शब्द समानार्थी व्याख्या
कोरंटी स्त्री. एक काटेरी, फुलांचे झाड
कोरंब वि. झडलेला; झिजलेला; खंगलेला; जीर्ण; अशक्त; जर्जर (काष्ठ, शरीर इ.). (राजा.) [क. कोरे = झडणे, कमी होणे]
कोरा वि. १. ताजा; नवा; नवीन; नुकताच केलेला; न धुतलेला; न उपभोगलेला; न वापरलेला (कागद, भांडे, वस्त्र, इमारत, दुकान इ.). २. (ल.) ज्याला सराव किंवा अभ्यास नाही असा नवशिका (माणूस); अनुभव नसलेला. ३. न सुधारलेला, बदललेला; काही परिणाम ज्यावर होत नाही असा; संस्कारहीन (शिक्षण, शिस्त वगैरेनी). ४. कमी-जास्तपणा, वाढ किंवा काही परिणाम झाला नाही असा (व्यवहार, व्यापार, माल). ५. ज्याच्यावर काहीच लिहिलेले नाही असा. (कागद इ.) ६. रोख. (वा.) कोरा घेणे - दिव्य स्वीकारणे. [फा. कोऱ्हा]
कोरा   रुपयाचा एक प्रकार.
कोरान न. न शिजविलेल्या तांदूळ, गहू इत्यादी धान्यांची भिक्षा. पहा : कोरडी भिक्षा. (क्रि. करणे, मागणे.) : ‘काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥’ - ज्ञा १२·८५.
कोरान्न न. न शिजविलेल्या तांदूळ, गहू इत्यादी धान्यांची भिक्षा. पहा : कोरडी भिक्षा. (क्रि. करणे, मागणे.) : ‘काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥’ - ज्ञा १२·८५.
कोरान्नकर पु. स्त्री. कोरान्नाची भिक्षा मागणारा पुरुष किंवा स्त्री : ‘दारा न ये कोरान्नकर ।’ - एभा २३·९३.
कोरान्नकरी पु. स्त्री. कोरान्नाची भिक्षा मागणारा पुरुष किंवा स्त्री : ‘दारा न ये कोरान्नकर ।’ - एभा २३·९३.
कोरान्नकरीण पु. स्त्री. कोरान्नाची भिक्षा मागणारा पुरुष किंवा स्त्री : ‘दारा न ये कोरान्नकर ।’ - एभा २३·९३.
कोराल न. (पशु.) पाळीव जनावराच्या संरक्षणासाठी घातलेले कुंपण.
कोराळ न. १. डोंगरातील कडा, खडक : ‘एरव्ही फोडी कोऱ्हाळें । पाणी जैसे ॥’ - ज्ञा १६·११७. २. डोंगरातील कोरीव लेणी. ३. दगड; खडकाळ जमीन. [क.]
कोराळे न. १. डोंगरातील कडा, खडक : ‘एरव्ही फोडी कोऱ्हाळें । पाणी जैसे ॥’ - ज्ञा १६·११७. २. डोंगरातील कोरीव लेणी. ३. दगड; खडकाळ जमीन. [क.]
कोराळ जमीन   (डांग प्रांतातील) तांबडसर अशी निकस जमीन. ही टेकड्यांच्या पायथ्याशी असते. पहा : कोराळे
कोरांटा पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोरांटी पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोऱ्हांटा पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोऱ्हांटी पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोऱ्हांटकी पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोरांटकी   पहा : कोरांटी
कोरिका पु. खाद्य पदार्थ : ‘नाना कोरिके विस्तीर्ण, रुक्मिणी वाढीतसे ।’ - नागा ९९५.
कोरी स्त्री. नापीक जमीन. ही दुसऱ्या जमिनीबरोबर कसली असता त्या जमिनीवर सरकारसारा बसत नाही. पहा : कोराळ जमीन
कोरीटक   पहा : कोरडिके ४
कोरीव वि. १. कोरलेले; खोदलेले; पोखरलेले. २. खवलेला, मगज बाहेर काढलेला (नारळ इ.). ‘घडीला कां कोरीवा । परि जैसा ।’ - अमृ ९·७.
कोरीवकातीव वि. कोरलेले व कातलेले. (ल.) सुबक; सुरेख; सुंदर; चांगल्या आकाराचे.
कोरीव ठोकळा   चित्रे छापण्याचा ठसा.