाणे - मोठ्या नेटाने संकटातून तरून जाणे, कसेबसे काम पुरे पाडणे. (कमजोरी, अशक्तता असताना). कोपराने खणणे - सवलतीचा प्रमाणाबाहेर फायदा घेणे; अतिरेक करणे. कोपरापासून हात जोडणे - अति कळवळ्याने विनवणे. कोपरापासून नमस्कार - १. वरील अर्थ. २. यापुढे संबंध नसेल तर बरे अशा अर्थी.
कोपर   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोपरा   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोपरी   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोहोपरा   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोपरकात्री स्त्री. उपयोगात येणारी वाकड्या पात्याची कात्री.
कोपरखळी स्त्री. १. कोपराने मारलेली ढुसणी, ढुसकणी. (क्रि. मारणे, देणे.) २. कोपराने पाडलेला खळगा. (हा गुराख्यांचा खेळ असतो. अशा खळग्यात ती पोरे गोट्यांनी खेळतात.) (क्रि. पाडणे.) ३. (ल.) लेखात, भाषणात उगाच दुसऱ्यावर घेतलेले तोंडसुख; जाता जाता, सहजासहजी एखाद्याविरुद्ध बोलणे; ताशेरा.
कोपरखिळी स्त्री. १. कोपराने मारलेली ढुसणी, ढुसकणी. (क्रि. मारणे, देणे.) २. कोपराने पाडलेला खळगा. (हा गुराख्यांचा खेळ असतो. अशा खळग्यात ती पोरे गोट्यांनी खेळतात.) (क्रि. पाडणे.) ३. (ल.) लेखात, भाषणात उगाच दुसऱ्यावर घेतलेले तोंडसुख; जाता जाता, सहजासहजी एखाद्याविरुद्ध बोलणे; ताशेरा.
कोपरदुटी स्त्री. कोपरे आणि गुडघे पोटाशी धरून झाकण्यापुरते वस्त्र : ‘स्नानकुंडली कां कोपरदुटी पांगुरावी :’ - लीचउ १३७.
कोपरघुसणी स्त्री. (गोट्यांच्या खेळातील एक शब्द) कोपराने गोटी गलीत घालणे. पहा : कानघुसणी
कोपरबरास न. १. तांबे व पितळ यांचा मिश्र धातू. २. टीनचा धातू. कोपरबरासचा डबा = केरोसिनचा (टिनचा) डबा (कु.) ३. जर्मन सिल्व्हर [इं. कॉपर + ब्रास]
कोपरबास न. १. तांबे व पितळ यांचा मिश्र धातू. २. टीनचा धातू. कोपरबरासचा डबा = केरोसिनचा (टिनचा) डबा (कु.) ३. जर्मन सिल्व्हर [इं. कॉपर + ब्रास]
कोपरमोड वि. कोपरासारखी मोडलेली (जागा). (व.)
कोपरवाळी स्त्री. बाजूबंद; एक दागिना. (व.)
कोपरा पु. १. कोन; उपदिशा. २. (वास्तु.) दोन भिंतीच्या सांध्यातील, दर्शनी काटकोनातील चौरस दगड. [सं. कूर्परौ] (वा.) कोपरा धरणे - १. रुसणे. २. विटाळशी असणे.