शब्द समानार्थी व्याख्या
कोश पु. १. खजिना; साठा; संग्रह; तिजोरी; खाण; वखार. २. जीवाचे अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंदमय असे जे कोश आहेत त्यांपैकी प्रत्येक; आत्म्याचे आवरण. ३. (ग्रंथ.) ज्यात वर्णानुक्रमे शब्दांची रचना करून त्यांची माहिती दिली आहे असा ग्रंथ. ४. आवरण; पटल; पापुद्रा; अस्तर. ५. म्यान (तरवारीचे). ६. कोळीकीटक अंड स्थितीतून कीट स्थितीत येऊन शरीराभोवती रेशमासारखे मऊ आवरण करतो तो; कोशेटा. ७. कळी : ‘अंतरीं फांकें । हृदयकोशु ॥’ - ज्ञा ६·२०९. ८. दिव्य करून लावलेला निकाल; न्यायदानातील दिव्य (अग्नी, पाणी, विष, वजनाचा काटा, उकळणारे तेल, कुलदेवतेवर पाणी घालणे इ.); शपथ; प्रतिज्ञा (वा.) कोश पिणे - शपथ घेणे : ‘पियालीं कृतनिश्चयाचा कोशा ।’ - ज्ञा १३·६०५. [सं.]
कोशकल्प पु. (वन.) कोश असलेला संवर्त; कोश असलेला पुष्पमुकुट; कोशाप्रमाणे कार्यक्षम अवयव.
कोशकार पु. १. रेशमाचा किडा; कोळ्याच्या वर्गातील प्राणी. २. कोशस्थितीत असलेला, कोशवासी किडा किंवा फुलपाखरू. [सं.], ३. शब्दार्थ कोश रचणारा, कोश तयार करणारा संपादक. [सं.]
कोशकीट पु. पहा : कोशकार १. कोशकिडा हा आपल्याभोवती कोशेटा करून आपल्यालाच कोंडून घेतो : ‘एरव्ही कोशकीटकाचिया परी । तो आपण या आपण वैरी ।’ - ज्ञा ६·७२. [सं.]
कोशकीटक पु. पहा : कोशकार १. कोशकिडा हा आपल्याभोवती कोशेटा करून आपल्यालाच कोंडून घेतो : ‘एरव्ही कोशकीटकाचिया परी । तो आपण या आपण वैरी ।’ - ज्ञा ६·७२. [सं.]
कोशगृह न. भांडार : ‘कीं कोशगृहीं प्रवेशोनी ।’ - रावि १·७१. [सं.]
कोशपद   कोशातील शब्दनोंद.
कोशपान न. देवाचे तीर्थ पिणे; दिव्याचा एक प्रकार; शपथ घेणे.
कोशमय वीट   (स्था.) वजनाला हलकी व उष्णतारोधक सच्छिद्र वीट.
कोशरा न. जाडेभरडे रेशीम. ‘बंदुखानचे बंदा बद्दल कोशरे सुमारे ५००० हजार पाठविणे.’ - पेद ४५·१००. [सं. कोश]
कोशरे न. जाडेभरडे रेशीम. ‘बंदुखानचे बंदा बद्दल कोशरे सुमारे ५००० हजार पाठविणे.’ - पेद ४५·१००. [सं. कोश]
कोशेरे न. जाडेभरडे रेशीम. ‘बंदुखानचे बंदा बद्दल कोशरे सुमारे ५००० हजार पाठविणे.’ - पेद ४५·१००. [सं. कोश]
कोशल न. खलबत : ‘...खंडोपंत व सदाशिव माणकेश्वर यांस बोलावून कोशल अर्ध रात्रीपर्यंत जालें.’ - ऐलेसं ७८८१.
कोशलगार पु. सल्लागार.
कोशलदार पु. सल्लागार.
कोशशुद्धि स्त्री. दिव्याने निरपराधित्व सिद्ध करण्याची क्रिया. [सं.]
कोशशुद्धी स्त्री. दिव्याने निरपराधित्व सिद्ध करण्याची क्रिया. [सं.]
कोशसिद्धांत पु. (तत्त्व.) अन्नरसमय आत्म्याच्या आत प्राणमय आत्मा, त्याच्या आत मनोमय आत्मा, त्याच्या आत विज्ञानमय आत्मा व त्याच्याही आत आनंदमय आत्मा राहतो. हे आत्म्याचे कोश आहेत. याचे विवरण करणारा सिद्धांत. त्याला कोशसिद्धांत किंवा पंचकोशसिद्धांत असे म्हणतात. [सं.]
कोशा वि. काळसर रंगाची (गाय, बैल).
कोशा पु. डोक्याला बांधायचा रेशमी रुमाल, फेटा (कोशेट्याच्या रेशमाचा). [सं. कौशेयः]
कोशागार पु. तिजोरी; जामदारखाना; भांडारगृह; खजिना. [सं.]
कोषागार पु. तिजोरी; जामदारखाना; भांडारगृह; खजिना. [सं.]
कोशाध्यक्ष पु. खजिनदार; निधी ज्याच्याकडे असतो तो पदाधिकारी; द्रव्यसंग्रहावरील अधिकारी. [सं. कोश + अध्यक्ष]
कोषाध्यक्ष पु. खजिनदार; निधी ज्याच्याकडे असतो तो पदाधिकारी; द्रव्यसंग्रहावरील अधिकारी. [सं. कोश + अध्यक्ष]
कोशासक्ती स्त्री. बंधित असण्याची इच्छा.