शब्द समानार्थी व्याख्या
कोंदाटणे अक्रि. पहा : कोंदणे
कोंदी स्त्री. कोन; भिंतीची सांध किंवा जोड. बहुधा सांधीकोंदी असा जोडशब्द येतो.
कोंधाट   पहा : कोंदाट : ‘कर्पूरकदलिचीं गर्भपूटें । उकलति कर्पूराचेनि कोंधाटे ।’ - राज्ञा ११·२४६.
कोंधाटणे अक्रि. कोंदाटणे, कोंदणे : ‘तेजें कोंधाटलिया दिशा । जेयाचेनि ॥’ - राज्ञा १·१३९.
कोंना पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]
कोंनी पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]
कोंने पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]
कोंब पु. १. कोम; झाडाचा धुमारा (केळीच्या कांद्यापासून निघणारा पासंबा) : ‘बाळार्क कंदा निघाले कोंब । तैसे रत्नमणींचे खांब ।’ - मुसभा २·८. २. अंकुर; मोड : ‘विपरीत ज्ञानाचा कोंब फुटे ।’ - विउ ३·७. ३. पालखीचा वाकलेला दांडा : ‘एकीकडे दांडीयाचा कोंबु तेणें खांदी घेतला :’ - गोप्र ८२. (गो.) [सं. कंबी] (वा.) कोंब फुटणे - १. कोंब येणे. २. (ल.) आशा उत्पन्न होणे.
कोंबट   वि. कोमट; उबट; किंचित उष्ण; साधारण ऊन. (शरीर, वस्तू इ. स लावतात. हवेच्या संदर्भात हा शब्द वापरत नाहीत.) [सं. कोण]
कोंबडका पु. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारा. (शेतकी शेतकरी १९३७)
कोंबडकी स्त्री. कुक्कुटपालन. (शेतकी शेतकरी १९३७)
कोंबडखाना पु. कोंबड्या ठेवायची जागा; एकंदर कोंबड्या : ‘सगळा कोंबडखाना विकून झिपऱ्याकरिता चांदीचा करगोटा आणणार होती.’ - आआशे ३१.
कोंबडतुरा पु. तांबडा देठ व तुरा असणारे एकप्रकारचे तण.
कोंबडनखी स्त्री. एक प्रकारची औषधी मुळी.
कोंबडबाउल पु. अंडी विकत घेणारा : ‘मघाशी कोंबडबाउल आला होता.’ - सराई २२.
कोंबडसाद स्त्री. कोंबडा आरवण्याची वेळ; पहाट.
कोंबडा पु. १. एक पाळीव पक्षी; कुक्कुट. याचा रंग चित्रविचित्र असून डोक्याला तुरा असतो व गळ्याला कल्ले असतात. याचे मांस खातात. २. फुगडीचा एक प्रकार; मुलींचा एक खेळ. ३. (ल.) केसांचा फुगा. ४. चंद्राभोवती पडलेले खळे. ५. राजगिऱ्याच्या वर्गातले एक फुलझाड.
कोंबडी वि. आकड्याच्या जुगारातील परिभाषा : ‘आंगठा म्हणजे एक, कोंबडी दोन.’ - मक १९६१·३१.
कोंबडे न. १. कोंबड्याचे लहान पिल्लू. २. ढगातील तांबूस पट्टे; पाऊस पडण्याचे चिन्ह. (वा.) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - मुद्दाम पदरचे खर्चून भांडणे लावणे. कोंबडे आरणे - पहाटेची वेळ होणे.
कोंबणे उक्रि. १. ठासून भरणे; गच्च भरणे. ठासणे. २. बदडणे; कुबलणे.
कोंबणे अक्रि. १. कोमेजणे; वाळणे; निस्तेज होणे. २. कोंब, अंकुर फुटणे, मोड येणे.
कोंबरा पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.
कोंबारा पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.
कोंबरी पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.
कोबरी पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.