शब्द समानार्थी व्याख्या
कोसम   पहा : कोशिंब
कोसम्यौंचे सक्रि. पाण्यामुळे (लाकूड) कुजून जाणे. (गो.)
कोसरा पु. कोळी; किडा. पहा : कोसला : ‘गगनीं लागला कोंसरा । कोण पुरवी तेथे चारा ।’ - तुगा ३३०९.
कोसला पु. १. रेशमाचा किडा : ‘जैसा स्वयें बांधौन कोसला मृत्यु पावें ।’ - दास ८·७९. २. रेशमाचा किडा किंवा कोळी यांचा कोश किंवा कोशिटा. ३. ह्या कोशेट्याचा तोड्याच्या बंदुकीच्या भोवती असलेला वेढा.
कोसला (वि.) १. काळसर : ‘गणा पाटलाचा खोंड.. रंगानं कोसला.’ - गागो १००. २. पिवळसर. [सं. कोश + ल]
कोसा पु. १. रेशमाचा किडा : ‘जैसा स्वयें बांधौन कोसला मृत्यु पावें ।’ - दास ८·७९. २. रेशमाचा किडा किंवा कोळी यांचा कोश किंवा कोशिटा. ३. ह्या कोशेट्याचा तोड्याच्या बंदुकीच्या भोवती असलेला वेढा.
कोसा (वि.) १. काळसर : ‘गणा पाटलाचा खोंड.. रंगानं कोसला.’ - गागो १००. २. पिवळसर. [सं. कोश + ल]
कोसला पु. चकमकीवरून उडवलेली ठिणगी ज्याच्यावर पाडतात तो कापूस.
कोसली स्त्री. मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वा साखर इ. घालून तयार केलेली करंजी, मिष्ट पदार्थ. कोसल्या उकडून वा तळून करतात. (ना.)
कोसळणे उक्रि. १. एकदम पडणे; तुटून, मोडून पडणे; ढासळणे; विस्कळणे (भिंत, विहीर, रास इ.) : ‘बाजी एकदम जागच्या जागींच कोसळला.’ - स्वप ८८. २. पडून तुकडे होणे (यंत्र इ.) ३. (ल.) वेगाने खाली येणे, पडणे (पाऊस). ४. आधार सुटून, वियुक्त होऊन, सपाटून भरभर खाली पडणे. (वाऱ्याने फळे, फुले). ५. फिसकटणे; प्रतिकूल होणे; निष्फळ होणे (बेत, मसलत). [क. कोसरु = आधार सुटणे]
कोसंब   पहा : कोशिंब : ‘कोसंब अंजीर खैराडा ।’ - कालिका २२·१५.
कोसाई स्त्री. घोड्याचा एक रोग. याने त्याच्या दोन्ही मांड्याखाली गाठी येतात. - अश्वप २·२८३.
कोसिटा पु. कोष्ठी, विणकर : शैव विप्र चाटे । सोवनी अपार कोसिटे ।’ - उह २१६४.
कोसीस   पहा : कोशीस
कोसे वि. भुरट्या रंगाचे : ‘कोसी कनकवणे.’ - वह २८२.
कोसेरा पु. कोळ्याचे घर.
कोस्टी स्त्री. शिकार करून मारलेल्या सावजाचे घातलेले वाटे. [कु.]
कोस्त पु. कलमी आंब्याची एक जात. (गो.) [पो. कोस्ता]
कोहक न. कुहर; विवर; गुहा; डोंगर; पर्वत; भुयारीमार्ग : ‘कोहकी वसती ।’ - ऋ ७९; ‘कोणें एके नगराबाहेरी कोहंकी । चंडरव नामे कोल्हा असे ।’ - पंच १·३७. [सं. कुहर]
कोहंक न. कुहर; विवर; गुहा; डोंगर; पर्वत; भुयारीमार्ग : ‘कोहकी वसती ।’ - ऋ ७९; ‘कोणें एके नगराबाहेरी कोहंकी । चंडरव नामे कोल्हा असे ।’ - पंच १·३७. [सं. कुहर]
कोहकणे अक्रि. वाळणे; सुकणे; रोडावणे. (व.) [सं. कोय]
कोहटळी स्त्री. कुजकी घाण; घाणीची जागा: ‘मग बाळपणीची कोहटळी । धुंडूनि घेतसे ।’ - स्वानु ९·४·७३. [सं. कोथ]
कोहडे   पहा : कुहडे
कोहेडे   पहा : कुहडे
कोहरटे पु. अव. वृक्षाचे शाखाविहीन बुंधे.