शब्द समानार्थी व्याख्या
कोळिंदर पु. दोन रुखांवर खुंट्या मारून त्यावर एक आडवे लाकूड मारतात त्यास कोयनळ म्हणतात. कोयनळावर कोळंब्याची एक बाजू टेकलेली असते. (को.)
कोयनाटकी स्त्री. कोयीची केलेली भिंगरी, पिपाणी; कोकाटी; कोय.
कोयनाटकी वि. (कोयीने संतुष्ट होणारा) कंजूष, कृपण.
कोयनेल न. हीवतापावरचे एक औषध; सिंकोना सालीचे सत्त्व : ‘५ ग्रेन कोयनेल दिवसातून ३-४ वेळा घ्यावे.’ - निऔ २२. [इं. क्वीनीन]
कोयपाणी न. गुठळ्या व पाणी झालेले (शितड्या पाण्याचे) दही.
कोय मारणूक कोया :   मुलांचा एक खेळ.
कोयमे न. ताक करायचे मडके. (खा.) पहा : कोळंबे
कोयर पु. केर; उकिरडा. (गो.)
कोयरसिताडो पु. शेणपोतेरे. (गो.)
कोयरी स्त्री. १. चांदीच्या पत्र्याची, सपाट अगर पसरट आकाराची, साधी अगर नक्षी केलेली डबी. ही मधोमध कापलेल्या आंब्याच्या छेदासारखी दिसते. हिच्यात हळदीकुंकू ठेवण्यासाठी दोन-तीन पुडे असतात; हळदीकुंकवाची डबी; कुयरी. २. झीग व टिकली यांचे कोयरीच्या आकाराचे विणकाम. ३. आंबेघाटी कोयरीच्या आकाराची टोपणे, मणी, घागऱ्या जिच्यात ओवल्या आहेत असा दागिना, कमरपट्टा, माळ इ.
कोयरीची माळ स्त्री. चांदीच्या कोयरीच्या आकाराच्या मण्यांची माळ; घोड्याचा दागिना.
कोयल न. नांगरताना चुकलेली जागा. (बे.)
कोयल स्त्री. कोकिळा : ‘मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ ।-’ अफला ५४. [सं. कोकिल]
कोईल स्त्री. कोकिळा : ‘मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ ।-’ अफला ५४. [सं. कोकिल]
कोयाळ स्त्री. कोकिळा : ‘मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ ।-’ अफला ५४. [सं. कोकिल]
कोयंडा पु. १. दाराची कडी अडकविण्याचे गोलाकार अडकण; वाकवून दुहेरी केलेला खिळा. २. कडीत घालायचा खिळा; अडसर; आकडा. ३. लांब आसुडाचा लाकडी दांडा. (कर.) ४. फासा (नथ, डूल इत्यादीचा). ५. कोलदांडा (मनुष्याला किंवा गुरांना घालण्याचा) हाताला बांधून त्यामध्ये घातलेला. ६. एका खेळातील वाकडी काठी. गुराखी हा खेळ खेळतात. (कु.), ७. आंब्यातील कोय. (राजा.)
कोयंडी स्त्री. १. गुराने दावे चावून तोडू नये व मारक्या गुराने एकदम वळून हल्ला करू नये म्हणून एका लांब काठीला दोन कान्या लावून वेसणीत बांधण्याची केलेली व्यवस्था. २. शिक्षा म्हणून हात वगैरेंना कळ लागण्यासाठी लावण्यात येणाऱ्या टिपऱ्या.
कोयंडी स्त्री. पु. विहिरीच्या दोराचा फास. (गो.)
कोयंडो स्त्री. पु. विहिरीच्या दोराचा फास. (गो.)
कोयंडो पु. दांडू. (गो. कर.)
कोयडो पु. दांडू. (गो. कर.)
कोया पु. १. एक पक्षी. २. या पक्षाचे केविलवाणे ओरडणे, ध्वनी, शब्द. [ध्व.] (वा.) कोया करणे, कोया करीत हिंडणे - १. कीव येण्याजोगी याचना, विनवणी करणे (अन्न इ. करिता). २. कंगाल होऊन भटकत फिरणे.
कोयाड न. मंत्रतंत्र, जादूटोणा : ‘त्या काळात तरी हा कोयाडाचाच प्रकार’ - बहु २८.
कोयाडे न. पिकलेले, पाडाचे व आंबट आंबे उकडून गीर काढून त्यात पाणी, गूळ व मसाला वगैरे घालून केलेला पदार्थ; आंब्याचे तोंडी लावणे.
कोयार पु. बेलफळ कोरून केलेला भोवरा. (व.)