शब्द समानार्थी व्याख्या
कोळमाटणे अक्रि. पहा : कोळपणे : ‘येल कोळमाटून जावी’ - रैत ४३.
कोळमुटचे अक्रि. कल्हई नसलेल्या भांड्यात पदार्थ ठेवल्याने त्याला कलंक येणे; पदार्थ कळकणे. (गो.)
कोळमूळ न. उभट व वाटोळे भांडे (कढी, ताक वाढण्यासाठी उपयोगी. काही भांड्यांना मागे मूठ असते); पाळे. (गो. कु.)
कोळम न. लहान कोळंबी (गो. कु.). पहा : कोळंबे
कोळम्यां न. लहान कोळंबी (गो. कु.). पहा : कोळंबे
कोळयो पु. भाताचे बी. (गो.)
कोळवण न. १. वसई व कल्याण यांच्या उत्तरेकडील प्रदेश; उत्तर कोंकण. यात विशेषतः कोळी लोकांची वस्ती आहे. २. कोळ्यांचा दंगा, पुंडावा : ‘महीकाठी कोळवण जाले आहे.’ - पेद ३६·२११.
कोळवा पु. वाळवून ठेवलेल्या पालेभाज्या. (व.)
कोळवाड स्त्री. पु. गावातील कोळी लोकांची वस्ती, वाडी.
कोळवाडा स्त्री. पु. गावातील कोळी लोकांची वस्ती, वाडी.
कोळविणे उक्रि. पहा : कोळणे
कोळवीजु स्त्री. अकाळ वीज : ‘जैसी उगवली कोळवीजुची पुटी ।’ - रुस्व १३·१५३९.
कोळवू स्त्री. (बैल किंवा रेडा इ.) जनावरांच्या अंगावरील गोचीड किंवा गोमाशी; कोळऊ.
कोळवे न. १. शेराचा एक अष्टमांश भाग अथवा चिपट्याचा एक द्वितीयांश भाग; अदपावाचे माप : ‘-कधि ऐकली चिपटीं कधि निपट कोळवीं चोळवी कधीं पाहिलीं ।’ - राला १०९. [सं. कुडव = पावशेर], २. ठेंगण्या घराला आत जाताना वर डोके लागू नये म्हणून कमानीसारखा आकार आणून उंच वाढविलेला पाख्याचा भाग. ३. चांधईला लागून काढलेली खोली; घराची पडवी. हिचा उपयोग भांड्यांची खोली, स्वयंपाक घर, न्हाणीघर वगैरेसाठी होतो. (कु. को.), ४. बैलाचे वशिंड. (को.)
कोळे न. बैलाचे वशिंड. (को.)
कोळशी स्त्री. १. काजळी (जळत्या वातीची किंवा मशालीची); कोजळी; जळकी वात. २. जोंधळ्यावरील रोग. याने दाणे काळे पडतात. ३. नाचणीची एक गरवी जात. हिचे दाणे काळे असतात. [क. कोळ्‌ळि]
कोळशीट न. कोळ्यांचे जाळे.
कोळशेटे न. कोळ्यांचे जाळे.
कोळष्टक न. कोळ्यांचे जाळे.
कोळिष्टक न. कोळ्यांचे जाळे.
कोळशीण स्त्री. एक प्रकारचे लहान औषधी झुडूप. अंगाखाली कोळी चुरडला असताना याच्या पाल्याचा रस लावतात.
कोळसीण स्त्री. एक प्रकारचे लहान औषधी झुडूप. अंगाखाली कोळी चुरडला असताना याच्या पाल्याचा रस लावतात.
कोळशी सड   पिकांचा एक रोग. जमिनीलगत कवकामुळे हा रोग काही पिकांच्या रोपांना होतो. यामुळे स्तंभ काळा पडतो. काही वेळेला रोगपीडित काळा स्तंभ लिबलिबित होतो.
कोळसणे अक्रि. कोळशासारखे काळे होणे.
कोळसन न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)