शब्द समानार्थी व्याख्या
कौलिक पु. वि. १. शाक्त पंथातील एक व्यक्ती अथवा तो पंथ. २. (सामा.) मांत्रिक; वाममार्गी; चेटक्या. ३. कपट. [सं.]
कौलिक पु. व्याध; जाळे वापरून सावज पकडणारा; पारधी : ‘एके दिनीं कौलिक पारधीतें ।’ -वामन व्याधाख्यान १. [सं. कौल]
कौली स्त्री. सरकारकडून कौल घेऊन प्रथमतः लागवडीला आणलेली जमीन.
कौली वि. सरकारातून ज्याचा कौल घेतला आहे असे (शेत, झाड इ.).
कौली पु. १. एक प्रकारची आखूड व दाट उगवणारी वनस्पती. ही बहुधा मळे जमिनीत फार होते. (चि. कु.)
कौलीप्रक्षेप पु. (स्था.) पाणी वाहून जाण्यासाठी भिंतीच्या पुढे आलेला कौलारू छपराचा भाग.
कौलीमक्तेदार पु. कौलाने शेत करणारा.
कौलू स्त्री. जुनाट पाणथरी; लघ्वांतर त्वचा ग्रंथी कठीण होणे.
कौशबर्दार   दरबारात जाताना बाहेर काढून ठेवलेले जोडे सांभाळणारा नोकर.
कौशल न. १. कुशलता; तरबेजपणा; चातुर्य; पारंगतता; हातोटी; हुन्नर. २. सुख; कल्याण; सुरक्षितता; निश्चितता. [सं.]
कौशल्य न. १. कुशलता; तरबेजपणा; चातुर्य; पारंगतता; हातोटी; हुन्नर. २. सुख; कल्याण; सुरक्षितता; निश्चितता. [सं.]
कौशा पु. १. रक्षक; रक्षणकर्ता; पाठीराखा; वाली; कड घेणारा. २. सूड उगवणारा.
कौशिक कानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.
कौशीकानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.
कौसीकानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.
कौशेय वि. रेशमी (वस्त्र, सूत). [सं.]
कौसल न. गुप्त मसलत; कट; अनिष्ट कारस्थान; कपटी योजना; कवटाळ; कवसाळ. (क्रि. करणे.) : ‘म्हणे काय कौंसाल केलें सतीनें ।’ - रामसुतात्मज (द्रौपदीवस्त्रहरण १९२).
कौसाल न. गुप्त मसलत; कट; अनिष्ट कारस्थान; कपटी योजना; कवटाळ; कवसाळ. (क्रि. करणे.) : ‘म्हणे काय कौंसाल केलें सतीनें ।’ - रामसुतात्मज (द्रौपदीवस्त्रहरण १९२).
कौसाल वि. १. कसबी; कुशल (माणूस, योजना इ.) : ‘नाना कौसाल रचना । केली धर्मांचिया स्थापना ।’ - कालिकापुराण १६·६६. २. कपटी; कुभांडखोर : ‘तुकयाबंधु स्वामि कानड्या कौसाल्या रे ।’ - तुगा १४०. [सं. कौशल्य]
कौसाल पु. कौशल्य; कुशलता : ‘तीयेतें स्वीकरी श्रीचक्रपाणी हे कौसाल्य कृपेचे ।’ - मुप्र १४९६.
कौसाल्य पु. कौशल्य; कुशलता : ‘तीयेतें स्वीकरी श्रीचक्रपाणी हे कौसाल्य कृपेचे ।’ - मुप्र १४९६.
कौसाळ वि. कुशल; चतुर : ‘तूं माय जननी कांसवी कौसाळ ।’ - नागा. ६०९.
कौसुंभ वि. १. कुसुंब्याच्या रंगाने रंगलेला. २. कुसुंब्यासंबंधी. [सं.]
कौस्तुभ पु. समुद्रमंथनातील चौदा रत्नांपैकी एक; श्रीविष्णूच्या कंठातील मणी; अलंकार : ‘कंठीं कौस्तुभमणि विराजित ।’ - तुगा १. [सं.]
कौस्तुभी स्त्री. घोड्याच्या गळ्याखाली लोंबणारी पोळी. - अश्वप १·९९. [सं. कौस्तुभ]