शब्द समानार्थी व्याख्या
कोष्टकी गुणाकार गुण्य राशींचे जितके अंक तितक्या कोष्टकांचा गुणकांक. समसंख्यांक पंक्ती करून गुणण्याचा प्रकार. धावरा गुणाकार, बैठा गुणाकार. पहा : कपटसिंधु
कोष्टम न. झेंगट; लफडे; खेंकटे. (व.)
कोष्टसंख्या स्त्री. आराखडा : ‘मराठी व्याकरणाची कोष्टसंख्या म्हणजे आराखडा आंग्लभाषेस अनुसरून असावा.’ - के १·१·१९३७.
कोष्टा पु. कोष्टी; कोळी.
कोष्टाऊ वि. हातमागाचा : ‘तुम्ही स्वतःला कोष्टाऊ लुगडी घ्या.’ - माजी.
कोष्टी पु. १. एक विणकर जात. ह्यांचा धंदा सूत कातणे व विणणे. साळ्यापेक्षा यांची जात निराळी. २. (ल.) कोळी, किडा. हा तंतू काढून जाळे विणतो. ३. एक पक्षी. [सं. कोश]
कोष्टी स्त्री. (बकऱ्याची, डुकराची इ.) मानाची सागुती; सागुतीची पुडी. (गो. कु.)
कोष्ठ न. १. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात. २. कोड (एक त्वचेचा रोग). [सं. कुष्ठ]
कोष्ठकोळं जन न. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात.
कोष्ठकोळां जन न. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात.
कोष्ठकोळि जन न. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात.
कोष्ठ पु. १. पोट; कोठा. २. धान्याचे कोठार; कोठी. ३. खोली; दिवाणखाना. ४. आम, रुधिर, मूत्र इ. देहातील स्थाने. जसे : - आमकोष्ठ, इ.
कोष्ट पु. १. पोट; कोठा. २. धान्याचे कोठार; कोठी. ३. खोली; दिवाणखाना. ४. आम, रुधिर, मूत्र इ. देहातील स्थाने. जसे : - आमकोष्ठ, इ.
कोष्ठ न. (स्था.) खाच; खळगा; खड्डा. इतर बांधकामापेक्षा खालच्या पातळीवर बांधलेली जागा. [सं.]
कोष्ठक न. (वै.) लहान कोशांपैकी एक. यामध्ये वाहिनीचे प्रशाखन होण्याची क्रिया संपते. तिचे गुच्छभ ग्रंथीमध्ये परिवर्तन होते. या ग्रंथी स्रावी पेशींनी भरून जातात. या कोशमय ग्रंथींपैकी प्रत्येक. [सं.]
कोष्ठबंधक वि. मलावरोध करणारे; स्तंभक. [सं.]
कोष्ठशुद्धि स्त्री. शौचाला साफ होणे; कोठा शुद्ध होणे (पुष्कळ रेच झाल्यानंतर). [सं.]
कोष्ठशुद्धी स्त्री. शौचाला साफ होणे; कोठा शुद्ध होणे (पुष्कळ रेच झाल्यानंतर). [सं.]
कोष्ठागार   पहा : कोठार
कोष्ठीकरण न. (मानस.) कल्पना, मूल्ये किंवा अभिवृत्ती दडवून ठेवणे.
कोष्ण वि. किंचित उष्ण; कोंबट; कुबट. [सं.]
कोस पु. १. अंतर दाखविणारे रस्ता मोजणीचे माप; साधारणतः दोन मैल. एक चतुर्थांश योजन. याचे निरनिराळ्या ठिकाणी गजाच्या लांबीप्रमाणे अंतर निरनिराळे असते. साधारणपणे चार हजार हातांचा कोस धरतात. [सं. क्रोश], २. चतुष्कोण, त्रिकोण इ. विवक्षित आकार तंतोतंत नसून त्यात वाकडेपणा आल्यामुळे होणारा न्यूनाधिक भाव; कोच (ताणलेले कापड, हातरुमाल, शेत, भिंत, रस्ता, कुंपण इ. ना येणारा); आधिक्य; वाढ (क्रि. येणे, असणे, होणे, जाणे, निघणे, काढणे, जिरणे, जिरविणे.) [क. कोशे = वाकण, वळण], ३. दिव्य; पहा : कोश (क्रि. घेणे, पिणे.)
कोस स्त्री. १. कूस; फायद्याची मर्यादा : ‘कोणत्या कापडांत किती कोस आहे हें पाहून तसलें कापड येथें तयार करण्याची धडपड...’ - जप्रशि १०२. २. कापडाचा तिरकेपणा. ३. सापाची कात. (व.) [सं. कोश]
कोसकोसी स्त्री. गावागावातील अंतरे कोसात दाखविणारे टिपण : ‘परगणे वाई कोसकसी संमत मुरें देहें ४७.’ - पराग अंक ३ वर्ष १. ९/१०.
कोसपेणी स्त्री. कोसांची मोजदाद.