शब्द समानार्थी व्याख्या
कोरीव लेख   (ग्रंथ) दगडाच्या अथवा अन्य पृष्ठभागावर कोरून काढलेली अक्षरे, चिन्हे, लेख इत्यादी.
कोरी सवाशीण स्त्री. विवाहित परंतु ऋतू प्राप्त न झालेली सवाष्ण.
कोरे वि. बिनचुन्याचे; कच्चे : ‘दिवसगती लागेल याकरिता कोरे काम करावे यैसे आमचा विचार आहे.’ - पेद १६·३७. [फा. कोऱ्हा]
कोरोडा   पहा : कोरवडा
कोऱ्हडा   पहा : कोरवडा
कोऱ्होडा   पहा : कोरवडा
कोरोलँ न. शेतातील तण. (गो.) पहा : कोरळ [क. करले]
कोर्ट न. १. न्याय देणारी सभा; न्याय कचेरी; सरकार दरबार. २. न्यायाधीश. ३. सर्व न्यायाधीश आणि मुलकी अधिकारी तसेच लवादपंच यांच्याशिवाय ज्यांना पुरावा घेण्याचा कायद्यानुसार अधिकार आहे अशा सर्व व्यक्ती. [इं.] (वा.) कोर्टकचेरी, कोर्टदरबार करणे - एखाद्या गोष्टीच्या निकालासाठी कोर्टात किंवा अधिकाऱ्याकडे तक्रार करणे : ‘गुजा, व्यंकू, अरे आता कोर्टदरबार का करणार आहात?’ - पडघ ११५. ४. खेळण्याकरता तयार केलेली बंदिस्त जागा, जसे :- टेनिस कोर्ट.
कोर्टमार्शल न. लष्करातील गुन्हेगारांसाठीचे लष्करी न्यायालय : ‘त्याचा इन्साफ कोर्ट मार्शलकडून करवावा.’ - के १७·५·३०.
कोऱ्हेर वि. लाकूड इत्यादीतून कोरून तयार केलेला; कोरीव. (बाहुली इ.)
कोऱ्हेरी वि. लाकूड इत्यादीतून कोरून तयार केलेला; कोरीव. (बाहुली इ.)
कोल पु. १. अभय. किल्ला शरण आला म्हणजे त्याने कौल घेतला असे म्हणत : ‘ठाणेकरी काही अद्यापि कोलाची बोली बोलत नाही.’ - इएमपी ३६. २. दंड; काठी. ३. तिळाची कळी : ‘झाडिलीचि कोळे झाडी ।’ - राज्ञा १३·५८६.
कौल पु. अभय. किल्ला शरण आला म्हणजे त्याने कौल घेतला असे म्हणत : ‘ठाणेकरी काही अद्यापि कोलाची बोली बोलत नाही.’ - इएमपी ३६.
कोल स्त्री. विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळातील गली. पहा : कोली
कोलण स्त्री. विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळातील गली. पहा : कोली
कोलणी स्त्री. विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळातील गली. पहा : कोली
कोल न. कर्जफेडीकरिता जप्त केलेले उत्पन्न, मालमत्ता; शेतातील पीक इ. जप्तीचा माल; कबज. (क्रि. धरून ठेवणे, सोडणे.) [ फा. कौल = करार]
कोल वि. गरीब, अशक्त; दुबळा (द्रव्याने, शरीराने, चालण्याने, बुद्धीने); असमर्थ (को.) [क. कोळे = वाळणे, झिजणे]
कोल पु. डुक्कर. [सं.]
कोलकर पु. सेवेकरी; शिपाई; तराळ. (माण.) [क. कोतुकार = शिपाई]
कोलकरी पु. सेवेकरी; शिपाई; तराळ. (माण.) [क. कोतुकार = शिपाई]
कोलकाठी स्त्री. एक खेळ; दांडपट्टा : ‘देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं’ - ज्ञा ११·५४८. [क. कोलु = काठी]
कोलके न. वजन.
कोलखंड न. मोठे पोट. (गो.)
कोलगे न. कुत्री. (गो.) पहा : कोली