शब्द समानार्थी व्याख्या
कूपकच्छप पु. १. (शब्दशः) विहिरीतील कासव किंवा बेडूक (यावरून) २. (ल.) घरकोंबडा; आपले घर हेच जग समजणारा; बाह्य जगाविषयी अज्ञानी; आकुंचित दृष्टीचा माणूस. [सं.]
कूपकाटी क्रिवि. काट्याच्या झुडपात; कुंपणात; काट्यात वगैरे.
कूप क्रमलेख (भूशा.) विशेषतः तेलासाठी वेधन करून किंवा खनिजपदार्थांच्या साठ्यासाठी खोदलेल्या विहिरीमध्ये सापडणाऱ्या थरांची अथवा त्या थरांच्या भौतिक गुणधर्माची खोलीनुसार केलेली यादी. त्या अनुषंगाने काढलेला आलेख.
कूपनलिका स्त्री. जमिनीला छिद्र पाडून त्यात नळी बसवून भूगर्भातील यंत्राद्वारे वर खेचण्याची केलेली सोय; नलिकारूपी विहीर. [सं.]
कूपपटाशी स्त्री. (यंत्र) अर्ध गोलाकार धार असलेली पटाशी.
कूपमंडूक न्याय पु. विहिरीतील कासवाचे किंवा बेडकाचे जग म्हणजे त्या विहिरीतीलच संकुचित भाग, जागा. तिच्या बाहेर काय आहे याची त्याला मुळीच कल्पना नसते. त्याप्रमाणेच जो मनुष्य आपला गाव किंवा आपला देश सोडून कधी बाहेर गेला नाही त्याला आपलाच गाव किंवा देश चांगला असे वाटते व इतर गाव किंवा देश यांना तो तुच्छ लेखतो; संकुचित दृष्टी, व्यापक दृष्टिकोनाचा अभाव असणे : ‘असे प्रतिपादन करणे म्हणजे हिंदुधर्माच्या स्वरूपाबद्दल कूपमंडूक न्यायाने आपले अज्ञान प्रदर्शित करणे होय.’ - लोटिकेले ४·३८८. [सं.]
कूपमंडूकवृत्ति स्त्री. आपल्याला दिसते तेवढेच जग असे मानण्याची बुद्धी; दुसऱ्याचे अस्तित्व, गरजा, विचार, लक्षात न घेण्याची बुद्धी; अतिशय संकुचित वृत्ती. [सल.]
कूपमंडूकवृत्ती स्त्री. आपल्याला दिसते तेवढेच जग असे मानण्याची बुद्धी; दुसऱ्याचे अस्तित्व, गरजा, विचार, लक्षात न घेण्याची बुद्धी; अतिशय संकुचित वृत्ती. [सल.]
कूपयंत्रघटिका स्त्री. रहाटगाडगे. [सं.]
कूपयंत्रघटिका न्याय   रहाटगाडग्याच्या पोहऱ्यांची सदोदित पालटणारी स्थिती. रहाटगाडगी फिरू लागली म्हणजे रिकामे पोहरे घालून पाण्याने भरून येतात, त्यातील पाणी ओतले जाते व ती रिकामी होऊन पुन्हा खाली जातात आणि पुन्हा भरून वर येतात. अशीच माणसाची स्थिती (सुखातून दुःखात व दुःखातून सुखात) पालटली जाते. चक्रनेमिक्रम; उत्कर्षमागून अपकर्षाचा क्रम. [सं.]
कूपरी स्त्री. आळ; दोष; आरोप : ‘आपणयावरील साकारपणाची कूपरी ।’ - भाए ६१७.
कूपिका स्त्री. कूपी; बाटली; सुरई : ‘तिची वर्णिता रुपरेखा । ती सौंदर्याची कूपिका ।’ - कथा १·३·३७. [सं. कूप]
कूय स्त्री. हुकी; कोल्ह्याचे ओरडणे. कोल्ह्याची कुई. (गो.) [ध्व.]
कूर पु. रास; ढीग. (तंजा.) [सं. कूट]
कूर वि. तीक्ष्ण धार असलेले. (तंजा.) [सं. क्रूर]
कूर्च पु. १. घोड्याच्या खुराचा वरचा भाग. - अश्वप १·६३. २. दाढीचे केस : ‘भंवते इंद्रनीळ विरुढती सानट । तर ते कूर्च वरवंट । उपमीजते ।’ - ज्ञाप्र ४६५. ३. पैतृक कर्मांत पितरांना व देवांना उदक देण्यासाठी व इतर धार्मिक विधींत दर्भाची विशिष्ट आकाराची मुष्टी करतात तो विधी. ४. पहा : कूर्चा [सं.
कूर्च पु. गुच्छ; जुडगा. [सं.]
कूर्चा स्त्री. (शाप.) मृदू अस्थी; मृदू अस्थींचे वेष्टण : ‘हाडांच्या शेवटी कूर्चेचें म्हणजे अस्थींचे वेष्टण असते.’ - मराठी ६ वे पुस्तक (१८७५) २५४. [सं. कूर्च]
कूर्चिका स्त्री. घोड्याच्या कूर्चाचा मागील भाग. - अश्वप १·६२. [सं. कूर्च]
कूर्निश   पहा : कुरनिसात
कूर्परधर न. (यंत्र) यंत्रात ज्या दांड्यामुळे अनेक चात्या अथवा दांडे फिरतात ते बसविलेली पट्टी.
कूर्पास पु. बायकांच्या अंगातील चोळी; बंडी : ‘कूर्पासका आड दडोन धाकें ।’ - सारुह ७·१३५.
कूर्म पु. १. कासव : ‘कां कूर्म जियापरि । उवाइला अवेव पसरी ।’ - ज्ञा २·३०१. २. विष्णूच्या (दशावतारातील दुसरा अवतार : ‘शेष कूर्म वाऱ्हाव जाले ।’ - दास २०·८·२२. [सं.]
कूर्मक पु. १. कासव : ‘कां कूर्म जियापरि । उवाइला अवेव पसरी ।’ - ज्ञा २·३०१. २. विष्णूच्या (दशावतारातील दुसरा अवतार : ‘शेष कूर्म वाऱ्हाव जाले ।’ - दास २०·८·२२. [सं.]
कूर्म पु. १. पंच उपप्राणांपैकीं एक : ‘नाग कूर्म कृकल देवदत्त । पांचवा धनंजय जाण तेथ । यांची वस्ती शरीरांत । ऐक निश्चितू सांगेन ।’ - एभा १२·३२१. २. जांभईच्या वेळेच्या वायूच्या विशिष्ट स्थितीचे नाव : ‘आणि जांभई शिंक ढेकर । ऐसैसा होतसे व्यापर । नाग कूर्म कृकर । इत्यादि होय ॥’ - ज्ञा १८·२४·१. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
कूर्म पु. डोळ्यामधील तांबडा ठिपका. पहा : कुमरी [सं.]
कूर्मगति स्त्री. सावकाश चालणे; मंद चाल : ‘शिक्षणाची प्रगती कूर्मगतीने चालू आहे.’ - माप्र ४३३. [सं.]
कूर्मगती स्त्री. सावकाश चालणे; मंद चाल : ‘शिक्षणाची प्रगती कूर्मगतीने चालू आहे.’ - माप्र ४३३. [सं.]
कूर्मदुग्ध न. कासविणीचे दूध; असंभाव्य गोष्टी (ख - पुष्पाप्रमाणे). [सं.]
कूर्मदृष्टि स्त्री. कृपा; कृपादृष्टी; मेहेरबानी (कारण कासविणीस आचळे नसल्याने तिच्या नुसत्या मायेच्या दृष्टीनेच तिची पिले वाढतात.)
कूर्मदृष्टि वि. कृपादृष्टी दाखविणारा. [सं.]
कूर्मदृष्टि स्त्री. कृपा; कृपादृष्टी; मेहेरबानी (कारण कासविणीस आचळे नसल्याने तिच्या नुसत्या मायेच्या दृष्टीनेच तिची पिले वाढतात.)
कूर्मदृष्टि वि. कृपादृष्टी दाखविणारा. [सं.]
कूर्मपृष्ठाकार वि. बहिर्गोल (भिंग वगैरे). [सं.]
कूर्मलोम न. कासवाचे केस; अशक्य गोष्ट. [सं.]
कूर्मासन न. १. (योग) योगशास्त्रात सांगितलेले एक आसन. याचे चार प्रकार आहेत. २. (मल्लखांब) मल्लखांबावर आढी मारून हातांनी पायाचे अंगठे धरून केलेले आसन. [सं.]
कूल न. वंश; जात; देवक इ. अर्थी. पहा : कुल [सं. कुल]
कूल न. तीर; काठ : ‘श्रीगोदावरीच्या कूलीं ।’ - ज्ञा १८·१८०३. [सं.]
कूल न. सोनाराची घडणावळ : ‘दागिन्यांना चांगला घाट येऊ द्या हो. कुलीसाठी दोन रुपये जाजती पडले तरी चिंता नाही.’ - मासंवा १८५. (गो.) [क. कूलि]
कूल न. लाकडात भोक पाडून त्यात बसविण्यासाठी तयार केलेले लाकडाचे टोक, खुंटी, कुसू. [कर्ना.]
कूलर पु. (हवा, पाणी, वगैरे) थंड करणारे यंत्र. [इं.]
कूली सरोवर   (भूशा.) लाव्हा रसाच्या प्रवाहाने तयार झालेले सरोवर.
कूलोम न. विद्युतभाराचे परिमाण.
कूशार वि. स्वच्छ; मोकळे.
कूस स्त्री. १. शरीराची एक बाजू; बरगडीची, काखेखालची बाजू. २. जठर, गर्भाशय : ‘तो तू देवकीकूंसीचा सेजारीं ।’ - शिव ११२. ३. (ल.) जागा; अवकाश (खोटे बोलण्यास, फसवण्यास, लबाडीस, गैरमिळकतीस). (सामा.) जागा किंवा अवकाश असा अर्थ. ४. भरलेली जागा; साधलेली संधी (खोटे हिशेब करून खऱ्या खर्चापेक्षा जास्त रक्कम खर्ची टाकून, माल जमा करून, दुसऱ्याची व्यवस्था करताना काही रक्कम गिळंकृत करून इ.); घेतलेले माप किंवा केलेले हिशेब यात फारशी लबाडी अंगी न लागता थोडासा कमी - अधिकपणा करणे; थोडी कसर; वर्तावळा. ५. गुरे इ. प्रसवल्यानंतर त्यांच्या योनिद्वारे निघणारा कुजका अंश. [सं. कुक्षि.] (वा.) कूस उजवणे - मूल होणे. कूस घालणे - खेळातील नियम मोडल्याबद्दल खेळगड्‌याला बाहेर टाकणे. (कु.) कूस ठेवणे - सवलत देणे : ‘पण टिळकांपुरती त्यांनी सार्वजनिक सभेची कूस ठेवण्याची तयारी दाखवली.’ - आभासा २५७. कूस फावणे - संधी मिळणे.; सबब सापडणे : ‘ तिच्या योगाने मुसलमानांना आपल्या मागण्या वाढविण्याला कूस फावली.” - आभासे ३८१. कूस फुटप - पहा : कूस उजवणे (गो.) कूस भरणे - : एखाद्या पदार्थाने पोट भरणे. २. गर्भ राहणे. कुशीस होणे - एका अंगावर निजणे.
कूस न. १. कुसळ; टोक : ‘आपली लेखणी ते किती नम्रपणाने चालवितात व तिचे कूसहि कोणास बोचू नये या विषयी ते किती जपत असत.’ - निमा ९०९ २. (ल.) अशिष्ट शब्द. [सं. कुश]
कूस स्त्री. कामचुकारपणा : ‘खरी मेहनत व कूस किती याची खडान्‌खडा माहिती असल्यामुळे.’ - गांगा १४.
कूस   स्त्री. सोंड : ‘(भुंगा) अंगावर आदळून कूस मारायचा.’ - तीम १४३.
कूसगोम स्त्री. घोड्याच्या कुशीवर असलेली गोम, भोवरा. हा अशुभ मानतात.
कूसभोवरा स्त्री. घोड्याच्या कुशीवर असलेली गोम, भोवरा. हा अशुभ मानतात.

शब्द समानार्थी व्याख्या
कूसनिकुरणीचा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कूसनिखवणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कुसधुणीचा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कुसधुवणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कुसधुणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कूसधुणा पु. स्त्रीच्या अनेक मुलांपैकी शेवटचा मुलगा; मूल.
कूहरी स्त्री. कैरीसारखा सोन्याचा अलंकार. पहा : कुइरी : ‘ल्याली राकडि मूद बोरकळि ते शोभे तळीं कूहरी ।’ - अक अनंत – सीता - स्वयंवर ४५.
कूळ न. १. कौलदार; खंडकरी; पट्ट्याने जमीन धारण करणारा (सरकारची किंवा शेतमालकाची) २. धनकोचा (सावकाराचा) ऋणको; आरोपीचा जामीन; वैद्याचा रोगी; वकिलाचा पक्षकार; आश्रयदात्याचा पोष्य; ज्याने द्रव्यादी देणे द्यायचे आहे तो; आश्रित (म्हणजे ऋणको, जामीन, रोगी इ.) २. सामान्यतः सरकारला सारा देणारा असामी, असाम्या. ४. गिऱ्हाईक; इसम; व्यक्ती. (गो.) ५. शेतकरी इतर अर्थ व सामासिक शब्द पहा : कुळ [क. कुळ = कर देणारी व्यक्ती]
कूळ न. १. गोत्र; वंश; जात; कुटुंब. २. लग्नात ठेवायचे देवक (मराठा समाजात रूढ). प्रत्येकाच्या कुळात चाल असेल त्याप्रमाणे कळंब, मारवेल, वड इ. झाडाची फांदी आणून ती तुळशीवृंदावनात लावतात व तिची पूजा करतात.) [सं. कुल] (वा.) कूळ उद्धरणे - १. कुळाची कीर्ती वाढविणे. २. (उप.) कुळातील माणसांना (विशेषतः जवळच्या नातलगांवरून) शिव्याशाप देणे. कूळ ठेवणे - (काही जातीत) देवकप्रतिष्ठा, देवदेवक बसवणे (गो.)
कूळ स्त्री. नारळीच्या हीरांचे केलेले जाळे. (गो.)
कूळकट न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकत न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकथा न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकहाणी न. स्त्री. १. कुळाची कथा किंवा गोष्टी. कूळकट हा शब्द मुख्यत्वे वाईट अर्थाने योजतात. कुळकथा म्हणजे कुळाची कहाणी, कैफियत, इतिहास. २. (ल.) कंटाळवाणी, कटकटीची हकीगत माहिती. (वा.) कूळकट, कूळकत, कूळकथा, कूळकहाणी सांगणे - एखाद्याच्या वंशातील (मागची किंवा चालू) बिंगे, दोष काढणे, सांगणे.
कूळकरंटा वि. कुळातील हतभागी; भद्र्या; कुळाचे नाव घालविणारा; मुख्यत्वे चिक्कू.
कूळकायदा पु. जमीनमालकांपासून कुळांना न्याय मिळावा, त्यांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून करण्यात आलेला कायदा.
कूळघडणी स्त्री. प्रत्येक कुळाची जमीन, साधनसामग्री, लाग - लागवड व सारा इ. चे दर्शक, कुळकर्ण्याने तयार केलेले सरकारी पत्रक, तक्ता.
कूळजमा स्त्री. १. गाव किंवा जिल्ह्यातील कुळांपासून येणाऱ्या साऱ्याची रक्कम. २. सावकाराने कुळाला किंवा शेतकऱ्याला कर्जाऊ दिलेली रक्कम.
कूळझाडा पु. गावातील खंडकरी किंवा कौलदार यांचा तक्ता.
कूळटिळक पु. वंशाचे भूषण; कुळाला भूषणभूत अशी व्यक्ती. [सं. कुलतिलक]
तिलक पु. वंशाचे भूषण; कुळाला भूषणभूत अशी व्यक्ती. [सं. कुलतिलक]
कूळपट पु. कौलनामा; खंडपत्र.
कूळपट्टा पु. कौलनामा; खंडपत्र.
कूळपर्वत   पहा : कुलाचल, सप्तपर्वत
कूळपैसा   पहा : कुळजमा २

शब्द समानार्थी व्याख्या
कूळबुडव्या वि. स्वतःच्या कुटुंबाचा नाश करणारा; कुलकलंक.
कूळभरणा पु. (व्यापक) शेतकरी किंवा कुळे. याच्या उलट अडाणकबाड.
कूळरुजुवात स्त्री. १. कुळाने सरकारी खजिन्यात भरलेल्या पैशाची चौकशी करून रुजुवात घालणे. २. अशा रीतीने रुजुवातीस मिळालेली पुष्टी.
कूळवर्ग पु. कुळघडणीच्या अनुरोधाने कुळे अथवा रयत यांच्या जमीनजुमल्यासंबंधीचे किंवा त्यांच्याकडून येणे असलेल्या पैशाबद्दलचे वर्गीकरण दाखविणारे वार्षिक पत्रक-तक्ता. (समासात) कुळवर्गपट्टी - जमाबंदी - वसूलबाकी इ. पहा : कुळारग.
कूळवंत वि. कुलीन; अभिजात; कुलवंत; चांगल्या कुळात जन्मलेला.
कूळवार क्रिवि. कुळाच्या अनुक्रमाप्रमाणे दर किंवा दर कुळागणिक. कुळवार पत्रक - झाडा. (समासात) कुळवार पावत्या - पाहणी - फाजील - वसूल - बाकी - रुजुवात.
कूळवारी स्त्री. कुळीचा तक्ता.
कूळशील न. कूल आणि शील; वाडवडिलांची परंपरा व व्यक्तीची दानत; कुलातील आचारविचार, चालरीत, स्थितिरीती. लग्न जुळविताना ज्या बाबी पाहायच्या त्यातील एक यावरून.
कूं अ. एखादी व्यथा झाली असताना मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चं, हू, इस्, उस्, हुश् याप्रमाणे). (क्रि. म्हणणे, करणे) पहा : हाय [ध्व.]
कूं अ. एखादी व्यथा झाली असताना मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चं, हू, इस्, उस्, हुश् याप्रमाणे). (क्रि. म्हणणे, करणे) पहा : हाय [ध्व.]
कूंचा   पहा : कुंचा : ‘ब्रह्मतेजाचा कूंचा ढळें । मुगुटावरी ।’ - शिव १११.
कूंजणे अक्रि. शब्द करणे (पक्षी वगैरेंनी) : ‘जे कूंजते कोकिल वनीं ।’ - ज्ञा ६·४५. [सं. कूजन्]
कूंजद स्त्री. दोन्ही बाजूंना तीळ लावून तयार केलेली पोळी.
कूंस   पहा : कुसूं १, २, ३ (को.)
कृक पु. घाटी; गळा; घसा; कंठनाल. [सं.]
कृकर पु. १. ढेकराच्या वेळचा वायू. पंच उपप्राणांपैकी एक. पहा : कूर्म : ‘आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादी होय ॥’ - ज्ञा १८·३४१ [सं.]
कृकल पु. १. ढेकराच्या वेळचा वायू. पंच उपप्राणांपैकी एक. पहा : कूर्म : ‘आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार । नाग कूर्म कृकर । इत्यादी होय ॥’ - ज्ञा १८·३४१ [सं.]
कृकलास पु. सरडा : ‘दान देता नहुषां कूषी जाहला कृकलास ।’ - एभा ६·९५. [सं.]
कृच्छ्र न. १. एक प्रायश्चित्त; २. शारीरिक दुःख; कष्ट; तप : ‘माझे नि उद्देशें संपूर्ण । तपसाधन कृच्छ्रादिक ।’ - एभा १७·४२०. ३. पाप. ४. पहिल्या दिवशी एकदा जेवण, दुसऱ्या दिवशी सायंकाळी जेवण, तिसऱ्या दिवशी न मागता आपोआप मिळेल ते खावे व चौथे दिवशी उपोषण याप्रमाणे क्रमाने १२ दिवस करण्याचे व्रत : ‘अथवा एकांतरा कृच्छ्रीं ।’ - ज्ञा १७·३३४. [सं.]
कृच्छ्र न. मूत्रकृच्छ्र; मूत्रावरोध.
कृच्छ्रचांद्रायण न. चंद्रकलेप्रमाणे चढउताराने जेवणातील घास खाण्याचे कृच्छ्र. प्रायश्चित : ‘कृच्छ्रचांद्रायणें झालीं वेडीं ।’ - एभा १२·२७. [सं.]
कृच्छ्रेंकरून किव्रि. नाखुशीने, कष्टाने (येणे, करणे इ.).
कृत न. कृत, त्रेता, द्वापार व कली या युगांपैकी पहिले; सत्ययुग. [सं.]
कृत वि. ज्याने केलेले आहे या अर्थाने समासाच्या पूर्वी जोडतात. उदा. कृतभोजन-ज्याने जेवण केलेले आहे असा.
कृत वि. उप. कृतकृत्य; ज्याने आपला हेतू साध्य केला आहे असा; ज्याला काही करायचे उरले नाही असा; तृप्त.

शब्द समानार्थी व्याख्या
कृतार्थ वि. उप. कृतकृत्य; ज्याने आपला हेतू साध्य केला आहे असा; ज्याला काही करायचे उरले नाही असा; तृप्त.
कृतक वि. (उंदीर, ससा, खार इत्यादीप्रमाणे) कुरतडणारा.
कृतक वि. मानलेला; दिखाऊ; नाटकी; लटका. [सं.]
कृतकपुत्र पु. (कायदा) मानलेला, पाळलेला मुलगा; विकत घेतलेला मुलगा. [सं.]
कृतकर्मा वि. निपुण; कुशल; हुशार. [सं.]
कृतकार्य वि. ज्याने आपले काम संपविले आहे असा; यशस्वी; विजयी; कृतार्थ; प्राप्तयश. पहा : कृतकृत्य [सं.]
कृतकाल वि. १. निश्चित, ठरावीक काळाचा; मुदतीचा; मुदतबंद (गहाण, निक्षेप यांच्या संबंधाने.). २. अमुक मुदतीपर्यंत चाकरी करायला जो आपणास बांधून घेतो असा (चाकर). [सं.]
कृतकृत्य वि. १. कृतकार्य; ज्याने संसारासंबंधी सर्व कृत्ये पार पाडून त्यापासून मिळणारे सुख अनुभवले आहे असा; पुण्यकृत्याने ज्याचा जन्म सार्थकी लागला आहे असा. २. आरंभिलेले दुर्घट काम ज्याने तडीला नेऊन समाधान प्राप्त करून घेतले आहे असा; ज्याला आपल्या श्रमाचे फळ मिळाले आहे असा : ‘म्हणे कृतकृत्य झालों देवदर्शनें ।’ - संवि २६·२८.
कृतकृत्य न. अशक्य, अपूर्व कृत्य; अगदी अचाट कृत्य; मोठ्या बुद्धिमत्तेचे काम.
कृतकृत्यता स्त्री. कृतार्थपणा; यशस्वितेचा अभिमान : ‘त्याच्यात सुस्ती, कृतकृत्यताबुद्धी, पंडितमन्यता वगैरे दोष अखंड बसल्यामुळे....’ - निमा ३. [सं.]
कृतघटस्फोट वि. घटस्फोट करून जातीबाहेर टाकलेला. [सं.]
कृतघ्न वि. १. निमकहराम; उपकार न जाणणारा; बेइमान; हरामखोर. २. केलेली कृत्ये किंवा उपाय व्यर्थ पाडणारा; कार्यविध्वंसक. [सं.]
कृतघ्नता स्त्री उपकाराची जाणीव नसणे; निमकहरामी; बेइमानी.
कृतनिश्चय पु. दृढनिश्चय, निग्रह, निर्धार.
कृतनिश्चय वि. दृढनिश्चयी; ज्याने निश्चय केला आहे असा. [सं.]
कृतसंकल्प पु. दृढनिश्चय, निग्रह, निर्धार.
कृतसंकल्प वि. दृढनिश्चयी; ज्याने निश्चय केला आहे असा. [सं.]
कृतपुंख वि. १. सोडला जाण्याच्या बेतात असलेला (बाण). २. (ल.) निघण्याच्या बेतात आहे असा. [सं.]
कृतबुद्धी वि. निश्चयी : ‘ऐसे हट निग्रही कृतबुद्धी ।’ - दास १·१०·११. [सं.]
कृतयुग न. पहा : कृत
कृतसंस्कार वि. जो संस्काराने पावन झालेला आहे किंवा ज्याच्यावर विशेष संस्कार झाला आहे असा. [सं.]
कृतसाक्षी पु. (कायदा) साक्ष देण्याकरिता नेमलेला. पहा : साक्षी [सं.]
कृतज्ञ वि. उपकार जाणणारा; निमक-नमकहलाल; इमानी. [सं.]
कृतज्ञता स्त्री. उपकाराची जाणीव. [सं.]
कृताकृत वि. १. बेपर्वा; उदासीन; आवश्यकही नव्हे व अयोग्यही नव्हे असा (केल्या तरी चालतील, न केल्या तरी चालतील अशा गोष्टीसंबंधी); वैकल्पिक. २. निष्काळजीपणाने, अनास्थेने केलेले किंवा अजिबात गाळलेले; अर्धवट; अपूर्ण.

शब्द समानार्थी व्याख्या
कृताकृत न. केवळ संभवनीय स्थिती; घडण्याची किंवा न घडण्याची संभवनीयता ज्यात सारखी आहे अशी स्थिती. अल्पस्वल्प सत्त्व, अस्तित्व. [सं.]
कृतान्न न. शिजविलेले अन्न, (विशेषतः) भात. [सं.]
कृतापराध पु. १. केलेला गुन्हा. २. गुन्हा केला आहे अशी व्यक्ती. [सं.]
कृतार्थ वि. १. ज्याने आयुष्यातील साध्य किंवा हेतू साधला आहे असा; ज्याला काही करायचे उरले नाही असा. २. कृतकृत्य; तृप्त; धन्य; समाधान पावलेला; संशय फेडलेला (धर्मशास्त्र इ. संबंधी). [सं.]
कृतावस्था स्त्री. आपला हेतू तडीला नेल्याची स्थिती; आपल्याकडून आटोकाट प्रयत्न केल्याची स्थिती.
कृतावस्था क्रिवि. आटोकाट; शेवटपर्यंत; कमीत कमी, जास्तीत जास्त. [सं.]
कृतांजलि वि. हाताची ओंजळ पसरलेला; ज्याने दोन्ही हात जोडले आहेत असा; अगदी नम्र; आज्ञाशील. [सं.]
कृतांजली वि. हाताची ओंजळ पसरलेला; ज्याने दोन्ही हात जोडले आहेत असा; अगदी नम्र; आज्ञाशील. [सं.]
कृतांत पु. १. मृत्यू; यम; काळ : ‘जैसें महाप्रलयीं पसरलें । कृंतातमुख ॥’ - ज्ञा १·८८. २. दैव; नशीब. ३. सिद्ध केलेला निर्णय, सिद्धांत. [सं.]
कृति स्त्री. १. कर्म; काम; कृत्य; काही कार्य करण्याचा व्यापार. २. क्रिया; रीत; पद्धत; युक्ती; प्रकार (उद्योग, धंदा इत्यादीचा) : ‘देशी धंद्यांच्या कृतीत व यंत्रात काही एक सुधारणा कोणास सुचवितां आली नाहीं.’ - सेंपू १·१०. ३. केलेले काम; साधलेली गोष्ट, कार्य. ४. ख्याती; पराक्रम : ‘शाण्णव कुळीचे भूप मिळाले सांगाया झाल्या कृती ।’ - ऐपो १७८.
कृति वि. कुशल; हुषार : ‘व्यसनीं सहाय होउनि आप्ताला होय जो परासु कृती ।’ - मोद्रोण ११·१५. [सं.]
कृती स्त्री. १. कर्म; काम; कृत्य; काही कार्य करण्याचा व्यापार. २. क्रिया; रीत; पद्धत; युक्ती; प्रकार (उद्योग, धंदा इत्यादीचा) : ‘देशी धंद्यांच्या कृतीत व यंत्रात काही एक सुधारणा कोणास सुचवितां आली नाहीं.’ - सेंपू १·१०. ३. केलेले काम; साधलेली गोष्ट, कार्य. ४. ख्याती; पराक्रम : ‘शाण्णव कुळीचे भूप मिळाले सांगाया झाल्या कृती ।’ - ऐपो १७८.
कृती वि. कुशल; हुषार : ‘व्यसनीं सहाय होउनि आप्ताला होय जो परासु कृती ।’ - मोद्रोण ११·१५. [सं.]
कृति स्त्री. (ग.) संख्येचा वर्ग; द्विघात. [सं.]
कृती स्त्री. (ग.) संख्येचा वर्ग; द्विघात. [सं.]
कृतिअंक पु. (ग्रंथ.) साहित्याचे वर्गीकरण करताना लेखकाच्या कलाकृतीचा दिलेला क्रमांक.
कृतिचातुर्य न. अडचणीच्या प्रसंगात मार्ग सुचणे; हुषारी.
कृतिप्रधान वि. ज्यात घटनांना, कृतीला प्राधान्य दिले आहे अशी (साहित्यकृती).
कृतिसमर्पण   (ग्रंथ) पहा : अर्पणपत्रिका
कृतिस्वाम्य न. साहित्य, कला, संगीत, नाट्य यांसारखी कलाकृती प्रकाशित करण्याचा, विशिष्ट काळापुरता एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कायद्याने दिलेला अधिकार.
कृतीचा वि. कृत्रिम; करणीचा; बनावट : ‘कृतीची आयाळें जडवुनि गळा, पुष्ट करुनी ।’ - सिंहान्योक्ति, मराठी ६ वे पुस्तक पृ. १२५ (१८९६).
कृतोपकार पु. केलेला मोठा उपकार; कृपा; मेहेरबानी. [सं.]
कृत्त वि. कापलेला. [सं.]
कृत्ति न. १. चामडे; कातडे; मृगचर्म. २. कात. [सं.]
कृत्ती न. १. चामडे; कातडे; मृगचर्म. २. कात. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
कृत्तिका स्त्री. सत्तावीस नक्षत्रांपैकी तिसरे. ह्या नक्षत्रपुंजात सात तारे आहेत. त्यांची आकृती देशी वस्तऱ्यासारखी दिसते. [सं.]
कृत्य न. काम; कृती; कार्य. [सं. कृ = करणे]
कृत्य न. (ग.) भूमितीत करायला सांगितलेली रचना; कृतिसापेक्ष सिद्धांत; वस्तुपाठ. [सं. कृ = करणे]
कृत्यपण न. करण्याची योग्यता : ‘मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां - ज्ञा १६·४६४
कृत्या स्त्री. १. विनाशक हेतूंसाठी आणि मंत्रतंत्र सिद्धीसाठी बळी देऊन प्रसन्न करून घेतात अशी स्त्री देवता; उग्र देवता; राक्षसी : ‘सर्वाहि चमू प्रेषी राजा भीमक्षयार्थ कृत्यासी ।’ - मोभीष्म ५·३२. २. (ल.) भांडखोर, कज्जे दलाल, कैदाशीण स्त्री. [सं.]
कृत्याकृत्य न. चांगले व वाईट काम; योग्यायोग्य कर्म; कार्याकार्य. [सं.]
कृत्याकृत्य वि. धन्य. पहा : कृतकृत्य : ‘देवाचा : भाग्याचा : मी कृत्याकृत्य केला’ - लीच ३·८६.
कृत्यैक्य न. नाटकाच्या कृतींमधील अपेक्षित एकात्मता.
कृत्रिम न. खोटेपणा; लबाडी; कपट; कावा : ‘कृत्रिम अवघेचि खुंटले ।’ - दास १९·९·५.
कृत्रिम वि. १. बनावट, करणीचे, कृतीचे. समासात - कृत्रिमवेष - रूप इ. २. मनुष्याने केलेले; नैसर्गिक नव्हे असे; अनैसर्गिक. [सं.]
कृत्रिम गर्भधारणा स्त्री. नर व मादी यांच्या प्रत्यक्ष संभोगाशिवाय मादीला गर्भवती करणे (नरप्राण्याचे रेत मादीच्या योनिमार्गातून गर्भाशयात घालून).
कृत्रिम तंतू   काही रसायने एकत्रित करून बनवलेला (संश्लेषित) धागा. रेशमी, सुती किंवा तागाचा - अशा नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या धाग्यांपेक्षा वेगळा धागा. उदा. नायलॉन, रेयॉन इ.
कृत्रिम लोणी न. मार्गारिन. (शेतकीशेतकरी न १९३७)
कृत्रिमतावाद पु. (मानस.) नैसर्गिक घटनांवर हेत्वारोप करण्याची मुलांमध्ये असणारी प्रवृत्ती. उदा. ढग का हलतात? - त्यांना हलावयाचे किंवा फिरावयाचे आहे म्हणून.
कृत्रिम नाणे   खोटे नाणे; कमी किमतीचे नाणे : ‘असलें कृत्रिम नाणें करून शेतकऱ्यांचे व नेटिव्ह व्यापाऱ्यांचे म्हणजे आपल्या बहुतेक सर्व प्रजेचे नुकसान करण्यास कोणत्याही दुसऱ्या देशातील सरकार तयार झालें असतें असें आम्हांस वाटत नाहीं.’ - लोटिकेले १·१५१.
कृत्रिम निवड   एका जातीतील अनेक वनस्पतींतून किंवा प्राण्यांतून मनुष्याच्या आवडीप्रमाणे (गरजेप्रमाणे) विशिष्ट गुणयुक्त प्रकारांची (प्राण्यांची) पैदाशीकरता किंवा संकर घडवून आणण्याकरिता केलेली निवड. कित्येक खाद्यवनस्पती किंवा पाळीव प्राणी माणसाने शेकडो वर्षे केलेल्या निवडीतूनच उगम पावले आहेत.
कृत्रिम पुत्र पु. मानलेला मुलगा; दत्तक मुलगा. हा आपल्या मातापितरांचे और्ध्वदेहिक करणारा, बारा वारसदारांपैकी एक आहे. [सं.]
कृत्रिमपुत्रिका स्त्री. मुलींच्या खेळातील बाहुली : ‘आणा चिरें सरस कृत्रिमपुत्रिकांशी ।’ - वामनविराट ५·१३३.
कृत्रिम बाहुली   (वै.) डोळ्यात शिरणारा प्रकाश कमी करण्याकरिता वापरण्यात येणारा सूक्ष्म छिद्र असणारा पडदा.
कृत्रिम युद्ध   १. डावपेचाचे युद्ध; गनिमी कावा. २. लटकी लढाई.
कृत्रिम रुपया   १. खोटा रुपया; बनावट रुपया. २. ज्यात सोळा आण्याची चांदी निघत नव्हती पण जो सरकारी कायद्याने सोळा आणे किमतीचा मानला जात असे असा रुपया : ‘हिंदुस्थानांत हल्ली कृत्रिम रुपयाचा प्रसार आहे.’ - भाच ९३.
कृत्रिम रेतन केंद्र न. (कृषि) जेथे माजावर आलेल्या गायी, म्हशी इ. प्राण्यांना कृत्रिम रीतीने गर्भधारणा करवली जाते ते ठिकाण.
कृत्रिम शत्रू   १. आपल्या कृत्यांनी तयार केलेला शत्रू. २. वरून शत्रुत्व पण आतून मित्रत्व असा माणूस.
कृत्रिमी वि. १. खोटा; कावेबाज; बेईमानी; ढोंगी : ‘मी काहीं लबाड कृत्रिमी नव्हे.’ - बाळ २·६८. २. बनावट; मुद्दाम केलेला; काल्पनिक; करणीचा. पहा : कृत्रिम
कृत्रिमी स्त्री. लबाडी; खोटी वागणूक.

शब्द समानार्थी व्याख्या
कृत्स्न वि. १. झाडून सर्व; सगळे. २. पूर्ण; पुरेपूर; भरपूर; संपूर्ण. [सं.]
कृदंत न. (व्या.) धातूवरून अथवा क्रियापदावरून साधलेला शब्द; धातुसाधित. काळ किंवा पुरुष यांचा बोध न होणारे असे धातूचे रूप.
कृदंतकाळ पु. कृतांतकाळ. पहा : करदनकाळ, कृतांत [सं. कृतांत + काळ]
कृदांत पु. कृतांत (अप.) : ‘न बाधे काळकृदांतक्षोभ ।’ - दावि २१६. [सं. कृतांत]
कृपण वि. १. कंजूष; चिक्कू; कवडीचुंबक : ‘शरीरभोगाकडे । पाहातां कृपणु आवडे ।’ - ज्ञा १३·२०९. २. गरीब; दरिद्री; दीनवाणा; केविलवाणा (मुद्रा, चेहरा, भाषण). ३. क्षुद्र; संकुचित मनाचा. [सं.]
कृपा स्त्री. १. दया; मेहेरबानी; करुणा. २. दाखविलेली दया; केलेला अनुग्रह. ३. अनुकूल वृत्ती; अनुग्रह बुद्धी; सद्‌भाव. ४. (भक्ती) ईश्वरी कृपा; अनुग्रह : ‘अंबे तुझी कृपा जोडे । तरी मुकाही वेदशास्त्र पढे ।’ - हरि १·२७. कृपामृत, कृपारस, कृपावृष्टी असे कृपापूर्वपदघटित समास पुष्कळ आहेत. [सं.] (वा.) कृपा करणे - दुसऱ्याचे भले करणे; एखाद्याला हवे ते देणे.
कृपाकटाक्ष पु. स्त्री. १. दयादृष्टी; दयेने, अनुकंपेने पाहणे. २. कृपा, मेहेरबानी दाखविणे, करणे : ‘कृपादृष्टी दासाकडे पाहे ।’ - दत्ताची आरती. [सं.]
कृपादृष्टि पु. स्त्री. १. दयादृष्टी; दयेने, अनुकंपेने पाहणे. २. कृपा, मेहेरबानी दाखविणे, करणे : ‘कृपादृष्टी दासाकडे पाहे ।’ - दत्ताची आरती. [सं.]
कृपादृष्टी पु. स्त्री. १. दयादृष्टी; दयेने, अनुकंपेने पाहणे. २. कृपा, मेहेरबानी दाखविणे, करणे : ‘कृपादृष्टी दासाकडे पाहे ।’ - दत्ताची आरती. [सं.]
कृपाक्लिन्न वि. दयेने पाझर फुटलेला; दयार्द्र; कृपाळू. [सं.]
कृपाण न. १ तरवार; खड्‌ग; खंजीर. २. शीख धर्माचा माणूस जवळ बाळगतो ते शस्त्र.
कृपाणिकास्थि पु. (प्राणि.) तरवारीसारखा ज्यांच्या हाडांचा सांगाडा आहे असे प्राणी. [सं.]
कृपाणिकास्थी पु. (प्राणि.) तरवारीसारखा ज्यांच्या हाडांचा सांगाडा आहे असे प्राणी. [सं.]
कृपाणी स्त्री. लहान तरवार. [सं. कृपाण]
कृपानिधि पु. अत्यंत कृपाळू; कृपेचा ठेवा; कृपासागर. [सं.]
कृपानिधी पु. अत्यंत कृपाळू; कृपेचा ठेवा; कृपासागर. [सं.]
कृपापांग पु. कृपाप्रसाद.
कृपाबोध पु. दयाळूपणा.
कृपावलोकन न. मेहेरनजर; दया.
कृपावलोकन वि. कृपेने पाहणारा; कृपादृष्टी; सहानुभूती दर्शविणारा. [सं.]
कृपावंत वि. १. दयाळू; मायाळू, उपकारी, अनुग्रही. २. ज्याला दया आली आहे असा.
कृपाळ वि. १. दयाळू; मायाळू, उपकारी, अनुग्रही. २. ज्याला दया आली आहे असा.
कृपाळा वि. १. दयाळू; मायाळू, उपकारी, अनुग्रही. २. ज्याला दया आली आहे असा.
कृपाळू वि. १. दयाळू; मायाळू, उपकारी, अनुग्रही. २. ज्याला दया आली आहे असा.
कृपालू वि. १. दयाळू; मायाळू, उपकारी, अनुग्रही. २. ज्याला दया आली आहे असा.

शब्द समानार्थी व्याख्या
कृपाळुपण न. दया; कीव : ‘येणे संग्रामाचेनि अवसरें । येथ कृपाळुपण नुपकरे ।’ - ज्ञा २·२३.
कृमि   पु. १. किडा; अळी; कीटक; लहान जंतू : ‘जै त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंतीं कृमी ।’ - ज्ञा १८·५२५. या वर्गांतील प्राण्यांचे शरीर वेटोळ्यांचे असते. हे सरपटणारे असून नारू, जंत, अळी या प्रकारातले आहेत. २. (अव.) जंत (पोटातील). [सं.]
कृमी   पु. १. किडा; अळी; कीटक; लहान जंतू : ‘जै त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंतीं कृमी ।’ - ज्ञा १८·५२५. या वर्गांतील प्राण्यांचे शरीर वेटोळ्यांचे असते. हे सरपटणारे असून नारू, जंत, अळी या प्रकारातले आहेत. २. (अव.) जंत (पोटातील). [सं.]
कृमिघ्न वि. कृमींचा नाश करणारे, पोटातील कृमी नष्ट करणारे (जंत पाडण्याचे औषध, जंताचे औषध.). [सं.]
कृमिनाशक वि. कृमींचा नाश करणारे, पोटातील कृमी नष्ट करणारे (जंत पाडण्याचे औषध, जंताचे औषध.). [सं.]
कृमिनाशक घातक वि. कृमींचा नाश करणारे, पोटातील कृमी नष्ट करणारे (जंत पाडण्याचे औषध, जंताचे औषध.). [सं.]
कृमिनाशक हारक वि. कृमींचा नाश करणारे, पोटातील कृमी नष्ट करणारे (जंत पाडण्याचे औषध, जंताचे औषध.). [सं.]
कृमिहर वि. कृमींचा नाश करणारे, पोटातील कृमी नष्ट करणारे (जंत पाडण्याचे औषध, जंताचे औषध.). [सं.]
कृमिछिद्र न. किड्यांच्या हालचालीमुळे पडलेले लहान भोक.
कृमिवाताळे न. पोटात जंतामुळे होणारी वातविकृती.
कृमिशूल पु. एक रोग; जंतामुळे पोट दुखणे : ‘कृमिशूलें तळमळी तें । तयावरितें ।’ - गीता १३·२४९६ [सं.]
कृमी पु. किरमिजी रंग; कोचिनील. [सं.]
कृमी वि. ज्याला जंतविकार झाला आहे असा. [सं.]
कृश वि. १. रोडका; लुकडा; दुबळा; सडपातळ; बारीक. २. नाजूक; पातळ (वस्तू). [सं.]
कृशर न. खिचडी. [सं. कृसर]
कृशरान्न न. खिचडी. [सं. कृसर]
कृशान न. पु. अग्नी; विस्तव : ‘खालीं चेतविती महा कृशानन ।’ - रावि १·१३०. [सं.]
कृशानु न. पु. अग्नी; विस्तव : ‘खालीं चेतविती महा कृशानन ।’ - रावि १·१३०. [सं.]
कृशानू न. पु. अग्नी; विस्तव : ‘खालीं चेतविती महा कृशानन ।’ - रावि १·१३०. [सं.]
कृशानन न. पु. अग्नी; विस्तव : ‘खालीं चेतविती महा कृशानन ।’ - रावि १·१३०. [सं.]
कृशांग वि. रोडक्या शरीराचा, किडकिडीत; सडपातळ बांध्याची. : ‘पोरे सदैव रडती क्षुधिते कृशांगे ।’ - वामन, नवनीत १४०; [सं.]
कृशांगी वि. रोडक्या शरीराचा, किडकिडीत; सडपातळ बांध्याची. : ‘पोरे सदैव रडती क्षुधिते कृशांगे ।’ - वामन, नवनीत १४०; [सं.]
कृषक वि. पु. शेतकरी; कुणबी; शेत कसणारा : ‘नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।’ - ज्ञा १३·२०७. [सं.]
कृषिक वि. पु. शेतकरी; कुणबी; शेत कसणारा : ‘नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।’ - ज्ञा १३·२०७. [सं.]
कृषिजीवि वि. पु. शेतकरी; कुणबी; शेत कसणारा : ‘नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।’ - ज्ञा १३·२०७. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
कृषिजीवी वि. पु. शेतकरी; कुणबी; शेत कसणारा : ‘नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।’ - ज्ञा १३·२०७. [सं.]
कृषीवल वि. पु. शेतकरी; कुणबी; शेत कसणारा : ‘नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।’ - ज्ञा १३·२०७. [सं.]
कृषीवळ वि. पु. शेतकरी; कुणबी; शेत कसणारा : ‘नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।’ - ज्ञा १३·२०७. [सं.]
कृषकशास्त्र न. वनस्पतींची लागवड, जोपासना, संग्रह, पशूंची निपज व त्यांची वाढ, त्यांचा उपयोग इ. विषयांचे विवेचन करणारे शास्त्र; शेतकीचे शास्त्र.
कृषि स्त्री. शेती; शेतकी; शेतकाम : ‘किंबहुना कृषी जिणे’। - ज्ञा १८·८८१. [सं. कृष्]
कृषी स्त्री. शेती; शेतकी; शेतकाम : ‘किंबहुना कृषी जिणे’। - ज्ञा १८·८८१. [सं. कृष्]
कृषिकक्रांती   (कृषी) शेत जमिनीची प्रत सुधारणे, जमिनीचे समाजाभिमुख रीतीने केलेले वाटप, सुधारित तंत्रज्ञान, संकरित बी-बियाणे, पर्यावरणानुरूप पिकांची निवड यांसारख्या बदलांमुळे होणारी कृषिउत्पादनातील प्रचंड वाढ.
कृषिकर्म न. शेतनांगरणी; नांगरट; जमीन कसणे. [सं.]
कृषिवर्त पु. पोर्तुगीज पूर्वकालीन सरकारला ग्रामसंस्थांकडून मिळणारा कर. (गो.) [सं.]
कृषिविभाग पु. (कृषि.) हवामान, पिके, जमिनीचा कस इत्यादीबाबत समान स्थिती असलेला भूभाग.
कृषिशास्त्र न. शेतकी, पिकांची लागवड, पशुधन इ. चा अभ्यास करणारे व त्यांच्या विकासाचा विचार करणारे शास्त्र. [सं.]
कृष्ट वि. कडवी; क्रुद्ध; नाखूष.
कुष्ट वि. कडवी; क्रुद्ध; नाखूष.
कृष्ण वि. १. काळा; पाण्याने भरलेल्या मेघासारखा; सावळा. २. कपटी; दुष्ट. [सं.] (वा.) कृष्ण करणे – काळे करणे; तोंड फिरविणे; नाहीसे होणे. कृष्णवर्ण होणे - काळे होणे; एखादी वस्तू, मरणाने किंवा अन्य तऱ्हेने दृष्टिआड होणे. (एखाद्याचा अत्यंत तिरस्कार आला असता उपयोगात आणतात.)
कृष्णअनुशीतन न. (यंत्र) लोखंड ९००° से. पर्यंत तापवून हळू हळू थंड करणे. त्यामुळे त्याचा रंग काळसर बनतो.
कृष्णकनक पु. काळा धोत्रा. [सं.]
कृष्णकमळ न. एक वेल व त्यावरील फूल. हे निळसर रंगाचे असते.
कृष्णकारस्थान न. गुप्तपणाने केलेला दुष्टपणाचा कट.
कृष्णकावळा पु. सोनकावळा; ज्याची मान पांढरी असते असा कावळा. (श्रीकृष्णाने या कावळ्याच्या मानेला दही फासले अशी दंतकथा आहे यावरून.)
कृष्णकृत्य न. वाईट, कपटी, नीच, काळेबेरे कृत्य. [सं.]
कृष्णगुजरी स्त्री. लुगड्याची एक जात.
कृष्णग्रंथि स्त्री. सोडण्यास कठीण अशी गाठ (श्रीकृष्णाने गोकुळात एका गवळ्याच्या दाढीची आणि त्याच्या बायकोच्या वेणीची गाठ बांधली होती, त्यावरून.) [सं.]
कृष्णग्रंथी स्त्री. सोडण्यास कठीण अशी गाठ (श्रीकृष्णाने गोकुळात एका गवळ्याच्या दाढीची आणि त्याच्या बायकोच्या वेणीची गाठ बांधली होती, त्यावरून.) [सं.]
कृष्णतालू वि. ज्याची टाळू काळी आहे असा (घोडा). हे अशुभचिन्ह मानतात.
कृष्णटालू वि. ज्याची टाळू काळी आहे असा (घोडा). हे अशुभचिन्ह मानतात.

शब्द समानार्थी व्याख्या
कृष्णताळू वि. ज्याची टाळू काळी आहे असा (घोडा). हे अशुभचिन्ह मानतात.
कृष्णटाळू वि. ज्याची टाळू काळी आहे असा (घोडा). हे अशुभचिन्ह मानतात.
कृष्णपक्ष पु. १. काळोख्या रात्रीचा पंधरवडा; वद्य पक्ष; ज्यामध्ये चंद्राच्या कला उत्तरोत्तर कमी होत जातात तो पक्ष. २. (ल.) उतरती कळा, वय; ऱ्हास. ३. ज्याच्याकडे दोष आहे असा पक्ष, बाजू : ‘आस्तिक व नास्तिक, शुक्लपक्ष व कृष्णपक्ष अशा जोडप्यांतील तंटे एक तर स्वल्पजीवि असतात....’ - आगर ३·२०२. [सं.]
कृष्णपक्ष   १. घट आणि वाढ; क्षय आणि वृद्धी. २. खोटेपणा व खरेपणा; वाईट आणि चांगले. [सं.]
शुक्लपक्ष   १. घट आणि वाढ; क्षय आणि वृद्धी. २. खोटेपणा व खरेपणा; वाईट आणि चांगले. [सं.]
कृष्णपक्षी वि. विदुर जातीचे लोक. (ना.)
कृष्णमणी पु. विवाहित स्त्रियांनी घालायचा काळ्या मण्यांचा गळेसर. [सं.]
कृष्णमूर्ति स्त्री. अतिशय काळा, काळाकुळकुळीत माणूस. [सं.]
कृष्णमूर्ती स्त्री. अतिशय काळा, काळाकुळकुळीत माणूस. [सं.]
कृष्णमृग पु. काळवीट : ‘शरभापुढें टिकेना सिंहहि मग काय कृष्णसार थिरे ।’ - मोद्रोण ११·६७. [सं.]
कृष्णसार पु. काळवीट : ‘शरभापुढें टिकेना सिंहहि मग काय कृष्णसार थिरे ।’ - मोद्रोण ११·६७. [सं.]
कृष्णमृत्तिका स्त्री. बंदुकीची दारू. [सं.]
कृष्णमेचु $1 काळा संगमर्मर; सिरसाळ पाषाण : ‘ऐसी कृष्णमेचुची उगवनी । सुदेवो देखताय नयनी ।’ - नरुस्व १०३. २. काळे रत्न : ‘तो उचश्रवेयाचिये जावळीचा : तैसा स्वेत वर्ण कृष्णमेचुचा -’ नरूस्व २७४०.
कृष्णरक्तउष्णता   (यंत्र.) अंदाजे ६००° सें. तापमानापर्यंत दिलेली उष्णता.
कृष्णवर्णधारी पेशी   (वै.) काळे किंवा गडद तपकिरी रंगद्रव्य असलेल्या पेशी. केस, त्वचा यांचा रंग या पेशींच्या कमी-जास्त प्रमाणावर अवलंबून असतो.
कृष्णविलास पु. स्त्री. १. श्रीकृष्णाच्या गोकुळातील क्रीडा, खोड्या, लीला, पुंडावा. २. (ल.) अर्वाच्य खोड्या, खेळ. ३. (ल.) व्यभिचार; सुरत विलास. [सं.]
कृष्णक्रीडा पु. स्त्री. १. श्रीकृष्णाच्या गोकुळातील क्रीडा, खोड्या, लीला, पुंडावा. २. (ल.) अर्वाच्य खोड्या, खेळ. ३. (ल.) व्यभिचार; सुरत विलास. [सं.]
कृष्णसट वि. मानेवरील केस काळे, आवाज मेघनगाऱ्याप्रमाणे गंभीर, श्वास कृष्णसर्पासारखा, गती उत्तम आणि धाडसी असा (घोडा). - अश्वप १·२३.
कृष्णागर पु. चंदनाचे एक प्रकारचे झाड : ‘कृष्णागर मलयागर परिमळ । देवदार वृक्ष तेथें ।’ - हरि २३·१००. [सं. कृष्ण + अगरु]
कृष्णागरु पु. चंदनाचे एक प्रकारचे झाड : ‘कृष्णागर मलयागर परिमळ । देवदार वृक्ष तेथें ।’ - हरि २३·१००. [सं. कृष्ण + अगरु]
कृष्णाची गाय   इंद्रगोप, पावसाळ्यात आढळणारा, लहान, तांबड्या रंगाचा, पुष्कळ पायांचा किडा. हे किडे समुदायाने राहतात.
कृष्णाजिन न. काळविटाचे किंवा सामान्यतः हरिणाचे कातडे; मृगाजिन : ‘नाहीं नाहीं चर्माआतु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ।’ - तुगा ३४२. [सं.]
कृष्णार्पण न. १. कृष्णभक्तीने ब्राह्मणाला अगर देवळाला जमीन दान देणे. २. स्वत्व न ठेवता केलेले दान. (क्रि. करणे). [सं.]
कृष्णावर्त वि. शरीरावर एखाद्या ठिकाणी शंखाप्रमाणे भोवरा असलेला (घोडा). हे शुभचिन्ह मानतात. - अश्वप १·९१. [सं.]
कृष्णावळ पु. कांद्याला विनोदाने म्हणतात. कारण तो उभा चिरला म्हणजे शंखाकृती आणि आडवा चिरला म्हणजे चक्राकृती दिसतो आणि शंख, चक्र ही कृष्णाची आयुधे आहेत : ‘आगस्तीचें मूत्र गळा लावुनि म्हणती कृष्णावळ ।’ - तुगा २८२४. [सं. कृष्ण + वलय = कृष्णावळ]

शब्द समानार्थी व्याख्या
कृष्णावळा पु. घोड्याच्या पायाच्या आतील बाजूस होणारे आवाळू.
कृस्य वि. कृश : ‘तै देह कृस्य होते की’ - लीचपू ५७४.
कृंतक पु. (वै.) पुढचा दात; चौकडीचा-छेदक-दात. [सं.]
कृंतक वि. करांडणारे; कुरतडणारे. [सं. कृत् - कृंत् = कुरतडणे]
कृंतकप्राणी पु. एक प्राणिवर्ग. हे प्राणी पालेभाज्या गवत कुरतडून खातात. उदा. ससा, उंदीर, खार इ.
कृंतन न. १. कापणी. २. नखाने, दातांनी कुरतडणे. [सं. कृत् - कृंत् = कुरतडणे]
क्लृप्त वि. १. शोधून काढलेले; नवीन निर्माण केलेले; रचलेले, बनविलेले. २. निपुण; शहाणा; हुषार; तरबेज : ‘न तुजविना आत्ममतें क्लृप्त तुज असे ।’ - आप १७. [सं. क्लृप्]
क्लृप्ति स्त्री. १. युक्ती; कला; चातुर्य; शोध; शक्कल; कल्पना; हेतू साधण्याची चतुराईची योजना : ‘कोणी रासायनिक शोध लाविले किंवा कोणी क्लृप्ति काढल्या....’ - सेंपू २. (प्रस्तावना) ११. २. कल्पना; मसलत; युक्ती; उपाय; तजवीज; तोड (मनामधील). ३. (गूढ, गुंतागुंतीच्या यंत्राची) कळ; रचना; ते चालविण्याची रीत; त्याचा उपयोग करण्याची हिकमत. [सं.]
क्लृप्ती स्त्री. १. युक्ती; कला; चातुर्य; शोध; शक्कल; कल्पना; हेतू साधण्याची चतुराईची योजना : ‘कोणी रासायनिक शोध लाविले किंवा कोणी क्लृप्ति काढल्या....’ - सेंपू २. (प्रस्तावना) ११. २. कल्पना; मसलत; युक्ती; उपाय; तजवीज; तोड (मनामधील). ३. (गूढ, गुंतागुंतीच्या यंत्राची) कळ; रचना; ते चालविण्याची रीत; त्याचा उपयोग करण्याची हिकमत. [सं.]
के क्रिवि. कोठे : ‘तये वेळीं तूं कवणें कें । देखावासी ॥’ - ज्ञा १·२२९. [सं. क्व]
कें क्रिवि. कोठे : ‘तये वेळीं तूं कवणें कें । देखावासी ॥’ - ज्ञा १·२२९. [सं. क्व]
के क्रिवि. कसे : ‘परदैवा कें नांदणें । आपुलेनि आंगें ।’ - ऋ ४२. [सं. कथ]
कें क्रिवि. कसे : ‘परदैवा कें नांदणें । आपुलेनि आंगें ।’ - ऋ ४२. [सं. कथ]
के सना. काय : ‘तंव कें नारदु भणे ।’ - शिव १२६. [सं. किम् = काय]
कें सना. काय : ‘तंव कें नारदु भणे ।’ - शिव १२६. [सं. किम् = काय]
केउता क्रिवि. १. कोठे : ‘चैतन्य गेलें नेणो केउतीं ।’ - शिव ८२८; २. कोठला; कोठील : ‘तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ॥’ - ज्ञा १६·४५३. [सं. कुत्र] ३. कशाला : ‘केउता कल्पतरूवरी फुलोरा ।’ - ज्ञा १०·११. ४. कसा; कशी : ‘मज सांडूनि केउती । गोवळाप्रती जातेसी ।’ - एभा १२·१०१; ‘प्रळयानळा देता खेंव । पतंग वांचे केउता ।’ - मुविराट ६·५४. ५. कोणता; कसला : ‘अनंगा केउता हाथिएरू ।’ - शिव २६५. ६. केव्हा. [सं. कियत् + उत]
केउती क्रिवि. १. कोठे : ‘चैतन्य गेलें नेणो केउतीं ।’ - शिव ८२८; २. कोठला; कोठील : ‘तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ॥’ - ज्ञा १६·४५३. [सं. कुत्र] ३. कशाला : ‘केउता कल्पतरूवरी फुलोरा ।’ - ज्ञा १०·११. ४. कसा; कशी : ‘मज सांडूनि केउती । गोवळाप्रती जातेसी ।’ - एभा १२·१०१; ‘प्रळयानळा देता खेंव । पतंग वांचे केउता ।’ - मुविराट ६·५४. ५. कोणता; कसला : ‘अनंगा केउता हाथिएरू ।’ - शिव २६५. ६. केव्हा. [सं. कियत् + उत]
केउते क्रिवि. १. कोठे : ‘चैतन्य गेलें नेणो केउतीं ।’ - शिव ८२८; २. कोठला; कोठील : ‘तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ॥’ - ज्ञा १६·४५३. [सं. कुत्र] ३. कशाला : ‘केउता कल्पतरूवरी फुलोरा ।’ - ज्ञा १०·११. ४. कसा; कशी : ‘मज सांडूनि केउती । गोवळाप्रती जातेसी ।’ - एभा १२·१०१; ‘प्रळयानळा देता खेंव । पतंग वांचे केउता ।’ - मुविराट ६·५४. ५. कोणता; कसला : ‘अनंगा केउता हाथिएरू ।’ - शिव २६५. ६. केव्हा. [सं. कियत् + उत]
केउलवाणा वि. दीनवाणा. पहा : केविलवाणा : ‘येती शरण तुला जे केउलवाणे न ते जना दिसती ।’ - मोभीष्म १·४५.
केउलवाणी वि. दीनवाणा. पहा : केविलवाणा : ‘येती शरण तुला जे केउलवाणे न ते जना दिसती ।’ - मोभीष्म १·४५.
केउलवाणे वि. दीनवाणा. पहा : केविलवाणा : ‘येती शरण तुला जे केउलवाणे न ते जना दिसती ।’ - मोभीष्म १·४५.
केऊं उद्गा. कुत्र्याचे केकाटणे; क्यंव : ‘चोरटें सुनें मारिलें टाळें । केऊं करी परि न संडी चाळे ।’ - तुगा ८८६. (क्रि. करणे)
केकट न. कुत्रे : ‘आवो केंकट खाइल म्हणे :’ - गोप्र १९.
केकटणे अक्रि १. दुःखाने ओरडणे; आर्त स्वर काढणे; भुंकणे (कुत्रे, पोर इ. नी) : ‘तें कोल्हें केकटून केकटून उड्या मारून मारून ...’ -नाकु ३·२४. ३. किंकाळणे; मोठ्याने रडणे. [ध्व.]
केकणे अक्रि १. दुःखाने ओरडणे; आर्त स्वर काढणे; भुंकणे (कुत्रे, पोर इ. नी) : ‘तें कोल्हें केकटून केकटून उड्या मारून मारून ...’ -नाकु ३·२४. ३. किंकाळणे; मोठ्याने रडणे. [ध्व.]

शब्द समानार्थी व्याख्या
केकावणे अक्रि १. दुःखाने ओरडणे; आर्त स्वर काढणे; भुंकणे (कुत्रे, पोर इ. नी) : ‘तें कोल्हें केकटून केकटून उड्या मारून मारून ...’ -नाकु ३·२४. ३. किंकाळणे; मोठ्याने रडणे. [ध्व.]
केकट्टां वि. अर्धे पिकलेले (भात). (गो.)
केकत न. स्त्री घायपातीचे फूल व झाड; हे उष्ण प्रदेशात होते. हे कुंपणाला लावतात. याच्या पातींचे उभे व सरळ तंतू निघतात. त्यांची टिकाऊ वस्रे विणतात. याच्यापासून दोरखंडेही करतात. [सं. केतक]
केकती न. स्त्री घायपातीचे फूल व झाड; हे उष्ण प्रदेशात होते. हे कुंपणाला लावतात. याच्या पातींचे उभे व सरळ तंतू निघतात. त्यांची टिकाऊ वस्रे विणतात. याच्यापासून दोरखंडेही करतात. [सं. केतक]
कंकताट न. स्त्री घायपातीचे फूल व झाड; हे उष्ण प्रदेशात होते. हे कुंपणाला लावतात. याच्या पातींचे उभे व सरळ तंतू निघतात. त्यांची टिकाऊ वस्रे विणतात. याच्यापासून दोरखंडेही करतात. [सं. केतक]
कंकताड न. स्त्री घायपातीचे फूल व झाड; हे उष्ण प्रदेशात होते. हे कुंपणाला लावतात. याच्या पातींचे उभे व सरळ तंतू निघतात. त्यांची टिकाऊ वस्रे विणतात. याच्यापासून दोरखंडेही करतात. [सं. केतक]
केकत   पहा : केतक, केतकी
केकती   पहा : केतक, केतकी
केकतडाचे सळ   (चांभारी) दोर; चामड्याची पिशवी शिवण्यासाठी कातड्याऐवजी उपयोगात आणतात ते; घायपाताचे दोर; तोडा; पन्हळी.
केकया स्त्री. १. कैकेयी; भरताची आई. २. (ल.) भांडखोर, कैदाशीण, कजाग स्त्री. [सं.]
केकयी स्त्री. १. कैकेयी; भरताची आई. २. (ल.) भांडखोर, कैदाशीण, कजाग स्त्री. [सं.]
केकरा पु. स्त्री. न. मेंढीचे पोर. पहा : कोकरा, कोकरी, कोकरू
केकरी पु. स्त्री. न. मेंढीचे पोर. पहा : कोकरा, कोकरी, कोकरू
केकरु पु. स्त्री. न. मेंढीचे पोर. पहा : कोकरा, कोकरी, कोकरू
केकरे न. फावडे, खोरे, केंगरे. (राजा.)
केकसणे अक्रि. खेकसणे; वसकन अंगावर जाणे. [ध्व.]
केकसा स्त्री. १. पहा : केकया, केकयी २. कर्कशा; कजाग स्त्री. २. भेसूर, किळसवाणी स्त्री. [सं. कैकस राक्षस]
केकसा मावशी स्त्री. १. पहा : केकया, केकयी २. कर्कशा; कजाग स्त्री. २. भेसूर, किळसवाणी स्त्री. [सं. कैकस राक्षस]
केका स्त्री. १. मोराचे ओरडणे, टाहो, ध्वनी. २. मोरापंत कवीनी केलेल्या केकावली रचनेतील आर्या. [सं.]
केकाटणे अक्रि. १. ओरडणे; मोठ्याने हाक मारणे. २. हेल काढून रडणे. ३. कर्कश ओरडणे : ‘रेल्वेची मालगाडी मोठ्याने केकाट, केकाट केकाटून थांबली.’ - हाचिं ५१. ४. दुःखाने किंवा वेदनेने मोठ्याने ओरडणे. ३ भुंकणे. तें (सुनें) केकाटले’ - लीचउ ५०.
केकाण न. समुदाय : ‘घेऊनि इंद्रियांची केकाणे ।’ - ज्ञा १८·४६४.
केकाणे न. १. केकाण नावाच्या देशातील घोडा; घोड्याचा एक प्रकार : ‘जालौरीचे केंकाणे थोरू ।’ - शिव ९३७. २. एक देश. ३. दौड; धाव.
केकाणे न. दोरखंड.
केकार पु. मोराचे ओरडणे : ‘मयोर गर्जती केकारे’। - मुआदि १५·७२ [सं. केका + रव]
केकी पु. मोर. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
केकी कोळसा   (भुशा) ऊर्ध्वपतनानंतर कोकमध्ये रूपांतरित होणारा दगडी कोळशाचा प्रकार.
केकें उद्गा. केकटणे; केकणे. (क्रि. करणे.) [ध्व.]
केगई स्त्री. भांडकुदळ, भांडखोर, दुष्ट स्त्री; हट्टी स्त्री.
केघई स्त्री. भांडकुदळ, भांडखोर, दुष्ट स्त्री; हट्टी स्त्री.
केगद स्त्री. केवडा. पहा : केतक, केतकी [सं. केतक]
केगादी स्त्री. केवडा. पहा : केतक, केतकी [सं. केतक]
केगया   पहा : केकया, केकयी
केगामती   पहा : केकया, केकयी
केगरे न. फावडे; खोरे.
केचित वि. काही; काही लोक. [सं. कश्चित् (अव.)]
केचिन्मत न. सर्वांना मान्य नसणारे मत; काही लोकांचे मत.
केज न. मालाच्या मोबदल्याचे धान्य, नारळ इ. पदार्थ; विनिमयार्थ दिलेली वस्तू. उदा. माळणीकडून भाजी घेऊन धान्यरूपाने दिलेली किंमत. (क्रि. घालणे.) (माण. व.) : ‘आदरासी मोल नये लावू केजें ।’ - तुगा ३४०४. २. मोबदला; मालाची देवघेव. [सं. क्रेय] (वा.) केज्यास कापूर होणे - भारी किमतीचा पदार्थ हलक्या किमतीला विकला जाणे.
केजी न. मालाच्या मोबदल्याचे धान्य, नारळ इ. पदार्थ; विनिमयार्थ दिलेली वस्तू. उदा. माळणीकडून भाजी घेऊन धान्यरूपाने दिलेली किंमत. (क्रि. घालणे.) (माण. व.) : ‘आदरासी मोल नये लावू केजें ।’ - तुगा ३४०४. २. मोबदला; मालाची देवघेव. [सं. क्रेय] (वा.) केज्यास कापूर होणे - भारी किमतीचा पदार्थ हलक्या किमतीला विकला जाणे.
केजे न. मालाच्या मोबदल्याचे धान्य, नारळ इ. पदार्थ; विनिमयार्थ दिलेली वस्तू. उदा. माळणीकडून भाजी घेऊन धान्यरूपाने दिलेली किंमत. (क्रि. घालणे.) (माण. व.) : ‘आदरासी मोल नये लावू केजें ।’ - तुगा ३४०४. २. मोबदला; मालाची देवघेव. [सं. क्रेय] (वा.) केज्यास कापूर होणे - भारी किमतीचा पदार्थ हलक्या किमतीला विकला जाणे.
केजणे उक्रि. नारळ, धान्य इ. देऊन त्याबदल्यात मासळीचा कुट्टा अगर भाजीपाला घेणे. (को.)
केटर वि. अंगाने किरकोळ (जनावर). (व.)
केटा वि. किडका; कुजका; सुमार (माल). (माण.) [क. केटट् = वाईट]
केड वि. कद्रू; कृपण; चिक्कू.
केड   नासणे; नास. (बे.) [क. केडिसु = नाश करणे]
केडगा वि. कळ, भांडण लावणारा. (कर.) [क. केडिसु]
केडणार वि. अवहेलना करणारा. (गो.)
केडला क्रिवि. केव्हा. (चि.) [सं. कियत + वेला]
केडलावणे   वेडावणे. (कु.) [सं. कटु]
केडशी स्त्री. बुरशी; बुरा. [क. केडु = नासणे]
केडूळ क्रिवि. एवढा वेळ; कितीतरी वेळ; फार वेळ. [सं. कियत्‌वेला]

शब्द समानार्थी व्याख्या
केडोळ क्रिवि. एवढा वेळ; कितीतरी वेळ; फार वेळ. [सं. कियत्‌वेला]
केढवळ पु. पुष्कळ वेळ; किती वेळ; फार वेळ.
केढोळ पु. पुष्कळ वेळ; किती वेळ; फार वेळ.
केढवळचा वि. किती वेळचा; केव्हाचा; बऱ्याच वेळापासून.
केढोळचा वि. किती वेळचा; केव्हाचा; बऱ्याच वेळापासून.
केणा पु. स्त्री. केना नावाची शेतात उगवणारी भाजी. याची फुले निळी-जांभळी असतात. ह्याला कातरपाने येतात.
केणी पु. स्त्री. केना नावाची शेतात उगवणारी भाजी. याची फुले निळी-जांभळी असतात. ह्याला कातरपाने येतात.
केणाकुरडुची भाजी   केणा आणि कुंजरा या दोन हलक्या पालेभाज्या आहेत. त्यावरून भिकार अन्न. पहा : कळणाकोंडा : ‘घागरी मडक्यात कांही दाणे पहा, दळून त्याची भाकरी कर, केणी कुरडूची भाजी कर.’ -संपत शनिवारची कहाणी ३२.
केण्याकुंजऱ्याची भाजी   केणा आणि कुंजरा या दोन हलक्या पालेभाज्या आहेत. त्यावरून भिकार अन्न. पहा : कळणाकोंडा : ‘घागरी मडक्यात कांही दाणे पहा, दळून त्याची भाकरी कर, केणी कुरडूची भाजी कर.’ -संपत शनिवारची कहाणी ३२.
केणी पु. न. १. विक्रीचा माल; मालाचे गाठोडे : ‘तरी तैसी एथ कांहीं । सावियाची केणी नाहीं ।’ - ज्ञा ६·३४१. २. वस्तू; प्रकार. ३. बाजारात विकायला आलेल्या जिनसांवर (माल, वस्तूंवर) देशमुख-देशपांडे वगैरे वतनदारांचा कर. सरकारी कर. ४. व्यापारविषयक पदार्थ (विशेषतः धान्य, फळे, भाजी इ.) : ‘इया पाटणीं जें केणे उघटे ।’ - पाटणचा शीलालेख. ५. वर्तावळा, वर लावणे. ६. पैसा, डबोले. (मावळी).
केणे पु. न. १. विक्रीचा माल; मालाचे गाठोडे : ‘तरी तैसी एथ कांहीं । सावियाची केणी नाहीं ।’ - ज्ञा ६·३४१. २. वस्तू; प्रकार. ३. बाजारात विकायला आलेल्या जिनसांवर (माल, वस्तूंवर) देशमुख-देशपांडे वगैरे वतनदारांचा कर. सरकारी कर. ४. व्यापारविषयक पदार्थ (विशेषतः धान्य, फळे, भाजी इ.) : ‘इया पाटणीं जें केणे उघटे ।’ - पाटणचा शीलालेख. ५. वर्तावळा, वर लावणे. ६. पैसा, डबोले. (मावळी).
केणी स्त्री. कमतरता; अडचण : ‘उपायाची नाहि । केणि येथें ॥’ - राज्ञा ९·४६७.
केणे न. दुकान : ‘नातरि जालंधाच्या पाटणीं । जेवि केणें लावण्याचें’ - उगी ६२५.
केणे न. बासनाभोवती बांधायची सुताची किंवा रेशमाची दोरी; बंधन. पहा : केवणे : ‘तया ध्वनिताचें केणें सोडूनि ।’ - ज्ञा ६·२९२. (वा.) केण्याची समाधी घेणे - रेशमी दोरीचा गळफास लावून घेणे : ‘तेथेंच केण्याची समाधी पुंडलिकाच्या देवालयाच्या सन्निध घेऊन मृत्यु पावले.’ - चिटणीस बखर म रि ४·४२.
केण्या क्रिवि. कोठून; कोणत्या वाटेने, मार्गाने. (चि.)
केत पु. केतू; ध्वज.
केत पु. इच्छा; हौस : ‘श्वशुरप्रमुख सासू कृष्ण आराधि केते ।’ -मंराधा ७८.
केत पु. १. झाडाचा नार, गाभा. (राजा.) २. झाडातील जून लाकूड.
केतक न. १ केवडा; केवड्याचे कणीस. २. कणसाचे एक पान, पात. ३. डोक्यातील सोन्याचा एक दागिना. [सं.]
केतकट स्त्री. केतकीचे झाड; केवडा. (को.)
केतकट न. केतकीचे लाकूड.
केतकपान   पहा : केतक ३
केतकी स्त्री. केवड्याचे झाड. पहा : केतक [सं.]
केतकी वि. केतकीच्या पानासारख्या रंग.
केतकी स्त्री. एक प्रकारचा पक्षी; चांभारीण पक्षी. (को.)

शब्द समानार्थी व्याख्या
केतकी वज्र   खड्‌गाचा एक प्रकार. [सं.]
केतके न. गूळ उकरण्याचे उलथणे. (बे.) [क. कित्तु = उपटणे]
केतन न. ध्वज; पताका; निशाण; चिन्ह. [सं.]
केती वि. किती : ‘हें येकेक केती सांघावे ।’ - राज्ञा ७·५१.
केतुक अवि. किती : ‘भटो, अटनीं कोणा गावीं केतुका काळ असावे?’ - स्मृस्थ २१४.
केतुका वि. केवढा; किती; कसला; कितीसे : ‘ते सैन्यु सांगौ केतुलें ।’ - शिव १०३१; ‘हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।’ - ज्ञा १३·१२; ‘तक्षकविषाचा केतुला केवा ।’ - मुआदि ८·१९. [सं. कियत् + क]
केतुकी वि. केवढा; किती; कसला; कितीसे : ‘ते सैन्यु सांगौ केतुलें ।’ - शिव १०३१; ‘हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।’ - ज्ञा १३·१२; ‘तक्षकविषाचा केतुला केवा ।’ - मुआदि ८·१९. [सं. कियत् + क]
केतुके वि. केवढा; किती; कसला; कितीसे : ‘ते सैन्यु सांगौ केतुलें ।’ - शिव १०३१; ‘हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।’ - ज्ञा १३·१२; ‘तक्षकविषाचा केतुला केवा ।’ - मुआदि ८·१९. [सं. कियत् + क]
केतुला वि. केवढा; किती; कसला; कितीसे : ‘ते सैन्यु सांगौ केतुलें ।’ - शिव १०३१; ‘हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।’ - ज्ञा १३·१२; ‘तक्षकविषाचा केतुला केवा ।’ - मुआदि ८·१९. [सं. कियत् + क]
केतुली वि. केवढा; किती; कसला; कितीसे : ‘ते सैन्यु सांगौ केतुलें ।’ - शिव १०३१; ‘हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।’ - ज्ञा १३·१२; ‘तक्षकविषाचा केतुला केवा ।’ - मुआदि ८·१९. [सं. कियत् + क]
केतुले वि. केवढा; किती; कसला; कितीसे : ‘ते सैन्यु सांगौ केतुलें ।’ - शिव १०३१; ‘हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।’ - ज्ञा १३·१२; ‘तक्षकविषाचा केतुला केवा ।’ - मुआदि ८·१९. [सं. कियत् + क]
केतु पु. १. (ज्यो.) नवग्रहांतील काल्पनिक नववा ग्रह. २. एक दैत्य. याचे शिर विष्णूने मोहिनीरूप घेऊन उडवले. पहा : राहू. ३. धूमकेतु; शेंडे नक्षत्र : ‘उदैजणे केतूचे जैसें ।’ - ज्ञा १६·३१९. [सं.]
केतू पु. १. (ज्यो.) नवग्रहांतील काल्पनिक नववा ग्रह. २. एक दैत्य. याचे शिर विष्णूने मोहिनीरूप घेऊन उडवले. पहा : राहू. ३. धूमकेतु; शेंडे नक्षत्र : ‘उदैजणे केतूचे जैसें ।’ - ज्ञा १६·३१९. [सं.]
केतु पु. निशाण. [सं.]
केतू पु. निशाण. [सं.]
केतुल वि. केवढे : ‘कवण केतुला । कवणाचा कैं जन्मला ।’ - ज्ञा १०·६६.
केते-पान न. चंनकांचनी गंजिफाच्या खेळात चारी हुकूम एकाला आल्याने होणारी जीत.
केथवर क्रिवि. कोठवर; कोठपर्यंत; किती लांब.
केथेमेथे   किरकोळ : ‘केथे मेथें मागत होतो.’ - वच ३०२.
केदवळ क्रिवि. किती वेळ; केवढा वेळ. (कु.)
कदोळ क्रिवि. किती वेळ; केवढा वेळ. (कु.)
केदोळ क्रिवि. किती वेळ; केवढा वेळ. (कु.)
केदार न. पु. १. शेत. २. मळा. ३. पाटाचा बांध : ‘वाटेस फुटतां केदार ।’ - पांप्र १·६६. ४. केदारेश्वराचे स्थान; बद्रिकेदार. [सं.]
केदार पु. एक वृक्ष.
केदारखंड पु. शेतबांध; पाणी अडविण्यासाठी बांधलेला बंधारा : ‘केदारखंड - बंधन आज्ञापुनि धाडिला तुम्ही म्हणती ।’ - मोआदि २·१९.

शब्द समानार्थी व्याख्या
केदारनाट पु. (संगीत) बिलावल थाटाचा राग. केदार आणि नट या रागांचा जोडराग. गानसमय रात्र.
केदारयोग पु. (ज्यो.) पत्रिकेत सातही ग्रह चार स्थानांमध्ये किंवा एकसारख्या चारी स्थानांमध्ये असतील तर हा योग होतो. या योगावर माणूस श्रीमंत, आळशी, बुद्धिमान, आप्तांवर उपकार करणारा असा असतो.
केदारी स्त्री. नैवेद्य : ‘पिराचे केदारीस तांदूळ, केळी.’ - बाबारो २·१०१.
केदो वि. केवढा. (गो. कु.)
केद्वा क्रिवि. केव्हा; कधी; कोणत्या वेळी : ‘तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवा पांडुरंगा ॥’ - तुगा ८४६. [सं. कदा]
केधवा क्रिवि. केव्हा; कधी; कोणत्या वेळी : ‘तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवा पांडुरंगा ॥’ - तुगा ८४६. [सं. कदा]
केन   आऊत; नांगर.
केनशी स्त्री. १. बुरशी; बुरा. (को.) पहा : केंडशी २. लोणा.
केनसावणे अक्रि. (अन्न इत्यादी पदार्थ) बुरसणे; बुरशी येणे. (को.)
केना   पहा : केणा (वाई)
केनाइट न. (भूशा.) खनिज क्षारांपैकी एक.
केनाळ न. एक प्रकारचे भाताचे बी; करगुंट; कोळपा. (गो.)
केनी   पहा : केना, केणी
केनी   पहा : केनशी
केप स्त्री. १. बंदुकीच्या घोड्याचा ज्यावर आघात होऊन बार उडतो ती तांब्याची लहान टोपी. २. दिवाळीत मुलांच्या पिस्तुलात घालायची दारू भरलेली कागदी चकती. [इं. कॅप]
केपगुजबरी स्त्री. एक फळझाड; ढोलांबा. [इं.]
केबरा पु. १. शेतातून कोठारात भात नेत असताना येणारी तूट भरून निघावी म्हणून दिलेली सूट, भत्ता. २. विक्रीसाठी साठवलेल्या सरासरी पिकाची नुकसानभरपाई करण्यासाठी बसवलेली पट्टी.
केबल स्त्री. १. तारांच्या जुडग्यांचा दोर; तारेचा जाड मजबूत दोर. २. समुद्रपार तारेने पाठवलेला संदेश. [इं.]
केबल   उपग्रहाद्वारे संदेश पोहोचविणारी यंत्रणा.
केबिन स्त्री. १. आगबोटीतील प्रवाशांची खोली. २. कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी असलेली स्वतंत्र लहान खोली. [इं.]
केम न. (भूशा.) हिमनदी वितळल्यामुळे तिच्या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ, रेती इत्यादींनी बनलेले लांबट टेकाड. [इं.]
केम न. यंत्राच्या विशिष्ट प्रकारच्या गतीचे दुसऱ्या प्रकारच्या गतीत रूपांतर (वाटोळ्या गतीचे मागे पुढे होणाऱ्या गतीत) करायचे साधन. [डच कॅम]
केमटा वि. हेमटा; चिक्कू; कृपण; पहा : केड
केमण स्त्री. काव; हुरमुंज; गेरू. (बे.)
केमर   पहा : केंबरे : ‘डबक्यातून आणि हिरवळीतून आसरा घेणाऱ्या केमरांनी (घुंगुरट्यांनी) तो आसरा सोडला.’ - माचू ३२१.

शब्द समानार्थी व्याख्या
केमशी स्त्री. बुरशी. पहा : केंडशी
केमसा पु. स्त्री. पुरुष अथवा स्त्रीला बायका देतात ती एक शिवी.
केमशी पु. स्त्री. पुरुष अथवा स्त्रीला बायका देतात ती एक शिवी.
केयूर न. १. दंडामधील कडे, वळे; बाजूबंद : ‘जैसा केयुरादिकीं कसु । सुवर्णाचा ॥’ - ज्ञा १३·१०६५. २. कंकण.
केर पु. न. १. कचरा; गवताच्या काड्या; धुरळा; शेण, माती, गवत, पाने इत्यादींचा वाईटसाईट अंश. २. गाळ; रेंदा; निरुपयोगी पदार्थ; अवशिष्ट भाग. ३. बारीक कण; गवतकाडी, कसपट, तुकडा इ. (साखरेतील, धान्यातील, कापसातील.) (को.) [क. किर, केर] (वा.) केर फिटणे - कचऱ्याप्रमाणे उडून जाणे; नाश होणे : ‘तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।’ - ज्ञा १३४. केर फेडणे - नाश करणे. केरवारा करणे - घरातील निरनिराळी कामे करणे. १. (ल.) धसफस करून काम बिघडवणे; नासणे; खराब करणे. २. तिरस्काराने नाकारणे. (उपदेश वगैरे.)
केर पु. अभ्र; ढग : ‘जैसा केरु फीटलेया अभाली । दीठि रिगे सूर्यमंडलीं । - राज्ञा १०·७४. २. संशय.
केर स्त्री. दोन डोंगरांमधील लांबट शेतजमीन; पावसाळी हंगामाची शेतजमीन. (गो.)
केर पु. मासळी. (गो.)
केर पु. मोठा, उंच रथ. उदा. म्हाळसेचा केर.
केरकचरा पु. केर व इतर निरुपयोगी वस्तूंना उद्देशून वापरण्याचा शब्द.
केरकतवार पु. अडगळ; गाळसाळ; केरकचरा. [केरचे द्वि.]
केरकारत पु. अडगळ; गाळसाळ; केरकचरा. [केरचे द्वि.]
केरकुध्वित पु. अडगळ; गाळसाळ; केरकचरा. [केरचे द्वि.]
केरकसपट न. केरकचरा; गवतकाडी; गाळसाळ.
केरकस्तान न. केरकचरा; गवतकाडी; गाळसाळ.
केरकार पु. झाडलोट करणारा.
केरकारू पु. झाडलोट करणारा.
केरकोंडा पु. केर व कोंडा; घराची झाडलोट करणे वगैरेसारखी हलकी नोकरी. (निर्वाहाचे साधन म्हणून केलेली.)
केरडोक न. छपरापासून लोंबणारे जाळे; कोळिष्टके; गवताच्या काड्या;
केरणे अक्रि. खाणे.
केरपट्टी स्त्री. केरनेणावळ; केर काढण्यासाठी जे झाडूवाले नेमतात त्यांचा खर्च भागवण्यासाठी बसवलेला कर.
केरपाणी न. झाडलोट, पाणी भरणे, सारवणे, सडासंमार्जन वगैरे बायकांची रोजची कामे.
केरपोतेरे न. झाडलोट, पाणी भरणे, सारवणे, सडासंमार्जन वगैरे बायकांची रोजची कामे.
केरली स्त्री. खगोलविद्या; नक्षत्रज्ञान.
केरपातेर न. केरकचरा.

शब्द समानार्थी व्याख्या
केरपुंजा पु. केराचा ढीग.
केरवळ्या (कोणाच्या) पुअव. कोणफळाचा केलेला एक खाद्यपदार्थ.
केरवा पु. चिनी मातीचे एक भांडे : ‘केरवा नांवाचे चिनी मातीचें पात्र आहे त्यांत एक मुंबईमण गुलाबपाणी असतें.’ -मुंव्या ११९. [फा. कहरुवा]
केरवा पु. तबल्याचा एक बोल. याच्या चार मात्रा असतात.
केरवा पु. केरवा नाच. पहा : कारवा
केरवा पु. १. बांगड्यांचा एक प्रकार. २. पिवळा दृष्टमणी; तृणमणी : ‘आंबर नावाचे एक खनिज आहे. केरवा मणी त्याचा केलेला असतो.’ - वनश्री १०७. [फा. कह्‌रुवा]
केरवारा पु. झाडलोट : ‘सर्व वाड्याचा केरवारा सणावारी झाला म्हणजे फार झाले.’ - भदि ५१.
केरवाऱ्यात $1 केरात, घाणीत. २. (ल.) केरवाऱ्यावर उडून गेलेला.
केरवाऱ्यात निशी $1 केरात, घाणीत. २. (ल.) केरवाऱ्यावर उडून गेलेला.
केरसुणी स्त्री. १. केर झाडण्यासाठी शिंदीच्या पातींची अगर नारळीच्या हिरांची केलेली झाडणी; वाढवण; सळाथी. २. ऐदी स्त्री; आळशी स्त्री.
केरसुणी वि. नेहमी बाजूला शेपटी वळवलेला (घोडा); पहा : उघडगांड्या
केरसोणी स्त्री. १. केर झाडण्यासाठी शिंदीच्या पातींची अगर नारळीच्या हिरांची केलेली झाडणी; वाढवण; सळाथी. २. ऐदी स्त्री; आळशी स्त्री.
केरसोणी वि. नेहमी बाजूला शेपटी वळवलेला (घोडा); पहा : उघडगांड्या
केरसुणीकार पु. झाडलोट करणारा नोकर : ‘तंव गोरंभकु नामें केरसुणीकारु ।’ - पंच १·२६.
केरसुणीकारु पु. झाडलोट करणारा नोकर : ‘तंव गोरंभकु नामें केरसुणीकारु ।’ - पंच १·२६.
केरा वि. १. तिरप्या नजरेचा; चकणा. २. वाकडा. [सं. केकर = तिरवा.]
केरावणे अक्रि. धान्य वगैरेमध्ये केरकचरा मिसळणे. (को.)
केरावारी वि. टाकाऊ; कवडी किमतीचा (माल).
केरासमान वि. टाकाऊ; कवडी किमतीचा (माल).
केरी स्त्री १. केर; काड्या (नांगराने उपटून निघालेल्या); केरकचरा (पाण्याच्या ओघाबरोबर आलेला, भरतीबरोबर आलेला.) २. जमीन भाजल्यावर राहिलेले कवळ वगैरे; शेतातील धस, खुंट; पिकाबरोबर वाढलेले तण, पाचोळा. ३. माडाच्या पात्यांची विणलेली पाटी. (को.)
केरी स्त्री. विहिरीतील एक प्रकारचा मासा.
केरोसीन न. घासलेट.
केल न. १. काठीचे दुबेळके, डोके, भाग. २. दुबेळे, दुबेळक्याचा काटा. ३. मोडलेल्या फांदीचा, झाडाच्या खोडावर राहिलेला भाग. ४. काठीला लावलेली आकडी.
केलटे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]
केळटे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]

शब्द समानार्थी व्याख्या
केयटे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]
केलडे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]
केळडे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]
केयडे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]
केल्डे न. माकडाचे पिल्लू; माकड. (को. गो.) [पो. केल्दन]
केलडे न. (नाविक) कप्पीसारखे पण साधारण लांबट चाक.
केलमल पु. रुपयांना सांकेतिक शब्द. (कैकाडी)
केलाडु न. लहान मूल; लेकरू. (को.)
केलि स्त्री. खेळ; करमणूक, क्रीडा; विलास; विहार : ‘जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥’ - ज्ञा १८·४. [सं.]
केली स्त्री. खेळ; करमणूक, क्रीडा; विलास; विहार : ‘जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय ॥’ - ज्ञा १८·४. [सं.]
केलिकलह पु. प्रीतिकलह; लाडझगडा; खेळातील विनोदी भांडण. [सं.]
केले न. कर्म; कृत्य : ‘न देखे आपुलें केलें । परापवाद स्वयें बोले ।’ -एभा - २३·२७४. [सं. कृ] (वा.) केले न केलेसे करणे - निष्काळजीपणाने, कुचराईने एखादे काम करणे. (वा.) केले केले न केले न केलेसे करणे - (एखादे काम) निष्काळजीपणाने करणे; कसेतरी तडीला लावणे.
केलेपण न. काही केल्याची भावना; कर्तृत्व : ‘परि केलेपण शरीरीं । उरों नेदी’ - ज्ञा १३·५२३.
केव स्त्री. करुणा; याचना; दया. पहा : कीव
केवट न. किरकोळीचा व्यापार; किरकोळ विक्री - व्यवहार. [सं. क्री = विकत घेणे]
केवटपण न. किरकोळीचा व्यापार; किरकोळ विक्री - व्यवहार. [सं. क्री = विकत घेणे]
केवटळ स्त्री. जी जमीन ओढा किंवा नदी यांच्या काठी असते व ज्या जमिनीत डोंगराच्या वरच्या प्रदेशातून गाळ वाहत येऊन बसतो अशी जमीन; घडवा मळई.
केवटा पु. १. पिवळसर रंगाची माती. २. गाळाने बनलेली जमीन; बारीक गाळ, माती : ‘ही जमीन नदीच्या केवट्याची असावी.’ -बागेची माहिती.
केवटा वि. १. मोठ्या दुकानातून खरेदी करून किरकोळ भावाने जिन्नस विकणारा; किरकोळ, लहान व्यापारी; घाऊक खरेदी करणारा.
केवटा वि. अति कृपण; चिक्कू, चिकट.
केवटी वि. १. मोठ्या दुकानातून खरेदी करून किरकोळ भावाने जिन्नस विकणारा; किरकोळ, लहान व्यापारी; घाऊक खरेदी करणारा.
केवटी वि. अति कृपण; चिक्कू, चिकट.
केवट्या वि. १. मोठ्या दुकानातून खरेदी करून किरकोळ भावाने जिन्नस विकणारा; किरकोळ, लहान व्यापारी; घाऊक खरेदी करणारा.
केवट्या वि. अति कृपण; चिक्कू, चिकट.
केवड   (क्रिवि.) पुष्कळ; किती प्रमाणाने, अंशाने (प्रश्नार्थाने किंवा मोघम रीतीने उपयोग) पहा. एव्हाडा [सं. कियत् + दा]

शब्द समानार्थी व्याख्या
केवड वि. किती मोठा, मोठे : ‘निहाळा पां केवडा । पसरूनिया चवडा ।
केवडा   (क्रिवि.) पुष्कळ; किती प्रमाणाने, अंशाने (प्रश्नार्थाने किंवा मोघम रीतीने उपयोग) पहा. एव्हाडा [सं. कियत् + दा]
केवडा वि. किती मोठा, मोठे : ‘निहाळा पां केवडा । पसरूनिया चवडा ।
केव्हडा   (क्रिवि.) पुष्कळ; किती प्रमाणाने, अंशाने (प्रश्नार्थाने किंवा मोघम रीतीने उपयोग) पहा. एव्हाडा [सं. कियत् + दा]
केव्हडा वि. किती मोठा, मोठे : ‘निहाळा पां केवडा । पसरूनिया चवडा ।
केव्हडा   (क्रिवि.) पुष्कळ; किती प्रमाणाने, अंशाने (प्रश्नार्थाने किंवा मोघम रीतीने उपयोग) पहा. एव्हाडा [सं. कियत् + दा]
केव्हडा वि. किती मोठा, मोठे : ‘निहाळा पां केवडा । पसरूनिया चवडा ।
केव्हढा   (क्रिवि.) पुष्कळ; किती प्रमाणाने, अंशाने (प्रश्नार्थाने किंवा मोघम रीतीने उपयोग) पहा. एव्हाडा [सं. कियत् + दा]
केव्हढा वि. किती मोठा, मोठे : ‘निहाळा पां केवडा । पसरूनिया चवडा । करितसे माजिवडा । आकारगजु ॥’ - ज्ञा १३·६५.
केवडा पु. १. केतकीचे झाड व त्याचा तुरा, कणीस. हिंदुस्थानात पाणथळ जागी केवडा येतो. पांढऱ्या जातीला केवडा व पिवळ्या जातीला केतकी म्हणतात. केतकीला फार सुवास येतो. त्याचे तेल व अत्तर काढतात. २. बायकांच्या वेणीतील लांबट चौकोनी सोन्याचे फूल. ३. अंगरख्याची काखेतील कळी. ४. वेणीचा एक प्रकार. (क्रि. घालणे, काढणे, उतरणे.) ५. जोंधळ्यावरील एक रोग. [सं. केतकी]
केवडी स्त्री. केतकी. पहा : केवडा
केवड्याचा खाप   सुस्वरूप चेहऱ्यासाठी ही उपमा वापरतात.
केवढातरी क्रिवि. फार; अतिशय.
केवढाला वि. किती; कितीतरी.
केवढासा वि. केवढा.
केवढ्याचा वि. किती किमतीचा; कितव्याचा; कितव्याने. पहा : कितकावा
केवढ्यानदा क्रिवि. केवढ्या मोठ्या आवाजाने.
केव्हढ्यानदा क्रिवि. केवढ्या मोठ्या आवाजाने.
केवढ्यांदा क्रिवि. केवढ्या मोठ्या आवाजाने.
केवढ्यांनी क्रिवि. केवढ्या मोठ्या आवाजाने.
केवण स्त्री. मुरुडशेंगेचे झाड. साधारणपणे हे पुरुषभर उंच असते. याची पाने मोठी नसतात. शेंगा मुरड घातल्याप्रमाणे असतात. झाडाच्या सालीची दोरखंडे करतात. हे औषधी आहे.
केवणे न. १. कापडाचा गठ्ठा बांधण्याची दोरी (रेशमी अगर सुती). पहा : केणे २. साठा; संग्रह; संचय; पुंजी. पहा : केवा
केवन्या स्त्री. न्यून; उखाळ्यापाखाळ्या. (कु. गो.)
केवन्यो स्त्री. न्यून; उखाळ्यापाखाळ्या. (कु. गो.)
केवल वि. १. शुद्ध; स्वच्छ; मिश्रण नसलेले : ‘जेथ परमानंदु केवल । महासुखाचा ॥’ - राज्ञा १. १४. २. ज्याला दुसऱ्या कोणाचेही साहाय्य नाही असा; एकटा; फक्त; मात्र. ३. निव्वळ; नुसता; शुद्ध.

शब्द समानार्थी व्याख्या
केवल क्रिवि. १. बरोबर रीतीने; नियमित रीतीने; नियमाने; निश्चितपणे. २. अगदी; हुबेहूब; सादृश्यामुळे तद्रूप दिसणारे. ३. बिलकूल; मुळीच : ‘दक्षिणेत केवळ असामी नाहीं दुसरा ।’ - ऐपो २३६. [सं.]
केवल वि. निश्चळ; अकर्ता : ‘तो पुरुष स्वतंत्र असून निसर्गतः केवळ म्हणजे अकर्ता आहे.’ - गीर १६२. [सं.]
केवळ वि. १. शुद्ध; स्वच्छ; मिश्रण नसलेले : ‘जेथ परमानंदु केवल । महासुखाचा ॥’ - राज्ञा १. १४. २. ज्याला दुसऱ्या कोणाचेही साहाय्य नाही असा; एकटा; फक्त; मात्र. ३. निव्वळ; नुसता; शुद्ध.
केवळ क्रिवि. १. बरोबर रीतीने; नियमित रीतीने; नियमाने; निश्चितपणे. २. अगदी; हुबेहूब; सादृश्यामुळे तद्रूप दिसणारे. ३. बिलकूल; मुळीच : ‘दक्षिणेत केवळ असामी नाहीं दुसरा ।’ - ऐपो २३६. [सं.]
केवळ वि. निश्चळ; अकर्ता : ‘तो पुरुष स्वतंत्र असून निसर्गतः केवळ म्हणजे अकर्ता आहे.’ - गीर १६२. [सं.]
केवल अपलक्ष्यांक   (शाप.) साधनांच्या कमतरतेमुळे किंवा मानवी मर्यादांमुळे राहणारी चूक.
केवल उष्णमान न. मूल शून्यांशापासूनची उष्णतेची तीव्रता. [सं.]
केवल एकक   (शाप.) विद्युत चुंबकीय सी.जी.एस. पद्धतीचा घटक असलेले मोजमापाचे एकक. युनिट.
केवल गणनसिद्धांतदोष   (तत्त्व.) केवळ एकाच प्रकारची अनेक उदाहरणे एकत्र करून काढलेला सामान्यवाची निष्कर्ष. अशा तऱ्हेने सामान्यवाची निष्कर्ष काढणे सदोष आहे असे मानले जाते. [सं.]
केवल त्वरण   (भौतिक) एखाद्या स्थिर बिंदूच्या संदर्भात दुसऱ्या वस्तूचे त्वरण.
केवलध्वनी पु. (प्रचलित भाषेतील अक्षराच्या उच्चाराचा) मूलध्वनी.
केवलपरिमाण केवलमहत्ता न. (ज्यो.) एखाद्या ताऱ्याचे, तो पृथ्वीपासून ३२·६ प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर असतानाचे आकारमान.
केवलप्रयोगी वि. (व्या.) उद्गारवाचक (अव्यय). जी वापरली असताना त्यावरून वक्त्याने अथवा सांगणाराचे हर्षशोकादी जे मानसिक विकार अथवा उद्गार यांचा बोध होतो. या शब्दांचा वाक्यातील इतर शब्दांशी व्याकरणदृष्ट्या संबंध नसतो. उदा. अरेच्या!; अरेरे; अबब इ. [सं.]
केवलमूल्य न. (ग.) संख्येची चिन्हनिरपेक्ष किंमत.
केवल रेषा स्त्री. (भूमिती) दोन बिंदूंनी मर्यादित एकमितीय (रुंदी नसलेली फक्त लांबी असलेली) आकृती. ही काल्पनिक किंवा आदर्श रेषा आहे.
केवलवनी वि. केवळ म्हणजे शुद्ध वाणाचा, एकनिष्ठ, सच्चा : ‘येथें वजिरे आजम केवलवनी’ - ऐलेपाम्यु १९६.
केवलवाणा वि. दीन; ज्यांच्याबद्दल कीव, दया उत्पन्न होईल असा; बापुडा; विव्हळणारा (स्वर, मुद्रा इ.): ‘बघुं नको मजकडे केविलवाणा’ - एकच प्याला. [सं. कृपालु]
केविलवाणा वि. दीन; ज्यांच्याबद्दल कीव, दया उत्पन्न होईल असा; बापुडा; विव्हळणारा (स्वर, मुद्रा इ.): ‘बघुं नको मजकडे केविलवाणा’ - एकच प्याला. [सं. कृपालु]
केवुलवाणा वि. दीन; ज्यांच्याबद्दल कीव, दया उत्पन्न होईल असा; बापुडा; विव्हळणारा (स्वर, मुद्रा इ.): ‘बघुं नको मजकडे केविलवाणा’ - एकच प्याला. [सं. कृपालु]
केवलवाणी वि. दीन; ज्यांच्याबद्दल कीव, दया उत्पन्न होईल असा; बापुडा; विव्हळणारा (स्वर, मुद्रा इ.): ‘बघुं नको मजकडे केविलवाणा’ - एकच प्याला. [सं. कृपालु]
केविलवाणी वि. दीन; ज्यांच्याबद्दल कीव, दया उत्पन्न होईल असा; बापुडा; विव्हळणारा (स्वर, मुद्रा इ.): ‘बघुं नको मजकडे केविलवाणा’ - एकच प्याला. [सं. कृपालु]
केवुलवाणी वि. दीन; ज्यांच्याबद्दल कीव, दया उत्पन्न होईल असा; बापुडा; विव्हळणारा (स्वर, मुद्रा इ.): ‘बघुं नको मजकडे केविलवाणा’ - एकच प्याला. [सं. कृपालु]
केवलवेदन न. (मानस.) यालाच शुद्धवेदन असे म्हणतात. यात वेदन होते. पण अर्थाची जाणीव अभिप्रेत नसते.
केवलव्यतिरेकी वि. (न्याय) केवळ नास्तिपक्षाने संबद्ध असलेला; अभावाचा संबंध असणारा. पहा : अन्वयव्याप्ति [सं.]
केवलशब्द पु. (भाषा.) एकच घटकावयव असलेला शब्द.

शब्द समानार्थी व्याख्या
केवलसत्तावाद पु. ब्रह्मवाद.
केवलसाक्षी वि. (तत्त्व.) फक्त, नुसते पाहणारा (ईश्वर); शुद्ध साक्षी; निःशेषतः अलिप्त असलेला.
केवला पु. (गवंडी) भिंतीचा पुढील अगर मागील भाग, टोक; चांदईचा शेवट. (बे.)
केवला वि. एक ही संख्या (इसम, रुपया इ.). (नंद भाषा)
केवलान्वयी अनुमान (तत्त्व.) ज्या अनुमानातील साध्य सर्वव्यापी असल्यामुळे जेथे साध्य नाही असे ठिकाणच (विपक्ष) उपलब्ध नसते त्यास ‘केवलान्वयी’ अनुमान असे म्हणतात.
केवलेश्वरवादी वि. फक्त ईश्वराचे अस्तित्व मानून धर्म हा ईश्वरप्रणीत आहे हे मत न मानणारा.
केवल्यो बावल्यो स्त्री. चेष्टा; टिवल्याबावल्या. (कु.)
केवशीन क्रिवि. कोठून. (गो.)
केवळ   पहा : केवल
केवा पु. १. साठा; संग्रह; पुंजी; डबोले. २. रोख रक्कम; रोकड. (नंदभाषा कर.) [सं. क्री - क्रय]
केवा पु. महत्त्व; सामर्थ्य; प्रौढी; पाड (निषेधार्थी प्रयोग.). पहा : किंमत : ‘संतभजनी माझा सद्‌भावो । केवा कोण पाहा भक्तीचा ।’ - एभा ११·१५५३. [क. केव]
केवालु स्त्री. बारीक रेती : ‘रत्नकुटाचि केवालु मौआल’ - वह १७७.
केवि क्रिवि. कसे; कोणत्या रीतीने; कशासारखे; कोणत्या प्रकाराने : ‘तो केवि मार्गी इथें । क्षेमी होए ।’ - ऋ ७. [सं. कथम्]
केवी क्रिवि. कसे; कोणत्या रीतीने; कशासारखे; कोणत्या प्रकाराने : ‘तो केवि मार्गी इथें । क्षेमी होए ।’ - ऋ ७. [सं. कथम्]
केवी   पहा : केवा १, २ (को. गो.)
केवी पु. उपऱ्या शेतकरी; परगावचे कूळ.
केवूं क्रिवि. कसा; कशी. पहा : केवी : ‘प्राणेश्वरा त्यजूनी केवूं । वाचूं म्हणतसे ते नारी ।’ - गुच ३०·९०.
केव्हडा   पहा : केवढा
केव्हळा   प्रश्नार्थक अव्यय. केव्हा? केव्हाही; कधीही : ‘वाटा केव्हळी न वचति । क्रोधाचिये ।’ - ज्ञा ४·५९.
केव्हळि   प्रश्नार्थक अव्यय. केव्हा? केव्हाही; कधीही : ‘वाटा केव्हळी न वचति । क्रोधाचिये ।’ - ज्ञा ४·५९.
केव्हा क्रिवि. १. (प्रश्नार्थक) कोणत्या वेळी, कोणत्या प्रसंगी, समयाला. २. (जोराने उच्चारला असता) कोणत्याही वेळी; कधीही (निषेधार्थी प्रयोग.) ३. केव्हा केव्हा. ४. किती काल झाला असताना. केव्हा व कधी याच्यामध्ये भेद आहे. केव्हा याने नुकत्याच होऊन गेलेल्या काळाचा बोध होतो व कधी याने बऱ्याच पूर्वीच्या काळाचा बोध होतो.
केव्हा कधी केव्हाकेव्हा क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.
केव्हाकेव्हाना क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.
केव्हा नाही केव्हा क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.
केव्हातरी क्रिवि. कधीकधी; मधूनमधून; वेळेनुसार.

शब्द समानार्थी व्याख्या
केव्हाच क्रिवि. १. अगदी त्याच क्षणी; लगेच (मागल्या काळाबद्दल, गत कृत्याकडे संबंध.) २. कधीच नाही या अर्थी उपयोग.
केव्हाचा वि. १. पुष्कळ काळपर्यंत; किती वेळचा (गेलेल्या, असलेल्या, बसलेल्या, वाट पाहणाऱ्या माणसाबद्दल योजतात.) २. (प्रश्नवाचक) केव्हापासून.
केव्हाना क्रिवि. अचानक; कल्पना नसताना : ‘मग एके दिवशी ती (म्हातारी) केव्हाना मरून गेली.’ - घरदार ८०.
केव्हापासून क्रिवि. १. (प्रश्नवाचक) किती वेळापासून. २. बऱ्याच वेळापासून.
केव्हाशीक क्रि. वि. १. केव्हाही (निषेधार्थी). २. केव्हाच. (कु.)
केव्हासक क्रि. वि. १. केव्हाही (निषेधार्थी). २. केव्हाच. (कु.)
केव्हासाक क्रि. वि. १. केव्हाही (निषेधार्थी). २. केव्हाच. (कु.)
केव्हासा क्रिवि. कोणत्या वेळेच्या सुमाराला. (व.)
केव्हेळी क्रिवि. केव्हातरी.
केश पु. केस; रोम; लव. [सं.] (वा.) केश काढणे - श्मश्रू करणे (विशेषतः विधवा स्त्रीची). केश देणे - विधवेने केशवपनास मान्यता देणे. पहा : गळा
केशकलाप पु. भरपूर केस. दाट सुंदर केस.
केशट्यो पु. झिपऱ्या (लघुत्वदर्शक). (गो.)
केशपाश पु. केसांच्या जटा; बांधलेले केस; पुष्कळ केस. [सं.]
केशजाल पु. केसांच्या जटा; बांधलेले केस; पुष्कळ केस. [सं.]
केशबंध पु. (नृत्य) (संयुक्त हस्त) पताकहस्त करून ठेवणे. [सं.]
केशभूषा स्त्री. केसांची वेगवेगळ्या प्रकारे रचना, सजावट करणे. केसांची शोभिवंत बांधणी करणे. [सं.]
केशर न. १. जाफरा, काश्मीर या भागात होणारे एक तंतुमय, सुगंधी, खाद्य पदार्थात वापरण्याचे द्रव्य. २. एक झाड. याचा रंगासाठी उपयोग करतात. पहा : कपिला [सं.]
केशरा पु. मरेन किंवा मारीन या पूर्वनिश्चयाचे चिन्ह म्हणून लढाऊ शिपाई जो केशरी रंगाचा पोशाख अंगावर घालत असत तो. विशेषतः रजपूत योद्धे केशरा घालीत. (क्रि. करणे, घेणे.) [सं. केशर]
केशरी वि. १. केशरासंबंधी; केशरयुक्त; केशरी रंगाने रंगवलेले; (केशरी बर्फी, केशरी पातळ इ.) केशरी वस्त्र परिधान केलेले २. केशरी पोशाख करून जिवावर उदार झालेला (योद्धा). (वा.) केशरी करणे - जोहार करणे. पूर्वी रजपुतात अखेरच्या संग्रामाकरिता निघायच्या वेळी स्त्रियांना अग्नीत लोटून, केशरी पोषाख करून बाहेर पडत यावरून : ‘त्यानें आपल्या बायकांची केशरी करून तानाजीशी लढण्यास आला.’ - मातीर्थ ४·४६१. केशरी वागे करणे - केशरी पोषाख करणे. हा पोषाख निर्वाणीच्या हल्ल्याच्या वेळी केला जात असे. केशरी पोषाख केल्यानंतर रजपूर वीर रणांगणातून परत फिरत नसत : ‘एक दिवस रजपुतांनी केशरी वागे करून लढाईचा प्रसंग घातला.’ - पेद १२·५.
केशरी स्त्री. १. केशराची उटी. २. केशरमिश्रित पक्वान्न, पदार्थ (केशरी भात, मिठाई इ.). ३. एक फुलझाड.
केशरी पु. सिंह. पहा : केसरी
केशऱ्या वि. रेषा असलेला (आंबा).
केशवकरणी स्त्री. पद्यातील एका जातिवृत्ताचे नाव. रामजोशाच्या ‘केशवकरणी अद्‌भुतलीला नारायण तो कसा । तयाचा सकल जनांवर ठसा ।’ या काव्यावरून हे नाव पडले. याच्या पहिल्या चरणात २७ व दुसऱ्या चरणात १६ मात्रा असतात. केव्हा केव्हा २१ मात्रांचा अंतरा असतो.
केशवपन न. केसांची श्मश्रू करणे; केस काढणे; हजामत (विशेषतः विधवांच्या बाबतीत योजतात.) : ‘विधवांनी केशवपन केलें नाहीं तर त्यानें या राजकीय प्रश्नाचा उलगडा होण्यास यत्किंचितही मदत होण्याचा संभव नाही.’ - लोटिकेले ४·१८६. [सं.]
केशवमाधव पु. १. विष्णूच्या चोवीस नावांपैकी पहिले व तिसरे नाव; कृष्णाची नावे. २. (ल.) बुरसलेल्या पदार्थातील बारीक किडे; अशुद्ध पाण्यातील किडे.

शब्द समानार्थी व्याख्या
केशवाहिनी स्त्री. (प्राणि.) केसासारखी सूक्ष्म नलिका. [सं.]
केशवीचुरा पु. केस विंचरणारा; शृंगार करणारा : ‘प्रदेष्टाः केशवीचुराः हातसाहाना’ - पंचो ८३·६.
केशसंवाहन न. केस धुऊनपुसून साफ करणे. [सं.]
केशाकर्षण न. (शाप.) अत्यंत बारीक छिद्राच्या नळीतून द्रव पदार्थांचे होणारे आकर्षण. [सं.]
केशाकार वाहिनी   (वै.) अगदी केसासारखी बारीक रक्तवाहिनी. स्नायु आणि ऊतींमध्ये रक्त व प्राणवायू यांचा पुरवठा करण्याचे कार्य या वाहिन्या करतात.
केशाकेशी   पहा : केशधरणी : ‘तुम्हीं ही शब्दांची केशाकेशी चालविली आहे.’ - नाकु २०३.
केशांत पु. घोड्याच्या कपाळावरचा भाग. - अश्वप १·६१.
केशिका वि. केसासारखी, अगदी बारीक (वेज) असलेली नळी; केसासारखी सूक्ष्म नळी (विशेषतः रक्तवाहिनी). [सं.]
केस   पहा : केश. (वा.) केस काढणे - श्मश्रू करणे; दाढी-मिशा काढणे. केस नखलणे - केसातून नखे (बोटे) फिरवून (फणीप्रमाणे) केंस व्यवस्थित करणे; जटा काढणे : ‘वेणी विंचरली केस नखलुन । अलंकार चढविले हिऱ्याचे कळस काप कुंचलुन ।’ - प्रला २२०. केसांच्या अंबाड्या होणे - केस पांढरे होणे; वृद्धावस्था येणे. केसात माती घालणे - अतिशय दुःख होणे. केसाने गळा कापणे - विश्वासघात करणे; गोडगोड बोलून फसवणे : ‘चांडाळांनों, हरामखोरांनो दगा करून आमचा सर्वांचा केसाने गळा कापलात ।’ - कांचनगड. केसाने चरण झाडणे - सेवा करण्याचा कळस करणे; अगदी हलकी सेवा करणे : ‘पाहिन क्षणभरी । चरण झाडीन केशीं ।’ - धावा, नवनीत पृ. ४४९. केसाला टका, धक्का लागू न देणे, न लावणे - उत्तम प्रकारे संरक्षण करणे; उपद्रव होऊ न देणे : ‘तुझिया टका न लागो साधुपिपीलिकचमूगुडा केशा ।’ - मोकर्ण ५०·३. केसालाही धक्का न लागणे, केस वाकडा न होणे. - जरासुद्धा नुकसान किंवा दुखापत न होणे.
केस स्त्री. १. रुग्ण, आजारी मनुष्य. २. मृत्यू; विशिष्ट रोगाने आलेले मरण. [इं.]
केस स्त्री. (कायदा) ज्याची चौकशी चालू आहे असे प्रकरण किंवा घटना. कज्जा; खटला (वा.) केस फाईल करणे - एखाद्या गोष्टीची चौकशी थांबवणे.
केसउ पु. पळस; वृक्षविशेष : ‘जैसा केसउ फुलला । तैसा अशुद्धें वोहळला ।’ - उह ६३१.
केसक न. किंशुक; पळसाचे फूल : ‘करतळें रंगें कालौनि केसके । रांविती सुगंधें उदकें ।’ - नरुस्व ८४५. [सं. किंशुक]
केसकरीण स्त्री. सकेशा विधवा.
केसटी स्त्री. १. घाणेरड्या, विसकटलेल्या केसांच्या झिपऱ्या. २. (तिरस्कारार्थी प्रयोग) केस. पहा : केशट्यो
केसटोपी स्त्री. ज्याच्यावर केस (फर) आहेत अशी चामड्याची टोपी.
केसणा क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसणी क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसना क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसनी क्रिवि. किती; केवढा; कसा; कशाप्रकारचा : ‘परमाणुची केसनी थोरीं ।’ - दाव २८८; ‘विरडियां पाड तो केसणा । तूं देखणा निजदृष्टी ।’ - एरुस्व १६·७५.
केसतूड   पहा : केसतोडा : ‘केसतूड होऊन मांडी विलक्षण ठसठसत रहावी तशी ती केंसानं गळा कापणारी बातमी.’ - उअ २१.
केसतोड पु. केस उपटला गेल्यामुळे होणारा फोड.
केसतोडा पु. केस उपटला गेल्यामुळे होणारा फोड.
केसधरणी स्त्री. केसांची झोंबाझोंबी : ‘तेथ जाली केशधरणी’ - शिव १०४५.
केसन अ. केवढे : ‘तीयेचे फळ मोक्षासमानः ते शक्ति केसंनी’ - मूप्र ६९२.

शब्द समानार्थी व्याख्या
केसपट न. केर; बारीक कण. पहा : कसपट
केसपिक्या वि. म्हातारा : ‘हा केसपिक्या सयाजीरावांचा वडील भाऊ.’ - विवि ८·२·३०.
केसपुळी स्त्री. करट (गो.)
केसभर क्रिवि. थोडेसुद्धा : ‘मग एवढी जड पारडी उचललीं असतां खांदा केसभरहि इकडे की तिकडे कलत नाहीं.’ - नि.
केसर न. केशर.
केसर पु. १. फुलातील तंतू; पराग : ‘कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबेल केसर । इया शंका ।’ - ज्ञा १३·२४८. २. आंब्याच्या कोयीला असणाऱ्या शिरा.
केसर न. १. भाताचे लोंगर, कणीस, लोंबी. २. मंजिरी, मोहोर (तुळस, आंबा इत्यादीचा)
केसर न. कसपट; केर; बारीक कण; केसपट.
केसर न. सिंहाची, घोड्याची आयाळ. - अश्वप १·६२.
केसरकी स्त्री. पुढील सालच्या पिकाकरिता नांगरून ठेवलेली जमीन. [सं. कृषि]
केसरणे अक्रि. मोहोर येणे.
केसरबोंडी स्त्री. न. केसर; एक प्रकारचे झाड. याच्या बोंडात केशरी रंगाचा गर व बिया असतात.
केसरी बोंड स्त्री. न. केसर; एक प्रकारचे झाड. याच्या बोंडात केशरी रंगाचा गर व बिया असतात.
केसरी बोंडी स्त्री. न. केसर; एक प्रकारचे झाड. याच्या बोंडात केशरी रंगाचा गर व बिया असतात.
केसरमंडल न. (वन.) परागकण बनवणाऱ्या एक किंवा अनेक अवयवांचा (केसरदलांचा) संच.
केसरहीन वि. (वन.) केसरदले नसलेले (फूल). उदा. पोपईची स्त्रीपुष्पे, सूर्यफुलाची किरणपुष्पके.
केसरिया   पहा : केशरा
केसरी स्त्री. १. पाचेचे झाड व त्याचे फूल. २. भाताचे लोंगर, घोस.
केसरी पु. सिंह.
केसरी वि. १. केशरी वस्त्रांनी आच्छादलेले; केशरी रंगाचा पोशाख घातलेला. पहा : केशरी, केशरा. २. रेषा असलेला (आंबा.).
केसऱ्या वि. १. केशरी वस्त्रांनी आच्छादलेले; केशरी रंगाचा पोशाख घातलेला. पहा : केशरी, केशरा. २. रेषा असलेला (आंबा.).
केसरी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.
केसारी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.
केसळी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.
केसाळी स्त्री. १. दृष्ट लागू नये म्हणून (अस्वलाच्या) केसांची केलेली दोरी. ही जनावरांच्या गळ्यात बांधतात. २. केसांची दोरी.

शब्द समानार्थी व्याख्या
केसरी डाळ   एक प्रकारचे केशरी रंगाचे द्विदल धान्य : ‘मध्य प्रदेशात ‘केसरी डाळ’ किंवा ‘लाखी डाळ’ खाण्याचा प्रघात असून-’ आआआ ४७.
केसारीण स्त्री. केसांच्या दोरीचा गळफास लावून माणसाला मारणारी स्त्री.
केसारीण   (अशा स्त्रिया असतात अशी दंतकथा आहे.)
केसाळ वि. अंगावर पुष्कळ केस असलेला.
केसाळा वि. अंगावर पुष्कळ केस असलेला.
केसाळू वि. अंगावर पुष्कळ केस असलेला.
केसाळी स्त्री. आगवळ; वेणी घालताना वेणीच्या टोकाला बांधतात ती. लहान दोरी पहा : केसरी, केसाळी
केसोळी स्त्री. आगवळ; वेणी घालताना वेणीच्या टोकाला बांधतात ती. लहान दोरी पहा : केसरी, केसाळी
केसाळीण स्त्री. सकेशा विधवा स्त्री. (तंजा.)
केसीन न. दुधातील एक प्रथीन. [इं.]
केसुरडी   पहा : केसटी
केसू न. पळसाचे फूल: ‘डोइये केसूवाची माळ बांधिली’ - नरुस्व २५२४.
केसोमासी क्रिवि. संपूर्णत; अंगप्रत्यंग. (व.)
केस्तांव न. भांडणतंटा. (गो.)
केहरवा पु. १. केरवा. पहा : कारवा. २. (ताल) याला चार मात्रा व दोन विभाग असतात.
केही क्रिवि. कोठे : ‘दुरी केंही न वचावें ।’ - ज्ञा ३·८९. [सं. क्व + हि]
केहेठी क्रिवि. कोठून : ‘तुम्ही केहेठीं आलेत?’ - लोक २·६१. (चि. राजा.)
केळ स्त्री. १. केळीचे झाड. हे पुष्कळ दिवस टिकणारे, कंदरूप आहे. ह्याला मोठी पाने येतात. ह्याच्या अनेक जाती आहेत. २. केळीचे फळ. ३. ब्राह्मणी पागोट्यावरील कपाळपट्टीवरचा भाग, बिनी. ४. स्त्रिया लुगड्याच्या निऱ्या पोटाजवळ खोवताना केळ्याच्या आकाराचा भाग करतात तो. [सं. कदली ] (वा.) केळे खाणे - साखर खाणे - (ल.) खोटे बोलणे, मूर्खासारखी बडबड करणे (वगैरेला औपरोधिक शब्द.)
केळ पु. पिंपळाच्या जातीचे एक झाड. (गो.)
केळ स्त्री. धातूचा किंवा मातीचा घडा; कळशी : ‘धट्ट्याकट्ट्या बाया डोक्यावर केळा घेऊन झऱ्याला पाण्याला निघालेल्या...’ - हपा १४.
केळी स्त्री. धातूचा किंवा मातीचा घडा; कळशी : ‘धट्ट्याकट्ट्या बाया डोक्यावर केळा घेऊन झऱ्याला पाण्याला निघालेल्या...’ - हपा १४.
केळखंड न. न भरणारे केळे; वांझ केळे. याची भाजी करतात.
केळचे क्रि. थट्टा करणे. (गो.)
केळडे   पहा : केलडे : ‘वाघ पडला बावी केळडे गांड दावी.’ - लोक २·७३.
केळफूल न. केळीच्या कोक्यापासून निघालेले फूल. हे कडू, तुरट, अग्निदीपक, उष्ण, वीर्य व कफनाशक आहे. याची भाजी करतात.

शब्द समानार्थी व्याख्या
केळफूल बोंड न. केळीच्या कोक्यापासून निघालेले फूल. हे कडू, तुरट, अग्निदीपक, उष्ण, वीर्य व कफनाशक आहे. याची भाजी करतात.
केळफूल कमळ न. केळीच्या कोक्यापासून निघालेले फूल. हे कडू, तुरट, अग्निदीपक, उष्ण, वीर्य व कफनाशक आहे. याची भाजी करतात.
केळबंड स्त्री. केळ्यांचा लोंगर.
केळबंडी स्त्री. केळ्यांचा लोंगर.
केळवण   : पहा गडगनेर : ‘लोणवाण केळवाण मूळ न्हाणेयाची आइति करीति ।’ - दृपा ७४. [त. केळवन्]
केळवाण   : पहा गडगनेर : ‘लोणवाण केळवाण मूळ न्हाणेयाची आइति करीति ।’ - दृपा ७४. [त. केळवन्]
केळवण न. काळजी; काळजीपूर्वक सांभाळणे. [राजा.]
केळवणी स्त्री. प्रियकरीण.
केळवणे   १. केळवण करणे; गडगनेर करणे : ‘कन्या नेली निज मंडपासी । हृषीकेशी केळवला ।’ - एरुस्व १४·५१; ‘केळावला वर असे शिशुपाळ राजा ।’ - अक कृष्णकौतुक ३०. २. वाङ्‌निश्चय करणे.
केळवणे अक्रि. (ल.) सजणे; नटणे; शोभिवंत दिसणे; मिरवणे : ‘भीमाकरी जे केळवली । गदा नोवरी सगुणाथिली ।’ - मुसभा १५·११२.
केळावणे   १. केळवण करणे; गडगनेर करणे : ‘कन्या नेली निज मंडपासी । हृषीकेशी केळवला ।’ - एरुस्व १४·५१; ‘केळावला वर असे शिशुपाळ राजा ।’ - अक कृष्णकौतुक ३०. २. वाङ्‌निश्चय करणे.
केळावणे अक्रि. (ल.) सजणे; नटणे; शोभिवंत दिसणे; मिरवणे : ‘भीमाकरी जे केळवली । गदा नोवरी सगुणाथिली ।’ - मुसभा १५·११२.
केळवणे   फसला जाणे.
केळवत्तर निरी   परवंट्याची सर्वात वरची निरी : ‘केळवत्तर निरी झळकैली ।’ - शिव ४२.
केळवली स्त्री. पिकलेल्या केळ्यांपासून तयार करण्यात येणारे एक पक्वान्न.
केळवली वि. स्त्री. १. केळवलेली, केळवण झालेली नवरी : ‘नातरी केळवली नोवरी ।’ - ज्ञा १३·५५२. २. (ल.) सुखी स्त्री.
केळावली वि. स्त्री. १. केळवलेली, केळवण झालेली नवरी : ‘नातरी केळवली नोवरी ।’ - ज्ञा १३·५५२. २. (ल.) सुखी स्त्री.
केळवंड स्त्री. केळ्यांचा घड, लोंगर; त्यांच्या देठांचा झुबका : ‘बारा महिने नेहमी केळवंडी पिकत.’ - पाव्ह ११.
केळवंडी स्त्री. केळ्यांचा घड, लोंगर; त्यांच्या देठांचा झुबका : ‘बारा महिने नेहमी केळवंडी पिकत.’ - पाव्ह ११.
केळावली स्त्री. केळ्यांचा घड, लोंगर; त्यांच्या देठांचा झुबका : ‘बारा महिने नेहमी केळवंडी पिकत.’ - पाव्ह ११.
केळवा   पहा : केळंबा, केळंभा (को.)
केळवाण   पहा : केळवण. शुभ समारंभाच्या आधीची जेवणावळ : ‘लोणवाण केळवाण मूळ न्हाणेयाची आईती करीति :’ - दृपा ७४.
केळंबा पु. १. केळीचे पोर; पासंबा; नवीन फुटलेला कोंब; केळीचे रोप. (क्रि. फुटणे.) २. रानकेळीचा पोगा; पोगाडा; काल.
केळंभा पु. १. केळीचे पोर; पासंबा; नवीन फुटलेला कोंब; केळीचे रोप. (क्रि. फुटणे.) २. रानकेळीचा पोगा; पोगाडा; काल.
केळा पु. १. कऱ्हा; मडके; मातीची घागर [सं. कलश], २. बंदुकीची दारू ठेवण्याची पिशवी.

शब्द समानार्थी व्याख्या
केळांबा पु. १. आंब्याची एक जात. या झाडाला केळीच्या फळासारखे लांबट फळ येते. २. या झाडाचे फळ.
केळ्या आंबा पु. १. आंब्याची एक जात. या झाडाला केळीच्या फळासारखे लांबट फळ येते. २. या झाडाचे फळ.
केळी स्त्री. १. जोंधळ्याची-ज्वारीची एक जात. २. केळीचे झाड. पहा : केळ
केळीकदंब स्त्री. कदंबाची एक जात.
केळीक्रीडा स्त्री. १. परमेश्वरावताराने जड वस्तूशी केलेली क्रीडा : ‘या श्री प्रभूचीया केळीक्रीडा’ - लीचपू १६६. २. शृंगारक्रीडा : ‘श्रीकृष्णचक्रवर्ति केळीक्रीडा करीति’ - श्रीकृष्णच २८.
केळीचा कांदा   केळीचा गड्डा. हा वातनाशक व स्त्रियांच्या प्रदर रोगावर औषधी आहे.
केळे न. अर्धवट पिकलेली, गाभुळलेली चिंच. (कु.)
केळ्याचा हलवा   राजोळी केळ्यांपासून तयार केलेला एक गोड पदार्थ.
केंकरे न. फावडे; खोरे; केगरे. (राजा.)
केंकावणे   पहा : केकटणे : ‘(कुत्रा) दुःखाने शब्द करतो त्यास केंकावणे म्हणतात.’ - मराठी ३ रे पु (१८७३) पृ. १२१. [ध्व.]
केंजणे अक्रि. विनवणे; ‘हां जी हां जी करणे.’ - (तंजा.)
केंजळ   पहा : किंजळ १.
केंड न. हरिकातील फोल; धान्यावरील आवरण.
केंड पु. १. निकृष्ट माशाची एक जात. हा मासा वाटोळा असतो. २. जळालेल्या गवऱ्यांचा ढीग. ३. ज्वाळा. (गो.) [क. केंड = जळता निखारा.], ४. कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज.
केंडणी स्त्री. अवहेलना.
केंडणे उक्रि. १. अडवणे; रोधणे; अडथळा करणे. २. (सर्व अर्थी) कोंडणे. उदा. अडवून ठेवणे, बांधून टाकणे, खिळून ठेवणे. ३. खुंटणे; बरोबर वाढ न होणे. (व.) [क. केडिसु, केडु], ४. दोषारोप ठेवणे; दूषण देणे; तुच्छ लेखणे; टोचून बोलणे : ‘कोणाही केंडावें हा आम्हां अधर्म ।’ - तुगा ४२४५. ५. धुडकावून देणे; हिडीसफिडीस करणे; अव्हेर करणे; लाथाडणे : ‘जरि केंडिला तरी हिरा स्तविलाचि शिरीं चढे न शिरगोळा ।’ - मोआदि २७·४४.
केंडशी स्त्री. बुरा; बुरशी.
केंडावणे अक्रि. वेडावणे; खट्टू करणे.
केंडूस वि. बुरसलेले; केंडशी आलेले.
केंडूसणे अक्रि. बुरसणे.
केंदरावणे अक्रि. वेडावणे. (कु.)
केंदाळ न. पाण्यात वाढणारी एक वनस्पती; एक प्रकारचे गवत. (कर.)
केंद्र न. (शाप.) १. दीर्घवर्तुळातील ज्या दोन बिंदूंपासून परीघावरील कोणत्याही बिंदूंपर्यंत अंतरांची बेरीज सारखी येते अशा बिंदूंपैकी प्रत्येक. २. वर्तुळाचा मध्यबिंदू; ३. नाभी. ४. (ज्यो.) ग्रहाच्या कक्षेच्या प्रथमबिंदूपासून त्याचे चवथ्या, सातव्या अथवा दहाव्या अंशापर्यंतचे अंतर. ५. समीकरणविषय. ६. मध्यवर्ती महत्त्वाचा भाग. ७. भारतीय घटनेनुसार सर्व भारताचे मिळून असणारे एक मध्यवर्ती सरकार. [सं.]
केंद्रक न. केंद्रस्थान; कोणत्याही वस्तूचा मध्यभाग; विशेषतः अणूचे केंद्रस्थान; अणुगर्भ. [सं.]
केंद्रक द्रव्य   पेशींच्या केंद्रामध्ये असलेले एकजातीय पेशीद्रव्य. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
केंद्रकील पु. हलणाऱ्या भागाचा आस ज्यात बसवलेला असतो तो भाग.
केंद्रगामी वि. वेगवेगळ्या ठिकाणांहून एका बिंदूकडे येणारा. [सं.]
केंद्रच्युति स्त्री. (ज्यो.) केंद्रापासूनचे अंतर; दीर्घवर्तुळाच्या मध्यापासून एका केंद्राच्या अंतराला बृहदक्षाच्या अर्ध्याने भागले असता येणारे गुणोत्तर. [सं.]
केंद्रच्युती स्त्री. (ज्यो.) केंद्रापासूनचे अंतर; दीर्घवर्तुळाच्या मध्यापासून एका केंद्राच्या अंतराला बृहदक्षाच्या अर्ध्याने भागले असता येणारे गुणोत्तर. [सं.]
केंद्रबिंदू पु. १. मध्यबिंदू. २. ज्या ठिकाणी उद्योगधंदे, व्यापार, संस्कृती, शिक्षण इ. गोष्टी प्रामुख्याने एकवटल्या आहेत असे ठिकाण : ‘मुंबई शहर हे उद्योगधंद्यांचा केंद्रबिंदू आहे.’ - खाअ ९१. [सं.]
केंद्रयोजन न. (स्था.) सिमेंट काँक्रिटची घरे बांधताना खांब, तुळया व जमिनी यांसाठी तयार केलेले लाकडी साचे. [सं.]
केंद्रशासन न. (राज्य.) कोणत्याही स्वतंत्र देशातील राज्यशासन-व्यवस्थेमधील मध्यवर्ती सरकार; भारताच्या संघ राज्यात केंद्रस्थानी असलेले सरकार. अनेक राज्ये किंवा स्वायत्ता घटक असणाऱ्या देशातील विशेष अधिकार असलेली मध्यवर्ती शासनव्यवस्था.
केंद्रशासन सरकार न. (राज्य.) कोणत्याही स्वतंत्र देशातील राज्यशासन-व्यवस्थेमधील मध्यवर्ती सरकार; भारताच्या संघ राज्यात केंद्रस्थानी असलेले सरकार. अनेक राज्ये किंवा स्वायत्ता घटक असणाऱ्या देशातील विशेष अधिकार असलेली मध्यवर्ती शासनव्यवस्था.
केंद्रशासित वि. केंद्राच्या प्रत्यक्ष प्रशासनाखालील (प्रदेश); ज्याला स्वायत्त राज्याचा दर्जा नाही असा (प्रदेश) [सं.]
केंद्रावरण न. केंद्राभोवती असलेले आच्छादक द्रव्य.
केंद्रांकनी स्त्री. (यंत्र.) धातूवर अथवा लाकडावर बिंदूत्मक ठोका देण्यासाठी वापरात येणारा कठिणाग्र दांडा.
केंद्रित वि. केंद्राला मिळालेला; एकत्र आलेला. (वा.) केंद्रित करणे - (मन) स्थिर करणे. [सं.]
केंद्रीकरण न. १. एकाच मध्यवर्ती बिंदूकडे आकर्षिले जाणे. २. सर्व सत्ता एकाच ठिकाणी, एकाच व्यक्तीकडे येणे. एकवटणे. ३. एकीकरण; ऐक्य : ‘लोकमताचे केंद्रीकरण करण्याकरिता राष्ट्रीय सभा आहे.’ - लोटिकेले ३·९५. [सं.]
केंद्रीकरण भवन न. १. एकाच मध्यवर्ती बिंदूकडे आकर्षिले जाणे. २. सर्व सत्ता एकाच ठिकाणी, एकाच व्यक्तीकडे येणे. एकवटणे. ३. एकीकरण; ऐक्य : ‘लोकमताचे केंद्रीकरण करण्याकरिता राष्ट्रीय सभा आहे.’ - लोटिकेले ३·९५. [सं.]
केंद्रीकृत वाहतूक नियंत्रण   (यंत्र.) प्रत्येक चौकातील नियंत्रण एकमेकांशी संबंधित ठेवण्याची योजना.
केंद्रीभूत वि. एकाग्र; एकाच गोष्टींवर स्थिर झालेले : ‘त्याचे विचार माधव ज्यूलियनच्या काव्यावर केंद्रीभूत झाले.’ - ब्राह्मण ५६. [सं.]
केंद्रीय वि. केंद्र सरकारातला; मध्यवर्ती. [सं.]
केंद्रीय द्रव पु. केंद्रस्थानीचा प्रवाही पदार्थ.
केंद्रीय धमन्या   (वै.) सजीवांच्या शरीरात हृदयातून बाहेर पडून रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमन्या, रक्तवाहिन्या.
केंद्रीय बधिरण   (वै.) केंद्रस्थानातून झालेले संमोहन.
केंद्रीय वाचाघात   (वै.) मेंदूतील बोलण्याच्या केंद्रास धक्का बसल्याने बोलण्याची क्रिया थांबणे.
केंद्रोत्सारक वि. मध्यबिंदूपासून दूर जाणारे (किरण, शक्ती).
केंद्रोत्सारगति स्त्री. केंद्रापासून दूर जाणारी किंवा एखाद्या पदार्थाला दूर नेणारी गती. [सं.]
केंद्रोत्सारगती स्त्री. केंद्रापासून दूर जाणारी किंवा एखाद्या पदार्थाला दूर नेणारी गती. [सं.]
केंद्रोत्सारी वि. केंद्रापासून दूर जाणारा. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
केंधूळचा क्रिवि. बऱ्याच वेळापासूनचा : ‘केंधूळचा भात शिजून पडला.’ - जैत १६.
केंप वि. लाल (गो.). [क. केंपू = लाल रंग]
केंपू वि. लाल (गो.). [क. केंपू = लाल रंग]
केंबरे न. घुंघुरटे; चिलट. या एक जातीच्या माशा असून नेहमी डोळ्यांजवळ उडतात. त्यामुळे डोळे येतात. (को.)
केंबरी न. घुंघुरटे; चिलट. या एक जातीच्या माशा असून नेहमी डोळ्यांजवळ उडतात. त्यामुळे डोळे येतात. (को.)
केमरे न. घुंघुरटे; चिलट. या एक जातीच्या माशा असून नेहमी डोळ्यांजवळ उडतात. त्यामुळे डोळे येतात. (को.)
केमरी न. घुंघुरटे; चिलट. या एक जातीच्या माशा असून नेहमी डोळ्यांजवळ उडतात. त्यामुळे डोळे येतात. (को.)
केंबूर न. घुंघुरटे; चिलट. या एक जातीच्या माशा असून नेहमी डोळ्यांजवळ उडतात. त्यामुळे डोळे येतात. (को.)
केंमूर न. घुंघुरटे; चिलट. या एक जातीच्या माशा असून नेहमी डोळ्यांजवळ उडतात. त्यामुळे डोळे येतात. (को.)
केंबळ न. १. भिंतीवर अथवा छपरावर लोंबणारी, होणारी कोळिष्टके, जाळी (धूर, धुरळ्यापासून). २. बायकी शिवी. ३. (ल.) खोकड, अशक्त, म्हातारी बाई.
केमळ न. १. भिंतीवर अथवा छपरावर लोंबणारी, होणारी कोळिष्टके, जाळी (धूर, धुरळ्यापासून). २. बायकी शिवी. ३. (ल.) खोकड, अशक्त, म्हातारी बाई.
केंबळ पु. स्त्री. न. १. छपरावरचे जुने गवत; शाकार; नवीन शाकाराखाली केव्हा केव्हा हे घालतात. एका पावसानंतर कुजून निकामी होणारे घरावरील गवत किंवा पेंढा. २. उसाचा जुना पाला अगर खपलीचे जुने शाकार, काड. (माण.) ३. लाल रंगाचे गवत; तांबोळी; तांबेटी.
केंबळा पु. स्त्री. न. १. छपरावरचे जुने गवत; शाकार; नवीन शाकाराखाली केव्हा केव्हा हे घालतात. एका पावसानंतर कुजून निकामी होणारे घरावरील गवत किंवा पेंढा. २. उसाचा जुना पाला अगर खपलीचे जुने शाकार, काड. (माण.) ३. लाल रंगाचे गवत; तांबोळी; तांबेटी.
केंबळी पु. स्त्री. न. १. छपरावरचे जुने गवत; शाकार; नवीन शाकाराखाली केव्हा केव्हा हे घालतात. एका पावसानंतर कुजून निकामी होणारे घरावरील गवत किंवा पेंढा. २. उसाचा जुना पाला अगर खपलीचे जुने शाकार, काड. (माण.) ३. लाल रंगाचे गवत; तांबोळी; तांबेटी.
केमळ पु. स्त्री. न. १. छपरावरचे जुने गवत; शाकार; नवीन शाकाराखाली केव्हा केव्हा हे घालतात. एका पावसानंतर कुजून निकामी होणारे घरावरील गवत किंवा पेंढा. २. उसाचा जुना पाला अगर खपलीचे जुने शाकार, काड. (माण.) ३. लाल रंगाचे गवत; तांबोळी; तांबेटी.
केमळा पु. स्त्री. न. १. छपरावरचे जुने गवत; शाकार; नवीन शाकाराखाली केव्हा केव्हा हे घालतात. एका पावसानंतर कुजून निकामी होणारे घरावरील गवत किंवा पेंढा. २. उसाचा जुना पाला अगर खपलीचे जुने शाकार, काड. (माण.) ३. लाल रंगाचे गवत; तांबोळी; तांबेटी.
केंबळगती वि. कुजलेल्या पेंड्यांचा; गवताने शाकारलेला : ‘उकिरड्याला लागूनच एक केंबळगती छप्पार.’ - रैत ७४.
केंबळी वि. कुजलेल्या पेंड्यांचा; गवताने शाकारलेला : ‘उकिरड्याला लागूनच एक केंबळगती छप्पार.’ - रैत ७४.
केंबळ्याघुडा वि. घुडा जातीचे भात.
केंबळ्याघुड्या वि. घुडा जातीचे भात.
केंबूळ स्त्री. निकामी पेंढा; शाकारायचे गवत : ‘बायकांनी छपराची केंबूळ ओढली.’ - आआशे १३०.
केंवेळी क्रिवि. केव्हाही : ‘वाटा केंवेळी न वचती ।’ - ज्ञा ४·६०. [सं. कियत् + वेला]
केंसार पु. बगळ्याच्या जातीचा एक पक्षी. (गो.)
कॅम्बोज पु. (कृषी) सह्याद्री परिसरात सदाहरित जंगलात वाढणारा एक वृक्ष. [इं.]
कॅरट पु. १. हिरे वगैरे तोलण्याचे वजन, परिमाण. एक कॅरट = एक रती किंवा एक आणा. पूर्वी हा ३·३३ ग्रेन बरोबर असे, पण हल्ली ३·२ ग्रेनबरोबर मानतात. २. सोन्याच्या शुद्धतेचे परिमाण. [इं.]

शब्द समानार्थी व्याख्या
कॅरम पु. टिकल्यांचा एक बैठा खेळ [इं.]
कॅरमबोर्ड पु. टिकल्यांचा खेळ खेळण्याचा चार पॉकेट्सचा लाकडी बोर्ड.
कॅरोटीन न. भाजीपाल्यातून मिळणारे ‘अ’ जीवनसत्त्व. पालेभाज्या खाणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात ह्याचे रूपांतर ‘अ’ जीवनसत्त्वात होते. गाजर, कोथिंबीर इ. मध्ये हे असते. [इं.]
कॅलरी स्त्री. उष्णतेचा एकम; उष्णतेचे एकक (युनिट). उष्णता मोजण्याचे माप. [इं.]
कॅल्शिअम न. (रसा.) एक धात्विक मूलद्रव्य.
कॅल्सीमाला स्त्री. (भूशा.) कल्शिअम जास्त प्रमाणात असणाऱ्या अग्निजन्य खडकांचा समूह.
कॅसेट स्त्री. १. एक्स रे फिल्मसाठी किंवा कोणत्याही छायाचित्रणाच्या फिल्मसाठी असलेले प्रकाशबंद धारकपात्र. २. ध्वनिफीत ठेवण्याची डबी; आवरण. [इं.]
कँकर रोग   (कृषी) कागदी लिंबाच्या पानावर, कांद्यांवर तसेच फळांवर सूक्ष्म जंतूंमुळे पडणारे वाटोळे, बारीक, तपकिरी रंगाचे डाग.
कँटन पु. (भूगोल.) स्वित्झर्लंड व फ्रान्समधील लहान प्रादेशिक विभाग. ह्याच शब्दावरून लष्करी वसाहत या अर्थाचा कँटोनमेंट हा शब्द तयार झाला आहे. [इं.]
कँडलशक्ती स्त्री. प्रकाश मोजण्याची पट्टी. २. कँडलशक्ती म्हणजे एका मेणबत्तीचा पडणारा प्रकाश.
कँडेला स्त्री. प्रकाशशक्तीचे माप.
कै. कैं वि. कित्येक; अनेक.
कै. कैं क्रिवि. १. केव्हा; कधी. पहा : कई : ‘आता कर्मठां कैवारी । मोक्षाची हे ॥’ - ज्ञा १८·६८. [सं. कदा]
कै   कोठे : ‘तरि मागिला जुंझी राणे । कै गेलें होते ।’ - शिव ९१५. [सं. क्व]
कैं   कोठे : ‘तरि मागिला जुंझी राणे । कै गेलें होते ।’ - शिव ९१५. [सं. क्व]
कैक वि. पुष्कळ; कित्येक. [सं. कतिपय + एक]
कैकट   पहा : कीकट : ‘आणि देख कैकट फटकाळा ।’ - यथादी १७·२३५.
कैकट वि. १. भयंकर; रानटी; वाईट; दरिद्री; किड्यांचा (देश). २. मगध देशासंबंधी. (मगधामध्ये म्लेंछांचे ठाणे असल्यामुळे तो धर्मकृत्याला अयोग्य असा मानला गेला आहे) : ‘मग म्लेंच्छाचे वसौटे । दांगाणे हन कैकटे ।’ - ज्ञा १७·२९४. [सं. कीकट]
कैकटा   पहा : कीकट : ‘आणि देख कैकट फटकाळा ।’ - यथादी १७·२३५.
कैकटा वि. १. भयंकर; रानटी; वाईट; दरिद्री; किड्यांचा (देश). २. मगध देशासंबंधी. (मगधामध्ये म्लेंछांचे ठाणे असल्यामुळे तो धर्मकृत्याला अयोग्य असा मानला गेला आहे) : ‘मग म्लेंच्छाचे वसौटे । दांगाणे हन कैकटे ।’ - ज्ञा १७·२९४. [सं. कीकट]
कैकड   पहा : कीकट : ‘आणि देख कैकट फटकाळा ।’ - यथादी १७·२३५.
कैकड वि. १. भयंकर; रानटी; वाईट; दरिद्री; किड्यांचा (देश). २. मगध देशासंबंधी. (मगधामध्ये म्लेंछांचे ठाणे असल्यामुळे तो धर्मकृत्याला अयोग्य असा मानला गेला आहे) : ‘मग म्लेंच्छाचे वसौटे । दांगाणे हन कैकटे ।’ - ज्ञा १७·२९४. [सं. कीकट]
कैकाट न. कैकाडी लोकांचा समूह; एक जात.
कैकाड वि. भांडखोर.
कैकाडी पु. एका जातीचे नाव. त्या जातीतील माणूस. या जातीतील लोक बुरड्या, टोपल्या इ. विकून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रात यांच्या चार पोटजाती आहेत. [सं. कीकट]

शब्द समानार्थी व्याख्या
कैकाडीण स्त्री. १. कैकाड्याची, कैकाडी जातीची स्त्री : ‘प्रथमचि मी तव दादा कैकाडीण झालें ।’ - भज ४०. २. कैदाशीण; भांडखोर स्त्री. ३. (प्रेमाने) गबाळ, केस पिंजारलेल्या मुलीला म्हणतात.
कैकायी   पहा : कैकाडीण : ‘कैकायी कैकायी दुरील माझा देश ।’ - भज ४०.
कैकाई   पहा : कैकाडीण : ‘कैकायी कैकायी दुरील माझा देश ।’ - भज ४०.
कैकाळ   पहा : कळिकाळ : ‘कैकाळाचें धाक नाहीं अवघीं विघ्नें नीवारी ।’ - ऐपो. ३५०.
कैकेय पु. इराणी लोक.
कैकेयी स्त्री. १. दशरथ राजाची पत्नी : ‘कैकेयी आनंदली थोर ।’ - रावि ३·९५. २. (ल.) शिरजोर, दुष्ट, कजाग, हट्टी स्त्री. [सं. केकय]
कैके स्त्री. १. दशरथ राजाची पत्नी : ‘कैकेयी आनंदली थोर ।’ - रावि ३·९५. २. (ल.) शिरजोर, दुष्ट, कजाग, हट्टी स्त्री. [सं. केकय]
कैच अ. कोठील? कोठून : ‘तैसे हृदय प्रसन्न होये । तर दुःख कैचें के आहे ।’ - ज्ञा २·३४०.
कैचण न. काडी कचरा; पाचोळा (विस्तव पेटवण्याकरिता); केरकचरा. पहा : किलचण (व. ना.)
कैची स्त्री. १. कातर. २. (वास्तु.) आधार देण्यासाठी एकमेकांना तिरपे दोन वासे जोडून केलेली रचना. ३. तुळया इ. घरावर चढविण्याकरिता दोन वाशांना दोरी बांधून केलेली कातरीसारखी रचना. ४. जास्त वजनाचे पदार्थ तोलण्याच्या काट्यासाठी लाकडाच्या तीन दांड्यांची केलेली तिकटी. ५. घराच्या आढ्याच्या खांबाचे लाकूड. ६. पेचप्रसंग : ‘अशी ही कैची हाय.’ - रैत १३२. [का.] (वा.) कैचीत धरणे, पकडणे - पेचात धरणे; अडचणीत गाठणे. कैंचीत सापडणे - सर्व बाजूंनी अडचणीत येणे; काय करावे ते न कळणे; एक नीट करायला जाता दुसरे बिघडणे : ‘ताराबाई विलक्षण कैचीत सापडली होती.’ - अजून १५. ७. दारू भरलेल्या बाणांची जुडी; दारूच्या बाणांचा समुदाय : ‘पन्नास हजार फौज सातशे कैची बाण ।’ - ऐपो २५५. ८. थैली : ‘समागमे शंभर उंट. बाणांच्या कैच्या’ - भाब ९.
कैची गुणाकार   (ग.) (अपूर्णांकाचे समीकरण सोडवताना) एका अपूर्णांकाच्या छेदाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणण्याची क्रिया.
कैछा पु. हलवायाचे उपकरण. पहा : करछा
कैतक स्त्री. फार जाड व लांब नळी असलेल्या बंदुकीचा एक प्रकार.
कैदक स्त्री. फार जाड व लांब नळी असलेल्या बंदुकीचा एक प्रकार.
कैतव न. कपट; लुच्चेगिरी; लबाडी : ‘त्याचे कसें कैतव साहसी गे । - सारुह ७·१२५. [सं.]
कैतान क्रिवि. जोराने : ‘ढोलं वाजत कैतान मध्यान रातीला.’ - एहोरा २·१३५.
कैताले न. ताडाच्या झाडावर चढताना हातात धरण्याकरिता घेतात ती दोरी. हिला एका बाजूला लाकडी मूठ व टोकाला पितळी कडी असते.
कैताळ न. करताळ; झांज.
कैद स्त्री. १. बंदी; नियंत्रण; बंधन; तुरुंगवास. २. शिस्त; कदर; अंमल; ताबा. ३. मर्यादा; नियंत्रण (सरकारचे धार्मिक, सामाजिक चालीरीतीचे). ४. निर्भत्सणे; धमकावणे; एकसारखे दोष पाहणे. (क्रि. करणे.) (को.)
कैद वि. बंदिस्त; कैदेत पडलेला (चोर). [फा.]
कैदकानू स्त्री. १. सरकारी कायदे, हुकूम यांना संज्ञा. २. बंदोबस्त; अंमल : ‘दिल्ली म्हणजे बादशाही तख्ताची जागा. तेथील अमर्यादा करून फौज दरवर्षी पाठवून कैदकानू तुम्ही आपली वसविली.’ -पाब १५०. [फा.]
कैदकाळ वि. निष्ठुर. (व.)
कैदकाळू वि. निष्ठुर. (व.)
कैदखाना पु. बंदिशाळा; तुरुंग; कारागृह. [फा.]
कैदखोर वि. तिरसट; टोचून बोलणारा; काचात ठेवणारा; कमालीचा शिस्तप्रिय; नियम वगैरे कडकपणाने लागू करणारा. (को.) [फा.]

शब्द समानार्थी व्याख्या
कैददगा पु. फसवणूक; फसवेगिरी : ‘मग यास का कैददगा म्हणावा तरी इंग्रज हठऊन तंग करून बडोद्यास घालविले.’ - मइसा १९·८४. [फा.]
कैदवार क्रिवि. शिस्तवार; हुकमानुसार; नम्रपणे; नियम पाळून शिस्तीने.
कैदवार वि. शिस्तबद्ध; नियमित; व्यवस्थित : ‘ब्राह्मणीराज्य कैदवार एकापेक्षां एक मसलती.’ - ऐपो २३१.
कैदा स्त्री. नियमबंदी; शिस्त.
कैदाशिणीचे कोडे   कधीही न सुटणारे कोडे.
कैदाशीण स्त्री. कैकाडीण; कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री.
कैदासीण स्त्री. कैकाडीण; कजाग, नाठाळ, भांडखोर स्त्री.
कैदी वि. १. बंदिवान; तुरुंगात असलेला. २. परतंत्र; ताब्यात असणारा. ३. कैदखोर; खट्याळ; खाष्ट; चिडखोर; तिरसट. (को.) [फा. कैद]
कैपख   पहा : कैपक्ष : ‘ऐसें कां कैंपखें । बोलिलासी ॥’ - ज्ञा १७·३५.
कैपत स्त्री. १. एक प्रकारचा पितळी दिवा. पहा : कैपंजी, २. दुष्ट, खट्याळपणाची योजना; गुप्त कट; खोडसाळपणाचा कट, मसलत, कारस्थान. (क्रि. करणे, रचणे, काढणे, चालवणे, मांडणे.) [फा. कैफियत]
कैपतखोर वि. दुष्ट प्रकारचे कारस्थान करणारा; कुभांडी; कपटी; कारस्थानी.
कैपती वि. दुष्ट प्रकारचे कारस्थान करणारा; कुभांडी; कपटी; कारस्थानी.
कैपती   पहा : कैपत : ‘यास जो कोणी हाली कैफती व कथला करील तो दिवाणीचा गुन्हेगार.’ - शिचसाखं २·२९४.
कैफती   पहा : कैपत : ‘यास जो कोणी हाली कैफती व कथला करील तो दिवाणीचा गुन्हेगार.’ - शिचसाखं २·२९४.
कैपक्ष पु. १. कैवार; पक्षपात : ‘म्हणती एकाचा कैपक्ष करीं ।’ - ज्ञा ९·१६८. २. बाजू; पक्ष : ‘विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ।’ - दास २·९·१४. [सं.]
कैपक्षी वि. कैवारी : ‘कैपक्षी रघुनाथ माझा ।’ - दावि ५३.
कैपंजी स्त्री. हाताने धरायची पणती. पहा : कयपंजी (गो.) [क. कै = हात + पंजी = पणती]
कैफ पु. १. धुंदी; उन्माद; गुंगी; नशा : ‘इंग्रजी विद्येच्या अव्वल कैफात आमच्या विद्वानांनी सुधारणेच्या नव्या दिशा काढल्या.’ - लोटिकेले ४·१८३. २. मादक अंमली पदार्थ, द्रव्य (भांग, गांजा इ.) ३. मादक गुण; झिंग आणण्याची शक्ती, प्रमाण. (क्रि. करणे, चढणे.). ४. व्यंग; खोड. [फा.]
कैफत स्त्री. १. कलह; तंटा; भांडण : ‘दरम्यानें रंभाजी नाईकवाडी कैफती करितो.’ - पेद ३१·१७. २. तक्रार; अडथळा. [फा. कफालत]
कैफियत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफेत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफयेत स्त्री. १. वर्णन; हकीगत; करिणा; लेखी जबानी; खटल्याचा तपशील. २. काम; खटला; उद्योग; व्यवहार; मुकदमा. ३. (कायदा) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षाच्या दाव्याबद्दल जे लेखी म्हणणे कोर्टात दाखल करतात ते. ४. खरा दस्तऐवज, लेख; अधिकारपत्र; लेखी हुकूम. [फा. कैफीयत]
कैफी वि. १. मादक पदार्थांचे सेवन करणारा (माणूस); गांजेकस; दारूबाज. २. गुंगी आणणारे; मादक (पेय). [फा.]
कैफीन स्त्री. (वै.) त्वचेला उत्तेजन देणारे औषध.

शब्द समानार्थी व्याख्या
कैमर्थ्य न. अनुपयुक्ततेचा, वैयर्थ्यतेचा, अनुचिततेचा दोष (वादविवादात, धंद्यात, कामात इ.) निरुपयोग. [सं. किं + अर्थ = उपयोग]
कैमुतिकन्याय पु. अर्थन्याय; एखादी दुष्कर गोष्ट करता येते तर सोपी गोष्ट होईलच होईल असा अर्थ असला म्हणजे त्याला म्हणतात. जसे : - कुऱ्हाडीने लाकूड तुटते, मग गवत सहजच तोडता येईल. [सं.]
कैरव न. स्त्री. चंद्रविकासी पांढरे कमळ : ‘सार्थक पार्थ करी ती कैरविणी तो सुधांशु गौरविती’ - नवनीत. [सं.]
कैरविणी न. स्त्री. चंद्रविकासी पांढरे कमळ : ‘सार्थक पार्थ करी ती कैरविणी तो सुधांशु गौरविती’ - नवनीत. [सं.]
कैरा वि. १. कैरेडोळ्या; मांजऱ्या; घाऱ्या डोळ्याचा (घोडा). कैराडोळा असणे हे अशुभचिन्ह आहे. २. ज्याचे बुबुळ घारे आहे असा (डोळा). ३. घाऱ्या, करड्या रंगाचा : ‘चितार भिंगारे खैरें । मोरें सेवरें आणि कैरें ।’ - हरि १·१९२ [हिं.]
खैरा वि. १. कैरेडोळ्या; मांजऱ्या; घाऱ्या डोळ्याचा (घोडा). कैराडोळा असणे हे अशुभचिन्ह आहे. २. ज्याचे बुबुळ घारे आहे असा (डोळा). ३. घाऱ्या, करड्या रंगाचा : ‘चितार भिंगारे खैरें । मोरें सेवरें आणि कैरें ।’ - हरि १·१९२ [हिं.]
कैरा वि. १. तिरळा; चकणा (डोळा) : ‘तारसें घुलें काणें कैरे’ - दास ३·६·४२. २. चकणा डोळा असलेला. [सं. केकर = तिरवा]
कैरी स्त्री. १. कच्चा आंबा; लहान आंबा; कुयरी. २. कपाशीचे हिरवे बोंड. (ना.) (वा.) कैरी पिकणे - (मुलगी) वयात येणे : ‘पुढे तिची कैरी पिकली.’ - वासू ३२. [तुल. का. काई = हिरवे, कच्चे + री]
कैल न. शेतातील धान्याचे मान, माप; वाटण्यापूर्वीची पिकाची मोजणी. पहा : कैली [फा.]
कैलास पु. कुबेर, शंकर यांचे निवासस्थान असलेला पर्वत. हा हिमालयात आहे. महादेवाचा लोक. (वा.) कैलास येणे, मिळणे, उतरणे, प्राप्त होणे - काही तरी मोठा लाभ होणे. कैलासाला डोके लागणे - आकाश ठेंगणे होणे; गर्वाने अतिशय फुगून जाणे. [सं.]
कैलासवासी वि. (मृत्यू पावलेल्या माणसाची कागदोपत्री विशेषतः तो शिवभक्त असल्यास - उल्लेख करताना योजतात.) परलोकवासी; मृत.
कैली वि. मापी आकार; खंडी, पायली, शेर इ. धान्ये वगैरे मोजण्याच्या प्रमाणदर्शक शब्दामागे हा शब्द लावतात : ‘तांदूळ कैली कोठीमापें पाच मण’ - मइसा १५·२२४. [फा. कैल् = माप]
कैली स्त्री. फुटक्या मडक्याचा तुकडा; खापर. (गो.) [का. केले = मडके]
कैली कोठी   वजनी मापाने मोजलेले; खंडी पायली, शेर इ. धान्ये मोजण्याचा परिमाणदर्शक शब्द.
कैली माप   मापाने मोजून घ्यायचे परिमाण.
कैली मापी   मापाने मोजून घ्यायचे परिमाण.
कैवजा क्रिवि. किती, अनेक प्रकारे : ‘येथें आलियानें रुक्नुद्दौला यास वस्वास येईल म्हणोन कैवजा लिहिले.’ - मईसा १·५३.
कैवर्त पु. १. कोळी; मासेमाऱ्या. २. भिस्ती; पाणक्या : ‘किरात कैवर्तक दुष्ट भारी ।’ - वामन (नवनीत) १३६. [सं.]
कैवर्तक पु. १. कोळी; मासेमाऱ्या. २. भिस्ती; पाणक्या : ‘किरात कैवर्तक दुष्ट भारी ।’ - वामन (नवनीत) १३६. [सं.]
कैवल्य न. १. सायुज्य मुक्ती; मोक्ष; जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य : ‘तें कैवल्य पर तत्त्वता । पातलें जगीं ।’ - ज्ञा ३·१५१. २. केवळपणा; एकटेपणा : ‘कैवल्य म्हणजे केवळपणा, एकटेपणा किंवा प्रकृतीशीं संयोग नसणें असा असून...’ - गीर १६२. [सं.] (वा.) कैवल्य वाटणे- कौतुक वाटणे. (व.)
कैवल्यदानी पु. (मोक्ष देणारा) ईश्वर; गुरू; ईश्वराचें एक अभिधान : ‘सुखानंद आनंद कैवल्यदानी ।’ - राम ३६.
कैवल्यनिधान न. १. मुक्तिसदन; मोक्ष : ‘मुमुक्षूस कैवल्यधाम ।’ - यथादी १·४६. २. मोक्षाचे स्थान जो परमेश्वर तो : ‘हुंबरती गाय तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ।’ - तुगा २४१. [सं.]
कैवल्यधाम न. १. मुक्तिसदन; मोक्ष : ‘मुमुक्षूस कैवल्यधाम ।’ - यथादी १·४६. २. मोक्षाचे स्थान जो परमेश्वर तो : ‘हुंबरती गाय तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ।’ - तुगा २४१. [सं.]
कैवल्यपद न. सायुज्य मुक्ती; कैवल्यधाम. [सं.] (वा.) कैवल्यपद येणे, प्राप्त होणे- अलभ्य लाभ होणे; फार चांगली गोष्ट मिळणे.
कैवल्यरस पु. मोक्षाचा आनंद. [सं.]

शब्द समानार्थी व्याख्या
कैवाड न. गुप्त कट; कारस्थान; हिकमत; मसलत; खोल विचार (विशेषतः दुष्टपणाचा); कुभांड; थोतांड. (क्रि. रचणे, घेणे, खाणे.) : ‘ज्या कर्मांचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे ।’ - एभा २५·२२३. [सं. कैतव]
कैवाडू न. गुप्त कट; कारस्थान; हिकमत; मसलत; खोल विचार (विशेषतः दुष्टपणाचा); कुभांड; थोतांड. (क्रि. रचणे, घेणे, खाणे.) : ‘ज्या कर्मांचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे ।’ - एभा २५·२२३. [सं. कैतव]
कैवाड न. पु. एका पक्षाचे समर्थन, कैवार, अभिमान, कैवारबद्दल योजतात : ‘एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडे ।’ - तुगा २७४. [क. कैवार]
कैवाडा पु. मदतनीस : ‘तुम्ही यादव सर्व कपट । दैत्यवधा कैवाडे’ - उह १४४०.
कैवाडी वि. १. धूर्त; शहाणा. २. गुप्त मसलती. ३. कैवारी.
कैवार पु. १. दयेमुळे केलेला पक्षपात; एखाद्याची बाजू घेऊन शेवटपर्यंत त्याला सांभाळून घेणे; साहाय्य, मदत करणे; पक्ष उचलणे; कड, बाजू घेणे. पहा : कैवाड (क्रि. घेणे, धरणे, करणे) : ‘ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें ।’ - ज्ञा ४·५१.
कैवार पु. न. १. वर्तुळ काढण्याचे साधन; २. वर्तुळ (कंपासाने काढलेले.) ३. परिघाची रेषा. ४. व्यास मापण्याचे साधन. [क.]
कैवर पु. न. १. वर्तुळ काढण्याचे साधन; २. वर्तुळ (कंपासाने काढलेले.) ३. परिघाची रेषा. ४. व्यास मापण्याचे साधन. [क.]
कैवारिया वि. कैवार घेणारा; साहाय्यकर्ता.
कैवारिया पु. (ख्रि.) १. सत्याचा आत्मा. २. पवित्र आत्मा (त्रिविधैक्य देवांतील एक). संबोधक (नवा करार). ‘मी न गेलों तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही.’ - योहा १६·१७.
कैवारी वि. कैवार घेणारा; साहाय्यकर्ता.
कैवारी पु. (ख्रि.) १. सत्याचा आत्मा. २. पवित्र आत्मा (त्रिविधैक्य देवांतील एक). संबोधक (नवा करार). ‘मी न गेलों तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही.’ - योहा १६·१७.
कैवाह पु. अडचण : ‘ते गुति कैवाड सोडवुनि’ - नागाव शिला १·१५.
कैसरचांदणी स्त्री. घोड्याला होणाऱ्या चांदणी नावाच्या रोगाचा एक प्रकार. - अश्वप २·१०४.
कैसा वि. क्रिवि. कोणत्या जातीचा; किती; कसा; कसला : ‘तरि माझिया वैरिणी । तिआं कैसिआं ।’ - शिव ८१९. [सं. कीदृश]
कैसिआं वि. क्रिवि. कोणत्या जातीचा; किती; कसा; कसला : ‘तरि माझिया वैरिणी । तिआं कैसिआं ।’ - शिव ८१९. [सं. कीदृश]
कैसिया वि. क्रिवि. कोणत्या जातीचा; किती; कसा; कसला : ‘तरि माझिया वैरिणी । तिआं कैसिआं ।’ - शिव ८१९. [सं. कीदृश]
कैसेन क्रिवि. कसे; कशाच्या योगाने; कशाने : ‘तो देव कैसेनि म्हणावा ।’ - विपू ५·२५.
कैसेनी क्रिवि. कसे; कशाच्या योगाने; कशाने : ‘तो देव कैसेनि म्हणावा ।’ - विपू ५·२५.
केंगटणे क्रि. मेटाकुटीला, जेरीला, जिकिरीला येणे : ‘पोटात काय न्हाई. बैलं केंगटून गेल्यात.’ - गोता ४५. (कर.)
केंगटीला येणे क्रि. मेटाकुटीला, जेरीला, जिकिरीला येणे : ‘पोटात काय न्हाई. बैलं केंगटून गेल्यात.’ - गोता ४५. (कर.)
कैंची वि. १. कोणता, २. कोठचा; कोठील; कसला : ‘कैंचा धर्म कैंचे दान । कैंचा जप कैंचे ध्यान ।’ - दास २·५·११.
कोइटारू वि. कोइटाने शाकारलेले; कोइटाचे छप्पर असलेले. (को.)
कोइनाथिले वि. ज्याला दुसरे कोणी नाही असे; असहाय : ‘भणौनि अनाथ : कोइनाथिले’ - ज्ञाप्र १११२. [सं. कोऽपि न अस्ति]
कोइल स्त्री. भिंगरी; हाताने फिरवायचा भोवरा.

शब्द समानार्थी व्याख्या
कोईल स्त्री. भिंगरी; हाताने फिरवायचा भोवरा.
कोइंडा पु. चाबकाचा लाकडी दांडा, मूठ. पहा : कोयंडा (माण.)
कोई स्त्री. १. आंब्याची बी; बाठी. पहा : कोय, २. कोबीची भाजी. ३. कमळ.
कोईकमळ न. पांढरे कमळ.
कोई कोई   भीतीने फोडलेली किंकाळी; कुईकुई (क्रि. करणे, होणे). [ध्व.]
कोईट न. शाकारणीचे गवत. पहा : कुईट (को.)
कोईन स्त्री. नदीच्या प्रवाहात मासे पकडण्यासाठी बांबू, टाळे, दगड यांचा बांध घालून त्याला लावलेल्या टोपल्या. पहा : खोईण
कोईल स्त्री. विटीदांडू खेळताना जमिनीत खणतात ती खळगी; गल; गल्ली. (को.)
कोईलडाव पु. विटी मारण्याची पाळी; कोलण्याची पाळी.
कोकशात्र न. कामशास्त्र; रतिरहस्यशास्त्र. हा ग्रंथ कोक नावाच्या कवीने केल्यामुळे या ग्रंथाला कोकशास्त्र हे नाव पडले.
कोक पु. १. चक्रवाक पक्षी : ‘मी कोक झालों निका ।’ -आसेतु २६. [सं.], २. लड्डा (तोबा) चा खेळ; वर्तुळाकार बसलेल्या गड्यांच्या मागे नकळत लड्ड ठेवून खेळतात तो खेळ. (बे.) [ध्व.], ३. दगडी कोळशातील धूर उष्णता देऊन काढून टाकल्यावर राहणारा भाग. [इं.]
कोक न. १. कामशास्त्र; रतिरहस्यशास्त्र. हा ग्रंथ कोक नावाच्या कवीने केल्यामुळे या ग्रंथाला कोकशास्त्र हे नाव पडले. २. भोक; छिद्र; बीळ; (ना.) ३. खोक; जखम. (गो.), ४. कुबडा. ५. कुबड; पोक. ६. (ल.) फुगीर उंचवटा; फुगा : ‘बुचड्याचा आधीं झोंक, त्यामधीं ठेवी कोक नोक, झोकें भर पुरली’ - प्रला १११ [क. कोक्किकोकुं]
कोकटहोळी स्त्री. होळीच्या आदल्या दिवशीची खेळातील होळी.
कोकड स्त्री. न. पहा : खोकड
कोंकड स्त्री. न. पहा : खोकड
कोकड वि. वाकडा; वाकलेला; कुबडा. (व.)
कोकण न. महाराष्ट्र राज्याच्या समुद्र किनाऱ्यालगतचा भाग; सह्याद्रीच्या पश्चिमेकडील प्रदेश. (वा.) बैल कोकणात जाणे - १. शक्तिहीन होणे. २. वयपरत्वे दुर्बल, अशक्त होणे. ३. नपुंसक होणे. [सं. कोंकण]
कोकणघार स्त्री. करकोची पक्षीण.
कोकणदुधी पु. दुध्या भोपळा. (गो.)
कोकणपट्टी स्त्री. कोकणकिनारा. पहा : कोकण
कोकणस्थी वि. १. चित्पावन ब्राह्मण जातीसंबंधी; कोकणस्थांचा (बेत, व्यवहार, कारभार इ.). २. (ल.) काटकसरीचा; बेतास बात; कंजूषपणाचा; चिक्कूपणाचा.
कोकणा पु. खानदेशात व नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला ज्यांची वस्ती आहे अशी एक जात व त्या जातीचा मनुष्य.
कोकणी पु. खानदेशात व नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला ज्यांची वस्ती आहे अशी एक जात व त्या जातीचा मनुष्य.
कोकणी वि. १. कोकणसंबंधी. २. कोकणचा राहणारा.
कोकण्या वि. १. कोकणसंबंधी. २. कोकणचा राहणारा.

शब्द समानार्थी व्याख्या
कोकणे अक्रि. १. ओरडणे; भुंकणे (कुत्रा). २. आरवणे (कोंबडा); ओरडणे; किंचाळणे (पोपट, कावळा) : ‘कोंबडा कोंकतो, पैसा मागतो ।’ - भिकारी गाणे. [ध्व.]
कोकणे न. एका रानवेलीचे फळ.
कोकदम्या येणे अक्रि. श्रमामुळे बेजार होणे; कासावीस होणे; थकून जाणे; दमछाक होणे : ‘घोडी कोकदम्याला आली होती.’ - फकिरा १७४.
कोगदम्या येणे अक्रि. श्रमामुळे बेजार होणे; कासावीस होणे; थकून जाणे; दमछाक होणे : ‘घोडी कोकदम्याला आली होती.’ - फकिरा १७४.
कोकनद न. तांबडे कमळ : ‘नेणति हे परलोक, विलोक न कोकनदासम पाणिपदें ।’ - आविश्वा २२. [सं.]
कोकबाण पु. लढाईतील आगीच्या बाणाचा एक प्रकार. [कहकबाण]
कोकमार्ग पु. कोकशास्त्र पाळणारा एक पंथ.
कोकर न. माशांची एक जात; विशिष्ट मासळी. हे मासे दिवाळीच्या सुमाराला पकडतात.
कोकर स्त्री. गळून पडणाऱ्या कच्च्या लवंगा : ‘ह्या कच्च्या गळतीला कोकर म्हणतात.’ - के ४·४·३९.
कोकरचाल स्त्री. कोकरासारखी चाल, गती (घोड्याला योजतात.) पहा : कुकरचाल
कोकरा पु. करडू; मेंढीचे (नर जातीचे) पिलू.
कोकरू पु. करडू; मेंढीचे (नर जातीचे) पिलू.
कोकलणे अक्रि. १. ओरडणे; भोकाड पसरणे; उपाय फसल्यामुळे हाका मारीत बसणे. २. तक्रार करणे; एखाद्याच्या नावाने हाका मारणे.
कोकलणे उक्रि. तुडविणे; बदडणे; रडायला; कोको करायला लावणे. [ध्व. सं. को + कल्]
कोकशाळा स्त्री. नाटकशाळा : ‘कोकशाला नाटकशाला दासी यांचा घ्याल मुका ।’ - राला ८५.
कोकस्थान न. वैराण जंगली मुलूख; जेथे केवळ पारवे घुमतात असे स्थान : ‘डोंगर धामणा संमत हवेली त्याचे माथा जमीन वैराण, कोकस्थान आहे.’ - मासपमा १६०.
कोकंब पु. रातंबा; आमसोलाचे झाड. हे झाड कोकणात सर्वत्र आढळते.
कोकंबी पु. रातंबा; आमसोलाचे झाड. हे झाड कोकणात सर्वत्र आढळते.
कोकम पु. रातंबा; आमसोलाचे झाड. हे झाड कोकणात सर्वत्र आढळते.
कोकंबेल न. कोकंबाच्या बियांचे तेल. हे पोटातही घेतात व अंगाला बाहेरून चोळतात.
कोका पु. १. मोना; केळीच्या गाभ्यातून केळफुलासह बाहेर पडणारा कोंब; केळफूल; पोफळीचा मोहोर अथवा फुले ज्यातून बाहेर पडतात तो भाग. पोफळीच्या कोक्यांपासून कागद तयार करतात. [सं. कोक], २. कानफाटे गोसावी वाजवतात ती किनरी; लहान एकतारी. ३. बगळा; कंक. ४. एक प्रकारचा शिंपीतील प्राणी; कालव : ‘बळीने बघता बघता एक कोका घेतला.’ - शेलूक ९६. ५. एक झाड. याच्या एकंदर पन्नास जाती असून हिंदुस्थानात त्यांपैकी सहा आढळतात. ६. आतला भाग : ‘कानाच्या कोक्यात शिरलेल्या गोमाशा झाडू लागलं.’ - गागो १०३·२. [फा. कूका ] (वा.) कोका करणे, कोकी करणे- गुंडाळणे; एकत्र करणे : ‘कसंतरी कोका करून झोपलो.’ - उअं ८. ७. चवडा : ‘पायाचं कोकं पाण्यात ठेवताच तिला पाणी गार गार लागलं.’ - खळाळ ३. ८. कंदिलाची काच : ‘कुणाकडे कंदील होता पण त्याचा कोका फुटला होता.’ - जांदि १७.
कोका स्त्री. १. पागोट्याच्या वरील चोच (कोकी). पागोट्याच्या (पगडीच्या) कमळाच्या वर असलेला हा भाग कागदाचा करून त्यावर कापडी पट्ट्या शिवतात. २. पागोटे, इरले इत्यादीवरील वाकडे टोक, चोच, राघू, कोंब : ‘मी एक पुणेरी, लाल, ब्राह्मणी कोकीची, जरीच्या झिरमिळ्यांची पगडी विकत घेतो.’ - माआ २२४.
कोकी स्त्री. १. पागोट्याच्या वरील चोच (कोकी). पागोट्याच्या (पगडीच्या) कमळाच्या वर असलेला हा भाग कागदाचा करून त्यावर कापडी पट्ट्या शिवतात. २. पागोटे, इरले इत्यादीवरील वाकडे टोक, चोच, राघू, कोंब : ‘मी एक पुणेरी, लाल, ब्राह्मणी कोकीची, जरीच्या झिरमिळ्यांची पगडी विकत घेतो.’ - माआ २२४.
कोकी पु. १. आतला भाग : ‘कानाच्या कोक्यात शिरलेल्या गोमाशा झाडू लागलं.’ - गागो १०३·२. [फा. कूका ] (वा.) कोका, कोकी करणे- गुंडाळणे; एकत्र करणे : ‘कसंतरी कोका करून झोपलो.’ - उअं ८.
कोकाट पु. १. कोळीण पक्ष्याचा शब्द. २. (न.) कलकलाट; गोंगाट; गलका. [ध्व.]

शब्द समानार्थी व्याख्या
कोकाटी स्त्री. १. हस्तिदंताचा भोवरा. याला भोक असल्याने याचा गुंगुं असा आवाज होतो. पहा : कोकाट, २. एक पक्षी : ‘कोकाट्या नळावर भांडणाऱ्या बायकांसारखा कालवा करीत होत्या.’ - व्यंमाक ९०. पहा : कोकाट, ३. केळफुलांच्या पाऱ्यांवरील आच्छादन.
कोकाट्या वि. कोकाट करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा; गोंगाट करणारा. [ध्व.]
कोकात्री पु. कोंबड्यासारखा तांबूस रंगाच्या एक पक्षी. मांसाहारी लोक याचे मांस खातात. (जुन्नरी). [ध्व.]
कोकादर स्त्री. पाणकोंबडी. (गो.) [ध्व.]
कोंकतारी स्त्री. पाणकोंबडी. (गो.) [ध्व.]
कोकापकड स्त्री. (मल्लखांब) मल्लखांबाला दोन्ही बाजूंनी तळहातांनी धरून मारायची उडी.
कोकाबेरी   नीलकमल.
कोकारणी स्त्री. कोंबड्याची आरव. (गो.) [ध्व.]
कोकारा पु. १. आरोळी; मोठ्याने मारलेली हाक. (राजा.), २. लहान मासा. (गो.)
कोकावणे अक्रि. १. सूं गुं इ. आवाज होणे (बाण, भोवरा इत्यादिकांचा). २. भुंकणे; केकाटणे (कुत्र्याचे). ३. केकावणे (केका) : ‘मोर कोकावती ते ।’ - अक रसकल्लोळ. ४. कोकलणे : ‘पोटात कावळे कोकावयास लागले.’ - पलको १३. [ध्व.]
कोकिल पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकिला पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकिळ पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकीळ पु. स्त्री. मंजूळ शब्द करणारा एक पक्षी. ह्याचा आवाज फार मधुर असतो. मादी आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात उबवून घेते अशा समजुतीवरून याला संस्कृतात परभृत, अन्यभृत म्हणतात. कोकिल वसंत ऋतूतच फक्त गातो.
कोकिलाव्रत न. अधिक आषाढात कोकिळेचा शब्द ऐकल्यानंतर जेवण्याचे बायकांचे एक व्रत.
कोकिलासन न. (मल्लखांब) मल्लखांबाच्या तोंडावर पुढे वाकून बसणे.
कोकिळ कोंबडा   स्काउटच्या मुलांचा एक खेळ.
कोकीदार वि. कोकी असलेले (इरले, पागोटे). पहा : कोका
कोकी स्त्री. डोळ्यातील फूल.
कोके न. दमा. (गो.) [ध्व.]
कोकेन न. गुंगी आणणारा मादक पदार्थ; बधिरीकरणासाठी वापरले जाणारे औषध.
कोको पु. (वन.) एक प्रकारचे झाड. ह्याच्या शेंगातील बियांपासून एक उत्तेजक स्वादिष्ट पेय बनवले जाते. [पोर्तु.]
कोगव स्त्री. कोकम : ‘देवळाचे दारी कोगवीवर कोगवां दाटली वो दाटली वो ।’ - एहोरा ३२.
कोगी स्त्री. खङ्‌गाचा एक प्रकार. [इं.]
कोगूळ स्त्री. कोकिळ. (कु. गो.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोच पु. १. चार चाकी घोडागाडी; बग्गी; [इं.], २. आंबेहळदीचा कांदा, गड्डा. (को.), ३. आरामात ऐसपैस बसता येईल अशी, पाठीशी व खाली मऊ गादी असलेली कमी उंचीची खुर्ची, ऐषारामी बैठक, आसन; बसावयाचा पलंग. [इं.]
कोच स्त्री. १. खोक; एखाद्या अणकुचीदार पदार्थाने झालेली जखम; खोच. २. अणकुचीदार टोक. [हिं. कोचना], ३. पगडी, इरले इत्यादींचे टोक. पहा : कोका, कोकी
कोच न. जांब्या दगडात कातळावर उगवणारे व काट्याप्रमाणे टोचणारे बारीक गवत, वेल. [सं. कूर्च]
कोचकई स्त्री. मोठे व जून झालेले आवळे उकडून तयार करण्यात येणाऱ्या वड्या. [क. कोच्चु = तुकडे करणे, पूड, चूर्ण + काई = फळ]
कोचकाई स्त्री. मोठे व जून झालेले आवळे उकडून तयार करण्यात येणाऱ्या वड्या. [क. कोच्चु = तुकडे करणे, पूड, चूर्ण + काई = फळ]
कोचकणे स्त्री. टोचणे; डिवचणे : ‘आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या सोज्वळ कुटुंबवत्सल माणसाला त्याने कोचकले.’ - काजवा १४१.
कोचका   पु. कोपरा. (व.)
कोचकार्द   आवळकाठी.
कोचीकंदर न. १. अडगळीची जागा. घाणेरड्या गर्दीच्या जागेबद्दल योजतात. (को.) २. गळाठा; अडगळ. ३. अडचणीची, संकोचाची अवस्था, स्थिती, गर्दी, गोंधळ असणे.
कोचकी स्त्री. १. (वास्तु.) कोपरा; कोन (घरातील, खोलीचा इ.). २. दिखाऊ चांदई. ३. पहा : कोकी १, ४. पागोटे : ‘मुदुतर थिरमे त्या कोचक्या कोरदारा ।’ - सारूह ३·४०.
कोचकीदार स्त्री. कोचकी असलेले (पागोटे इ.).
कोचकील वि. अरुंद, कोंदट, चिंचोळी (जागा).
कोचट वि. संकुचित; कोंदट; अपुरी (खोली); अरुंद; लहान तोंडाचे (भांडे, वस्तू). [सं. कुचू]
कोचा वि. संकुचित; कोंदट; अपुरी (खोली); अरुंद; लहान तोंडाचे (भांडे, वस्तू). [सं. कुचू]
कोचणे उक्रि १. कुरतडणे; तोडणे (नखे, दात, चोच इत्यादींनी). (राजा.) २. जोराने दाबणे. (व.) ३. खिळ्यांनी बोचणे (बे.). ४. भाजी चिरणे. (बे.) [क. कोच्चु = कापणे]
कोचणे स्त्री. भोवऱ्याच्या खेळात आपला भोवरा दुसऱ्याच्या फिरत्या भोवऱ्यावर मारणे.
कोचमन पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचमीन पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचमिल पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचमेल पु. गाडीवान; गाडीहाक्या; सारथी; सूत : ‘कोचमीन (महाराजांचा) मराठे जातीचा ... होता.’ - विक्षिप्त २·११८ [इं.]
कोचर स्त्री. आखूड शिंगाची म्हैस. (व.)
कोचवण स्त्री. जाच; तगादा; तसदी; टोचणी : ‘मजला देणेदाराची कोचवण किती आहे.’ - होकै २४.
कोचवणी स्त्री. काच; अडचण : ‘तुम्ही खर्चाचे कोचवणीत येऊन डेऱ्याचे दांडे होतीलना?’ - इसंहोकै १७.
कोचळा पु. न. पक्ष्याचे घरटे. (व. ना.) पहा : कोंचाळे
कोचाळे पु. न. पक्ष्याचे घरटे. (व. ना.) पहा : कोंचाळे

शब्द समानार्थी व्याख्या
कोचंबणे अक्रि. कुचंबणा होणे; संकोचणे; विरमणे; लाजणे. (व. ना.)
कोचा स्त्री. हळद.
कोचाळे न. १. वर्तुळ; कोंडाळे (बसलेल्या लोकांचे) (क्रि. घालणे, घालून बसणे, उठणे, मोडणे, काढणे.) २. भोवऱ्यासारखे एक खेळणे.
कोचाळे   पहा : कचोळे
कोचिनील पु. एक किडा. हा मूळचा मेक्सिको व पेरू या देशातील असून त्याची उपजीविका मुख्यतः फड्या निवडुंगावर होते. याच्या रूपेरी व काळा अशा दोन जाती आहेत. यापासून किरमिजी रंग करतात.
कोचिनील पु. एक किडा. हा मूळचा मेक्सिको व पेरू या देशातील असून त्याची उपजीविका मुख्यतः फड्या निवडुंगावर होते. याच्या रूपेरी व काळा अशा दोन जाती आहेत. यापासून किरमिजी रंग करतात.
कोचिंदर न. घरातील अगदी लहान जागा; अडचणीची जागा; ज्या जागेत वस्तू अस्ताव्यस्त पडल्यामुळे अडचण झाली आहे अशी जागा. पहा : कुचिंदर
कोचिंदा पु. एक वनस्पती, हिला पाती येतात. त्यांची भाजी (पोटातील) जंतुनाशक आहे.
कोची स्त्री. १. अणकुची; टोक. पहा : कोच, २. काचोळी; चोळी. (नंद भाषा) (कर.)
कोचोक पु. केर; उकिरडा. (गो.)
कोच्या पु. ठोसा; गुद्दा; हुर्री. (वा.) कोच्या होणे - फजिती होणे.
कोजळणे अक्रि. १. काजळीने आच्छादले जाणे; काळ्या किटाने भरणे. (नारळ, फळ इ.) २. काजळी धरणे (दिव्याच्या वातीने).
कोजळी स्त्री. १. जळत्या वातीचा शेष; कोळी; काजळी. २. जळणाऱ्या पदार्थाची ठिणगी. ३. राख (गवत, काटक्या इत्यादींची). ४. धुरामुळे होणारे जाळे, जळमट (छपरावर वगैरे). ५. (ल.) चिंता; हृदयरोग. [सं. कज्जल]
कोजागर पु. स्त्री. आश्विनी पोर्णिमा. [सं.]
कोजागरी पु. स्त्री. आश्विनी पोर्णिमा. [सं.]
कोट पु. १. किल्ला; गढी : ‘किल्ले गड कोट । दवलत खानाच्या हवाला ।’ - ऐपो १३. २. गावाचा अगर किल्ल्याचा तट. ३. सैन्याचा व्यूह : ‘कोट बांधून पिंजरा केला ।’ - ऐपो १३. ४. (पत्ते) हुकूम बोललेल्या भिडूने स्वतःच ओळीने सात (हात) करणे. (क्रि. देणे, करणे.), ५. सदऱ्याच्या वरून घालण्यासाठी थोड्या जाड कापडाचा शिवलेला (पोशाखाचा) एक प्रकार. ६. आच्छादन (पीकपाणी). [इं.], पहा : कोटी
कोटकल्याण न. १. भरपूर, पूर्ण कल्याण; पराकाष्ठेचा लाभ : ‘असें केल्यास माझें कोटकल्याण करण्याविषयीं जी तिची इच्छा आहे ती कमी होईल.’ - पाव्ह ८८. २. पराकाष्ठेची तृप्तता; समृद्धी.
कोटगा वि. कोडगा; निर्लज्ज, निर्ढावलेला : ‘सबळा प्रति जो कोटगा ।’ - ग्रंथराज ३·१०७. [क. कोट्टि = निर्लज्ज]
कोटिगा वि. कोडगा; निर्लज्ज, निर्ढावलेला : ‘सबळा प्रति जो कोटगा ।’ - ग्रंथराज ३·१०७. [क. कोट्टि = निर्लज्ज]
कोटगा पु. १. दोरीने फिरवायचा भोवरा. २. वाघे लोकांचा कोटंबा.
कोटागिरी स्त्री. वेढा : ‘असता खेड्या महार (तर) फोडता दळव्याची कोटगिरी.’ - ऐपो ६९.
कोट घुंघट   (पुरा.) मुख्य दुर्गद्वाराच्या भिंतीत ठेवले जात असलेले सहायक दुर्गद्वार.
कोटचक्र न. किल्ला हाती येईल की नाही हे पाहण्याचे कागदावर काढलेले यंत्र : ‘कोटचक्र घालून पहावे.’ - ऐलेसं १५२६.
कोटर क्र. १ (वन.) वनस्पतीतील किंवा तिच्या लहानमोठ्या अवयवांतील पोकळी; झाडाची ढोली : ‘लोटेतो तरुकोंटरी लपुनियां कोठें तरीही रहा ।’ - मराठी ६ वे पुस्तक पृ. १२४ (१८९६). २. विवर; बीळ :
कोटर   ‘कूपामाझारि उदका जवळी कोटर असे.’ - पंचो ११९·५.

शब्द समानार्थी व्याख्या
कोटर कुऱ्हाड   (पुरा.) मध्ये पोकळी असलेली कुऱ्हाड. [सं.]
कोटरान न. निर्जन प्रदेश; भयाण रान. (ना.)
कोटव पु. एक लहान मासा. (को.)
कोटसा वि. कोठेसा; कोणत्या जागी.
कोटंबा पु. १. खंडोबाच्या वाघ्यांचे लाकडी चौकोनी भिक्षापात्र. खंडोबाचे भक्त ह्याची पूजा करतात : ‘हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें ।’ - तुगा ४४४६. २. लाकडी डोणी; कोटंबी; काथवट (लांबट, चौकोनी व खोलगट); जनावरांना चूण, भूस वगैरे खाणे घालण्याचे लाकडी पात्र.
कोटुंबा पु. १. खंडोबाच्या वाघ्यांचे लाकडी चौकोनी भिक्षापात्र. खंडोबाचे भक्त ह्याची पूजा करतात : ‘हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें ।’ - तुगा ४४४६. २. लाकडी डोणी; कोटंबी; काथवट (लांबट, चौकोनी व खोलगट); जनावरांना चूण, भूस वगैरे खाणे घालण्याचे लाकडी पात्र.
कोटंबी स्त्री. लहान कोटंबा, डोणी, काथवट.
कोटंबे न. कोळंबे; रहाटगाडग्याचे पाणी ज्या डोणग्यात पडते ते डोणगे.
कोटा पु. वाटून द्यायच्या पदार्थाचे प्रमाण. [इं.]
कोटार क्रिवि. भलतीकडे : ‘आरब व सिद्दी पुढे होऊन कोटार गेले.’ - ऐकोपुर.
कोटि वि. शंभर लक्ष; एक करोड; कोट; असंख्य : ‘जागजागीं आहेत वीर कोटी’ - र १०. [सं.] (वा.) कोटिध्वज लावणे, उभारणे - अफाट संपत्तीचा देखावा करणे; कोट्यधीश, नवकोट नारायण होणे.
कोटी संख्या वि. शंभर लक्ष; एक करोड; कोट; असंख्य : ‘जागजागीं आहेत वीर कोटी’ - र १०. [सं.] (वा.) कोटिध्वज लावणे, उभारणे - अफाट संपत्तीचा देखावा करणे; कोट्यधीश, नवकोट नारायण होणे.
कोटि स्त्री. १. (वन.) सजीवांच्या वर्गीकरणात प्राणी किंवा वनस्पती यापैकी कोणत्याही एका प्रकारातील जातीचा सर्वात मोठा संच दाखवणारी संज्ञा; विशिष्ट वर्ग : ‘रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटी स्त्री पुत्रां ।’ - एभा १३·४५; भेद. २. जात. ३. दर्जा; प्रत. ४. (वादविवादात) निरुत्तर करण्यासारखे खुबीदार उत्तर; भाषणाची मोठ्या युक्तीने रचना; खुबीचे भाषण. ५. शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन, अर्थाच्या गमती करून अलंकारचमत्कार दाखविणे. हे एक भाषा कौशल्य समजले जाते. पहा : श्लेष : ‘अहो विद्वत्ताप्रचुर कोट्यांची गुंतवळें गेली दहापांच घशांत.’ - नाकु ३·३४. ६. काटकोन त्रिकोणाची उभी बाजू; लंब रेषा; कर्णाखेरीज एक बाजू. [सं.], ७. थोर योग्यता, दर्जा; श्रेष्ठपणा; शौर्य, सद्गुण, विद्या यांमध्ये अतिशय प्रवीण असलेल्यासाठी सन्मानदर्शक संज्ञा. [सं.], ८. धनुष्याचे टोक; चंद्रकलेची टोके. [सं.], ९. कल्पना; विचारसरणी : ‘परंतु ही कोटी इतिहासदृष्ट्या टिकेल असे आम्हांस वाटत नाही.’ - लोटिकेले ४·११६. [सं.], १०. पराकाष्ठा : कळस : उच्च शिखर. जसे : - पराकोटी. [सं.] (वा.) कोटि उभवणे, कोटी उभवणे - ध्वज उभारणे : ‘तरी यशाची उभऊनि कोटी ।’ - नव १९·१७७.
कोटी स्त्री. १. (वन.) सजीवांच्या वर्गीकरणात प्राणी किंवा वनस्पती यापैकी कोणत्याही एका प्रकारातील जातीचा सर्वात मोठा संच दाखवणारी संज्ञा; विशिष्ट वर्ग : ‘रजोगुणाची कोटी । लोभिष्ट पोटी स्त्री पुत्रां ।’ - एभा १३·४५; भेद. २. जात. ३. दर्जा; प्रत. ४. (वादविवादात) निरुत्तर करण्यासारखे खुबीदार उत्तर; भाषणाची मोठ्या युक्तीने रचना; खुबीचे भाषण. ५. शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन, अर्थाच्या गमती करून अलंकारचमत्कार दाखविणे. हे एक भाषा कौशल्य समजले जाते. पहा : श्लेष : ‘अहो विद्वत्ताप्रचुर कोट्यांची गुंतवळें गेली दहापांच घशांत.’ - नाकु ३·३४. ६. काटकोन त्रिकोणाची उभी बाजू; लंब रेषा; कर्णाखेरीज एक बाजू. [सं.], ७. थोर योग्यता, दर्जा; श्रेष्ठपणा; शौर्य, सद्गुण, विद्या यांमध्ये अतिशय प्रवीण असलेल्यासाठी सन्मानदर्शक संज्ञा. [सं.], ८. धनुष्याचे टोक; चंद्रकलेची टोके. [सं.], ९. कल्पना; विचारसरणी : ‘परंतु ही कोटी इतिहासदृष्ट्या टिकेल असे आम्हांस वाटत नाही.’ - लोटिकेले ४·११६. [सं.]
कोटी स्त्री. पराकाष्ठा : कळस : उच्च शिखर. जसे : - पराकोटी. [सं.] (वा.) कोटि, कोटी उभवणे - ध्वज उभारणे : ‘तरी यशाची उभऊनि कोटी ।’ - नव १९·१७७.
कोटिक्रम पु. १. युक्तिवाद; शक्कल; खुबीदार विवेचनपद्धती; तर्कवाद; श्लेषात्मक भाषण : ‘हाच कोटिक्रम स्वीकारलेला आहे.’ - गीर १५७. (क्रि. करणे) २. पेच. [सं.] (वा.) कोटिक्रम लढवणे - तोड काढणे; उपाय योजना करणे; मध्यमार्ग काढणे.
कोटिज्या स्त्री. (त्रिकोणमिती) कोभुजज्या. काटकोन त्रिकोणातील लघुकोनाच्या लगतची बाजू व कर्ण यांचे गुणोत्तर. कोटिज्या आणि भुजज्या यांच्या वर्गांची बेरीज १ भरते. [सं.]
कोटिभोज वि. कोट्याधीश : ‘धनेश्वर नामें कोणियेक ब्राह्मण । तो वस्तुवित्तेसि संपूर्ण । कोटिभोज पै ।’ - कथा २·१५·६
कोटिशः वि. कोट्यावधी. [सं.]
कोटिशा वि. कोट्यावधी. [सं.]
कोटिस्पर्शज्या स्त्री. (त्रिकोणमिती) कोटिज्या व भुजज्या यांचे गुणोत्तर; कोस्पर्शज्या. [सं.]
कोटी स्त्री. टोळी; जमाव; कोठा : ‘दोहींकडे राऊत व माणसाची कोटी व मध्ये समुद्रतटाकासही पाईची माणसे ठेवून खबरदार राहिलो.’ - पेद ३४·१५९.
कोटीर पु. डोक्यावरचा मुकुट : ‘मस्तकीं कोटीर झळकत ।’ - जै १४·५६. [सं. कोटिर, कोटर]
कोटी सहसंबंध   दर्जाप्रमाणे एकमेकांशी असलेला संबंध.
कोटे न. १. पक्ष्याचे घरटे; कोठे : ‘पोटाखाली अंडी घेऊन कोट्यात बसलेल्या व्हल्यांनी आपल्या गोल डोळ्यांची उघडझाप केली.’ - व्यंमाक ५४. २. रेशमी किड्यांचा कोशेटा. [सं. कोट्ट, कोट]

शब्द समानार्थी व्याख्या
कोट्यधीश कि. नवकोट नारायण; श्रीमंत; करोडपती. [सं.]
कोट्याधीश कि. नवकोट नारायण; श्रीमंत; करोडपती. [सं.]
कोट्यवधी वि. कोटीच्या मापाने मोजण्यासारखा; अपार; अगणित; अनंत. [सं.]
कोट्यावधी वि. कोटीच्या मापाने मोजण्यासारखा; अपार; अगणित; अनंत. [सं.]
कोट्यंश वि. अत्यंत अल्प.
कोट्यानकोटी वि. अगणित; अतोनात : ‘जळत हृदय माझें जन्म कोट्यानकोटी ।’ - रामदास करुणाष्टक [सं. कोटि + अनुकोटि]
कोठ पु. १. किल्ला. २. किल्ल्याचा तट. पहा : कोट. ३. पहा : कोठी [सं. कोष्ठ], ४. मोठी व वाटोळी चकंदळे पडणारी रक्तपिती. ५. गजकर्ण; नायटा. [सं. कुष्ठ]
कोठचा वि. १. कोठल्या गावचा, ठिकाणाचा. पहा : कुठचा. २. कोणता, कसचा.
कोठडी स्त्री. १. घरातील खोली; (विशेषतः) सामान ठेवण्याची कोठी; दालन : ‘हरिविजयग्रंथ भांडार । छत्तीस कोठड्यांचे परिकर ।’ - हरि ३६·२१६. २. कपाट; फडताळ. (व.) ३. तुरुंगाची कोठी. [सं. कोष्ठ]
कोठणे स्त्री. (प्र.) कोठून; कोणत्या ठिकाणाहून.
कोठदार वि. (चर्मकार.) विशिष्ट प्रकारचा मारवाडी जोडा. हा मारवाडी कुणबी घालतात.
कोठनीस पु. कोठावळा; कोठीवाला; कोठीवरील अधिकारी.
कोठपर्यंत क्रि. वि. कुठवर; कोणत्या ठिकाणापर्यंत; कोणत्या मुद्यापर्यंत; कोणत्या पल्ल्यापर्यंत; कोणत्या मजलेपर्यंत (स्थळ किंवा वेळ यासंबंधी).
कोठपर्यंत पावेतो क्रि. वि. कुठवर; कोणत्या ठिकाणापर्यंत; कोणत्या मुद्यापर्यंत; कोणत्या पल्ल्यापर्यंत; कोणत्या मजलेपर्यंत (स्थळ किंवा वेळ यासंबंधी).
कोठवर क्रि. वि. कुठवर; कोणत्या ठिकाणापर्यंत; कोणत्या मुद्यापर्यंत; कोणत्या पल्ल्यापर्यंत; कोणत्या मजलेपर्यंत (स्थळ किंवा वेळ यासंबंधी).
कोठपो पु. भाताची पेज गाळण्याचा लांबट, चौकोनी कोटंबा, भांडे
कोठपो   (कु.); काथवट. पहा : कोटंबा
कोठयॉ पु. कोठ्या; एक परदेशी गलबत. हे गुजराथेतील खारवी मुसलमान वापरतात. याच्या व दक्षिणी गलबताच्या बांधणीत फरक म्हणजे. याचे धाकटे शीड व कलमी लहान असतात. [सं. कोष्ठ]
कोठवा पु. कोठ्या; एक परदेशी गलबत. हे गुजराथेतील खारवी मुसलमान वापरतात. याच्या व दक्षिणी गलबताच्या बांधणीत फरक म्हणजे. याचे धाकटे शीड व कलमी लहान असतात. [सं. कोष्ठ]
कोठला पु. कोठी; खोली : ‘सानिये कोठला ठेविजे दीपु’ - विद ३.
कोठला वि. कुठला. पहा : कोठचा
कोठली स्त्री. पोटातील आतडे; आतड्यातील मळ : ‘बालपणिचिं कोठलीं । बाहिरी घाली ।’ - राज्ञा ६·२१६.
कोठलेले वि. बरेच दिवस साठ्यात पडून राहिले असल्यामुळे जुने झालेले (कापड). (कु.)
कोठवळा   पहा : कोठनीस : ‘दाटी पुढील दारीं मागिल दारीं आहे कोठिमध्यें कोठवळा ।’ - प्रला २६७.
कोठावळा   पहा : कोठनीस : ‘दाटी पुढील दारीं मागिल दारीं आहे कोठिमध्यें कोठवळा ।’ - प्रला २६७.

शब्द समानार्थी व्याख्या
कोठिवळा   पहा : कोठनीस : ‘दाटी पुढील दारीं मागिल दारीं आहे कोठिमध्यें कोठवळा ।’ - प्रला २६७.
कोठंबा   पहा : कोटंबा
कोठ्या   पहा : कोटंबा
कोठंबी स्त्री. पाण्याची डोणी; हंडा.
कोठमी स्त्री. पाण्याची डोणी; हंडा.
कोठा पु. १. कोठार; संग्रहालय; वखार; आगर; साठवण (धान्य, पाणी इत्यादीची). २. पोट; पक्वाशय : ‘कोठ्यामाजी संचरे ।’ - ज्ञा ६·२१७. ३. (शिवणकाम) छातीपोटाचा भाग (शिवायच्या कपड्याचा). ४. बंदुकीतील दारू, कारंजाचे पाणी इत्यादीचा साठवणीचा कप्पा, साठा. ५. पक्ष्याचे घरटे. ६. गुरांचा गोठा : ‘बैलु वीकूनि कोठा ।’ - राज्ञा १३·२२३. (व. ना.) ७. हुंडीच्या ज्या घरात रकमेचा आकडा लिहितात ते घर. ८. निळीचा रंग तयार करताना निळीची झाडे ज्यात भिजत टाकतात तो हौद. ९. पानाच्या डब्यातील पाने ठेवण्याचे पूड; खण, कप्पा. १०. कोष्टक; सदर; स्तंभ; रकाना. ११. (जंबिया) जंबियाच्या खेळात आपल्या हातातील जंबियाने जोडीदाराच्या बरगडीच्या खड्यांतून (शिंपीतून) बेंबीकडे फाडत येणे. [सं. कोष्ठ], १२. बांबूच्या काठीच्या खेळामधील बरगडीवर मार. १३. गलबताचा एक प्रकार.
कोठा   पहा : कोटा ‘त्यांना तालुक्याचे ठिकाणाहून कोठाच कमी मिळतो...’ - गांगा २.
कोठिवा पु. गलबताचा एक प्रकार.
कोठार न. १. धान्यागार; कोठडी; खोलीतील किंवा भिंतीतील बळद; वखार; साठवणीची जागा : ‘कीं विश्वबीजाचें कोठार -’ ऋ ३८. २. पक्ष्यांचे घरटे. [त. कोट्टगारम] [सं. कोष्ठागार]
कोठारी न. १. धान्यागार; कोठडी; खोलीतील किंवा भिंतीतील बळद; वखार; साठवणीची जागा : ‘कीं विश्वबीजाचें कोठार -’ ऋ ३८. २. पक्ष्यांचे घरटे. [त. कोट्टगारम] [सं. कोष्ठागार]
कोठारली स्त्री. घोणीच्या वर्गातील एक लहान प्राणी. (कु.)
कोठारी   पहा : कोठनीस
कोठारे न. १. पहा : कोठार. २. भूस बाहेर येऊ नये म्हणून त्यावर लावलेल्या कडब्याच्या पेंड्या.
कोठावगणे उक्रि. कोठे जाता किंवा कोठून आलात असे विचारणे.
कोठाविगणे उक्रि. कोठे जाता किंवा कोठून आलात असे विचारणे.
कोठिंबर न. (वन.) गोडे कारिंट. ही गुजराथेत पुष्कळ होतात. यांची भाजी करतात.
कोठिंबा   पहा : कोटंबा
कोठिंबी   पहा : कोटंबा
कोठिंबे   पहा : कोटंबा
कोठी स्त्री. १. धान्यागार; संग्रहालय; वखार; खजिना; हौद; रांजण : ‘पाण्याची कोठी एक मातीची’ - ऐरापु, विवि. २९७. २. कारखाना; पेढी; दुकान; खोली. ३. कोठीवरचा कामगार; कोठीवाला : ‘तरी स्वामींनी कोठी लवकर पाठवून तांदूल नेले पाहिजे.’ - पेद २७·१३०. ४. सैन्याची दाणागोट्याची बेगमी. ५. नळाचे पाणी साठवून किंवा बंदुकीतील बाराची दारू साठवून ठेवायची जागा. ६. शरीरातील भाग (हे ७२ आहेत) : ‘आता बाहत्तर कोठ्यांतील शुद्धि पिंडामध्यें’ - मोल्स्व. ७. (गौरीपूजन) धड; गौरीचा मुखवटा ज्यावर बसवतात तो भाग : ‘कनिष्ठेच्या कोठीवर नीट मुखवटा बसवून दिला.’ - मुखवटे १७५·८. साळी वगैरे ठेवण्याकरिता केलेली बांबूची लांबट व मोठी कणगी; लोखंडी पत्र्याची पाटी, पिंप. ९. मिठागरातील चौकोन, खाचर. १०. एक प्रकारचे गलबत. ११. गुरांचा गोठा : ‘वासरुवांची कोठी’ - स्थापो ७५. १२. धान्यादी सामग्री घेऊन येणाऱ्या बैलांचा तांडा किंवा पठारा. [क.], १३. (संगीत) भोपळा. (वीणा, सतार, तंबोरा इ. साठी वापरण्यात येणारा.), १४. सरकारी वाडा, घर; मोठ्या सरदार जहागीरदाराचा इमला; कचेरी : ‘साहेबांनीं महाराजांस देवासकरांचे कोठीवर तुम्ही कां गेला होता - म्हणून विचारले.’ - विक्षिप्त ३·१७१. १५. नाचगाणे करणाऱ्या स्त्रियांचे राहण्याचे ठिकाण. १६. चिलखताचा एक प्रकार.
कोठी खांबपद्धती   (भूशा.) खाणीतून चौकोनी खोल्या व आधारभूत खांब खोदून कोळसा काढण्याची पद्धत.
कोठीकरा पु. वखारीतील तांदळाच्या नासधुशीबद्दल अजमास करून जास्त वसूल केलेले धान्य.
कोठीभाडे न. १. रयतेने किल्ल्यावर धान्य नेऊन देण्याऐवजी त्यांच्यावर बसवलेला कर. २. धान्य किल्ल्यावर स्वतः पोचवण्याऐवजी दिलेली नेणावळ.
कोठीमहाल पु. सरकारी धान्याची वखार, कोठार.
कोठील वि. कोणत्या ठिकाणचा; कोठचा. [सं. क्व]

शब्द समानार्थी व्याख्या
कोठीवाला पु. १. पहा : कोठवळा. २. पेढीवाला; सावकार; व्यापारी.
कोठीवाले गवई   परंपरेने चालत आलेल्या तेवढ्याच चिजा म्हणणारे गवई. (कु.)
कोठून क्रिवि. कोणत्या ठिकाणा - स्थळा - वेळेपासून; कुठून.
कोठोन क्रिवि. कोणत्या ठिकाणा - स्थळा - वेळेपासून; कुठून.
कोठे न. पक्ष्याचे घरटे; पहा : कोटे : ‘कातणीने जाळें केलें पाकोळीने कोठे बांधले.’ - ज्योफु ३८५. (को.)
कोठे क्रिवि. १. कोणत्या ठिकाणी. २. (जोर दिला असता) कोणत्याही स्थळी; कोणीकडेही; कोठेही : ‘आणि नसतां पोटीं । कोठे काष्ट असे सृष्टी ।’ - राज्ञा १८·६००. ३. (चुकीने) कधी; केव्हा. [सं. कुत्र]
कोठे कोठे   काही काही ठिकाणी. [कोठेचे द्वि.]
कोठे मोठे   काही काही ठिकाणी. [कोठेचे द्वि.]
कोठेजणे अक्रि. वाळणे : ‘(नाटकूट वोषधी) कोठेजौनि जाति-’ विद १७.
कोठ्या   पहा : कोठी ७, कोठा
कोड न. १. कौतुक; लळा; लाड; कुरवाळणे (मूल, देव, प्रिय, वस्तू इ.); आवड; मौज; नाजूक रीतीने वागविणे; काळजीने जपणे. कौतुक शब्दाबरोबर योजतात : ‘जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें ।’ - ज्ञा ८·१७९. २. हौस; उत्कट इच्छा; हाव; उत्कंठा (ह्यात हेकेखोरपणा, हट्ट, तऱ्हेवाईकपणा गर्भित असतो.) ३. खेळाडूपणा; चैनी स्वभाव; आनंदीपणा; मजा; गंमत. ४. आश्चर्य, आनंद, नवल उत्पन्न करणारी गोष्ट : ‘ज्याच्या शरीरबळाचें कोड । एकला लक्षांवरी दे झड ।’ - एभा १७·१३९. (वा.) कोड पुरविणे - कौतुकाने हौस पुरविणे; लाड पुरविणे; पाहिजे असलेली वस्तू देऊन आनंदित करणे : ‘आवडी धरूनि करूं गेलों लाड । भक्तिप्रेम कोड न पुरेचि ।’ - तुगा ८७६. ५. कोडे; कूट; प्रश्न; गूढ. ६. (ल.) संकट; कष्ट : ‘कोडें थोडें तो करी नीर गोळा ।’ - अहमु ३०.
कोड स्त्री. २१ नग; कोडी; कोटी (वास्तविक २०); खंडी. [सं. कोटी]
कोड पु. न. १. महारोग; रक्तपिती. २. कातडीचा नैसर्गिक रंग जाऊन पांढरे डाग पडणे. [सं. कुष्ठ]
कोड न. कायदेपुस्तक; कायद्यांचा, नियमांचा संग्रह : ‘लष्करी कोड कुणालाच नाकबूल नाहीं.’ - के २२ । ७ । १९३०. [इं.]
कोडकी स्त्री. उडीचा एक प्रकार व खेळ. या खेळाचे तीन चार प्रकार आहेत. (ठाकरी)
कोडगा पु. लाथा, बुक्क्या इ. चा मार; हग्या मार. (क्रि. देणे.)
कोडगा वि. १. मार खाल्लेला; मारलेला; लतखोर. २. निर्लज्ज; निसुग; निसवलेला; कोटगा; निगरगट्ट. [क. कोट्टि = बेशरम]
कोडगा पु. भोवरा. पहा : कोटगा
कोडगेखाऊ वि. नेहमी हग्या मार खाऊनही दुर्गुण सोडीत नाही असा.
कोडगेला वि. काहीसा कोडगा; हट्टी.
कोडत न. न्याय देण्याची जागा; न्यायालय; कोर्ट : ‘कोडतांतूनहि मराठी भाषा काढण्याचा सरकार यत्न चालवीत आहे हें अगदीं गैर आहे.’ - निमा ४. [इं. कोर्ट]
कोडतसांव पु. पैलू. (गो.)
कोडता पु. न. १. (शेती) हातांनी हेटे (ढेकळे) फोडण्याचे हत्यार. २. (सुतारी) लाकडी ठोकणी; हातोडा. (बे.) [क. कोडिता]
कोडते पु. न. १. (शेती) हातांनी हेटे (ढेकळे) फोडण्याचे हत्यार. २. (सुतारी) लाकडी ठोकणी; हातोडा. (बे.) [क. कोडिता]
कोडपणे अक्रि. मारणे; शिक्षा करणे. (ना.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोडपा पु. कोपरा; आडबाजू : ‘एका कोडप्यातल्या खेडेगावात त्यांनी दिवस कसे कंठावेत?’ - आआशे २६९.
कोडपारधी स्त्री. खेळ म्हणून केलेली हरणादिकांची शिकार : ‘कोडपारधी हरणांरोहियां चितळांची’ - लीचपू २१०.
कोडबा वि. कोडबी वल्हवणारा.
कोडबाड स्त्री. कोंडी; वेढा; गराडा : ‘फिरंगी लोकांस कोडबाड झाली.’ - ऐपो २·५३.
कोडबी स्त्री. उलंडी असलेली मोठी होडी. (को.)
कोडबुळे न. १. भाजणीच्या पिठाचा तेलात तळून केलेला लांबट वर्तुळाकार खाद्यपदार्थ. २. संकीर्ण जातीचे; भेसळ जातीचे; जातिभ्रष्ट. (ग्रा.) [क. कोड = शिंग + बळ्ळी = बेली]
कोडबोळे न. १. भाजणीच्या पिठाचा तेलात तळून केलेला लांबट वर्तुळाकार खाद्यपदार्थ. २. संकीर्ण जातीचे; भेसळ जातीचे; जातिभ्रष्ट. (ग्रा.) [क. कोड = शिंग + बळ्ळी = बेली]
कोडबो पु. भात (धान्य) ठेवण्याचे होडीसारखे लाकडी पात्र. पहा : कोटंबा
कोडवो पु. भात (धान्य) ठेवण्याचे होडीसारखे लाकडी पात्र. पहा : कोटंबा
कोडबॉ पु. नदीकिनाऱ्यावर उगवणारे गवत. (गो.)
कोडम न. कोनाकार लाकूड; गाड्याच्या धुऱ्याला बांधलेले लाकूड. (व.)
कोडमा पु. लाड; फाजील लोभ. (व.)
कोडव पु. कुंपण : ‘चांपाटीयाचे कोडव कीजति’ - शिव ३१२.
कोडवळी न. कडबोळे.
कोडवादिने क्रिवि. प्रत्येक वस्तूची किंमत न ठरविता सरसकट कोडीची किंमत ठरवून (देणे, घेणे).
कोडवादीने क्रिवि. प्रत्येक वस्तूची किंमत न ठरविता सरसकट कोडीची किंमत ठरवून (देणे, घेणे).
कोडवाव स्त्री. कोरडी, कोरडवाहू जमीन; केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जमीन; पाणथळ किंवा बागाईत नसलेली जमीन.
कोडवाळ स्त्री. कडू मासळी; कडुवाळ. (गो.)
कोडवॅलॉ वि. कडू (गो.)
कोडिया पु. कुष्ठरोगी : ‘कोडिया न दिसे चंदनबरवा’ - नाम १८४७.
कोडिवरी वि. कोट्यवधी : ‘तियें कोडिवरी सगळीं । घेताति शस्त्रे’ - ज्ञा ११·३९१.
कोडीवारी संख्या वि. कोट्यवधी : ‘तियें कोडिवरी सगळीं । घेताति शस्त्रे’ - ज्ञा ११·३९१.
कोडिसवाणा वि. सुंदर; मनोहर; कौतुकवाणे; लहान; गोजिरवाणे : ‘ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा ।’ - ज्ञा ११·२९१. [सं. कूटसम]
कोडिसवाणी वि. सुंदर; मनोहर; कौतुकवाणे; लहान; गोजिरवाणे : ‘ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा ।’ - ज्ञा ११·२९१. [सं. कूटसम]
कोडिसवाणे वि. सुंदर; मनोहर; कौतुकवाणे; लहान; गोजिरवाणे : ‘ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा ।’ - ज्ञा ११·२९१. [सं. कूटसम]

शब्द समानार्थी व्याख्या
कोडी स्त्री. १. विसांची संख्या; खंडी (कापड, लोखंडी पत्रे, बांगड्या इ. मोजताना योजितात) : ‘इंगरेजी तरवारा उत्तम कोडी’ - पेद ८·५२. २. कोटी; शंभर लक्ष : ‘जे वर्षशतांचिया कोडी ।’ - ज्ञा ६·४६५. पहा : कोटि ३. अनेक पंक्ती : ‘आनंदें डोलति कोडी । विमानाचिया ।’ - ऋ ३६. ४. प्रकार; तऱ्हा : ‘कोडीअे असंख्यातु कळसु । जेथें मिर्वती गगना ।’ - धवळे १५. [सं. कोटी], ५. (भूमिती) उंची; खोली. [सं. कोटी]
कोडी वि. रक्तपित्या; कोड झालेला; महारोगी. [सं. कुष्ठ]
कोडीमोडी स्त्री. खोडीमोडी; अवयव आखडणे : ‘ते... वाये कोडीमोडी करूनि घातले असति’ - लीचपू ४३९.
कोडुळे न. कडबुळे. पहा : कोडबोळे (व.)
कडुवळे न. कडबुळे. पहा : कोडबोळे (व.)
कोडू पु. कात. (बे.)
कोडू स्त्री. चिरीमिरी; वानगी. (गो.)
कोडे न. १. अडचण; कोंडमारा; पेच; संकट : ‘कोडें सांकडें संकट । नाना संसार खटपट ।’ - दास ४·३·६. २. कूटस्थळ; गूढ प्रश्न; सांकेतिक भाषेतील प्रश्न; उखाणा : ‘आजि फिटले माझें कोडें ।’ - तुगा २२४०. ३. कुवेडे; करणी; जादूटोणा. ४. रहस्य; न कळणारी गोष्ट : ‘कृष्णाताई हे एक कोडं होतं.’ - रथ २३१. [सं. कूट] कोडे करणे - दुसऱ्यावर भुतेखेते वगैरेसारख्या वाममार्गाने अभिचार करणे : ‘...तेव्हा शिंद्यांकडील लोक कांही कोडें केलें म्हणून आळ घेऊन कटकटीस आले.’ - ऐलेसं ५१२८. कोडे घालणे - कठीण प्रश्न विचारणे; अडचणीत टाकणे. कोडे पडणे - काय करावे हे न सुचणे; अडचणीत सापडणे. कोड्यात टाकणे - काय करावे ते दुसऱ्याला न सुचेल असे करणे : ‘विरुबाईनी त्यांना कोड्यात टाकलं होतं.’ - राऊ ३३४. कोड्यात पडणे - काय करावे ते न सुचणे; प्रश्न पडणे. ५. प्रेम. ६. पणती (मातीची); दिवे लावणे. ७. डाक लावण्याच्या वेळी उपयोगात आणायचा समईवजा दिवा. [सं. कूट = मडके]
कोडेल वि. कोड आल्यासारखे अधूनमधून, तुटकतुटक, एकसारखे नसणारे. (व.)
कोडेवर्म न. कपट वृत्ती; कूट कर्म : ‘कासया करावें कोडेंवर्म । सत्यधर्म लपवूनी ।’ - भवि १४·१४.
कोडोळे न. १. पातेल्यात किंवा कढईत केलेले थालीपीठ (भाजणीचे). २. पहा : कोंडाळे
कोंडोळे न. १. पातेल्यात किंवा कढईत केलेले थालीपीठ (भाजणीचे). २. पहा : कोंडाळे
कोड्या वि. कुष्ठरोगी; महारोगी : ‘जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षित ।’ - मुरंशु २६०. [सं. कुष्ठ]
कोढ्या वि. कुष्ठरोगी; महारोगी : ‘जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षित ।’ - मुरंशु २६०. [सं. कुष्ठ]
कोढी वि. कुष्ठरोगी; महारोगी : ‘जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षित ।’ - मुरंशु २६०. [सं. कुष्ठ]
कोढळे न. भांडे : ‘बाइसीं : कोढळे पाहिलें :’ - लीचउ ६.
कोढी वि. हट्टी; दुराग्रही. (ना.) (वा) कोढी पडणे - कोंडी होणे; कोंडमारा होणे : ‘यामुळे संस्थानासी कोढी पडोन कांही ताखद नाहीसारखी झाली.’ - पेद २८·२०४.
कोढले   पहा : कोंढाळे : ‘कोढुले आणिलें : तवं तेल नाही’ - लीचउ ८.
कोण सना. १. प्रश्नार्थक सर्वनाम. अज्ञात माणसासंबंधाने विचारताना योजतात. २. कोणती; किती : ‘तेथें या कांबिटाचा गरिब गुण किती? प्रौढिही कोण येणें?’ - आसी ३२. ३. किती तरी; फार; अतोनात. ४. काय. [सं. कः पुनः]
कोण पु. १. कोपरी; कोन : ‘तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानीं आकाश लोपलें एके कोणी ।’ - भारा बाल ११·१७० [सं.], २. प्रसूती : ‘रुक्मिणीसी जाला कोणु । जन्म पावला मदनु’ - उह ३७२. ३. मुलगा : ‘तेही आपुलेया कोणातें (लेकाते) गोसावीयांते पाहावेया पाठवीले :’ - लीचउ २९९. (वा.) कोणी नीगणे - बाळंत होणे : ‘तवं तीए कोणीं नीगाली’ - लीचउ २०२. ४. (ज्यो.) लग्न, पंचम व नवम स्थान. [सं.]
कोणटा पु. कोपरी; कोन : ‘तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानीं आकाश लोपलें एके कोणी ।’ - भारा बाल ११·१७० [सं.]
कोन पु. प्रसूती : ‘रुक्मिणीसी जाला कोणु । जन्म पावला मदनु’ - उह ३७२. २. मुलगा : ‘तेही आपुलेया कोणातें (लेकाते) गोसावीयांते पाहावेया पाठवीले :’ - लीचउ २९९. (वा.) कोणी नीगणे - बाळंत होणे : ‘तवं तीए कोणीं नीगाली’ - लीचउ २०२.
कोनी पु. प्रसूती : ‘रुक्मिणीसी जाला कोणु । जन्म पावला मदनु’ - उह ३७२. २. मुलगा : ‘तेही आपुलेया कोणातें (लेकाते) गोसावीयांते पाहावेया पाठवीले :’ - लीचउ २९९. (वा.) कोणी नीगणे - बाळंत होणे : ‘तवं तीए कोणीं नीगाली’ - लीचउ २०२.
कोणएक सना. १. कोणीतरी एक. २. विशिष्ट किंवा एखादा माहीत असलेला मनुष्य, वस्तू.
कोणकोणटे अ. कोपऱ्याकोपऱ्यातून : ‘कोणकोणटें चौक झाडिला’ - गोप्र १९३.

शब्द समानार्थी व्याख्या
कोणकोष्टक न. (ग्रंथ). कोलन वर्गीकरणात वापरले जाणारे संकेतचिन्ह, चौकोनी कंस.
कोणगे न. पहा : कोनगे
कोणचा वि. १. दोन वस्तूंपैकी कोठला. २. जो तो; विवक्षित.
कोण जाणे   कोणास ठाऊक, माहीत; न कळे बुवा.
कोणताका सना. हवा तो; पाहिजे तो; कोणताही. (एकवचनी व अनेकवचनी प्रयोग)
कोणचाका सना. हवा तो; पाहिजे तो; कोणताही. (एकवचनी व अनेकवचनी प्रयोग)
कोणत्या तोंडाने क्रिवि. न शरमता; न लाजता, उघडपणे, उजळमाथ्याने; कसा (प्रश्नार्थक).
कोणत्या नाकाने क्रिवि. न शरमता; न लाजता, उघडपणे, उजळमाथ्याने; कसा (प्रश्नार्थक).
कोणत्यासी   कोणास : ‘येणें कोणत्यासी रोख दिलें ।’ - ब ५०३.
कोणदंड पु. खांबाचा वाटोळा दांडा.
कोणप न. १. कुणप; प्रेत. २. (ल.) तुच्छ, गलिच्छ वस्तू : ‘वरीते कश्मला कोणपा या ।’ - आसी २८. [सं. कुणप = प्रेत]
कोणपदार्थ वि. यःकश्चित; निंद्य; त्याज्य; क्षुद्र : ‘कोणपदार्थ स्त्रियांच्या जाती । अपवित्रा दुष्टिणी । पति असतां व्यभिचारिणी ।’ - पला ४३.
कोणपा पु. कोपरा, कोना. (बे.)
कोणपिका वि. कोपऱ्यात अगर घरात पिकलेला (आंबा, फणस इ.).
कोणबिंदु पु. कोनाच्या दोन बाजू ज्यात मिळतात तो बिंदू. [सं.]
कोणबिंदू पु. कोनाच्या दोन बाजू ज्यात मिळतात तो बिंदू. [सं.]
कोणय सना. कोणीही.
कोणय क्रिवि. कसाही. (गो.)
कोणव सना. कोणीतरी; कोणीहीं.
कोणसा वि. कोणीतरी; फलाणा; बोलणाऱ्याला माहीत नसलेला.
कोणाइत वि. पु. कोपऱ्यामधील; कोनाश्रित : ‘कोणाइत मार्कंडे उत्तरे वाडी’ - स्थापो ११.
कोणाक सना. कोणाला. (कु.)
कोणाचा कोण सना. (अज्ञात माणसासंबंधी, त्यांच्या नात्यागोत्यासंबंधी माहिती विचारताना) लांबचा नातेवाईक; बळेबळे संबंध जोडलेला. (यःकश्चित, फालतू माणसासंबंधी योजतात.)
कोणाच्या केरवळ्या   एक खाद्य; कोणफळ सोलून व उकडून त्यात मीठ घालून वाटून त्याच्या लाट्यात खोबऱ्याचा कीस, भुईमुगाचे दाणे यांचे पुरण भरून तळून काढतात.
कोणाश्म पु. (भुशा.) दीर्घकालीन खडकांचे अनेक कोचदार खंड नैसर्गिक लुकणक्रियेने एकत्र सांधले जाऊन बनणारा एकसंध खडक.

शब्द समानार्थी व्याख्या
कोणिष्ठी पु. कोष्टी; विणकाम करणारा : ‘दसिण दिसें कोणिष्ठिआचि वाडी’ - नागावशीला १·२१.
कोणी प्र. सना. १. कुणी; कोणी एक; कोणीतरी; कोणीही : ‘नये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी ।’ - राम १२१. नकारवाचक विधानात पूर्ण अभावदर्शन. २. कोणतीही : ‘हातीचा बाण जाई तव कोणी तजवीज?’ - ऐकोपुर.
कोणी वि. कोणी एखादा; वाटेल तो; हवा तो.
कोणीकडणे क्रिवि. १. कोणत्या ठिकाणाहून - दिशेहून - बाजूकडून. २. कसेही; कोणत्याही प्रकारे.
कोणीकडून क्रिवि. १. कोणत्या ठिकाणाहून - दिशेहून - बाजूकडून. २. कसेही; कोणत्याही प्रकारे.
कोणीकडे क्रिवि. कोणत्या बाजूला, दिशेला, ठिकाणी.
कोणीका सना. १. हवा तो; पहिजे तो. २. भिकार; यःकश्चित; उपेक्षणीय.
कोणीतरी सना. १. कोणीही; कुणीतरी. २. यःकश्चित; नालायक; भिकार.
कोणीही सना. १. वाटेल तो, त्याने. २. पहा : कोणीच
कोणे न. १. खोली; अंतर्गृह. [क.], २. गुरांच्या कानात होणारा एक रोग. यामुळे गुरांच्या कानातून पाण्यासारखा पू वाहत असतो.
कोणेकवजा वि. कोणत्याही प्रकारचा.
कोणेकोणी क्रिवि. प्रत्येक कोपऱ्यात; अडचणीत. पहा : कोनी
कोण्या प्र. सना. कवण्या; कोणत्या : ‘विरक्तें असावें कोण्या गुणें ।’ दास ६·९·१. (वा.) कोण्या, कोणत्या झाडाचा पाला असणे - कसपटाप्रमाणे लेखणे : ‘नवरा म्हणजे कोणत्या झाडाचा पाला?-’ खु २५.
कोत पु. १. भाला; त्याचे पाते : ‘घायीं कोंत न जिरे ।’ - ज्ञा १३·५३८. २. वेळूचा, बांबूचा कोंब. (बे.).
कोत न. १. माडाच्या किंवा ताडाच्या पोयीचे अग्र; गाभ्याचे टोक (टोक कापून नंतर त्यातून रस काढण्यासाठी तेथे मडके लावतात.) २. अणकुचीदार टोक. [को.]
कोत स्त्री. कुवत; शक्ती. (कु.) [फा. कुव्वत]
कोतकार पु. भालाईत.
कोतकांती स्त्री. भाला; एक शस्त्र : ‘लांगूल सागर कटारें । कोतकांती ईट तोमरें । - कथा २·११·१४.
कोतमीर   पहा : कोथिंबीर (कुण.)
कोतरखळ्या स्त्री. घळी; भेगा : ‘... यमुनेच्या संगमीं दीस धरून रहावे, तरी ते जागा जबून. कोतरखळ्या फार.’ - ब्रच २३.
कोतरा पु. नदीच्या किनाऱ्याला प्रवाहामुळे पडलेले खोल खड्डे.
कोतारा पु. नदीच्या किनाऱ्याला प्रवाहामुळे पडलेले खोल खड्डे.
कोतल वि. १. रिकामे; राखीव. (व.) २. जरुरीपेक्षा जास्त.
कोतल पु. कोतवाली घोडा; शृंगारलेला घोडा (मिरवणुकीचा) : ‘कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किस्त करित ।’ - ऐपो २००. [हिं.]

शब्द समानार्थी व्याख्या
कोतल अंदीशी   अदूरदर्शित्व.
कोतवार   पहा : कोतवाल ३
कोतवाल पु. १. मराठी साम्राज्यातील नगररक्षकांचा मुख्याधिकारी; शहराचा मुख्य संरक्षक अधिकारी; फौजदार; पोलिस अधिकारी; कोकणात पोलिस-उपनिरीक्षकाला कोतवाल म्हणत असत. मराठी राज्यात याला कज्जे तोडणे, बाजारातील वस्तूंचे भाव ठरविणे, खरेदी विक्रीचे दस्त ऐवज नोंदणे इ. कामे असत. २. गावात जेवणाचे अथवा इतर समारंभाचे आमंत्रण करणारा अधिकारी; बोलावणेकरी : ‘-निमंत्रणे करण्यास कोतवालास द्यावी.’ - ऐरापुत्र ९·४५९ (बडोदे-काशी). सरकारी काम करणारा गावमहार. (व.) ३. (ल.) कायद्याचा बडगा : ‘पुढाऱ्यांनीं त्यांच्यावर कोतवाल फिरवल्यानंतर’ - के ६·२·१९४०. [फा.], ४. नित्योपयोगापेक्षा जास्त संग्रह केलेला पदार्थ. [हिं.], ५. पोपटाएवढा एक काळा पक्षी. याला कोळसा असेही म्हणतात. याची शेपटी दुभागलेली असते. हा पक्षी लहान असून कावळा, घार वगैरे पक्ष्यांनाही हाकून देतो.
कोतवालघोडा पु. १. मिरवणुकीपुढे शृंगारून चालविलेला घोडा : ‘कोतवालतेजी धावा घेती ।’ - ऐपो. पहा : कोतल. २. (ल.) शोभेसाठी वापरावयाचे अलंकार, ठेवणीतील कपडे इ.
कोतवाली स्त्री. १. कोतवाल कचेरी; कोतवालाचा कारभार, खाते. २. शहर जकात; बाजारपट्टी. ३. पोलिसचौकी; नाके; चावडी : ‘सहा महिने पायात बिड्या ठोकून एकेक महिना एकएक कोतवालीवर त्यास बसविला-’ - विक्षिप्त १·८८. (बा.) ४. कोतवालाचा खर्च भागविण्यासाठी बसविलेले कर.
कोतवाली वि. कोतवालासंबंधी; फौजदारी.
कोतवालीचा पोषाख   सणासुदीला घालायचा उंची, ठेवणीतील पोषाख.
कोतवाली पिंजरा   कैदखाना; तुरुंग : ‘कोणास बेशुद्ध होईपर्यंत मार देण्यांत आला व कोतवाली पिंजऱ्याची भरती करण्यांत आली’ - विक्षिप्त १·७३.
कोतळे   आतडे; कोथळा : ‘घाई वाटती कोंतळी ।’ - उह १४०६.
कोता वि. जरुरीपेक्षा आखूड; अपुरा; लांडा; त्रोटक; लहान; तुटका; कमती; तुटपुंजे; संकुचित : ‘आमचें ज्ञान किती कोतें आहे पहा.’ - गीर २४६. [फा.]
कोताई स्त्री. आखूडपणा; अपुरेपणा; कमताई; कोतेपणा : ‘वसूल घेण्यास सख्ती करिता कोताही केली नाही.’ - ऐटि ५·११. [फा.]
कोताही स्त्री. आखूडपणा; अपुरेपणा; कमताई; कोतेपणा : ‘वसूल घेण्यास सख्ती करिता कोताही केली नाही.’ - ऐटि ५·११. [फा.]
कोतान्देसी वि. अदूरदृष्टी; अविचारी : ‘परंतु रांगडे कोतांदेसी आहेत.’ - पेदभा २९·१६९.
कोते अंदेशा वि. अदूरदृष्टी; अविचारी : ‘परंतु रांगडे कोतांदेसी आहेत.’ - पेदभा २९·१६९.
कोतायरक न. कोते हत्यार; आखूड पल्ल्याचे हत्यार. (क.) कोते हतेरा पोचणे - प्रत्यक्ष हाताला हात भिडवून लढाई होणे : ‘दोन वेला पठाण चालोन कोते हातेरास पोहोचले.’ - हिंदखं १·४१.
कोतार न. वैर; भांडण. (कु.)
कोतासिला पु. तरवार, भाल्यासारखे आखूड पल्ल्याचे हत्यार.
कोतिक   कौतुक : ‘देवने कोतिक पुरीन ।’ - कला १५.
कोतियाळ वि. कोयता (शस्त्र) घेतलेला (वीर) : ‘येक धावती आगळें । लोहागळे कोतियाळ । फरशधर ।’ - कालिका २२·७.
कोती स्त्री. वरईची एक जात. हिचा दाणा पांढरा असतो; एक तृणधान्य.
कोती अंदेशा   अदूरदृष्टीपणा; अविचार : ‘कोती अंदेशा करून तुम्ही निजाम हस्तीखान यांस जाऊन भेटला.’ - पेद २०·१३३.
कोतेकर पु. भालाईत. पहा : कोतकारू : ‘पैले कोतेकारा । जवळिके चाला ।’ - शिव ५६४; ‘सेले साबळे कोतेकर । धनुर्धर पायाचे ।’ - एरुस्व ८·१३. [सं. कुंत + कार]
कोतेकार पु. भालाईत. पहा : कोतकारू : ‘पैले कोतेकारा । जवळिके चाला ।’ - शिव ५६४; ‘सेले साबळे कोतेकर । धनुर्धर पायाचे ।’ - एरुस्व ८·१३. [सं. कुंत + कार]
कोतो पु. पाणी काढण्याच्या लाठीचा कोळंबे अडकविण्याचा बांबू. (कु.) [क. कोट्ट = बांबूची नळी]
कोत्त पु. जुडगा; घोस. (तंजा.) [क. कोत्तु]

शब्द समानार्थी व्याख्या
कोत्ता पु. गवंडी. (तंजा.) [त. कोलुतुकार]
कोत्फ न. स्त्री. बंदुकीच्या नळीवर किंवा दस्त्यावर केलेले नक्षीकाम किंवा मिन्याचे काम.
कोत्फगारी न. स्त्री. बंदुकीच्या नळीवर किंवा दस्त्यावर केलेले नक्षीकाम किंवा मिन्याचे काम.
कोथ पु. १. अरबी समुद्रात मिळणारा एक मासा : ‘ह्यातील काही जाती म्हणजे कोथ, घोळ... ह्या होत.’ - महासागर १५३. २. (वै.) शरीरावयव कुजणे, सडणे. [सं.]
कोथ न. (शाप.) सडणे; कुजणे. [सं. कुथ् = कुजणे]
कोथरा   पहा : कोतरा : ‘महीकाठी कोथरे भारी आणि अवघड ठिकाण पाहून वाटा रोवून बसले आहेत.’ - पेद ३६·२५५.
कोथळ पु. शरीर, डोके नसलेले धड : ‘बाण लागोनिया चरणीं । कोथळ उलंडति धरणी ।’ - मुआदि ३२·५३.
कोथळा पु. १. मोठे पोते; थैला (धान्याचा, दारूचा) : ‘माझ्या हातांतली चूड इथल्या कोथळ्याला लावली की पुरे!’ - सूर्योदय १७६. २. मोठा माणग्याचा कणगा, पालटे (धान्य ठेवण्याचे); मध्ये रुंद व वर निमुळते, सामान्यतः एका प्रकारच्या बरणीसारखे, धान्य वगैरे ठेवण्यासाठी केलेले मातीचे भांडे : ‘जैसें धान्यें कोथळेयामध्यें साटविती ।’ - ऋ ७५. ३. पोट (पक्वाशय); पोटातील कोठा; पोटातील कोठ्याभोवतालचे मांसाचे आवरण. ४. शरीरातील कोणतीही पिशवी; कोश. जसे :- अन्नाचा कोथळा; मूत्राचा कोथळा. ५. भोत; (उशीची) खोळ; अभ्रा. ६. जनावरे विताना बाहेर पडणारी आतडी, गुह्यभाग.
कोथळी स्त्री. १. (मुंबई) ६ मणाची गोणी; ६७२० सुरती भारांचे वजन. २. थैली. ३. लहान कोथळा; रांजण; मातीची कणगी; लहान पोते. इतर बहुतेक अर्थ कोथळ्याप्रमाणे. ४. हावरी अथवा तिळाच्या झाडांची गंजी (व.) ५. महालक्ष्मीचा मुखवटा बसविण्याकरिता केलेली मातीची वाटोळी व पोकळ उंच बैठक; खापराचे धड. (व. ना.)
कोथळे   शस्त्रसमूह : ‘माथे भरत्यांति कोथळी । घाई लहुडिचां ।’ - शिव ९६९.
कोथंबरी स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथिबरी स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथंबिरी स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथिबिरी स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथंबीर स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथिबीर स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथमीर स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथरीब स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथुंबिरी स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथुंबुरी स्त्री १. धन्याचे रोप. हे उगवून कोथिंबीर व्हायला १५ दिवस लागतात. कोथिंबीर कोवळी असताना तिची पाने व देठ भाजीपाल्यात घालतात. याचा एक विशेष स्वाद असतो. धने मसाल्याच्या उपयोगी आहेत. २. धने : ‘लसुण मिरची कोथुंबिरी । अवघा माझा जाला हरी I’ - सावता -३५ [सं. कुस्तुंबरी]
कोथंबरी देवी   देवीच्या रोगाचा एक प्रकार.
कोथंबरीबाळी स्त्री. कानात घालायच्या बाळ्यांचा एक प्रकार. याला कोथिंबिरीच्या दाण्याच्या आकाराचे मोत्यांचे घोस जोडलेले असतात : ‘कोथिंबिरी टोपण घोंसबाळ्या ।’ - सारुह ६·२४.
कोथंबरी भात   भाता (साळी)ची एक जात. (को. कु.)
कोथा पु. पाणी काढण्याच्या लाठीच्या कोळंब्याची काठी; ओकतीची काठी (कु.) पहा : कोतो
कोथामेथा पु. १. पहा : कोथेमेथे. २. समुच्चयार्थी किरकोळ धान्य.

शब्द समानार्थी व्याख्या
कोथिरे न. एक प्रकारचे गवत : ‘आकाशात तारे कोथिराच्या आणि पोह्याच्या तुऱ्याप्रमाणे चमकू लागले.’ - सराई ६२.
कोथेरे न. एक प्रकारचे गवत : ‘आकाशात तारे कोथिराच्या आणि पोह्याच्या तुऱ्याप्रमाणे चमकू लागले.’ - सराई ६२.
कोथी स्त्री. लाकडी कुदळ. (ठा.)
कोथेमेथे न. धने, हिंग, मेथी इ. जिन्नसांचा समुच्चय. (को.)
कोद पु. तीळगूळ.
कोदया पु. कुंड (भांडे). (व.)
कोदरणे स्त्री. उकरणे. (बे.) [सं. कु. = पृथ्वी + दृ = विदारणे.]
कोदरा वि. चोरटा. (नंद)
कोदरू   पहा : कोद्रव : ‘कोंबड्याने लवकर आरवू नये म्हणून त्याला कोदरू खायला घालू लागली.’ - ओदे ६०.
कोदवा पु. एक प्रकारचा दगड : ‘सीरसाळा : कोदवा : मुरुंबाळा’ - लीचउ ३३५.
कोदळे न. थालीपीठ. पहा : कोडोळे
कोदंड न. १. धनुष्य : ‘आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं ।’ - ज्ञा ३·१८९. २. (ल.) भुवई. ३. (ल.) मोठे संकट (रावणाच्या छातीवर शिवकोदंड पडल्याने तो कासावीस झाला त्यावरून). पहा : रामकोदंड [सं.]
कोदंड वि. उद्धट; दांडगा; भांडखोर; बेपर्वा.
कोदा पु. हलके व घाणीचे काम; काबाडकष्टाचे काम; कुत्तेघाशी. बहुधा अव. प्रयोग - कोदे (क्रि. करणे, निपटणे, उपसणे, पडणे.).
कोदवणे अक्रि. गुदप्रक्षालन करणे; ढुंगण धुणे. २. कोदा उचलणे, करणे. (कु. राजा.) पहा : कोदा
कोदावणे अक्रि. गुदप्रक्षालन करणे; ढुंगण धुणे. २. कोदा उचलणे, करणे. (कु. राजा.) पहा : कोदा
कोदुणे अक्रि. गुदप्रक्षालन करणे; ढुंगण धुणे. २. कोदा उचलणे, करणे. (कु. राजा.) पहा : कोदा
कोदील वि. ठिसूळ.
कोदे न. एक धान्य : ‘कोदेया भातेया (उड्या) पडतील.’ - लीचउ ४४८.
कोदो न. एक धान्य : ‘कोदेया भातेया (उड्या) पडतील.’ - लीचउ ४४८.
कोदेभाते पु. अव. हलकीसलकी, कष्टाची कामे : ‘रायाचीया राणिया कोदेभाते पडतील.’ - लीचउ १८९.
कोद्रव पु. एक प्रकारचे हलके धान्य; हरीक. सर्व धान्यातील हे हलके धान्य असून गरिबांशिवाय ते दुसरे कोणी खात नाहीत. कितीही निकस जमिनीत हे पिकते. [सं. कोद्रव]
कोद्रू पु. एक प्रकारचे हलके धान्य; हरीक. सर्व धान्यातील हे हलके धान्य असून गरिबांशिवाय ते दुसरे कोणी खात नाहीत. कितीही निकस जमिनीत हे पिकते. [सं. कोद्रव]
कोद्रा पु. एक विषारी तृणधान्य : ‘खळ्यातले विषारी हरीक (कोद्रा या नांवाचे धान्य) त्याच्या गाढवांनी खाल्ले नि त्यातली दोन गाढवें..... मेली.’ - सोबत ११७.
कोद्री   लहान खडा. (पूर्वविदर्भातील विवाह १८२३)

शब्द समानार्थी व्याख्या
कोधळे न. भांडे : ‘मग इंद्रभटासरिसे एक तुपाचें कोधळे घेउनि एत होते :’ - लीचउ ८९.
कोन पु. १. (भूमिती) दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात ती आकृती. याचे लघुकोन, काटकोन, विशालकोन असे प्रकार आहेत. २. कोपरा. ३. पागोट्याचा एक प्रकार : ‘कोन पाठविला आहे. घेणे.’ - ब्रच २९. ४. जागा; जमिनीचा लहान तुकडा; ‘कान द्यावा पण कोन देऊ नये.’ - एहोरा ९·२९. ५. प्रसूती, बाळंतपण (ह्या प्रसंगी स्त्री घराच्या कोपऱ्यात - बाजूला जाते यावरून) ६. बाळंतिणीची वस्त्रे, खाटले, भांडीकुंडी इ. सामान; बाळंते. ७. ठेवण्याची राहण्याची जागा. उदा. देवाचा कोन = देवघर (बे.) [सं. कोण] (व.) कोन , कोण होणे, निघणे - बाळंत होणे, प्रसूत होणे. (वि. प्र.) कोनी निघणे, कोन येणे - बाळंत होणे. हे प्रयोग सर्वमान्य आहेत. : ‘मग ते गरोदर होऊनि कोनी निघाली’ - पंच ३.
कोण पु. १. (भूमिती) दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात ती आकृती. याचे लघुकोन, काटकोन, विशालकोन असे प्रकार आहेत. २. कोपरा. ३. पागोट्याचा एक प्रकार : ‘कोन पाठविला आहे. घेणे.’ - ब्रच २९. ४. जागा; जमिनीचा लहान तुकडा; ‘कान द्यावा पण कोन देऊ नये.’ - एहोरा ९·२९. ५. प्रसूती, बाळंतपण (ह्या प्रसंगी स्त्री घराच्या कोपऱ्यात - बाजूला जाते यावरून) ६. बाळंतिणीची वस्त्रे, खाटले, भांडीकुंडी इ. सामान; बाळंते. ७. ठेवण्याची राहण्याची जागा. उदा. देवाचा कोन = देवघर (बे.) [सं. कोण] (व.) कोन, कोण होणे, निघणे - बाळंत होणे, प्रसूत होणे. (वि. प्र.) कोनी निघणे, कोन येणे - बाळंत होणे. हे प्रयोग सर्वमान्य आहेत. : ‘मग ते गरोदर होऊनि कोनी निघाली’ - पंच ३.
कोन   पहा : कोंडा (व.)
कोन पु. एक कंद व त्याची वेल. हा कांदा गोराडूसारखा असतो : ‘(गोराडूचे कंदास) कोकणात कोनफळ व नारमिगे म्हणतात.’ - फचि ८४.
कोनकर   पहा : कोतकर
कोनकार   पहा : कोतकर
कोनकोपरा पु. १. सांधीकोंदी; एका कडेची बाजू; अडगळ; सहज लक्षात न येणारी जागा. २. टेंगूळ; पुढे आलेला फुगीर भाग.
कोनाकोपरा पु. १. सांधीकोंदी; एका कडेची बाजू; अडगळ; सहज लक्षात न येणारी जागा. २. टेंगूळ; पुढे आलेला फुगीर भाग.
कोनकोपरा पु. आवडनिवड : ‘तैसा कोनकोपरा । नेणे जीउ ।’ - ज्ञा १३·३६.
कोन खिळण   (यंत्र) सरळ आणि लांब कोनातील बाजू तपासणीचा मापक.
कोनगे न. दरीतील तुटलेल्या कड्याला वा मोठ्या फांदीला लागलेले मधाचे पोळे; कोंगे; मधाच्या पोळ्याची एक जात; कोणगे. (गो.)
कोनट पु. कुणब्यासाठी वापरला जाणारा निंदाव्यंजक शब्द. (को.)
कोना पु. कुणब्यासाठी वापरला जाणारा निंदाव्यंजक शब्द. (को.)
कोन्या पु. कुणब्यासाठी वापरला जाणारा निंदाव्यंजक शब्द. (को.)
कोनटा पु. १. कोपरा. २. घरातील अंधारी जागा : ‘देऊळाची दक्षिण कोनटा आसन - स्थापो ३८ (व. ना.)
कोणटा पु. १. कोपरा. २. घरातील अंधारी जागा : ‘देऊळाची दक्षिण कोनटा आसन - स्थापो ३८ (व. ना.)
कोनटोपर न. कानटोपी; कान्होळे. (व.)
कोनडा पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनडे पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनाडा पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनाडे पु. न. सामान ठेवण्याकरिता भिंतीत केलेली जागा; देवळी; गोखला.
कोनपट न. (कोनचे हीनत्वदर्शक रूप.) १. कोपरा. २. (ल.) एकीकडची, एकान्ताची जागा; आड बाजू.
कोनपडा   पहा : कोनपट
कोनपालट पु. १. दुखणेकऱ्यास आराम पडण्यासाठी निजण्याची जागा बदलणे. २. व्यालेल्या मांजरीने आपल्या पिलांचे स्थलांतर करणे. (क्रि. करणे.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोनफळी स्त्री. दोन भिंतींच्या कोपऱ्यात बसविलेली फळी : ‘घरातल्या अंधाऱ्या कोनफळीवरचा डबा काढताना’ - काजवा ४. (को.)
कोनबिंदु पु. (भूमिती) त्रिकोणाचा शिरोबिंदू पहा : कोणबिंदु , कोणबिंदू
कोनबिंदू पु. (भूमिती) त्रिकोणाचा शिरोबिंदू पहा : कोणबिंदु, कोणबिंदू
कोनमापक पु. (भूमिती) कोन मोजण्याचे उपकरण. हे आकृत्या काढणे आणि जमिनीचे भाग पाडणे यासाठी उपयोगात येते.
कोनमापी पु. (भूशा.) स्फटिकाच्या कोणत्याही दोन बाजूंमधील कोन मोजण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण. भूमितीत वापरल्या जाणाऱ्या कोनमापकापेक्षा हे वेगळे असते. याचे अनेकविध प्रकार असतात.
कोनवासा पु. घराच्या दोन पाख्यांच्या सांध्यावर आढ्यापासून छपराच्या कोपऱ्यापर्यंत घातलेला मोठा वासा : ‘कोनवाशाचा कठीण सर त्याने ताकदीने नि कसबाने बसवला.’ - तोरण ३६५. (को.)
कोनवृत्त न. (ज्यो.) ईशान्य किंवा वायव्य वेधवलय किंवा वेधवृत्त.
कोनशिला स्त्री. १. इमारतीच्या बांधकामाला आरंभ करण्यापूर्वी तिच्या जागेवर समारंभपूर्वक ठेवलेला पहिला दगड; पायाचा दगड. (वा.) कोनशिला बसवणे - समारंभपूर्वक इमारतीच्या पायाचा दगड बसवणे. २. महत्त्वाचे तत्त्व; आधारभूत तत्त्व. उदा. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे ही भारतीय घटनेची कोंनशिला आहे.
कोनसो पु. कोपरा; कोन. (गो.)
कोना पु. १. कोनशिला. २. कोपऱ्याचा घडीव दगड. ३. कोपरा : ‘गोसावी... कोनेसी दडले’- गोप्र २८०. ४. घराच्या आढ्यावर किंवा कोनवाशावर घालण्याचे चापट कौल. ५. कोनवासा. [सं. कोण], ६. (यंत्र.) बोथटीकरण; कुठलीही कड लागू नये म्हणून बोथट करण्याची क्रिया.
कोना वि. एक प्रकारचा झंझावात : ‘हवाई भागात दक्षिणेकडून वाहणारे झंझावती वारे आहेत. त्यांना कोना वारे असे म्हणतात.’- महासागर ४५.
कोनाइड वि. (ग.) शंकूच्या आकाराचा (पदार्थ, आकृती).
कोनात्मक वि. कोनासंबंधी; कोनाचे.
कोनात्मक अंतर   वर्तुळाच्या भागामध्ये मोजायचे अंतर; वर्तुलखंड.
कोनाचे अंतर   वर्तुळाच्या भागामध्ये मोजायचे अंतर; वर्तुलखंड.
कोनासन न. आसनाचा एक प्रकार. उभे राहून दोन पायांमध्ये अंतर ठेवणे. उजवा हात वर करून डाव्या पायाच्या अंगठ्याला लावणे तसेच या उलट करणे. [सं. कोण + आसन]
कोनांक पु. (ज्यो.) सूर्य, तारे किंवा इतर ग्रह हे क्षितिजाच्या ज्या बिंदूत उगवतात किंवा मावळतात तो बिंदू आणि क्षितिजावरील पूर्व किंवा पश्चिम बिंदू ह्यांच्यामध्ये सापडणारा कंस; दिगंश.
कोनिता स्त्री. १. सकोन असण्याची स्थिती, कोनीयता. २. (भूशा.) संशकली खडकातील कणांच्या पृष्ठभागाची गोलाई किंवा खडबडीतपणा दर्शवणारी संज्ञा.
कोनी स्त्री. मासे धरण्याकरिता निमुळती विणलेली बांबूची नळकांडी. (ही कोनासारखी असते म्हणून.) [सं. कोण]
कोनी वालुकाश्म   बारीक, काटेरी, टोचणारी वाळू.
कोनीय संदेश   (ग.) चक्रीय गतीची तीव्रता मोजण्याचे चलनत्रिज्या परिमाण.
कोने न. १. हत्ती, उंट, म्हैस, गाय इ. जनावरांच्या पायांना, कानाला किंवा एखाद्या सांध्यात होणारा एक रोग. पहा : कोणे [सं. कोण], २. अंबाडीच्या काड्यांची जुडगी, बिंडे (माण.) [क. कोने = झाडाची फांदी, काटकी]
कोनेपिछाने पु. कोनेकोपरे : ‘कोनेपिछाने देखील तो अक्षरशः वाचून पाहिला.’ - ऐलेसं १७५२.
कोनोलिथ पु. (भूशा.) सापेक्षतः लहान पण आकारहीन अंतर्वेशी अग्निज खडक.
कोन्टा पु. कोपरा. (मा.) पहा : कोनटा

शब्द समानार्थी व्याख्या
कोन्याकोपऱ्याचा वि. १. सांधीकोंदीतला; कोठला तरी. २. (ल.) क्षुद्र; हलका.
कोन्हे न. मधाचे पोळे. पहा : कोनगे
कोन्हेक   कोणी एक : ‘कोन्हेकें वानरें फळे खाउं लागली.’ - पंचो ४·२२.
कोप पु. १. दुसऱ्याच्या अपराधामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी रागीट वृत्ती; राग; क्रोध : ‘तुमच्या कोपें कोठें जावें ।’ - तुगा ११६५. २. पहा : प्रकोप. (वा.) कोपास चढणे - रागावणे; कोप येणे; संतापणे : ‘गांगेय कोपा चढला कसा रे ।’ - वामन भीष्मप्रतिज्ञा १०.
कोप पु. न. १. कुजलेली, गंजलेली, किडलेली व्रणाची जागा (फळ, काष्ठ, पाषाण इत्यादीची). २. (सामा.) दोष; विकार; व्यंग. [सं. कुप्]
कोप स्त्री. न. १. झोपडे (शेतातील गवत, पानांचे); वृक्षाची ढोली; खोपटी; कुटी; मांडव; मंडपी : ‘तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥’ - ज्ञा १३·७८६. २. (ल.) घर : ‘लावि आंत ठाऊनि कोपट ।’ - अमं ४·४ : ‘म्हणौनि मठाचे दारिं कोंपि करुनि असावें ।’ - पंच १·२८. ३. (ल.) शरीर : ‘काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥’ - तुगा ६८२. [क. कोप्प = खोपटी, खेडे]
कोपी स्त्री. न. १. झोपडे (शेतातील गवत, पानांचे); वृक्षाची ढोली; खोपटी; कुटी; मांडव; मंडपी : ‘तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥’ - ज्ञा १३·७८६. २. (ल.) घर : ‘लावि आंत ठाऊनि कोपट ।’ - अमं ४·४ : ‘म्हणौनि मठाचे दारिं कोंपि करुनि असावें ।’ - पंच १·२८. ३. (ल.) शरीर : ‘काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥’ - तुगा ६८२. [क. कोप्प = खोपटी, खेडे]
कोपट स्त्री. न. १. झोपडे (शेतातील गवत, पानांचे); वृक्षाची ढोली; खोपटी; कुटी; मांडव; मंडपी : ‘तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके ॥’ - ज्ञा १३·७८६. २. (ल.) घर : ‘लावि आंत ठाऊनि कोपट ।’ - अमं ४·४ : ‘म्हणौनि मठाचे दारिं कोंपि करुनि असावें ।’ - पंच १·२८. ३. (ल.) शरीर : ‘काय करू उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥’ - तुगा ६८२. [क. कोप्प = खोपटी, खेडे]
कोपट वि. कोपिष्ट; रागीट; चिडखोर. [सं. कोप]
कोपणे अक्रि. रागावणे. [सं. कोप]
कोपर पु. भुजा आणि हात यांच्या मधल्या सांध्याचे मागील टोक. [सं. कूर्पुर] (वा.) कोपराढोपराने करणे - (बायकी) कसे तरी करून कष्टाने, आयासाने (घरकाम) करणे. कोपराढोपराने चालणे, जाणे - मोठ्या नेटाने संकटातून तरून जाणे, कसेबसे काम पुरे पाडणे. (कमजोरी, अशक्तता असताना). कोपराने खणणे - सवलतीचा प्रमाणाबाहेर फायदा घेणे; अतिरेक करणे. कोपरापासून हात जोडणे - अति कळवळ्याने विनवणे. कोपरापासून नमस्कार - १. वरील अर्थ. २. यापुढे संबंध नसेल तर बरे अशा अर्थी.
कोपर   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोपरा   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोपरी   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोहोपरा   १. स्त्री. भाकरीचे पीठ मळायची मोठी परात (तांब्या-पितळेची); थाळी; सनकी; पितळी. लहान कोपराला कोपरी म्हणतात. (कु.) २. हंडा; रुंद तोंडाचे भांडे. लहान लोखंडी कढई (व. ना.) [सं. खर्पर]
कोपरकात्री स्त्री. उपयोगात येणारी वाकड्या पात्याची कात्री.
कोपरखळी स्त्री. १. कोपराने मारलेली ढुसणी, ढुसकणी. (क्रि. मारणे, देणे.) २. कोपराने पाडलेला खळगा. (हा गुराख्यांचा खेळ असतो. अशा खळग्यात ती पोरे गोट्यांनी खेळतात.) (क्रि. पाडणे.) ३. (ल.) लेखात, भाषणात उगाच दुसऱ्यावर घेतलेले तोंडसुख; जाता जाता, सहजासहजी एखाद्याविरुद्ध बोलणे; ताशेरा.
कोपरखिळी स्त्री. १. कोपराने मारलेली ढुसणी, ढुसकणी. (क्रि. मारणे, देणे.) २. कोपराने पाडलेला खळगा. (हा गुराख्यांचा खेळ असतो. अशा खळग्यात ती पोरे गोट्यांनी खेळतात.) (क्रि. पाडणे.) ३. (ल.) लेखात, भाषणात उगाच दुसऱ्यावर घेतलेले तोंडसुख; जाता जाता, सहजासहजी एखाद्याविरुद्ध बोलणे; ताशेरा.
कोपरदुटी स्त्री. कोपरे आणि गुडघे पोटाशी धरून झाकण्यापुरते वस्त्र : ‘स्नानकुंडली कां कोपरदुटी पांगुरावी :’ - लीचउ १३७.
कोपरघुसणी स्त्री. (गोट्यांच्या खेळातील एक शब्द) कोपराने गोटी गलीत घालणे. पहा : कानघुसणी
कोपरबरास न. १. तांबे व पितळ यांचा मिश्र धातू. २. टीनचा धातू. कोपरबरासचा डबा = केरोसिनचा (टिनचा) डबा (कु.) ३. जर्मन सिल्व्हर [इं. कॉपर + ब्रास]
कोपरबास न. १. तांबे व पितळ यांचा मिश्र धातू. २. टीनचा धातू. कोपरबरासचा डबा = केरोसिनचा (टिनचा) डबा (कु.) ३. जर्मन सिल्व्हर [इं. कॉपर + ब्रास]
कोपरमोड वि. कोपरासारखी मोडलेली (जागा). (व.)
कोपरवाळी स्त्री. बाजूबंद; एक दागिना. (व.)
कोपरा पु. १. कोन; उपदिशा. २. (वास्तु.) दोन भिंतीच्या सांध्यातील, दर्शनी काटकोनातील चौरस दगड. [सं. कूर्परौ] (वा.) कोपरा धरणे - १. रुसणे. २. विटाळशी असणे.

शब्द समानार्थी व्याख्या
कोपरी स्त्री. १. तळहातापासून कोपरापर्यंत ४० अगर जास्त वेढे देऊन सुंभासारख्या दोरीची केलेली गुंडाळी : ‘त्या दिवशी सुंभाची कोपरी आणून छपराची डागडुजी करीत होता.’ - रथ २५५. २. गोट्यांच्या खेळातील एक संज्ञा. - डाव लागला म्हणजे नियमित स्थळापासून गोटी कोपराकोपराने उडवीत गल्लीमध्ये आणून टाकणे. ३. कोपराजवळ येणारी सूज; एक रोग. ४. कोपरापर्यंत बाह्या असलेली बंडी, अंगरखा : ‘अंगांत रेशमी कोपरी.’ - हाकांध २११. [सं.], ५. नखुरडे. [सं.]
कोपल न. एक प्रकारचे तेल, वार्निश : ‘रोगणाचा उपयोग करणें झाल्यास कोपल रोगणाचा उपयोग करावा.’ - मॅरट २५.
कोफल न. एक प्रकारचे तेल, वार्निश : ‘रोगणाचा उपयोग करणें झाल्यास कोपल रोगणाचा उपयोग करावा.’ - मॅरट २५.
कोपळी स्त्री. काटेरी झुडूप. (व.)
कोपी स्त्री. काटेरी झुडूप. (व.)
कोपळे न. कोपळी तोडण्याचे हत्यार. (व.)
कोपान्नल पु. क्रोधाग्नी.
कोपायमान वि. रागवलेला; संतप्त. [सं. कुप्यमान]
कोपिष्ट वि. ज्याला लवकर राग येतो असा; शीघ्र संतापी.
कोपी वि. ज्याला लवकर राग येतो असा; शीघ्र संतापी.
कोपी स्त्री. १. शेतातील झोपडे; खोपट. पहा : कोप, कोपट : ‘आश्रमासी स्थान कोपी गुहा ।’ - तुगा २७२५. २. वृक्षाची ढोली : ‘अन्न कोपीसी ठेवी.’ - गोप्र ७७.
कोपीण न. स्त्री. लंगोटी. (क्रि. नेसणे.) : ‘नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण ।’ - तुगा २८३०. [सं. कोपीन]
कोपीन न. स्त्री. लंगोटी. (क्रि. नेसणे.) : ‘नेसोनि कोपीन शुभ्रवस्त्र जाण ।’ - तुगा २८३०. [सं. कोपीन]
कोफता पु. गोळा (स्वयंपाकातील) : ‘खेम्याचे कोफते म्हणजे गोळे करून...’ - गृशि २·२१०. [फा. कोफ्ता = कुटलेला गोळा (मांसाचा)]
कोफेहाट पु. एकप्रकाचे दुकान, बाजार : ‘कोफेहाट... धनगरहाट’ - स्थापो ८१.
कोबरी पु. मातीचे एक भांडे. (कु.) [सं. खर्पर]
कोबले न. आंबे काढण्याकरिता काठीला बांधले जाणारे जाळे; घळ; झील; झेलगे; झेला.
कोबलेबारक न. टिन. पहा : कोपरबरास
कोबरब्राक न. टिन. पहा : कोपरबरास
कोबा : पु. (वास्तु.) चुना, माती, कांक्रीट, सिमेंट, शेळीच्या लेंड्या इ. चे मिश्रण. ह्याने जमीन, गच्ची तयार करतात.
कोबाया स्त्री. कलकल करणाऱ्या बाया, स्त्रिया. (व.)
कोबाळ पु. १. फारसे काम न करणारा मुलगा, म्हातारा इ. निरुपयोगी लोकांचा समुदाय (चि.). २. सटरफटर वस्तू.
कोबी स्त्री. पानांचा एक गड्डा; भाजी. ही युरोपीय लोकांनी आणलेली असून हिचे तीन-चार प्रकार आहेत. ही थंडीच्या दिवसात व चांगल्या जमिनीत तयार होते. कोबू. (गो.) [इं. कॅबेज]
कोब स्त्री. पानांचा एक गड्डा; भाजी. ही युरोपीय लोकांनी आणलेली असून हिचे तीन-चार प्रकार आहेत. ही थंडीच्या दिवसात व चांगल्या जमिनीत तयार होते. कोबू. (गो.) [इं. कॅबेज]
कोबीट न. फाळ नसून बोंडशी असलेला बाण, तीर.

शब्द समानार्थी व्याख्या
कोबीफ्लॉवर पु. कोबीच्या वर्गातील एक भाजी.
कोबेणे अक्रि. कोंब येणे; अंकुर फुटणे. (राजा. गो.) पहा : कोंबणे
कोबेवणे अक्रि. कोंब येणे; अंकुर फुटणे. (राजा. गो.) पहा : कोंबणे
कोम स्त्री. १. स्त्रियांच्या नावापुढे अमक्याची पत्नी असे दाखविण्याकरिता हा शब्द योजतात. २. जात. [फा. कोम् = जात, कुटुंब]
कोमजणे अक्रि. सुकणे; वाळणे (फूल); झडणे; अशक्त, क्षीण होणे.
कोमेजणे अक्रि. सुकणे; वाळणे (फूल); झडणे; अशक्त, क्षीण होणे.
कोमट   पहा : कोंबट
कोमटा पु. खाऱ्या पाण्यातील एक मासा : ‘फुटलेल्या बांधाचे दुःख विसरून तो कोमटा घेऊन घराकडे धावला.’ - इंधन २५.
कोमटी पु. १. कर्नाटकातील वैश्य जात व त्या जातीतील माणूस; व्यापार उदीम करणारी एक जात. २. (ल.) सोवळे-ओवळे नसणारा; अधार्मिक; नास्तिक. [क.]
कोमणे   पहा : कोमजणे : ‘कोमुन जातां तरी मला तूं फेंकून दिधलें असतें ।’ - टिक ३९; ‘म्हणोनी कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।’ - ज्ञा २·४. [सं. कु + म्लान]
कोमाईणे   पहा : कोमजणे : ‘कोमुन जातां तरी मला तूं फेंकून दिधलें असतें ।’ - टिक ३९; ‘म्हणोनी कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।’ - ज्ञा २·४. [सं. कु + म्लान]
कोमायणे   पहा : कोमजणे : ‘कोमुन जातां तरी मला तूं फेंकून दिधलें असतें ।’ - टिक ३९; ‘म्हणोनी कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।’ - ज्ञा २·४. [सं. कु + म्लान]
कोमल वि. १. मृदू; सुकुमार; नाजूक; सुंदर. २. गरीब; सौम्य; हळव्या मनाचा. ३. मधुर; रमणीय, प्रसादयुक्त. (शब्द, नाव, आवाज) : ‘सकोमल सरिसे ।’ - राज्ञा ६·१८३. ४. अपरिपक्व (ज्ञान). ५. बेअक्कल. [सं.]
कोमळ वि. १. मृदू; सुकुमार; नाजूक; सुंदर. २. गरीब; सौम्य; हळव्या मनाचा. ३. मधुर; रमणीय, प्रसादयुक्त. (शब्द, नाव, आवाज) : ‘सकोमल सरिसे ।’ - राज्ञा ६·१८३. ४. अपरिपक्व (ज्ञान). ५. बेअक्कल. [सं.]
कोमलणे अक्रि. १. कोमणे; कोमाइणे; सुकणे; निस्तेज होणे : ‘ब्रह्मादिसुखें कोमाये ।’ - भाए १७५. २. द्रवणे; सद्गदित होणे : ‘माझें तोंड उतरलेले पाहून हा फारच कोमावला.’ - बाळ २·१८. ३. कमी होणे; ओसरणे : ‘कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला अर्धांगवायु झाला आणि त्याची सर्व महत्त्वाकांक्षा कोमेजून गेली.’ - स्मरण ४०. [सं. कोमल]
कोमायणे अक्रि. १. कोमणे; कोमाइणे; सुकणे; निस्तेज होणे : ‘ब्रह्मादिसुखें कोमाये ।’ - भाए १७५. २. द्रवणे; सद्गदित होणे : ‘माझें तोंड उतरलेले पाहून हा फारच कोमावला.’ - बाळ २·१८. ३. कमी होणे; ओसरणे : ‘कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला अर्धांगवायु झाला आणि त्याची सर्व महत्त्वाकांक्षा कोमेजून गेली.’ - स्मरण ४०. [सं. कोमल]
कोमावणे अक्रि. १. कोमणे; कोमाइणे; सुकणे; निस्तेज होणे : ‘ब्रह्मादिसुखें कोमाये ।’ - भाए १७५. २. द्रवणे; सद्गदित होणे : ‘माझें तोंड उतरलेले पाहून हा फारच कोमावला.’ - बाळ २·१८. ३. कमी होणे; ओसरणे : ‘कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला अर्धांगवायु झाला आणि त्याची सर्व महत्त्वाकांक्षा कोमेजून गेली.’ - स्मरण ४०. [सं. कोमल]
कोमेजणे अक्रि. १. कोमणे; कोमाइणे; सुकणे; निस्तेज होणे : ‘ब्रह्मादिसुखें कोमाये ।’ - भाए १७५. २. द्रवणे; सद्गदित होणे : ‘माझें तोंड उतरलेले पाहून हा फारच कोमावला.’ - बाळ २·१८. ३. कमी होणे; ओसरणे : ‘कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला अर्धांगवायु झाला आणि त्याची सर्व महत्त्वाकांक्षा कोमेजून गेली.’ - स्मरण ४०. [सं. कोमल]
कोमलभाव पु. वत्सलभाव; मृदुभाव.
कोमलस्वर पु. (संगीत) शुद्ध स्वरांपेक्षा ध्वनीने नीच स्वर. हल्लीच्या संगीत पद्धतीत कोमल स्वर पाच मानतात. (कोमल) ऋषभ, गांधार, मध्यम, धैवत, निषाद.
कोमलॉ पु. कोंबडा. (गो.)
कोमळ पु. आरंभीच्या अवस्थेतील साधक : ‘की द्रिढावया कोमळाची स्वस्तताः देवें बोधशक्ति पाठविली मज पांता :’ - मूप्र ११६.
कोमाइणे अक्रि. सुकणे, कोमेजणे : ‘जेवी कर्दळी कोमाती चंडवातें ।’ - जांस्व २५४. पहा : कोमणे
कोमाणे अक्रि. सुकणे, कोमेजणे : ‘जेवी कर्दळी कोमाती चंडवातें ।’ - जांस्व २५४. पहा : कोमणे
कोमार न. १. तरुणपण; कौमार्य. २. उत्साह; हौस. [सं. कौमार्य] (वा.) कोमार काडप - हौस उत्पन्न करणे (गो.) कोमार काढणे - कोणत्याही गोष्टीला प्रवृत्त होणे. (कु.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोमाळणे   प्रेमाने अंगावरून हात फिरवणे; कुरवाळणे; गोंजारणे. (व.) : ‘कोम्हायता फुटे पान्हा’ - बगा १. [सं. कोमल]
कोम्हायणे   प्रेमाने अंगावरून हात फिरवणे; कुरवाळणे; गोंजारणे. (व.) : ‘कोम्हायता फुटे पान्हा’ - बगा १. [सं. कोमल]
कोम्हाळणे   प्रेमाने अंगावरून हात फिरवणे; कुरवाळणे; गोंजारणे. (व.) : ‘कोम्हायता फुटे पान्हा’ - बगा १. [सं. कोमल]
कोमेणे   पहा : कोमणे, कोमजणे : ‘वदनेंदु कोमेला कळाहीन वाटे सुखसंपत्ती ।’ - पला ४४.
कोमेतुला पु. १. समुद्रातील एक प्राणी. २. सपक्ष, सकेश तारा.
कोय स्त्री. १. आंब्याच्या फळातील बाठ, आठी, अठळी; बीज. २. बाठीतील गर; बाठांच्या पोटी असणारा दोन अवयवरूपी अंश. ३. (ल.) अंडकुली. ४. ताड फळाच्या गिरावरील कवची. ५. आंब्याच्या अर्ध्या बाठीची भिंगरी. [क. काई]
कोय पु. डोंगर. (आगरी) [फा. कोह = पर्वत]
कोयकमळ न. श्वेतकमळ; कुवलय. [सं. कुवलय]
कोयका पु. गुन्हेगार जातीतील पोलीस या अर्थाचा शब्द.
कोयकानाई पु. पोलीस शिपाई.
कोयकोय स्त्री. कुत्र्याचे किंवा त्याच्या पिल्लांचे भुंकणे; ओरडणे; क्यांव-क्यांव करणे.
कोंयकोंय स्त्री. कुत्र्याचे किंवा त्याच्या पिल्लांचे भुंकणे; ओरडणे; क्यांव-क्यांव करणे.
कोयडे   पहा : कुवेडे
कोयडेबार न. विटीदांडूचा खेळ. (गो.)
कोयतट न. आंब्यातील कोयीला तिरस्कारार्थी म्हणतात.
कोयतपट्टी स्त्री. जी जमीन नांगरटीस करायला योग्य नसल्याने हातांनीच कसतात, अशा जमिनीवर कोयतांच्या संख्येनुसार बसविण्यात येणारी पट्टी.
कोयता पु. १. लाकूड तोडण्याचे एक हत्यार. कोयतो : ‘मी हिवाने मेलो घे माझो कोयतो.’ - भज ८ (गो.) २. केस काढण्याचे हत्यार. (ढोर) [क. कोयित = विळा]
कोयताड न. कोयतीसारखे मोठे कणीस; मोठी आकडेदार चिंच वगैरे.
कोयताल न. शेताच्या कडेची जमीन. (बे.)
कोयती स्त्री. लहान कोयता; कोकणात भात कापण्याच्या कोयतीला करवतीसारखे दाते असतात. तिला दाती कोयती असेही म्हणतात.
कोयते न. लहान कोयता, कोयती. (राजा)
कोयतूल न. लहान कोयता, कोयती. (राजा)
कोयतेवाल पु. कोयतीच्या आकाराच्या शेंगा असणारे वाल; खरसांबळ.
कोयतो   एक अलंकार.
कोयनळ पु. दोन रुखांवर खुंट्या मारून त्यावर एक आडवे लाकूड मारतात त्यास कोयनळ म्हणतात. कोयनळावर कोळंब्याची एक बाजू टेकलेली असते. (को.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोळिंदर पु. दोन रुखांवर खुंट्या मारून त्यावर एक आडवे लाकूड मारतात त्यास कोयनळ म्हणतात. कोयनळावर कोळंब्याची एक बाजू टेकलेली असते. (को.)
कोयनाटकी स्त्री. कोयीची केलेली भिंगरी, पिपाणी; कोकाटी; कोय.
कोयनाटकी वि. (कोयीने संतुष्ट होणारा) कंजूष, कृपण.
कोयनेल न. हीवतापावरचे एक औषध; सिंकोना सालीचे सत्त्व : ‘५ ग्रेन कोयनेल दिवसातून ३-४ वेळा घ्यावे.’ - निऔ २२. [इं. क्वीनीन]
कोयपाणी न. गुठळ्या व पाणी झालेले (शितड्या पाण्याचे) दही.
कोय मारणूक कोया :   मुलांचा एक खेळ.
कोयमे न. ताक करायचे मडके. (खा.) पहा : कोळंबे
कोयर पु. केर; उकिरडा. (गो.)
कोयरसिताडो पु. शेणपोतेरे. (गो.)
कोयरी स्त्री. १. चांदीच्या पत्र्याची, सपाट अगर पसरट आकाराची, साधी अगर नक्षी केलेली डबी. ही मधोमध कापलेल्या आंब्याच्या छेदासारखी दिसते. हिच्यात हळदीकुंकू ठेवण्यासाठी दोन-तीन पुडे असतात; हळदीकुंकवाची डबी; कुयरी. २. झीग व टिकली यांचे कोयरीच्या आकाराचे विणकाम. ३. आंबेघाटी कोयरीच्या आकाराची टोपणे, मणी, घागऱ्या जिच्यात ओवल्या आहेत असा दागिना, कमरपट्टा, माळ इ.
कोयरीची माळ स्त्री. चांदीच्या कोयरीच्या आकाराच्या मण्यांची माळ; घोड्याचा दागिना.
कोयल न. नांगरताना चुकलेली जागा. (बे.)
कोयल स्त्री. कोकिळा : ‘मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ ।-’ अफला ५४. [सं. कोकिल]
कोईल स्त्री. कोकिळा : ‘मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ ।-’ अफला ५४. [सं. कोकिल]
कोयाळ स्त्री. कोकिळा : ‘मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ ।-’ अफला ५४. [सं. कोकिल]
कोयंडा पु. १. दाराची कडी अडकविण्याचे गोलाकार अडकण; वाकवून दुहेरी केलेला खिळा. २. कडीत घालायचा खिळा; अडसर; आकडा. ३. लांब आसुडाचा लाकडी दांडा. (कर.) ४. फासा (नथ, डूल इत्यादीचा). ५. कोलदांडा (मनुष्याला किंवा गुरांना घालण्याचा) हाताला बांधून त्यामध्ये घातलेला. ६. एका खेळातील वाकडी काठी. गुराखी हा खेळ खेळतात. (कु.), ७. आंब्यातील कोय. (राजा.)
कोयंडी स्त्री. १. गुराने दावे चावून तोडू नये व मारक्या गुराने एकदम वळून हल्ला करू नये म्हणून एका लांब काठीला दोन कान्या लावून वेसणीत बांधण्याची केलेली व्यवस्था. २. शिक्षा म्हणून हात वगैरेंना कळ लागण्यासाठी लावण्यात येणाऱ्या टिपऱ्या.
कोयंडी स्त्री. पु. विहिरीच्या दोराचा फास. (गो.)
कोयंडो स्त्री. पु. विहिरीच्या दोराचा फास. (गो.)
कोयंडो पु. दांडू. (गो. कर.)
कोयडो पु. दांडू. (गो. कर.)
कोया पु. १. एक पक्षी. २. या पक्षाचे केविलवाणे ओरडणे, ध्वनी, शब्द. [ध्व.] (वा.) कोया करणे, कोया करीत हिंडणे - १. कीव येण्याजोगी याचना, विनवणी करणे (अन्न इ. करिता). २. कंगाल होऊन भटकत फिरणे.
कोयाड न. मंत्रतंत्र, जादूटोणा : ‘त्या काळात तरी हा कोयाडाचाच प्रकार’ - बहु २८.
कोयाडे न. पिकलेले, पाडाचे व आंबट आंबे उकडून गीर काढून त्यात पाणी, गूळ व मसाला वगैरे घालून केलेला पदार्थ; आंब्याचे तोंडी लावणे.
कोयार पु. बेलफळ कोरून केलेला भोवरा. (व.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोयाळ स्त्री. १. कोयीचे केलेले वाद्य; पुंगी; पिपाणी. २. आंब्याच्या कोयीची भिंगरी; कोकाटी.
कोयाळ वि. १. कोय अथवा बाठा धरलेला आंबा. २. मंजूळ : ‘पाटच्या पारामंदी कर्णा वाजतो कोयाळ.’ - जसा ४६१.
कोयाळणे अक्रि. (आंब्याने) बाठा धरणे; आंबा कोयीने युक्त होणे. (को.)
कोयी स्त्री. डोक्यातील केर काढण्यासाठी आंब्याच्या कोयीला दाते पाडून केली जाणारी फणी.
कोर स्त्री. पु. १. कडा; धार; कडेची रेषा; किनारा; पदार्थाच्या कडेचा सूक्ष्म व एकसारखा धाराकार अवयव; मर्यादा. २. (वस्त्राचा) काठ; काठाची पट्टी; (जरीची) किनार; फीत इ. ३. (भाकरी-पोळीचा) तुकडा, चतकोर (चंद्रकोरेप्रमाणे चतकोराला कड असते यावरून). ४. नखाच्या मुळाशी असलेल्या चंद्राच्या कोरीसारख्या रेषा व तेथे होणारे नखुरडे. ५. (शिंपी) काखेत लावण्याचा त्रिकोनी तुकडा; ठुशी. ६. हजामतीचा एक प्रकार. ७. हद्द; मर्यादा : ‘तैसे जी न बडबडी । पदाची कोर न सांडी ।’ - ज्ञा १२·८५४. ८. गोवरीचा तुकडा; गोवरी; शेणी. (वा.) [क. कोरू = भाग] कोर धरणे - कपाळावरील केस चंद्राच्या कोरीप्रमाणे ठेवणे, राखणे; तशी हजामत करणे.
कोर स्त्री. १. मत्सर; द्वेष; बरकस. [फा. कुऱ्हा] (वा.) कोर धरणे, लावणे - द्वेष करणे : ‘मानकऱ्याने कोर धरली ।’ - ऐपो २८७. कोर चालविणे - वैर धरणे : ‘परंतु हिसायेब मोहिद्दीनखानासी पठाणानी थोडेंच दिवसांत कोर चालवून दक्षण आपण आटोपावी या तलाशास लागले.’ - हिंदखं १·४२. २. शिपायांची तुकडी, रांग. [इं. कोअर]
कोरक न. एक भाजी.
कोरका पु. १. (पुरा.) पाषाणाची, हाडाची, धातूची बनवलेली आरी, टोचा. २. हुंडी; वही; कागद. (नंद.). ३. (भाकरीचा) तुकडा, कोर : ‘मग गोसावीं दोन्ही कोरके एकवट मेळवली’ - गोप्र ६१.
कोरकापी स्त्री. सुताराचे नक्षीकामाचे एक हत्यार. (को.)
कोरकांगुणी स्त्री. एक प्रकारचे धान्य पहा : कांगुणी
कोरकांगोणी स्त्री. एक प्रकारचे धान्य पहा : कांगुणी
कोरकांडे न. कोरफड. घृतकुमारी; कन्याकुमारी. (को.) [सं. कुमारी + कांड]
कोरके न. कोरडे अन्न : ‘तळणवळण केलें : कोरकें सिद्ध जाले :’ - सारुह ६·७२.
कोरखडी स्त्री. एक प्रकारचा खडू. शिंपी लोक हा खडू कापडावर खुणा करण्यासाठी वापरतात.
कोरखांड न. भाकरी किंवा पोळीचा तुकडा : ‘या अवघेयां कोरखांड आले’ - लीचउ १३१.
कोरगिरी   पहा : कोरबंदी
कोरगू पु. खेड्यातील एक बलुत्या. प्रवाशांची बडदास्त ठेवण्याचे काम याच्याकडे असे.
कोरट स्त्री. कातलेले पण कच्चे (न उकळलेले) रेशीम. [हिं. कोरा = साधे रेशीम]
कोरटाण स्त्री. कोरेपणाची घाण, वास (कपडे, मडकी वगैरेस येणारी).
कोरटे पु. कारळे तीळ.
कोरड वि. निष्ठुर, ज्याचे अंतःकरण द्रवत नाही असा : ‘एक कोरडे कणवाळु : विश्वासघातकी.’ - मुप्र २७६.
कोरड स्त्री. १. तोंड अथवा घसा याला पडलेला शोष (आजार, उपास, भय वगैरे प्रसंगी); तोंड वाळणे; कंठशोष. (क्रि. पडणे, येणे.) २. (सामा.) शुष्कपणा; ओलेपणा नसणे. (क्रि. पडणे.) ३. निश्चिंत : ‘मग आपण एथ कोरडी एति’ - लीचपू ३९७. [क. कोरगु = वाळणे, शुष्क होणे] (वा.) कोरड वळणे , वाळणे - क्षुधेने व्याकुळ होणे. ४. अंगण; घरापुढील उघडा ओटा. (तंजा.)
कोरडक न. घराच्या आढ्याला वा भिंतीला लोंबणारे कोळिष्टक, जळमट. (को.)
कोरडणे अक्रि. कोरडे पडणे, वाळणे : ‘बोलायाचे पुष्कळ शक्ति न कोरडले ओंठ ।’ - अनंततनयकृत माझे कुंडल (हृदय तरंग २).
कोरडणे न. ओझे आवळताना दोरी ज्यावरून ओढून घेऊन बांधतात तो लोखंडी मणी; पुली. (बे.) पहा : कोरडिके [क. कोरडु = लाकडाचा तुकडा]

शब्द समानार्थी व्याख्या
कोरडवट स्त्री. १. जिराईत, कोरडवाहू जमीन; सुकी जागा. २. जमीन; भूमी (नदी, समुद्र, सरोवर यांच्या विरोधी शब्द). (व.)
कोरडवाव वि. विहीर किंवा पाटबंधाऱ्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन; जिराईत; कोरडवट.
कोरडवावू वि. विहीर किंवा पाटबंधाऱ्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन; जिराईत; कोरडवट.
कोरडवाही वि. विहीर किंवा पाटबंधाऱ्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन; जिराईत; कोरडवट.
कोरडवाहू वि. विहीर किंवा पाटबंधाऱ्याच्या पाण्याविरहित फक्त पावसाच्या पाण्यावर पिकणारी जमीन; जिराईत; कोरडवट.
कोरडवाहतूक स्त्री. शुष्कता; कफल्लकपणा.
कोरडा वि. १. अनार्द्र; शुष्क; जलरहित; आर्द्रताविरहित; पाण्याचा थोडासुद्धा अंश नसलेला : ‘ते रडे भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ।’ - वामन भरतभाव १६. २. नुसते; बरोबर कोरड्यास नसलेले; दूध, दही वगैरे पातळ पदार्थांचे कालवण नसलेले (अन्न). ३. नक्त (जेवणाशिवाय मजुरी); उक्ते. ४. (ल) औपचारिक, शुष्क, पोकळ, वरकांती, निष्फळ, बिनहशिलाचा, बिनफायद्याचा, निरर्थक. ५. व्यर्थ; फुकट : ‘हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥’ - ज्ञा १३·६९०. ६. (ल.) वांझ. ७. व्याकूळ. [क.] (वा.) कोरड्या अंगी तिडका - १. प्रसूतिवेदनांचे ढोंग. २. ढोंग; भोंदूपणा.
कोरडे वि. १. अनार्द्र; शुष्क; जलरहित; आर्द्रताविरहित; पाण्याचा थोडासुद्धा अंश नसलेला : ‘ते रडे भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ।’ - वामन भरतभाव १६. २. नुसते; बरोबर कोरड्यास नसलेले; दूध, दही वगैरे पातळ पदार्थांचे कालवण नसलेले (अन्न). ३. नक्त (जेवणाशिवाय मजुरी); उक्ते. ४. (ल) औपचारिक, शुष्क, पोकळ, वरकांती, निष्फळ, बिनहशिलाचा, बिनफायद्याचा, निरर्थक. ५. व्यर्थ; फुकट : ‘हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥’ - ज्ञा १३·६९०. ६. (ल.) वांझ. ७. व्याकूळ. [क.] (वा.) कोरड्या अंगी तिडका - १. प्रसूतिवेदनांचे ढोंग. २. ढोंग; भोंदूपणा.
कोरडी वि. १. अनार्द्र; शुष्क; जलरहित; आर्द्रताविरहित; पाण्याचा थोडासुद्धा अंश नसलेला : ‘ते रडे भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे ।’ - वामन भरतभाव १६. २. नुसते; बरोबर कोरड्यास नसलेले; दूध, दही वगैरे पातळ पदार्थांचे कालवण नसलेले (अन्न). ३. नक्त (जेवणाशिवाय मजुरी); उक्ते. ४. (ल) औपचारिक, शुष्क, पोकळ, वरकांती, निष्फळ, बिनहशिलाचा, बिनफायद्याचा, निरर्थक. ५. व्यर्थ; फुकट : ‘हिंडणवारा कोरडा । तैसा जया ॥’ - ज्ञा १३·६९०. ६. (ल.) वांझ. ७. व्याकूळ. [क.] (वा.) कोरड्या अंगी तिडका - १. प्रसूतिवेदनांचे ढोंग. २. ढोंग; भोंदूपणा.
कोरडा पु. १. कातडी चाबूक; आसूड. २. तडाखा, फटकारा. (वा.) कोरडा ओढणे - चाबूक लगावणे, मारणे. २. (ल.) कडक टीका करणे. [फा. कोर]
कोरडा अधिकार   १. नुसता पोकळ, नावाचा अधिकार. (क.) २. बिनपगारी अम्मल, हुद्दा; विनावेतन काम.
कोरडा खडक   अतिशय कठीण, टणक खडक. पहा : खडक. २. (ल.) अडाणी. ३. पहा : कोरडा पाषाण
कोरडाटाक वि. १. मुळीच पाणी नसलेला; कोरडा ठणठणीत : ‘गंगेच्या कोरड्याठाक पात्रात ...’ - पुत्र १३. २. (ल.) निर्विकार; घुम्या : ‘त्यांचा चेहरा तर कोरडाठाक होता.’ - देव ९०.
कोरडाठाक वि. १. मुळीच पाणी नसलेला; कोरडा ठणठणीत : ‘गंगेच्या कोरड्याठाक पात्रात ...’ - पुत्र १३. २. (ल.) निर्विकार; घुम्या : ‘त्यांचा चेहरा तर कोरडाठाक होता.’ - देव ९०.
कोरडा चंदा   आतबट्ट्याचा किंवा बिननफ्याचा उद्योग.
कोरडा पाषाण   १. कठीण, ठणठणीत दगड. २. (ल.) उपदेशाप्रमाणे आचरण न करणारा माणूस.
कोरडा प्रदेश   जेथे मद्य निर्मितीस वा पिण्यास बंदी आहे असा प्रदेश.
कोरडा ब्रह्मज्ञानी पु. भोंदू; ढोंगी; स्वतः ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसलेला पण लोकांना त्याचा उपदेश करणारा मनुष्य.
कोरडिके न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोरडीक न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोरडुके न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोरडूक न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोरुडके न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोरुडगे न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोडके न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)

शब्द समानार्थी व्याख्या
क्वाडका न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
क्वाडके न. १. अडसर, अडचण (गज, दाराचे कुत्रे, कुसे, तसेच कुळव, पाभर यांचे एले किंवा कोयंडा याचे कुसू). २. अर्धगोल किंवा अंतर्गोल लाकडी मणी, पुली. (यातून दोर ओढून घेऊन शेतकीची अवजारे बांधतात.) दोर तुटू नये म्हणून ही बांधतात. ३. सूत काढण्याच्या रहाटाला बसविलेले (कण्याच्या शेवटी) एक लाकडी चाक. या चाकाला एक बोट जाईल असे भोक असून त्यात बोट घालून ते फिरविले असता रहाट फिरतो. ४. सनगर लोकांचे बिनचाकाचे सूत उलवण्याचे साधन; कोरीटक. (को.)
कोरडी आग स्त्री. भयंकर मोठी आग.
कोरडी ओकारी स्त्री. १. घशात बोटे घालून मुद्दाम काढलेली ओकारी. सकाळी तोंड धुताना घशात बोटे घालून काढलेले खाकरे. (क्रि. देणे, काढणे.) २. ओकारी येतेसे वाटणे; (क्रि. येणे.). पोटात ढवळल्याप्रमाणे होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते, हृदयात पीडा होते, ओकारी येते परंतु अन्न पडत नाही अशा वेळी म्हणतात.
कोरडी खाकरी स्त्री. १. घशात बोटे घालून मुद्दाम काढलेली ओकारी. सकाळी तोंड धुताना घशात बोटे घालून काढलेले खाकरे. (क्रि. देणे, काढणे.) २. ओकारी येतेसे वाटणे; (क्रि. येणे.). पोटात ढवळल्याप्रमाणे होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते, हृदयात पीडा होते, ओकारी येते परंतु अन्न पडत नाही अशा वेळी म्हणतात.
कोरडीक स्त्री. बैलाला बांधलेला दोर. पहा : बैला, बैली, कोरडिके ४
कोरडी किटाळ स्त्री. १. (शब्दशः) कोरडी ठिणगी. २. (ल.) तोहमत; आळ. (क्रि. घालणे, उठवणे, घेणे.)
कोरडी किरकिर स्त्री. विनाकारण त्रास, कटकट, तक्रार, पिरपिर, भुणभुण.
कोरडी जागा स्त्री. वरकड कमाई नसणारी अधिकाराची जागा.
कोरडी जांभई स्त्री. श्रमामुळे आलेली (झोपेमुळे नव्हे) जांभई.
कोरडी जांभळी स्त्री. श्रमामुळे आलेली (झोपेमुळे नव्हे) जांभई.
कोरडी दारू   वायबाराची दारू; वायबार.
कोरडी पद्धत स्त्री. (कृषी.) केवळ पावसाच्या पाण्यावर केलेली शेती.
कोरडी भिक्षा   तांदूळ, गहू वगैरे धान्याची भिक्षा.
कोरडी मेजवानी स्त्री. अन्नाशिवाय मेवामिठाईची आणि तळणावळणाची मेजवानी; उपाहार.
कोरडी सवाशीण स्त्री. जेवणाखेरीज ओटी भरून कुंकू लावून जिची बोळवण करतात अशी सवाष्ण. ब्राह्मणेतरांच्या घरी ब्राह्मण सवाष्ण बोलावतात तेव्हा तिचा याप्रकारे सत्कार करतात.
कोरडे अंग   वांझपणा; वांझ कूस.
कोरडे कष्ट पुअव. विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत.
कोरडे श्रम पुअव. विनाफायदा, निरर्थक श्रम; व्यर्थ मेहनत.
कोरडे काम न. १. विटाळशेपणी व पाचव्या दिवशी न्हाऊन शुद्ध होण्यापूर्वी करायचे काम. २. वेळ घालविण्याकरिता केलेले सटरफटर काम.
कोरडे तप न. श्रद्धाहीन, भक्तिहीन तपश्चर्या, आराधना.
कोरडे बोलणे न. वरकांती, मनापासून नव्हे असे भाषण, बडबड.
कोरडे भाषण न. वरकांती, मनापासून नव्हे असे भाषण, बडबड.
कोरडे ब्रह्मज्ञान न. आचरण नसताना सांगितलेला वेदांत, परमार्थविद्या; बकध्यान; भोंदूपणा, ढोंग.
कोरडे वैर न. निराधार द्वेष, मत्सर.

शब्द समानार्थी व्याख्या
कोरडे सुख न. उपभोगाशिवाय सुख; नाममात्र आनंद.
कोरड्या गाथा स्त्रीअव. बनावट बातम्या; भुमका; कंड्या.
कोरड्या टाकाचा हिशेब   ज्यात यत्किंचितही फेरबदल करण्यासाठी लेखणी शाईत बुडविली गेली नाही असा स्वच्छ, बिनचूक लिहिलेला जमाखर्च; तक्ता; चोख हिशोब. (क्रि. देणे, करणे.)
कोरड्या टाकाचा हिशोब   ज्यात यत्किंचितही फेरबदल करण्यासाठी लेखणी शाईत बुडविली गेली नाही असा स्वच्छ, बिनचूक लिहिलेला जमाखर्च; तक्ता; चोख हिशोब. (क्रि. देणे, करणे.)
कोरड्या टाकाचा हिसाब   ज्यात यत्किंचितही फेरबदल करण्यासाठी लेखणी शाईत बुडविली गेली नाही असा स्वच्छ, बिनचूक लिहिलेला जमाखर्च; तक्ता; चोख हिशोब. (क्रि. देणे, करणे.)
कोरड्यास न. भात, भाकरी इत्यादीच्या जोडीला खायचा कालवणासारखा पदार्थ; कालवण : ‘चूल पेटली, वांग्याचे कोरड्यास गाडग्यात रटरटू लागले.’ - हपा २१.
कोरण न. १. कोरान्न; कोरडी भिक्षा : ‘कोरणें मागुन झोळी भरली ।’ - भज ४२, २. (रसा.) द्रावककोरण; रासायनिक क्रियेमुळे होणारे कोरण, खड्डा. ३. धातूच्या पत्र्यावर आम्लाने नक्षी किंवा अक्षरे कोरणे.
कोरणे न. कोरान्न; कोरडी भिक्षा : ‘कोरणें मागुन झोळी भरली ।’ - भज ४२
कोरण स्त्री. खोबण; खाच; (खिडकीच्या झडपांच्या खालच्या पट्टीतील) कोरून काढलेला भाग.
कोरणचिन्ह न. (भूशा.) विशिष्ट द्रावणाने विशिष्ट जातीच्या स्फटिकावर उमटणाऱ्या खुणा.
कोरणछिन्नी स्त्री. (स्था.) दगड कोरण्याचे हत्यार.
कोरणमुद्रक पु. कोरणारा; कोरीव काम करणारा.
कोरणी स्त्री. (स्था.) कोरीव कामासाठी वापरले जाणारे हत्यार.
कोरणी स्त्री. न. १. कोरणेपासून धातुसाधित नाम. कोरण्याची क्रिया; खोदणी. २. कोरण्याचे साधन; शस्त्र (मूर्ती, कान, नालबंदी करताना घोड्याचे खूर) कोरण्याच्या कामी उपयोगी; मातीच्या चित्राच्या कामी लागणारी करणी. ही पितळी, लोखंडी किंवा लाकडाची असून गुळगुळीत, सभोवार चपटी व निमुळती गोलटे मारलेली असते. चुनाळ्याची कोरणी त्याला साखळीने अडकवलेली असते. ती काडीसारखी पण तोंडाला चापट असते. ३. दुकानाच्या फळ्या काढघाल करण्यासाठी खालच्या व वरच्या उंबरठ्याला खोबण पाडलेली असते ती सर्व रचना.
कोरणे स्त्री. न. १. कोरणेपासून धातुसाधित नाम. कोरण्याची क्रिया; खोदणी. २. कोरण्याचे साधन; शस्त्र (मूर्ती, कान, नालबंदी करताना घोड्याचे खूर) कोरण्याच्या कामी उपयोगी; मातीच्या चित्राच्या कामी लागणारी करणी. ही पितळी, लोखंडी किंवा लाकडाची असून गुळगुळीत, सभोवार चपटी व निमुळती गोलटे मारलेली असते. चुनाळ्याची कोरणी त्याला साखळीने अडकवलेली असते. ती काडीसारखी पण तोंडाला चापट असते. ३. दुकानाच्या फळ्या काढघाल करण्यासाठी खालच्या व वरच्या उंबरठ्याला खोबण पाडलेली असते ती सर्व रचना.
कोरणे उक्रि. १. एखाद्या पदार्थावरील थोडा थोडा अंश नाजूक रीतीने काढणे; पोखरणे; खोदणे; नकसणे (आकार देण्यासाठी किंवा आतील भाग काढण्यासाठी) : ‘तो काष्ठें कोरूं धांवे ।’ -ज्ञा १८·७१९. २. कान, दात यातील मळ काढणे. ३. एखाद्याचे द्रव्य त्याच्या नकळत थोडे थोडे युक्तिप्रयुक्तीने बळकावण्याचा व्यापार, उद्योग. [क. कोरे = खोदणे, भोक पाडणे] (वा.) दात कोरून पोट भरणे - अतिशय कंजूषपणा करणे.
कोरदार वि. कंगणीदार : ‘मृदुतर थिरमे त्या कोंचक्या कोरदारा ।’ - सारुह ३·४०.
कोरदृष्टी स्त्री. तिरपी नजर; चोराची नजर; चोरून पाहणे; न्याहाळणे : ‘कोरदृष्टीने असावें पहात ।’ - कथा १·६·१९६.
कोरनगटी   पहा : कोरनाड : ‘पीतवसन परिधान कोरनगटी त्यावर भरजरी ।’ - मला २३५.
कोरनाड वि. या पेठेच्या साड्या व लुगडी (रेशमी, जरीची), (तंजा.) [क. कोरे = लग्नप्रसंगीचे वस्त्र; भारी वस्त्र + नाड = देश, पेठ]
कोरनितकोर वि. भाकरी, पोळीचा लहानसा तुकडा; अगदी थोडासा : ‘कुणी कोरनितकोर (भाकरी) दिली ती घेऊन ओढ्याकाठी गेला.’ - गागो ४७.
कोरप न. १. गोवऱ्यांची आगटी; झगरे. (को.), २. बंदुकीचा काना.
कोरपट्टी स्त्री. वेलबुट्टी व कशिदा काढलेला काठ. ही कापडाला स्वतंत्रपणे जोडतात.
कोरपणा स्त्री. रुखरुख. (कर.)
कोरपा वि. वाळून शुष्क झालेला (पदार्थ). (व.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोरफड स्त्री. कडू गर असलेल्या जाड, कडेला काटे असलेल्या पातीची औषधी वनस्पती. ही वनस्पती पाण्याशिवाय वाढते. जुन्या पात्या सुकल्या म्हणजे नव्या पात्या फुटून ही वनस्पती नेहमी ताजी राहते. म्हणून हिला कुवारी, कुमारी, कुवारकांडे म्हणतात. हिच्या रसापासून कडू (काळा) बोळ तयार करतात.
कोरफड न. कोरफडीपासून तयार केलेला पदार्थ : औषध : ‘कोरफडीच्या पानाचे औषधी उपयोग पुष्कळ आहेत.’ - वनश्री ४००. [सं. कुमारी]
कोरबंद वि. चिडखोर; त्रासिक.
कोरबंदी स्त्री. १. बरकस; द्वेष. २. एका ओळीत सैन्याची रचना करणे : ‘त्या बाबा फडक्याची कोरबंदी न्यारी ।’ - ऐपो २८१.
कोरबी स्त्री. झिंगा; एक प्रकारचा मासा. (को.) [क. कोरव]
कोरबू पु. गावातील एक बलुतेदार. ही धनगर जात आहे. कोरबूची कामे पुष्कळ आहेत. पैकी प्रवाशांची बडदास्त ठेवणे, त्यांची ओझी वाहणे, रयतेपासून सरकार देणे-घेणे वसूल करणे इ. : ‘मंगळवेढेकर कोरबूचे कांहीं खटले होते...’ - हरिवंब ११.
कोरभू पु. गावातील एक बलुतेदार. ही धनगर जात आहे. कोरबूची कामे पुष्कळ आहेत. पैकी प्रवाशांची बडदास्त ठेवणे, त्यांची ओझी वाहणे, रयतेपासून सरकार देणे-घेणे वसूल करणे इ. : ‘मंगळवेढेकर कोरबूचे कांहीं खटले होते...’ - हरिवंब ११.
कोरभारण न. (स्था.) चंद्रकोरीच्या आकाराचे घातलेले भरवण.
कोरम वि. पहा : कोरंब. १. (लाकूड किड्याने पोखरून पोकळ केले म्हणजे त्याला कोरम म्हणतात. त्यावरून लक्षणेने) पोकळ; पोखरलेले : ‘आतून जीर्ण व कोरम झालेले हें जुनें खोड.’ - महादजी चरित्र १. २. क्षीण; दुर्बल; निःसत्व : ‘वाढत्या खर्चाची धोंड आधींच कोरम झालेल्या शेतकऱ्यांवर पडता कामा नये.’ - के ७·१·१९४१. [सं. कृमि]
कोरम पु. न. सभेस आरंभ करण्यासाठी अवश्य ठरवलेली सभासदांची संख्या; गणपूर्ती. [इं.]
कोरमा पु. एक मांसयुक्त खाद्य.
कोरमेनचे क्रि. पोखरणे. (गो.)
कोरला पु. कांचनाच्या जातीचा एक रानटी वृक्ष. याची भाजी चवदार असते. गंडमाळा व अदची रोगात सालीचा काढा गुग्गुळाबरोबर देतात.
कोरवट वि. नव्यासारखे; कोरे. पहा : कोरवाण
कोरवडा पु. कोहळ्याचा कीस घालून केलेला उडदाच्या पिठाचा वडा. (व.) : ‘सहित पापडे कथिकवडे, आणिक कोरवडे ।’ -अमृतसुदाम १४.
कोरवण न. घर शाकारणीचे गवत.
कोरवाण न. १. अगदी नवे कोरे दिसणारे कापड. २. हलक्या प्रतीचे कापड.
कोरवाण वि. १. (वस्त्रोद्योग) मागावरून काढलेले परंतु पांजणी न केलेले (वस्त्र अगर तागा). हा अर्थ कोमटी लोकांत रूढ आहे. २. (सामा.) अगदी कोरे करकरीत; ताजे; नवे (कापड, मोती, भांडी, दागिने वगैरे).
कोरवान न. १. अगदी नवे कोरे दिसणारे कापड. २. हलक्या प्रतीचे कापड.
कोरवान वि. १. (वस्त्रोद्योग) मागावरून काढलेले परंतु पांजणी न केलेले (वस्त्र अगर तागा). हा अर्थ कोमटी लोकांत रूढ आहे. २. (सामा.) अगदी कोरे करकरीत; ताजे; नवे (कापड, मोती, भांडी, दागिने वगैरे). ३. कपाळावर केसांची कोर ठेवली आहे किंवा ठेवण्याचे वय झाले आहे असे. (दहा बारा महिन्यांचे मूल). पहा : कोर धरणे
कोरसी वि. वक्रदृष्टी : ‘तो कोरसीया कोनाडी : परिछेदाचे सीर पाडी.’ - मूप्र २१५३.
कोरष्टाण   पहा : कोरटाण
कोरसाण   पहा : कोरटाण
कोरळ पु. एक झाड. पिवळा कांचन. [क. करले]
कोरळा पु. समुद्राच्या कडेला मासे खाऊन राहणारा, पिवळ्या पायाचा व चोचीचा, पांढऱ्या रंगाचा एक पक्षी. (कुलाबा)

शब्द समानार्थी व्याख्या
कोरंटी स्त्री. एक काटेरी, फुलांचे झाड
कोरंब वि. झडलेला; झिजलेला; खंगलेला; जीर्ण; अशक्त; जर्जर (काष्ठ, शरीर इ.). (राजा.) [क. कोरे = झडणे, कमी होणे]
कोरा वि. १. ताजा; नवा; नवीन; नुकताच केलेला; न धुतलेला; न उपभोगलेला; न वापरलेला (कागद, भांडे, वस्त्र, इमारत, दुकान इ.). २. (ल.) ज्याला सराव किंवा अभ्यास नाही असा नवशिका (माणूस); अनुभव नसलेला. ३. न सुधारलेला, बदललेला; काही परिणाम ज्यावर होत नाही असा; संस्कारहीन (शिक्षण, शिस्त वगैरेनी). ४. कमी-जास्तपणा, वाढ किंवा काही परिणाम झाला नाही असा (व्यवहार, व्यापार, माल). ५. ज्याच्यावर काहीच लिहिलेले नाही असा. (कागद इ.) ६. रोख. (वा.) कोरा घेणे - दिव्य स्वीकारणे. [फा. कोऱ्हा]
कोरा   रुपयाचा एक प्रकार.
कोरान न. न शिजविलेल्या तांदूळ, गहू इत्यादी धान्यांची भिक्षा. पहा : कोरडी भिक्षा. (क्रि. करणे, मागणे.) : ‘काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥’ - ज्ञा १२·८५.
कोरान्न न. न शिजविलेल्या तांदूळ, गहू इत्यादी धान्यांची भिक्षा. पहा : कोरडी भिक्षा. (क्रि. करणे, मागणे.) : ‘काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥’ - ज्ञा १२·८५.
कोरान्नकर पु. स्त्री. कोरान्नाची भिक्षा मागणारा पुरुष किंवा स्त्री : ‘दारा न ये कोरान्नकर ।’ - एभा २३·९३.
कोरान्नकरी पु. स्त्री. कोरान्नाची भिक्षा मागणारा पुरुष किंवा स्त्री : ‘दारा न ये कोरान्नकर ।’ - एभा २३·९३.
कोरान्नकरीण पु. स्त्री. कोरान्नाची भिक्षा मागणारा पुरुष किंवा स्त्री : ‘दारा न ये कोरान्नकर ।’ - एभा २३·९३.
कोराल न. (पशु.) पाळीव जनावराच्या संरक्षणासाठी घातलेले कुंपण.
कोराळ न. १. डोंगरातील कडा, खडक : ‘एरव्ही फोडी कोऱ्हाळें । पाणी जैसे ॥’ - ज्ञा १६·११७. २. डोंगरातील कोरीव लेणी. ३. दगड; खडकाळ जमीन. [क.]
कोराळे न. १. डोंगरातील कडा, खडक : ‘एरव्ही फोडी कोऱ्हाळें । पाणी जैसे ॥’ - ज्ञा १६·११७. २. डोंगरातील कोरीव लेणी. ३. दगड; खडकाळ जमीन. [क.]
कोराळ जमीन   (डांग प्रांतातील) तांबडसर अशी निकस जमीन. ही टेकड्यांच्या पायथ्याशी असते. पहा : कोराळे
कोरांटा पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोरांटी पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोऱ्हांटा पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोऱ्हांटी पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोऱ्हांटकी पु. स्त्री. एक फुलझाड. याला पांढरी, तांबडी, पिवळी, निळी, पारवी या रंगाची फुले येतात. झाड २/४ हात उंच असते. सर्वांगाला काटे असून फुलाला वास येत नाही. या फुलात मध फार असतो : ‘गुलाबाचीं फुलें रम्यें दिसे तैशीच कोऱ्हांटी ।’ - टिक २७२. [सं. कुरंटक]
कोरांटकी   पहा : कोरांटी
कोरिका पु. खाद्य पदार्थ : ‘नाना कोरिके विस्तीर्ण, रुक्मिणी वाढीतसे ।’ - नागा ९९५.
कोरी स्त्री. नापीक जमीन. ही दुसऱ्या जमिनीबरोबर कसली असता त्या जमिनीवर सरकारसारा बसत नाही. पहा : कोराळ जमीन
कोरीटक   पहा : कोरडिके ४
कोरीव वि. १. कोरलेले; खोदलेले; पोखरलेले. २. खवलेला, मगज बाहेर काढलेला (नारळ इ.). ‘घडीला कां कोरीवा । परि जैसा ।’ - अमृ ९·७.
कोरीवकातीव वि. कोरलेले व कातलेले. (ल.) सुबक; सुरेख; सुंदर; चांगल्या आकाराचे.
कोरीव ठोकळा   चित्रे छापण्याचा ठसा.

शब्द समानार्थी व्याख्या
कोरीव लेख   (ग्रंथ) दगडाच्या अथवा अन्य पृष्ठभागावर कोरून काढलेली अक्षरे, चिन्हे, लेख इत्यादी.
कोरी सवाशीण स्त्री. विवाहित परंतु ऋतू प्राप्त न झालेली सवाष्ण.
कोरे वि. बिनचुन्याचे; कच्चे : ‘दिवसगती लागेल याकरिता कोरे काम करावे यैसे आमचा विचार आहे.’ - पेद १६·३७. [फा. कोऱ्हा]
कोरोडा   पहा : कोरवडा
कोऱ्हडा   पहा : कोरवडा
कोऱ्होडा   पहा : कोरवडा
कोरोलँ न. शेतातील तण. (गो.) पहा : कोरळ [क. करले]
कोर्ट न. १. न्याय देणारी सभा; न्याय कचेरी; सरकार दरबार. २. न्यायाधीश. ३. सर्व न्यायाधीश आणि मुलकी अधिकारी तसेच लवादपंच यांच्याशिवाय ज्यांना पुरावा घेण्याचा कायद्यानुसार अधिकार आहे अशा सर्व व्यक्ती. [इं.] (वा.) कोर्टकचेरी, कोर्टदरबार करणे - एखाद्या गोष्टीच्या निकालासाठी कोर्टात किंवा अधिकाऱ्याकडे तक्रार करणे : ‘गुजा, व्यंकू, अरे आता कोर्टदरबार का करणार आहात?’ - पडघ ११५. ४. खेळण्याकरता तयार केलेली बंदिस्त जागा, जसे :- टेनिस कोर्ट.
कोर्टमार्शल न. लष्करातील गुन्हेगारांसाठीचे लष्करी न्यायालय : ‘त्याचा इन्साफ कोर्ट मार्शलकडून करवावा.’ - के १७·५·३०.
कोऱ्हेर वि. लाकूड इत्यादीतून कोरून तयार केलेला; कोरीव. (बाहुली इ.)
कोऱ्हेरी वि. लाकूड इत्यादीतून कोरून तयार केलेला; कोरीव. (बाहुली इ.)
कोल पु. १. अभय. किल्ला शरण आला म्हणजे त्याने कौल घेतला असे म्हणत : ‘ठाणेकरी काही अद्यापि कोलाची बोली बोलत नाही.’ - इएमपी ३६. २. दंड; काठी. ३. तिळाची कळी : ‘झाडिलीचि कोळे झाडी ।’ - राज्ञा १३·५८६.
कौल पु. अभय. किल्ला शरण आला म्हणजे त्याने कौल घेतला असे म्हणत : ‘ठाणेकरी काही अद्यापि कोलाची बोली बोलत नाही.’ - इएमपी ३६.
कोल स्त्री. विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळातील गली. पहा : कोली
कोलण स्त्री. विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळातील गली. पहा : कोली
कोलणी स्त्री. विटीदांडूच्या अगर गोट्यांच्या खेळातील गली. पहा : कोली
कोल न. कर्जफेडीकरिता जप्त केलेले उत्पन्न, मालमत्ता; शेतातील पीक इ. जप्तीचा माल; कबज. (क्रि. धरून ठेवणे, सोडणे.) [ फा. कौल = करार]
कोल वि. गरीब, अशक्त; दुबळा (द्रव्याने, शरीराने, चालण्याने, बुद्धीने); असमर्थ (को.) [क. कोळे = वाळणे, झिजणे]
कोल पु. डुक्कर. [सं.]
कोलकर पु. सेवेकरी; शिपाई; तराळ. (माण.) [क. कोतुकार = शिपाई]
कोलकरी पु. सेवेकरी; शिपाई; तराळ. (माण.) [क. कोतुकार = शिपाई]
कोलकाठी स्त्री. एक खेळ; दांडपट्टा : ‘देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं’ - ज्ञा ११·५४८. [क. कोलु = काठी]
कोलके न. वजन.
कोलखंड न. मोठे पोट. (गो.)
कोलगे न. कुत्री. (गो.) पहा : कोली

शब्द समानार्थी व्याख्या
कोलडे न. १. एक प्रकारच्या गवताचे बी. कबुतरे हे बी खातात. २. एक प्रकारचे बारीक धान्य.
कोलणे उक्रि. १. (विटीदांडू) गलीवरची विटी दांडूने उडविणे : ‘रावबानें प्रथम कोललें व त्याची विटी झेलली गेली.’ - सुदे ६. २. आपणावरची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे. (कामाची, देण्याघेण्याची इ.) : ‘निकड कार्य करणें आल्या दुसऱ्यावर कोलत्यें ।’ - प्रल १७०. ३. लोटणे; झिडकारणे; दूर फेकणे; नाकारणे; हडहड करणे; उडविणे. ४. पराजित करणे (वादविवादात). [क. कोलु = काठी] (वा.) कोलून मारणे - १. लाथेने झुगारून देणे; उडवून फेकणे, वर करणे; उचकणे. २. एका अंगावरून दुसऱ्या अंगावर वळविणे.
कोलवणे उक्रि. १. (विटीदांडू) गलीवरची विटी दांडूने उडविणे : ‘रावबानें प्रथम कोललें व त्याची विटी झेलली गेली.’ - सुदे ६. २. आपणावरची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे. (कामाची, देण्याघेण्याची इ.) : ‘निकड कार्य करणें आल्या दुसऱ्यावर कोलत्यें ।’ - प्रल १७०. ३. लोटणे; झिडकारणे; दूर फेकणे; नाकारणे; हडहड करणे; उडविणे. ४. पराजित करणे (वादविवादात). [क. कोलु = काठी] (वा.) कोलून मारणे - १. लाथेने झुगारून देणे; उडवून फेकणे, वर करणे; उचकणे. २. एका अंगावरून दुसऱ्या अंगावर वळविणे.
कोलता पु. निखारा. पहा : कोलित
कोलती स्त्री. १. मशाल; कोलीत जळता निखारा; पेटलेले लहान लाकूड : ‘पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचे हिरवेपण असे ।’ - ज्ञा १८·७९०. २. (ल.) द्वेष - मत्सर - दुष्ट बुद्धीने रचलेले कुभांड; खोटा आरोप. (क्रि. वर ठेवणे.) (वा.) कोलती, कोलेता लावणे - (ल.) कुभांड रचणे; दुष्ट आरोप करणे; कलागत लावणे : ‘लावूनि कोलित । माझा करितील घात ।’ - तुगा १००७.
कोलेता स्त्री. १. मशाल; कोलीत जळता निखारा; पेटलेले लहान लाकूड : ‘पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचे हिरवेपण असे ।’ - ज्ञा १८·७९०. २. (ल.) द्वेष - मत्सर - दुष्ट बुद्धीने रचलेले कुभांड; खोटा आरोप. (क्रि. वर ठेवणे.) (वा.) कोलती, कोलेता लावणे - (ल.) कुभांड रचणे; दुष्ट आरोप करणे; कलागत लावणे : ‘लावूनि कोलित । माझा करितील घात ।’ - तुगा १००७.
कोलदंडा पु. १. द्वाड कुत्र्याच्या गळ्याला बांधतात ते दांडके अगर गज. (क्रि. बांधणे.) २. (शिक्षेचा प्रकार) उकिडवे बसवल्यानंतर हातामध्ये पाय अडकवून व हात बांधून कोपरे व गुडघे यांच्या मधून घातलेला दांडा : ‘जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड ।’ - स्वादि २·३·३८. ३. विघ्न; अडथळा : ‘साम्यवादी पक्षाच्या कोलदांड्यामुळे जर्मनीतील समाजवादी पक्ष अधिकार ग्रहण करू शकला नाही.’ - लोस ४० (ल) पेच; अडचण; कोडे : ‘म्हणून आदि पुरुष कर्तृक म्हणजे ईश्वरकर्तृक असा कोलदांडा पडतो.’ - के २५·१०·१९४०. [क. कोलु = काठी + दंड] (वा.) कोलदंडा, कोलदांडा, कोलदांड घालणे - अडथळा आणणे; दुसऱ्याचे काम यशस्वी होऊ न देणे : ‘नाना प्रकारचे कोलदांडे घालून...’ - ज्योफु १२७.
कोलदांडा पु. १. द्वाड कुत्र्याच्या गळ्याला बांधतात ते दांडके अगर गज. (क्रि. बांधणे.) २. (शिक्षेचा प्रकार) उकिडवे बसवल्यानंतर हातामध्ये पाय अडकवून व हात बांधून कोपरे व गुडघे यांच्या मधून घातलेला दांडा : ‘जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड ।’ - स्वादि २·३·३८. ३. विघ्न; अडथळा : ‘साम्यवादी पक्षाच्या कोलदांड्यामुळे जर्मनीतील समाजवादी पक्ष अधिकार ग्रहण करू शकला नाही.’ - लोस ४० (ल) पेच; अडचण; कोडे : ‘म्हणून आदि पुरुष कर्तृक म्हणजे ईश्वरकर्तृक असा कोलदांडा पडतो.’ - के २५·१०·१९४०. [क. कोलु = काठी + दंड] (वा.) कोलदंडा, कोलदांडा,कोलदांड घालणे - अडथळा आणणे; दुसऱ्याचे काम यशस्वी होऊ न देणे : ‘नाना प्रकारचे कोलदांडे घालून...’ - ज्योफु १२७.
कोलदांड पु. १. द्वाड कुत्र्याच्या गळ्याला बांधतात ते दांडके अगर गज. (क्रि. बांधणे.) २. (शिक्षेचा प्रकार) उकिडवे बसवल्यानंतर हातामध्ये पाय अडकवून व हात बांधून कोपरे व गुडघे यांच्या मधून घातलेला दांडा : ‘जावाई हाचि कोलदांड । काळें घातलासे वितंड ।’ - स्वादि २·३·३८. ३. विघ्न; अडथळा : ‘साम्यवादी पक्षाच्या कोलदांड्यामुळे जर्मनीतील समाजवादी पक्ष अधिकार ग्रहण करू शकला नाही.’ - लोस ४० (ल) पेच; अडचण; कोडे : ‘म्हणून आदि पुरुष कर्तृक म्हणजे ईश्वरकर्तृक असा कोलदांडा पडतो.’ - के २५·१०·१९४०. [क. कोलु = काठी + दंड] (वा.) कोलदंडा, कोलदांडा, कोलदांड घालणे - अडथळा आणणे; दुसऱ्याचे काम यशस्वी होऊ न देणे : ‘नाना प्रकारचे कोलदांडे घालून...’ - ज्योफु १२७.
कोलदेव पु. करकोचा किंवा कुदळपक्षी. (कुलाबा)
कोलन न. (भूशा.) वनस्पतिजन्य पदार्थांचे कोळशामध्ये रूपांतर होण्याची क्रिया.
कोलन पु. अगदी लहान खड्डा. (व.) [क. कोळ = डबके, तळे]
कोलन वर्गीकरण   (ग्रंथ.) रंगनाथन यांनी रूढ केलेली वर्गीकरणपद्धती; द्विबिंदू वर्गीकरणपद्धती.
कोलनाडॉ   पहा : कोलदांडा (गो.)
कोन्नाडॉ   पहा : कोलदांडा (गो.)
कोलबोल पु. कौल; संरक्षण : ‘मुलखास कोलबोल देऊन बंदोबस्त करणें.’ - ऐच ८९.
कोलभांड वि. भांडकुदळ; भांडणात पटाईत.
कोलम न. १. तांबडे जाडे शाकारणीचे गवत. २. एक प्रकारचे भात; तांदूळ.
कोलम पु. पोहरा; पाणी पाजण्यासाठी किंवा आंबोण ठेवण्यासाठी उपयोगी असणारे मातीचे रुंद तोंडाचे भांडे : ‘म्हस्के धनगर याने राखीचा कोलम चोरिला सबब...’ - पेसा ३८.
कोलमडणे उक्रि. १. अडखळणे; ठेचकळणे; मागे ओढणे; दुसऱ्या बाजूवर पडणे, उलटणे. २. खाली कोसळून पडणे; पाडणे (सोसाट्याच्या वाऱ्याने झाड इ.). [क. कोला + माड = आडकाठी]
कोलमाडणे उक्रि. १. अडखळणे; ठेचकळणे; मागे ओढणे; दुसऱ्या बाजूवर पडणे, उलटणे. २. खाली कोसळून पडणे; पाडणे (सोसाट्याच्या वाऱ्याने झाड इ.). [क. कोला + माड = आडकाठी]
कोलमाडा पु. १. एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाणे; एका कुशीवरून दुसऱ्या कुशीला वळणे. (क्रि. देणे.) २. उलटणे; ठेचाळणे; अडखळणे; कोलांटी खाणे; मागे ओढणे; कलाटणी. (क्रि. देणे). ३. (ल.) लांबणीवर टाकणे; टाळाटाळ; दिरंगाई. (क्रि. देणे.) [क. कोले + माडु]
कोलवा पु. घरावर घालायचा गवताचा जुना शाकार; सुपारी, नारळ इ. चा चूड. (राजा. गो.)
कोलवाकोलव स्त्री. १. टोलवाटोलवी; एकमेकांवर टाकणे (धंदा इ.); इकडून तिकडे असे. (क्रि. मारणे, उडविणे.) २. चुकवाचुकव; अनास्था; टाळाटाळ. [कोलणेचे द्वि.]
कोलाकोल स्त्री. १. टोलवाटोलवी; एकमेकांवर टाकणे (धंदा इ.); इकडून तिकडे असे. (क्रि. मारणे, उडविणे.) २. चुकवाचुकव; अनास्था; टाळाटाळ. [कोलणेचे द्वि.]

शब्द समानार्थी व्याख्या
कोलाकोली स्त्री. १. टोलवाटोलवी; एकमेकांवर टाकणे (धंदा इ.); इकडून तिकडे असे. (क्रि. मारणे, उडविणे.) २. चुकवाचुकव; अनास्था; टाळाटाळ. [कोलणेचे द्वि.]
कोलवे न. अगदी लहान खोली, कोचके. [हिं. कोल, कौल]
कोलंगी स्त्री. अग्नीची ठिणगी : ‘एक लालचुटुक कोलंगी त्या जागी उमटली.’ - पेरणी ११७. (क्रि. उडणे.) [क. कोळ्ळि = कोलित]
कोलंबी स्त्री. खाऱ्या किंवा गोड्या पाण्यातला एक कवचधारी चवदार मासा : ‘ही संगीत कोलंबी तडतड नाचती पांई’ - संगीत घोटाळा ६.
कोला पु. १. कुत्रा. (बे.), २. जळता निखारा. (व.) [क. कोळ्ळा]
कोलाटी   पहा : कोल्हाटी [क. कोलु = काठी + अटिंग = खेळणारा]
कोयिटी   पहा : कोल्हाटी [क. कोलु = काठी + अटिंग = खेळणारा]
कोलाडा पु. हरळीसारखे गवत. (वाई)
कोलावण स्त्री. जहाजावरील जकात; संरक्षणाबद्दलचा, राज्यातून सुरक्षितपणे जाऊ देण्याबद्दलचा कर : ‘इंग्रजांस कोलावण माफ करून त्यांशी सख्य संपादावें.’ - ब्रच ५२.
कोलाहल पु. १. मोठा गलबला; गोंगाट; कलकलाट; ओरडा; गोंधळ; संमिश्र आवाज : ‘(त्या) कोलाहलात एवढी एकच गोष्ट न विसरण्याचा आपण प्रयत्न करू या.’ - भाआसं ३०. २. अनेक विचारांचा गोंधळ : ‘मनात खूप कोलाहल चालला होता.’ - निअ ३६७. [सं.]
कोलाहळ पु. १. मोठा गलबला; गोंगाट; कलकलाट; ओरडा; गोंधळ; संमिश्र आवाज : ‘(त्या) कोलाहलात एवढी एकच गोष्ट न विसरण्याचा आपण प्रयत्न करू या.’ - भाआसं ३०. २. अनेक विचारांचा गोंधळ : ‘मनात खूप कोलाहल चालला होता.’ - निअ ३६७. [सं.]
कोलांटी स्त्री. एक विशेष प्रकारची उडी; खाली डोके करून उलटी उडी मारणे. (वि. प्र.) कोलांटी उडी. [क.] (वा.) कोलांटी उडी मारणे - राजकारणात वा अन्यत्र सोयीनुसार आपली मूळ भूमिका बदलणे, टोपी फिरवणे.
कोलित वि. रक्षणकर्ता. [सं. कुल = आप्ताप्रमाणे वागणे]
कोलिसा पु. कोळसा : ‘कोलिसा कालेपणें घडिला जैसा ।’ - राज्ञा १८·७४६.
कोलिसे न. १. रेशमासारखे पांढऱ्या अंगाचे कोळी वगैरे किड्यांनी बनविलेले जाळे किंवा घरटे. याचे बंदुकीसाठी वेष्टन करतात. २. तोड्याच्या बंदुकीला रेशमाचे दिलेले वेष्टन.
कोलिस्त न. सूक्ष्म शेष; तालीमखाना; इक्षुगंधा; कोकिलाक्ष; इक्षुर.
कोली कोलूक स्त्री. कुत्री; कोलगे. (गो. बे.)
कोली स्त्री. विटीदांडू, गोट्या इ. खेळण्यास करतात ती खळी, गल. पहा : कोल
कोली पु. कोळी : ‘तेणें कोलियें त्रिजगती । एकावट केली ॥’ - राज्ञा १८·१७०.
कोलीत न. पहा कोलती
कोलीत काकण न. आलातचक्र; पेटते लाकूड गरगरा फिरवले असता दिसणारी कंकणाकृती आकृती.
कोलीस न. कुंडीत वाढणारी एक वनस्पती.
कोलू पु. १. घाणा. २. पहा : कोलदांडा [क.] ३. विटी. ४. घरावरचे जुने शाकार (चुडते, गवत इ.). (गो. कु.) पहा : कोलवा
कोलेती स्त्री. खाजकुयली नावाची वनस्पती.
कोलो पु. कोल्हा. (खा. को.)

शब्द समानार्थी व्याख्या
कोल्ल स्त्री. विटी. (गो.)
कोल्लबार पु. विटीदांडू. (गो.)
कोल्लमशक पु. हा शक ख्रिस्ती शकाच्या आठशे चोविसाव्या वर्षी सुरू झाला. हा मलबारात चालू आहे.
कोल्लाळ पु. आरडाओरड; कोल्हाळ : ‘कोल्लाळ करिती माया बहिणी ।’ - नागा १८०७.
कोल्ली वि. १. रागीट (गो.). २. नादी; लहरी. [सं. क्रोधिन्]
कोल्हरी स्त्री. सोंग; मिष; बतावणी. पहा : ओडंबरी, कोल्हारी
कोल्हा पु. सुरवंट. (व.)
कोल्हा पु. न. १. कुत्र्याच्या वर्गातील प्राणी. हा भुऱ्या वर्णाचा व मऊ केसांचा असून रात्रीचा हिंडतो : ‘कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजें ॥’ - ज्ञा ४·२३. २. (ल.) लबाड, धूर्त, चोरटा माणूस. (वा.) कोल्हा, कोल्हे कोल्हीचे लग्न - ऊन असताना पडणारा पाऊस. कोल्ह्याचे तोंड बघणे, नागवे कोल्हे भेटणे - शुभशकुन घडणे; मोठा अकल्पित लाभ होणे. कोल्ह्याचे शिंग - अशक्य गोष्ट; (गो.) (ल.) १. अशक्य गोष्ट साध्य होणे; २. वशीकरण कला अवगत असणे.
कोल्हे पु. न. १. कुत्र्याच्या वर्गातील प्राणी. हा भुऱ्या वर्णाचा व मऊ केसांचा असून रात्रीचा हिंडतो : ‘कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजें ॥’ - ज्ञा ४·२३. २. (ल.) लबाड, धूर्त, चोरटा माणूस. (वा.) कोल्हा, कोल्हे कोल्हीचे लग्न - ऊन असताना पडणारा पाऊस. कोल्ह्याचे तोंड बघणे, नागवे कोल्हे भेटणे - शुभशकुन घडणे; मोठा अकल्पित लाभ होणे. कोल्ह्याचे शिंग - अशक्य गोष्ट; (गो.) (ल.) १. अशक्य गोष्ट साध्य होणे; २. वशीकरण कला अवगत असणे.
कोल्हाट न. कोल्हाट्यांचा खेळ; डोके खाली करून एक चक्कर मारून पुन्हा पायावर उभे राहण्याची उडी. पहा : कोलांटी
कोल्हांट न. कोल्हाट्यांचा खेळ; डोके खाली करून एक चक्कर मारून पुन्हा पायावर उभे राहण्याची उडी. पहा : कोलांटी
कोल्हाट अड न. कोल्हाट्यांचा खेळ; डोके खाली करून एक चक्कर मारून पुन्हा पायावर उभे राहण्याची उडी. पहा : कोलांटी
कोल्हांट अड न. कोल्हाट्यांचा खेळ; डोके खाली करून एक चक्कर मारून पुन्हा पायावर उभे राहण्याची उडी. पहा : कोलांटी
कोल्हाटी पु. स्त्री. दोरीवर कसरत करणारी एक भटकी जमात; भोरपी, नाडेभोरपी, डोंबारी : ‘जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ॥’ - ज्ञा १८·६०६ : ‘आली कोल्हाटीन खेळाया । सगुण गुण माया ।’ - भज ३५. २. कोल्हाट; कोलांटी; कसरतीचा खेळ; नाच. [क. कोलु = काठी + अटिग = खेळ्या]
कोल्हाटीण पु. स्त्री. दोरीवर कसरत करणारी एक भटकी जमात; भोरपी, नाडेभोरपी, डोंबारी : ‘जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ॥’ - ज्ञा १८·६०६ : ‘आली कोल्हाटीन खेळाया । सगुण गुण माया ।’ - भज ३५. २. कोल्हाट; कोलांटी; कसरतीचा खेळ; नाच. [क. कोलु = काठी + अटिग = खेळ्या]
कोल्हाटिन पु. स्त्री. दोरीवर कसरत करणारी एक भटकी जमात; भोरपी, नाडेभोरपी, डोंबारी : ‘जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा ॥’ - ज्ञा १८·६०६ : ‘आली कोल्हाटीन खेळाया । सगुण गुण माया ।’ - भज ३५. २. कोल्हाट; कोलांटी; कसरतीचा खेळ; नाच. [क. कोलु = काठी + अटिग = खेळ्या]
कोल्हार पु. कुंभार.
कोल्हार न. कुल्हार; मायघर; गुहा; कपाट : ‘ब्रह्मविद्येचें कोल्हार :’ - भाए ६६२. [क. कोल्हार = खिंड, बिकट मार्ग]
कोल्हारा पु. रानभाजीचे एक झाड. पहा : कोरळ [क. कोळर]
कोल्हारी वि. कुंभारी (मातीची चित्रे); कृत्रिम; बनावट : ‘अथवा कोल्हेरीचे असिवार ।’ - ज्ञा ९·१७३. [सं. कुलाल]
कोल्हेरी वि. कुंभारी (मातीची चित्रे); कृत्रिम; बनावट : ‘अथवा कोल्हेरीचे असिवार ।’ - ज्ञा ९·१७३. [सं. कुलाल]
कोल्हारी वै ताळ न. शेतातील बुजगावणे; भुताचे चित्र : ‘आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥’ - ज्ञा ११·४६६.
कोल्हारी वै ताळ न. शेतातील बुजगावणे; भुताचे चित्र : ‘आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती ॥’ - ज्ञा ११·४६६.
कोल्हाळ पु. गलका. पहा : कोलाहल : ‘आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥’ - ज्ञा १·१२२.
कोल्ही स्त्री. कोल्ह्याची मादी.

शब्द समानार्थी व्याख्या
कोल्ही वि. कोल्ह्याच्या रंगाची (तोंड, पोट, पाय काळे बाकी सर्व पांढरे असलेली) मेंढी.
कोल्ही स्त्री. जोंधळ्यांची एक जात. याचा दाणा वर दिसून येत नाही.
कोल्हू पु. उसाचा चरक; तेल्याचा घाणा. [हिं.]
कोल्हे न. भोपळ्याच्या आकाराचा, बियाणे ठेवण्याचा भाताण्याचा (पेंढ्याचा) मुडा, भांडे. [क. कोळवी = तेल इ. ठेवण्याचा नळा]
कोल्हेल न. भोपळ्याच्या आकाराचा, बियाणे ठेवण्याचा भाताण्याचा (पेंढ्याचा) मुडा, भांडे. [क. कोळवी = तेल इ. ठेवण्याचा नळा]
कोल्हेकुई स्त्री. १. कोल्ह्यांची आरडाओरड; हुकी. २. (ल.) क्षुद्र लोकांची एखाद्याच्या विरुद्ध निरर्थक बडबड; क्षुद्र अडथळा : ‘जगाची कर्कश कोल्हेकुई कोण ऐकत बसणार?’ - प्रेमसंन्यास.
कोल्हेखोक स्त्री. डांग्या खोकला. (आयुर्वेद आश १८५४)
कोल्हेटेकण न. मावळण्यास येणे (सूर्य, दिवस). कोल्हा मागच्या पायावर बसला म्हणजे जमिनीपासून जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सूर्य मावळताना क्षितिजापासून असला म्हणजे म्हणतात. विशेषतः चतुर्थी विभक्तीत बसणे किंवा येणे बरोबर उपयोग. (वा.) कोल्हे टेकण्यास बसणे - कोल्ह्याप्रमाणे दबकून बसणे. कोल्हे टेकण्यास येणे - वयामुळे अशक्तपणा येणे.
कोल्हेटेकणे न. मावळण्यास येणे (सूर्य, दिवस). कोल्हा मागच्या पायावर बसला म्हणजे जमिनीपासून जितक्या उंचीवर असतो तितक्या उंचीवर सूर्य मावळताना क्षितिजापासून असला म्हणजे म्हणतात. विशेषतः चतुर्थी विभक्तीत बसणे किंवा येणे बरोबर उपयोग. (वा.) कोल्हे टेकण्यास बसणे - कोल्ह्याप्रमाणे दबकून बसणे. कोल्हे टेकण्यास येणे - वयामुळे अशक्तपणा येणे.
कोल्हेबुद्धी स्त्री. हलकी बुद्धी; लबाडी : ‘...अशा कोल्हेबुद्धीची गोष्ट करीत असतील’ - ऐलेसं ५१६.
कोल्हेभूंक स्त्री. १. कोल्ह्याची हुकी, ओरडा; कोल्हेकुई. २. मोठी पहाट; प्रभात.
कोल्हेभोंक स्त्री. १. कोल्ह्याची हुकी, ओरडा; कोल्हेकुई. २. मोठी पहाट; प्रभात.
कोल्हेर न. लाकूड.
कोल्हेशाही स्त्री. लुच्चेगिरी : ‘असला कोल्हेशाई प्रश्न कशाला?’ - लोटिकेले १·२६.
कोल्हेशाई स्त्री. लुच्चेगिरी : ‘असला कोल्हेशाई प्रश्न कशाला?’ - लोटिकेले १·२६.
कोल्हेहूक स्त्री. १. कोल्ह्याची हुकी; कोल्हेकुई. २. (ल.) मोठमोठ्याने ओरडून हल्ला करणे.
कोल्हौर न. भुयारातील देऊळ : ‘- किं श्रृंघार कोल्हौरीची महाकाळी ।’ - उगी ४२३.
कोल्हौरी स्त्री. मातीचे चित्र; पुतळा : ‘देखौनि स्थानी कोल्हौरीचि जाली ।’ - रुस्व १०९.
कोवणे उक्रि. १. जुने होणे; (मडके इ. ची वाईट अथवा कोरेपणाची) घाण नाहीशी होणे; कोरेपणा जाणे. २. (ल.) रुळणे; सरावणे; निर्ढावणे (वाईट गोष्टीत).
कोवरी स्त्री. १. फणसाची कुयरी. २. फणसाची बी; आठळी.
कोवला वि. कोमल; ताजा; नाजूक; मृदुभाव असलेला : ‘विरुढे कोवलां अंकुरीं तैसे । रोमांच आले ॥’ - राज्ञा ११·२४३.
कोवली वि. कोमल; ताजा; नाजूक; मृदुभाव असलेला : ‘विरुढे कोवलां अंकुरीं तैसे । रोमांच आले ॥’ - राज्ञा ११·२४३.
कोवले वि. कोमल; ताजा; नाजूक; मृदुभाव असलेला : ‘विरुढे कोवलां अंकुरीं तैसे । रोमांच आले ॥’ - राज्ञा ११·२४३.
कोवसप अक्रि. मुरणे. पहा : कोवणे
कोवसा पु. १. आधार; आश्रय. (क्रि. देणे, करणे.) २. कैवारी; आश्रयदाता. पहा : कंशा : ‘जो भक्तांचा कोंवसा ।’ - दास २·७·४. ३. रेशमी किडा. [क. वस = आच्छादणे]

शब्द समानार्थी व्याख्या
कोवळणे अक्रि. आलिंगणे. पहा : कवळणे
कोवळलूस वि. अतिशय कोवळा; मऊ : ‘कोवळलूस गवत...’ - जैत ३१४.
कोवळसर वि. १. जरा कोवळा (नारळ, सुपारी इ.) २. लहानसर; अपक्व; नाजूक.
कोवळा वि. १. लहान; कच्चा; अपक्व; हिरवा. २. ताजा. ३. (ल.) नाजूक; सौम्य (सकाळ, सूर्यकिरण, ऊन). ४. कच्ची; अडाणी; अप्रगल्भ (ग्रहणशक्ती, समजूत). ५. अर्धवट; कोता; अप्रौढ; अपूर्ण (सल्लामसलत, विचार). ६. कमी बळकट; नाजूक; कोमल. ७.ज्याची नुकतीच सुरुवात झाली आहे असा. [सं. कोमल]
कोवळा पु. भोपळा; कोहळा : ‘काही बेसनाची, काही मुगाची, काही कोवळ्याची अशी गोडखारी भजी घेतली.’ - वानगी २२५.
कोवळा किरळा वि. लहान आणि नाजूक (अंकुर फुटलेला).
कोवळीक स्त्री. १. कोवळेपणा; (अप्रौढतेतील) नाजूकपणा, अशक्तपणा. २. तारुण्याचा बहर; नवेपणा; टवटवीतपणा. ३. मृदुपणा : ‘आणि महाबोधीं कोंवळीक दुणावली ॥ - ज्ञा १·३४.
कोवळीक वि. कोवळी.
कोवा पु. कोका; किनरी (कानफाट्याची); एकतारी. [क. कोवा]
कोवा स्त्री. (भिक्षुक लोकात सांकेतिक) विधवा.
कोवाडी वि. जादूगार.
कोवारी वि. कोवळी : ‘चंदनाची आवघी कोवारी : बाणें कापली राहे वरिचां वरी :’ - रुस्व ३४४.
कोवारीण स्त्री. पहा : कुवारीण. (बायकी) जिला बोडणात अगर देवीच्या पूजेला (नवरात्रात) बसविंतात व जेवायला घालतात अशी लग्न न झालेली आठ अगर त्याहून कमी वयाची मुलगी. (वा.) कोवारीण जाणे - पूजा, उत्सव इ. प्रसंगी कुमारिका म्हणून जेवायला जाणे.
कोवासा पु. कोवसा; कैवारी : ‘ऐसा देवो माहाबळी । भक्तांचा कोवासा ।’ - क्रिपु १७·५१.
कोवाळी पु. कोहळा. (चि. कु.)
कोव्हाळी पु. कोहळा. (चि. कु.)
कोहाळी पु. कोहळा. (चि. कु.)
कोविद वि. विद्वान; पंडित; ज्ञाता; सूज्ञ; कुशल : ‘सांगी काय तुज तुझ्या पौत्रांचें युद्ध कोविदा राया ।’ - मोभीष्म ३·४९. [सं.]
कोविदार पु. एका जातीचे झाड; कोरल; कांचन; शिसू : ‘तुळसी करवीर कोविदार ।’ - हरि १०·१५९. [सं.]
कोवी स्त्री. पोखरलेला नारळ; बेले. (को.) [क. कोवि = पोकळ नळी]
कोव्हरी क्रिवि. कुठवर, किती वेळपर्यंत; कोठपर्यंत. (ना.)
कोव्हाळा पु. कोहाळा. याची भाजी, सांडगे इ. करतात. याचा पाकही करतात. तो पौष्टिक असतो. पहा : कोहळा (वा.) कोव्हाळा, कोव्हाळे रासणे - देवीप्रीत्यर्थ कोहळा कापणे. पाठारे प्रभू लोकांत देवक स्थापनेच्या वेळी कोहळा कापतात.
कोव्हाळे पु. कोहाळा. याची भाजी, सांडगे इ. करतात. याचा पाकही करतात. तो पौष्टिक असतो. पहा : कोहळा (वा.) कोव्हाळा, कोव्हाळे रासणे - देवीप्रीत्यर्थ कोहळा कापणे. पाठारे प्रभू लोकांत देवक स्थापनेच्या वेळी कोहळा कापतात.
कोव्हाळी स्त्री. कोहळ्याचा वेल.
कोव्हाळे न. तांबडा भोपळा.

शब्द समानार्थी व्याख्या
कोश पु. १. खजिना; साठा; संग्रह; तिजोरी; खाण; वखार. २. जीवाचे अन्न-प्राण-मन-विज्ञान-आनंदमय असे जे कोश आहेत त्यांपैकी प्रत्येक; आत्म्याचे आवरण. ३. (ग्रंथ.) ज्यात वर्णानुक्रमे शब्दांची रचना करून त्यांची माहिती दिली आहे असा ग्रंथ. ४. आवरण; पटल; पापुद्रा; अस्तर. ५. म्यान (तरवारीचे). ६. कोळीकीटक अंड स्थितीतून कीट स्थितीत येऊन शरीराभोवती रेशमासारखे मऊ आवरण करतो तो; कोशेटा. ७. कळी : ‘अंतरीं फांकें । हृदयकोशु ॥’ - ज्ञा ६·२०९. ८. दिव्य करून लावलेला निकाल; न्यायदानातील दिव्य (अग्नी, पाणी, विष, वजनाचा काटा, उकळणारे तेल, कुलदेवतेवर पाणी घालणे इ.); शपथ; प्रतिज्ञा (वा.) कोश पिणे - शपथ घेणे : ‘पियालीं कृतनिश्चयाचा कोशा ।’ - ज्ञा १३·६०५. [सं.]
कोशकल्प पु. (वन.) कोश असलेला संवर्त; कोश असलेला पुष्पमुकुट; कोशाप्रमाणे कार्यक्षम अवयव.
कोशकार पु. १. रेशमाचा किडा; कोळ्याच्या वर्गातील प्राणी. २. कोशस्थितीत असलेला, कोशवासी किडा किंवा फुलपाखरू. [सं.], ३. शब्दार्थ कोश रचणारा, कोश तयार करणारा संपादक. [सं.]
कोशकीट पु. पहा : कोशकार १. कोशकिडा हा आपल्याभोवती कोशेटा करून आपल्यालाच कोंडून घेतो : ‘एरव्ही कोशकीटकाचिया परी । तो आपण या आपण वैरी ।’ - ज्ञा ६·७२. [सं.]
कोशकीटक पु. पहा : कोशकार १. कोशकिडा हा आपल्याभोवती कोशेटा करून आपल्यालाच कोंडून घेतो : ‘एरव्ही कोशकीटकाचिया परी । तो आपण या आपण वैरी ।’ - ज्ञा ६·७२. [सं.]
कोशगृह न. भांडार : ‘कीं कोशगृहीं प्रवेशोनी ।’ - रावि १·७१. [सं.]
कोशपद   कोशातील शब्दनोंद.
कोशपान न. देवाचे तीर्थ पिणे; दिव्याचा एक प्रकार; शपथ घेणे.
कोशमय वीट   (स्था.) वजनाला हलकी व उष्णतारोधक सच्छिद्र वीट.
कोशरा न. जाडेभरडे रेशीम. ‘बंदुखानचे बंदा बद्दल कोशरे सुमारे ५००० हजार पाठविणे.’ - पेद ४५·१००. [सं. कोश]
कोशरे न. जाडेभरडे रेशीम. ‘बंदुखानचे बंदा बद्दल कोशरे सुमारे ५००० हजार पाठविणे.’ - पेद ४५·१००. [सं. कोश]
कोशेरे न. जाडेभरडे रेशीम. ‘बंदुखानचे बंदा बद्दल कोशरे सुमारे ५००० हजार पाठविणे.’ - पेद ४५·१००. [सं. कोश]
कोशल न. खलबत : ‘...खंडोपंत व सदाशिव माणकेश्वर यांस बोलावून कोशल अर्ध रात्रीपर्यंत जालें.’ - ऐलेसं ७८८१.
कोशलगार पु. सल्लागार.
कोशलदार पु. सल्लागार.
कोशशुद्धि स्त्री. दिव्याने निरपराधित्व सिद्ध करण्याची क्रिया. [सं.]
कोशशुद्धी स्त्री. दिव्याने निरपराधित्व सिद्ध करण्याची क्रिया. [सं.]
कोशसिद्धांत पु. (तत्त्व.) अन्नरसमय आत्म्याच्या आत प्राणमय आत्मा, त्याच्या आत मनोमय आत्मा, त्याच्या आत विज्ञानमय आत्मा व त्याच्याही आत आनंदमय आत्मा राहतो. हे आत्म्याचे कोश आहेत. याचे विवरण करणारा सिद्धांत. त्याला कोशसिद्धांत किंवा पंचकोशसिद्धांत असे म्हणतात. [सं.]
कोशा वि. काळसर रंगाची (गाय, बैल).
कोशा पु. डोक्याला बांधायचा रेशमी रुमाल, फेटा (कोशेट्याच्या रेशमाचा). [सं. कौशेयः]
कोशागार पु. तिजोरी; जामदारखाना; भांडारगृह; खजिना. [सं.]
कोषागार पु. तिजोरी; जामदारखाना; भांडारगृह; खजिना. [सं.]
कोशाध्यक्ष पु. खजिनदार; निधी ज्याच्याकडे असतो तो पदाधिकारी; द्रव्यसंग्रहावरील अधिकारी. [सं. कोश + अध्यक्ष]
कोषाध्यक्ष पु. खजिनदार; निधी ज्याच्याकडे असतो तो पदाधिकारी; द्रव्यसंग्रहावरील अधिकारी. [सं. कोश + अध्यक्ष]
कोशासक्ती स्त्री. बंधित असण्याची इच्छा.

शब्द समानार्थी व्याख्या
कोशिक न. किड्याचे घर. पहा : कोशेटा : ‘कीटक करी स्वभुवन । कोशिके जैसें ।’ - कथा ५·७·८. [सं. कौशिक]
कोशिका न. किड्याचे घर. पहा : कोशेटा : ‘कीटक करी स्वभुवन । कोशिके जैसें ।’ - कथा ५·७·८. [सं. कौशिक]
कोशिकाजनन न. (वन.) कोशिकांचा उगम आणि विकास.
कोशिका पेशीद्रव्य   (वन.) कोशिकेतील प्रकल, प्राकलकणु किंवा विशिष्ट कोशिकांगके सोडून इतर सजीव व अर्धघन कलिल द्रव्य. [सं.]
कोशिका सिद्धांत   सर्व सजीव कोशिकामय असून त्यांची वाढ व उत्पत्ती कोशिका विभाजनामुळेच शक्य होते हा सिद्धांत.
कोशिया पु. काळा, लहानसा, चकचकीत पक्षी.
कोशिश स्त्री. प्रयत्न [फा.]
कोशिंदा पु. कोचिंदा वनस्पती.
कोशिंब पु. एक मोठे झाड. याच्या बियांचे तेल निघते. तसेच याच्या फांद्यांपासून लाख तयार केली जाते. याच्या बियांना कोशिंबी म्हणतात. [सं. कोशी + आम्र, कोशाम्र]
कोशिंबरे न. तांदळाचा एक प्रकार; कोथिंबरे भात.
कोशिंबीर स्त्री. कच्च्या फळांचे दह्यात कालवून केलेले कालवण, रायते, तोंडी लावणे : ‘या कोशिंबिरिका अनेक रचिल्या देवी तुला तोषदा ।’ - निमा १·१४; ‘कोशिंबिरी आंबेरायत ।’ - नव ९·११८. [क. को (गो) सुंबरी] [सं. कुस्तुंबरू]
कोशिंबरी स्त्री. कच्च्या फळांचे दह्यात कालवून केलेले कालवण, रायते, तोंडी लावणे : ‘या कोशिंबिरिका अनेक रचिल्या देवी तुला तोषदा ।’ - निमा १·१४; ‘कोशिंबिरी आंबेरायत ।’ - नव ९·११८. [क. को (गो) सुंबरी] [सं. कुस्तुंबरू]
कोशिंबिरिका स्त्री. कच्च्या फळांचे दह्यात कालवून केलेले कालवण, रायते, तोंडी लावणे : ‘या कोशिंबिरिका अनेक रचिल्या देवी तुला तोषदा ।’ - निमा १·१४; ‘कोशिंबिरी आंबेरायत ।’ - नव ९·११८. [क. को (गो) सुंबरी] [सं. कुस्तुंबरू]
कोशिंबेल न. कोशिंबीचे तेल.
कोशीस स्त्री. प्रयत्न; मेहनत. (क्रि. करणे.) : ‘इकडील दौलतीविषयी कोशीस करीत जावी ।’ - मइसा ८·५. [फा. कोशिश]
कोशेटा पु. स्त्री. १. फणस व इतर फळांतील आठळीचे टरफल. २. व्रणाची खपली, साल, कातडे. ३. कोळी व इतर काही किड्यांचे जाळे; कोश; किड्याचे घर. ४. थर.
कोशेटी पु. स्त्री. १. फणस व इतर फळांतील आठळीचे टरफल. २. व्रणाची खपली, साल, कातडे. ३. कोळी व इतर काही किड्यांचे जाळे; कोश; किड्याचे घर. ४. थर.
कोशेरा पु. स्त्री. १. फणस व इतर फळांतील आठळीचे टरफल. २. व्रणाची खपली, साल, कातडे. ३. कोळी व इतर काही किड्यांचे जाळे; कोश; किड्याचे घर. ४. थर.
कोष पु. पहा : कोश. समासात अंडकोष, बीजकोष इ. [सं.]
कोषवृद्धि स्त्री. अंतर्गळाचा रोग; अंडवृद्धी. [सं.]
कोषवृद्धी स्त्री. अंतर्गळाचा रोग; अंडवृद्धी. [सं.]
कोषावस्था स्त्री. कोषात किंवा कवचात राहण्याची अवस्था, काळ; फुलपाखराच्या ३ अवस्थांपैकी एक [सं.]
कोष्टक पु. १. स्तंभ; तक्ता; रकाना. २. किंमत, वजन, मापे इ. परिमाणदर्शक संज्ञांचे परस्परप्रमाण दाखविणारी यादी. [सं.]
कोष्ठक पु. १. स्तंभ; तक्ता; रकाना. २. किंमत, वजन, मापे इ. परिमाणदर्शक संज्ञांचे परस्परप्रमाण दाखविणारी यादी. [सं.]
कोष्टकीकरण न. (ग.) संख्या, आकडे किंवा कोणतीही माहिती तक्ता किंवा कोष्टक यामध्ये बसवणे.

शब्द समानार्थी व्याख्या
कोष्टकी गुणाकार गुण्य राशींचे जितके अंक तितक्या कोष्टकांचा गुणकांक. समसंख्यांक पंक्ती करून गुणण्याचा प्रकार. धावरा गुणाकार, बैठा गुणाकार. पहा : कपटसिंधु
कोष्टम न. झेंगट; लफडे; खेंकटे. (व.)
कोष्टसंख्या स्त्री. आराखडा : ‘मराठी व्याकरणाची कोष्टसंख्या म्हणजे आराखडा आंग्लभाषेस अनुसरून असावा.’ - के १·१·१९३७.
कोष्टा पु. कोष्टी; कोळी.
कोष्टाऊ वि. हातमागाचा : ‘तुम्ही स्वतःला कोष्टाऊ लुगडी घ्या.’ - माजी.
कोष्टी पु. १. एक विणकर जात. ह्यांचा धंदा सूत कातणे व विणणे. साळ्यापेक्षा यांची जात निराळी. २. (ल.) कोळी, किडा. हा तंतू काढून जाळे विणतो. ३. एक पक्षी. [सं. कोश]
कोष्टी स्त्री. (बकऱ्याची, डुकराची इ.) मानाची सागुती; सागुतीची पुडी. (गो. कु.)
कोष्ठ न. १. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात. २. कोड (एक त्वचेचा रोग). [सं. कुष्ठ]
कोष्ठकोळं जन न. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात.
कोष्ठकोळां जन न. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात.
कोष्ठकोळि जन न. एक औषधी वनस्पती. ही काश्मीरकडे होते. हिच्या मुळ्या औषधी आहेत. शिवाय त्यापासून अत्तर व केसांचा कलप तयार करतात.
कोष्ठ पु. १. पोट; कोठा. २. धान्याचे कोठार; कोठी. ३. खोली; दिवाणखाना. ४. आम, रुधिर, मूत्र इ. देहातील स्थाने. जसे : - आमकोष्ठ, इ.
कोष्ट पु. १. पोट; कोठा. २. धान्याचे कोठार; कोठी. ३. खोली; दिवाणखाना. ४. आम, रुधिर, मूत्र इ. देहातील स्थाने. जसे : - आमकोष्ठ, इ.
कोष्ठ न. (स्था.) खाच; खळगा; खड्डा. इतर बांधकामापेक्षा खालच्या पातळीवर बांधलेली जागा. [सं.]
कोष्ठक न. (वै.) लहान कोशांपैकी एक. यामध्ये वाहिनीचे प्रशाखन होण्याची क्रिया संपते. तिचे गुच्छभ ग्रंथीमध्ये परिवर्तन होते. या ग्रंथी स्रावी पेशींनी भरून जातात. या कोशमय ग्रंथींपैकी प्रत्येक. [सं.]
कोष्ठबंधक वि. मलावरोध करणारे; स्तंभक. [सं.]
कोष्ठशुद्धि स्त्री. शौचाला साफ होणे; कोठा शुद्ध होणे (पुष्कळ रेच झाल्यानंतर). [सं.]
कोष्ठशुद्धी स्त्री. शौचाला साफ होणे; कोठा शुद्ध होणे (पुष्कळ रेच झाल्यानंतर). [सं.]
कोष्ठागार   पहा : कोठार
कोष्ठीकरण न. (मानस.) कल्पना, मूल्ये किंवा अभिवृत्ती दडवून ठेवणे.
कोष्ण वि. किंचित उष्ण; कोंबट; कुबट. [सं.]
कोस पु. १. अंतर दाखविणारे रस्ता मोजणीचे माप; साधारणतः दोन मैल. एक चतुर्थांश योजन. याचे निरनिराळ्या ठिकाणी गजाच्या लांबीप्रमाणे अंतर निरनिराळे असते. साधारणपणे चार हजार हातांचा कोस धरतात. [सं. क्रोश], २. चतुष्कोण, त्रिकोण इ. विवक्षित आकार तंतोतंत नसून त्यात वाकडेपणा आल्यामुळे होणारा न्यूनाधिक भाव; कोच (ताणलेले कापड, हातरुमाल, शेत, भिंत, रस्ता, कुंपण इ. ना येणारा); आधिक्य; वाढ (क्रि. येणे, असणे, होणे, जाणे, निघणे, काढणे, जिरणे, जिरविणे.) [क. कोशे = वाकण, वळण], ३. दिव्य; पहा : कोश (क्रि. घेणे, पिणे.)
कोस स्त्री. १. कूस; फायद्याची मर्यादा : ‘कोणत्या कापडांत किती कोस आहे हें पाहून तसलें कापड येथें तयार करण्याची धडपड...’ - जप्रशि १०२. २. कापडाचा तिरकेपणा. ३. सापाची कात. (व.) [सं. कोश]
कोसकोसी स्त्री. गावागावातील अंतरे कोसात दाखविणारे टिपण : ‘परगणे वाई कोसकसी संमत मुरें देहें ४७.’ - पराग अंक ३ वर्ष १. ९/१०.
कोसपेणी स्त्री. कोसांची मोजदाद.

शब्द समानार्थी व्याख्या
कोसम   पहा : कोशिंब
कोसम्यौंचे सक्रि. पाण्यामुळे (लाकूड) कुजून जाणे. (गो.)
कोसरा पु. कोळी; किडा. पहा : कोसला : ‘गगनीं लागला कोंसरा । कोण पुरवी तेथे चारा ।’ - तुगा ३३०९.
कोसला पु. १. रेशमाचा किडा : ‘जैसा स्वयें बांधौन कोसला मृत्यु पावें ।’ - दास ८·७९. २. रेशमाचा किडा किंवा कोळी यांचा कोश किंवा कोशिटा. ३. ह्या कोशेट्याचा तोड्याच्या बंदुकीच्या भोवती असलेला वेढा.
कोसला (वि.) १. काळसर : ‘गणा पाटलाचा खोंड.. रंगानं कोसला.’ - गागो १००. २. पिवळसर. [सं. कोश + ल]
कोसा पु. १. रेशमाचा किडा : ‘जैसा स्वयें बांधौन कोसला मृत्यु पावें ।’ - दास ८·७९. २. रेशमाचा किडा किंवा कोळी यांचा कोश किंवा कोशिटा. ३. ह्या कोशेट्याचा तोड्याच्या बंदुकीच्या भोवती असलेला वेढा.
कोसा (वि.) १. काळसर : ‘गणा पाटलाचा खोंड.. रंगानं कोसला.’ - गागो १००. २. पिवळसर. [सं. कोश + ल]
कोसला पु. चकमकीवरून उडवलेली ठिणगी ज्याच्यावर पाडतात तो कापूस.
कोसली स्त्री. मकरसंक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वा साखर इ. घालून तयार केलेली करंजी, मिष्ट पदार्थ. कोसल्या उकडून वा तळून करतात. (ना.)
कोसळणे उक्रि. १. एकदम पडणे; तुटून, मोडून पडणे; ढासळणे; विस्कळणे (भिंत, विहीर, रास इ.) : ‘बाजी एकदम जागच्या जागींच कोसळला.’ - स्वप ८८. २. पडून तुकडे होणे (यंत्र इ.) ३. (ल.) वेगाने खाली येणे, पडणे (पाऊस). ४. आधार सुटून, वियुक्त होऊन, सपाटून भरभर खाली पडणे. (वाऱ्याने फळे, फुले). ५. फिसकटणे; प्रतिकूल होणे; निष्फळ होणे (बेत, मसलत). [क. कोसरु = आधार सुटणे]
कोसंब   पहा : कोशिंब : ‘कोसंब अंजीर खैराडा ।’ - कालिका २२·१५.
कोसाई स्त्री. घोड्याचा एक रोग. याने त्याच्या दोन्ही मांड्याखाली गाठी येतात. - अश्वप २·२८३.
कोसिटा पु. कोष्ठी, विणकर : शैव विप्र चाटे । सोवनी अपार कोसिटे ।’ - उह २१६४.
कोसीस   पहा : कोशीस
कोसे वि. भुरट्या रंगाचे : ‘कोसी कनकवणे.’ - वह २८२.
कोसेरा पु. कोळ्याचे घर.
कोस्टी स्त्री. शिकार करून मारलेल्या सावजाचे घातलेले वाटे. [कु.]
कोस्त पु. कलमी आंब्याची एक जात. (गो.) [पो. कोस्ता]
कोहक न. कुहर; विवर; गुहा; डोंगर; पर्वत; भुयारीमार्ग : ‘कोहकी वसती ।’ - ऋ ७९; ‘कोणें एके नगराबाहेरी कोहंकी । चंडरव नामे कोल्हा असे ।’ - पंच १·३७. [सं. कुहर]
कोहंक न. कुहर; विवर; गुहा; डोंगर; पर्वत; भुयारीमार्ग : ‘कोहकी वसती ।’ - ऋ ७९; ‘कोणें एके नगराबाहेरी कोहंकी । चंडरव नामे कोल्हा असे ।’ - पंच १·३७. [सं. कुहर]
कोहकणे अक्रि. वाळणे; सुकणे; रोडावणे. (व.) [सं. कोय]
कोहटळी स्त्री. कुजकी घाण; घाणीची जागा: ‘मग बाळपणीची कोहटळी । धुंडूनि घेतसे ।’ - स्वानु ९·४·७३. [सं. कोथ]
कोहडे   पहा : कुहडे
कोहेडे   पहा : कुहडे
कोहरटे पु. अव. वृक्षाचे शाखाविहीन बुंधे.

शब्द समानार्थी व्याख्या
कोहल   अल्कोहोल- भिषग्विलास जा १९४२
कोहशिकन पु. तोफेचे एक नाव; डोंगर सपाट करणारी तोफ. [फा.]
कोहळा पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहळी पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहळे पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहाळा पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहाळी पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहाळे पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहोळा पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहोळी पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहोळे पु. स्त्री. न. १. कोव्हाळा, कोव्हाळी, कोव्हाळे. एक प्रकारचा भोपळा; फळ आणि वेल.
कोहळी स्त्री. न. १. कोथळी; २. करंडा : ‘रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।’ - दास ४·७·९.
कोहळे स्त्री. न. १. कोथळी; २. करंडा : ‘रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।’ - दास ४·७·९.
कोहळे न. बैलाचे वशिंड. [सं. कुष्मांड]
कोहाळे न. बैलाचे वशिंड. [सं. कुष्मांड]
कोहोळे न. बैलाचे वशिंड. [सं. कुष्मांड]
कोहं उद्गा. पु. ‘मी कोण’, ‘मी कोण’ अशा अर्थाचा ध्वनी; मूल जन्मल्यानंतर ते प्रथम जो आवाज करते तो. [सं. कः + अहम्]
कोहा पु. पायाला पडणारी भेग, (ठा.) पहा : कुया [फा.]
कोहार पु. पालख्या वाहण्याचा भोयांचा धंदा करणारी एक जात : ‘नायकाने प्रतीवर्षी रुपये ५ घासी नाइक कोहार यास द्यावे...म्हणून आज्ञापत्र.’ - शारी १९९.
कोहारतरश पु. तीराचा एक प्रकार.
कोहिस्तान न. जंगली डोंगराळ प्रदेश : ‘...बेहिमतीनें विजयगडास कोहिस्तान व मवाश्यांत गेला म्हणोन सावकारी बातमी आली.’ - अखभा २·१०८. [फा.]
कोहोपरी स्त्री. परात; थाळी. पहा : कोपरी
कोळ पु. १. रानडुक्कर. २. कुत्रा : ‘या ग्रामकोळाचां ठाइं । जैसा मिळणीं ठाओ नाही ।’ - ज्ञा १३·६७९, ३. (पाण्यात वा ताकात) चिंच, आंबे, भात इ. कालवून केले जाणारे दाट पाणी; कुवळ; कोळलेले पाणी. ४. चिंच कोळल्यानंतर तिचा टाकाऊ भाग, चोथा. (वा.) कोळून पिणे - पचवणे; आत्मसात करणे. ५. जळलेला पदार्थ. (क्रि. होणे) कोळसा. ६. राख; वाळलेली, करपलेली अवस्था : ‘डाहाळी जळून कोळ जाती गळून पडे भिंतीवर आंबा ।’ - सला ५७. [क. कोळ्ळि = कोलित] (वा.) वाळून कोळ होणे - अगदी वाळून शुष्क होणे; झडणे (वनस्पती, पाने); कोमेजणे; आक्रसणे; करपणे (वनस्पती, जनावरे). ७. गहाण; कर्जाची फेड न केल्यामुळे कर्जाइतकी जिंदगी (कर्जदारापासून अगर दुसऱ्या कोणापासून) घेऊन अडकवून ठेवणे; गहाण माल. (क्रि. पाडणे.) [फा. कौल = करार], ८. खाडीचा फाटा; पोहडी; ओहर (को.). [क. कोळ्ळ = खोल जागा; भगदाड, दरी]
कोळ वि. मस्त माजलेला. [सं. कोल]
कोळ न. तिळाच्या झाडांची तीळ झाडून घेतल्यानंतरची लहान पेंडी : ‘झाडिलीचि कोळे झाडी । तया न फळें जेवीं बोंडी ।’ - ज्ञा १३·५८६.

शब्द समानार्थी व्याख्या
कोळऊ स्त्री. कोळ उवा; अंगावरील ऊ (म्हैस, डुक्कर इत्यादींच्या). पहा : कोळवू
कोळउंदीर पु. घूस. [सं. कोल]
कोळकुंदूर पु. घूस. [सं. कोल]
कोळकांदा पु. एक जंगली औषधी कांदा. (गो.)
कोळख स्त्री. ऐरणीचे लाकूड. (गो.)
कोळखण स्त्री. सोनाराचे सामान ठेवण्याचे लाकडी पात्र. (गो.)
कोळखंड न. बैलाचे वशिंड. (को.)
कोळखांदा न. बैलाचे वशिंड. (को.)
कोळगंड पु. (कोळी जातीला) तुच्छतेने म्हणतात.
कोळगा पु. भ्रमर : ‘उदैजेति परबिंबीं कळि कोळिगा राहिला कोंभीं ।’ - ऋ ९०. [सं. कुळिंग]
कोळिगा पु. भ्रमर : ‘उदैजेति परबिंबीं कळि कोळिगा राहिला कोंभीं ।’ - ऋ ९०. [सं. कुळिंग]
कोळगे न. तांब्याचे किंवा पितळेचे पिंप. हे लहान मोठ्या आकाराचे असते. (बे.) [क. कोळगा]
कोळणे   १. सक्रि. कालवणे; कुस्करून सार काढून घेणे : ‘जाड कोंडा वापरणे शक्य नसेल तर तो पाण्यात तास - दोन तास घालून कोळावा.’ - पाक ६२.
कोळणे उक्रि. कुसकरणे; (पाण्यात) हाताने चुरडणे; गर काढणे; पिळणे (चिंच, आंबा); सार, सत्त्व काढून घेणे.
कोळदांडा   पहा : कोलदांडा
कोळपणी स्त्री. कोळप्याने बेणणे; पेरलेल्या जमिनीतील तण काढणे; खुरपणी.
कोळपणे स्त्री. कोळप्याने बेणणे; पेरलेल्या जमिनीतील तण काढणे; खुरपणी.
कोळपणे अक्रि. करपणे; काळवंडणे; वरवर जळून काळे होणे; उन्हाने काळे पडणे (झाड, शरीर); चुलीत पेटलेले निखारे राखेने झाकले जाणे; जाळ न होता लाकूड काळे पडणे; धुमसणे; जळणे : ‘करीना शांत कांत ही कांत म्हणुन कोळपत्यें ।’ - प्रल २१८. [क. कोळ्ळि]
कोळपाट पु. पोळपाट. (तंजा.)
कोळपुटी स्त्री. माशांच्या डोक्याच्या तुकड्यांचे केलेले पक्वान्न, पदार्थ. (गो.)
कळपुटी स्त्री. माशांच्या डोक्याच्या तुकड्यांचे केलेले पक्वान्न, पदार्थ. (गो.)
कोळपुरुख पु. कुलदैवत : ‘मज कोळपुरुखु : उधारूनि देयावा’- लीचपू १४५.
कोळपे न. पु. वीतभर पीक उभे असताना उपयोगात आणायचे अवजार. याने पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हलविणे, भुसभुशीत करणे, आतील तण काढणे, पिकाला मातीची भर देणे ही कामे होतात. शेतीचे एक अवजार. [क. कोळ = फाळ, दात]
कोळप न. पु. वीतभर पीक उभे असताना उपयोगात आणायचे अवजार. याने पिकांच्या दोन ओळींमधील जमीन हलविणे, भुसभुशीत करणे, आतील तण काढणे, पिकाला मातीची भर देणे ही कामे होतात. शेतीचे एक अवजार. [क. कोळ = फाळ, दात]
कोळमसणे अक्रि. कोळपणे : ‘मला हिरवा करायचा बेत केला हुता, त्यो असा कोळमसून चालला होता.’ - खळाळ १६०. [क.]

शब्द समानार्थी व्याख्या
कोळमाटणे अक्रि. पहा : कोळपणे : ‘येल कोळमाटून जावी’ - रैत ४३.
कोळमुटचे अक्रि. कल्हई नसलेल्या भांड्यात पदार्थ ठेवल्याने त्याला कलंक येणे; पदार्थ कळकणे. (गो.)
कोळमूळ न. उभट व वाटोळे भांडे (कढी, ताक वाढण्यासाठी उपयोगी. काही भांड्यांना मागे मूठ असते); पाळे. (गो. कु.)
कोळम न. लहान कोळंबी (गो. कु.). पहा : कोळंबे
कोळम्यां न. लहान कोळंबी (गो. कु.). पहा : कोळंबे
कोळयो पु. भाताचे बी. (गो.)
कोळवण न. १. वसई व कल्याण यांच्या उत्तरेकडील प्रदेश; उत्तर कोंकण. यात विशेषतः कोळी लोकांची वस्ती आहे. २. कोळ्यांचा दंगा, पुंडावा : ‘महीकाठी कोळवण जाले आहे.’ - पेद ३६·२११.
कोळवा पु. वाळवून ठेवलेल्या पालेभाज्या. (व.)
कोळवाड स्त्री. पु. गावातील कोळी लोकांची वस्ती, वाडी.
कोळवाडा स्त्री. पु. गावातील कोळी लोकांची वस्ती, वाडी.
कोळविणे उक्रि. पहा : कोळणे
कोळवीजु स्त्री. अकाळ वीज : ‘जैसी उगवली कोळवीजुची पुटी ।’ - रुस्व १३·१५३९.
कोळवू स्त्री. (बैल किंवा रेडा इ.) जनावरांच्या अंगावरील गोचीड किंवा गोमाशी; कोळऊ.
कोळवे न. १. शेराचा एक अष्टमांश भाग अथवा चिपट्याचा एक द्वितीयांश भाग; अदपावाचे माप : ‘-कधि ऐकली चिपटीं कधि निपट कोळवीं चोळवी कधीं पाहिलीं ।’ - राला १०९. [सं. कुडव = पावशेर], २. ठेंगण्या घराला आत जाताना वर डोके लागू नये म्हणून कमानीसारखा आकार आणून उंच वाढविलेला पाख्याचा भाग. ३. चांधईला लागून काढलेली खोली; घराची पडवी. हिचा उपयोग भांड्यांची खोली, स्वयंपाक घर, न्हाणीघर वगैरेसाठी होतो. (कु. को.), ४. बैलाचे वशिंड. (को.)
कोळे न. बैलाचे वशिंड. (को.)
कोळशी स्त्री. १. काजळी (जळत्या वातीची किंवा मशालीची); कोजळी; जळकी वात. २. जोंधळ्यावरील रोग. याने दाणे काळे पडतात. ३. नाचणीची एक गरवी जात. हिचे दाणे काळे असतात. [क. कोळ्‌ळि]
कोळशीट न. कोळ्यांचे जाळे.
कोळशेटे न. कोळ्यांचे जाळे.
कोळष्टक न. कोळ्यांचे जाळे.
कोळिष्टक न. कोळ्यांचे जाळे.
कोळशीण स्त्री. एक प्रकारचे लहान औषधी झुडूप. अंगाखाली कोळी चुरडला असताना याच्या पाल्याचा रस लावतात.
कोळसीण स्त्री. एक प्रकारचे लहान औषधी झुडूप. अंगाखाली कोळी चुरडला असताना याच्या पाल्याचा रस लावतात.
कोळशी सड   पिकांचा एक रोग. जमिनीलगत कवकामुळे हा रोग काही पिकांच्या रोपांना होतो. यामुळे स्तंभ काळा पडतो. काही वेळेला रोगपीडित काळा स्तंभ लिबलिबित होतो.
कोळसणे अक्रि. कोळशासारखे काळे होणे.
कोळसन न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)

शब्द समानार्थी व्याख्या
कोळसुना न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)
कोळसून न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)
कोळसिंदा न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)
कोळसुंदा न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)
कोळिष्णा न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)
कोळिस्ता न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)
कोळिसे न. पु. कोल्ह्याकुत्र्यासारखे एक जंगली जनावर. आपला शत्रू जवळ आल्यास त्याच्या तोंडावर आपले मूत शिंपडून त्याला हा आंधळे करतो व मग खातो असे म्हणतात. (मावळ)
कोळसंडणे अक्रि. धुमसणे; बाहेरून जळून अगदी काळे होणे (परंतु आतून न जळणे).
कोळसा पु. १. कोतवाल पक्षी. २. अतिप्राचीन काळी, पृथ्वीवरील नैसर्गिक उत्पातामुळे झाडेझुडे भूगर्भात कुजून तयार झालेला काळ्याभुऱ्या रंगाचा कार्बनयुक्त पदार्थ. भूगर्भात खडकांच्या रूपात याचे थर आढळतात. याला दगडी कोळसा किंवा खाणीतील कोळसा असे म्हणतात. भट्टी लावून लाकडापासूनही कोळसा तयार करतात. जळणासाठी व ऊर्जानिर्मितीसाठी कोळशाचा उपयोग होतो. ३. विझलेला निखारा : ‘तरि वरि तसाच आंतहि उगाळितां कोळसा प्रयास करा ।’ - संशयरत्नमाला २० (नवनीत ३५०). [क. कोळ्ळी]
कोळसां न. ज्याचा फाळ झिजला आहे असा नांगर. (कु.) पहा : कोळसे
कोळसुंदा पु. कोरांटीतील एक जात. शेताच्या कडेला किंवा ओहोळाच्या काठी येणारे झुडूप. याची उंची दोनअडीच फूट असते. याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. पाने लांबट असून त्यांना खाली एक काटा असतो. याच्या बियांना तालीमखाना म्हणतात.
कोळसा पु. कोरांटीतील एक जात. शेताच्या कडेला किंवा ओहोळाच्या काठी येणारे झुडूप. याची उंची दोनअडीच फूट असते. याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. पाने लांबट असून त्यांना खाली एक काटा असतो. याच्या बियांना तालीमखाना म्हणतात.
कोळिसा पु. कोरांटीतील एक जात. शेताच्या कडेला किंवा ओहोळाच्या काठी येणारे झुडूप. याची उंची दोनअडीच फूट असते. याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. पाने लांबट असून त्यांना खाली एक काटा असतो. याच्या बियांना तालीमखाना म्हणतात.
कोळसुंदा पु. बंदुकीची माशी, मोहरी. हिच्याकडे बघून गोळीचा नेम धरतात.
कोळसे न. नांगराचा फाळ बनविण्याचा लाकडी ठोकळा. (कु.)
कोळसेमुडे न. कोळसे वाहण्याकरता केलेला भात्येणाचा मुडा.
कोळसॉ पु. चोवीस शेरांचे माप. (गो.)
कोळसो पु. चोवीस शेरांचे माप. (गो.)
कोळंगा पु. जळजळीत निखारा. [क. कोळ्ळि]
कोळंगी स्त्री. ठिणगी; गूल; काजळी.
कोळंजणे अक्रि. जळून राख होणे (विस्तवातून काढलेले कोलीत, निखारा); उन्हाने करपून काळे होणे, पडणे. पहा : कोळपणे
कोळं जन न. (वन.) भारतात सर्वत्र आढळणारी वनस्पती. कोष्ठ कोलंजन; आंबेहळदीसारखे झाड. पानांचा वास मधुर, मुळ्यांचा रंग पांढरा, चव तिखट, गड्डे व फळ औषधी. हे वेखंडाच्या ऐवजी वापरतात, तसेच सर्दीत मिऱ्याबरोबर देतात. दातदुखी थांबविण्यासाठी चूर्ण दातावर चोळतात. ही वनस्पती मज्जातंतूसाठी पौष्टिक व कामोद्दीपक आहे. [सं. कुलिंजन]
कोळां जन न. (वन.) भारतात सर्वत्र आढळणारी वनस्पती. कोष्ठ कोलंजन; आंबेहळदीसारखे झाड. पानांचा वास मधुर, मुळ्यांचा रंग पांढरा, चव तिखट, गड्डे व फळ औषधी. हे वेखंडाच्या ऐवजी वापरतात, तसेच सर्दीत मिऱ्याबरोबर देतात. दातदुखी थांबविण्यासाठी चूर्ण दातावर चोळतात. ही वनस्पती मज्जातंतूसाठी पौष्टिक व कामोद्दीपक आहे. [सं. कुलिंजन]
कोलिं जन न. (वन.) भारतात सर्वत्र आढळणारी वनस्पती. कोष्ठ कोलंजन; आंबेहळदीसारखे झाड. पानांचा वास मधुर, मुळ्यांचा रंग पांढरा, चव तिखट, गड्डे व फळ औषधी. हे वेखंडाच्या ऐवजी वापरतात, तसेच सर्दीत मिऱ्याबरोबर देतात. दातदुखी थांबविण्यासाठी चूर्ण दातावर चोळतात. ही वनस्पती मज्जातंतूसाठी पौष्टिक व कामोद्दीपक आहे. [सं. कुलिंजन]
कोळिं जन न. (वन.) भारतात सर्वत्र आढळणारी वनस्पती. कोष्ठ कोलंजन; आंबेहळदीसारखे झाड. पानांचा वास मधुर, मुळ्यांचा रंग पांढरा, चव तिखट, गड्डे व फळ औषधी. हे वेखंडाच्या ऐवजी वापरतात, तसेच सर्दीत मिऱ्याबरोबर देतात. दातदुखी थांबविण्यासाठी चूर्ण दातावर चोळतात. ही वनस्पती मज्जातंतूसाठी पौष्टिक व कामोद्दीपक आहे. [सं. कुलिंजन]

शब्द समानार्थी व्याख्या
कोळंब पु. कोंडवाडा. (गो.)
कोळंब न. पु. शाकारणीचे तांबडे, जाडे गवत; तांबट; तांबेट.
कोळंबा न. पु. शाकारणीचे तांबडे, जाडे गवत; तांबट; तांबेट.
कोळंब पु. एक प्रकारचे भात. (कुलाबा, कु.)
कोळंब्या पु. एक प्रकारचे भात. (कुलाबा, कु.)
कोळंबा पु. पाणी भरण्याचा पोहरा; खापरी भांडे; मडके. पहा : कोळंबे [क. कोळबि = पोकळ नळी]
कोळंबी स्त्री. १. झिंगा मासा. (को.), २. गुरांना पाणी पाजण्याच्या उपयोगाची दगडी किंवा लाकडी कुंडी. हिचा उपयोग कपडे धुण्यासाठीही करतात. (गो.) (सामा.) लाकडी पात्र. पहा : कोळंबे
कोळंबे न. १. मातीचे रुंद तोंडाचे भांडे. फुलझाडांच्या कुंड्यांसाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी व अंबोण ठेवण्यास याचा उपयोग करतात. (को. गो. कु.) २. रहाटाच्या लोट्याचे पाणी ज्यात पडते असे रहाटाच्यामध्ये असलेले लाकडी पात्र, डोणी. या डोणीची दोन्ही तोंडे बंद असून एका तोंडाजवळ खालच्या बाजूला भोक असते व त्यातून पाणी आडनळीत पडते. ३. विहिरीतून ओकतीने पाणी काढण्याकरता सुरमाडाच्या बुडख्याचे किंवा धातूचे केलेले पात्र; पोहरा. ४. कुंडीतील अथवा पाटातील पाणी बाहेर फेकण्याकरिता सुपाच्या किंवा पावड्याच्या आकाराचे भांडे; शेलणे. ५. (चर्मकार) चामडे भिजविण्याचे चांभाराचे खापरी अथवा दगडी पात्र; कुंडी; कोटमी.
कोळा पु. १. मोठा डास. २. जळता कोळसा : ‘सर्वांगी बांधौनि कोळे : लाविजति यके वेळे’ - ज्ञाप्र २९८.
कोळावे न. कोळी लोकांचा दरोडा, धाड. [क. कोळते = लुटालुट; दरोडा]
कोळिक पु. कोळी; कोळी जातीचा; वाटमारी करणारा : ‘वाटपाडा कोळिकु (वाल्मिकी).’ - ज्ञागा १२०.
कोळिगा पु. भ्रमर; भुंगा : ‘उदैजत पराबिंबीं । कळिकोळिगा राहिला कोंभी ।’ - ऋव ५६९.
कोळिता   पहा : कोळसुंदा
कोळिश्रय पु. १. रेशमाचा एक किडा : जैसा कोळिश्रयाचा बंध । तो तयांसचि करी बद्ध ।’ - कथा १·५. २. रेशमाच्या किड्याचे कोशीट, कोश. हा किडा औषधी असतो.
कोळिस्रा पु. १. रेशमाचा एक किडा : जैसा कोळिश्रयाचा बंध । तो तयांसचि करी बद्ध ।’ - कथा १·५. २. रेशमाच्या किड्याचे कोशीट, कोश. हा किडा औषधी असतो.
कोळिसरा पु. १. रेशमाचा एक किडा : जैसा कोळिश्रयाचा बंध । तो तयांसचि करी बद्ध ।’ - कथा १·५. २. रेशमाच्या किड्याचे कोशीट, कोश. हा किडा औषधी असतो.
कोळिष्णा   पहा : कोळसन
कोळिसणे सक्रि. विझणे; कोळपणे : ‘की विरहाग्नि मनीं कोळिसैला ।’ - नवि १३५.
कोळिसरा पु. न. एक प्रकारचा झुरळासारखा प्राणी.
कोळिसा पु. न. एक प्रकारचा झुरळासारखा प्राणी.
कोळिसे पु. न. एक प्रकारचा झुरळासारखा प्राणी.
कोळिसरी स्त्री. एक झुडूप; गवताचा एक प्रकार. पहा : कोळसुंदा
कोळी पु. १. जळत्या किंवा जळलेल्या वातीची काजळी. [क. कोळ्ळी], २. एक जात व त्या जातीचा माणूस. मासे पकडणे, विकणे व नावाड्याचा व्यवसाय करणारी जात. याच जातीतील काही लोक डोंगरात, अरण्यात राहून, शिकार करून उदरनिर्वाह करतात. प्राचीन ग्रामसंस्थेत कोळ्याकडे पाणी पुरविण्याचे काम असे. धीवर ही एक गुन्हेगार जात समजली जात होती. पण यांच्यापैकी फक्त महादेव कोळी (राजकोळी) व गुजराथकोळी याच दोन पोटजाती गुन्हे करत असत. ३. कोळी नावाचा किडा. हा आपल्या अंगातून धागा काढतो व त्याचे जाळे बनवितो. ४. पाण्यात राहणारा एक पक्षी. [सं. कौल, कौलिक]
कोळीण स्त्री. १. कोळी जातीतील बाई. २. कोळी किड्याची मादी. ३. शिमग्याच्या सणात कोळणीचे सोंग काढून नाचणारा पुरुष. ४. नायकीण. (नाशिक) ५. कोळी पक्ष्याची मादी. ६. रानडुकराची मादी : ‘कोळीण आपल्या पिलांसह वसवसत बाहेर पडली होती.’ - श्रीयो १·३०२.
कोळीलाकडी स्त्री. जंगलातून तोडून आणलेल्या लाकडावरील कर, दस्तुरी.

शब्द समानार्थी व्याख्या
कोळीष्टक न. कोळशीट; कोश.
कोळीसर   पहा : कोळिसरा : ‘झुडुपांवरचा काळा कोळीसर भुर्रकन फडफडत येऊन म्हाताऱ्या गाईच्या ढोपरावर बसत होता.’ - बाब ४८.
कोळुसांटा पु. एक प्रकारची वनस्पती. (बे.)
कोळे न. १. गवताचा लंबवर्तुळाकार (अंडाकृती) मुडा किंवा पुडा. यांत भात किंवा भाताचे बियाणे ठेवतात. गवताची पुरचुंडी (पावटे इ. ठेवण्याची). [सं.], २. वाळलेल्या काटक्या व पाचोळा : ‘एकाधा एकु तयावरि कोळें जाळो :’ - दृपा १४.
कोळेरोग पु. सुपारीवरील एक रोग.
कोळो पु. १. मोठी माशी. (चि. कु.), २. लांबवर उडणारा निखारा (जळती गंजी अथवा घर यांचा).
कोळ्याचे सूत   १. लांब सूत. २. (ल.) लांबच लांब, नीरस व कंटाळवाणे भाषण.
कोंकणा पु. सर्वसाधारण गोमंतकातील हिंदू लोकांना उद्देशून ख्रिस्ती लोक हा वापरतात तो शब्द. (गो.)
कोंकतर स्त्री. पाणकोंबडा. (गो.) [सं. कोक]
कोंकतारी स्त्री. पाणकोंबडा. (गो.) [सं. कोक]
कोंकारचे अक्रि. कोंबड्याचे आरवणे. (गो.) [ध्व.]
कोंकारी स्त्री. १. पाणकोंबडा. २. एक मासा. (गो. कु.) [ध्व.]
कोंकणे अक्रि. ओरडणे; आरवणे. (राजा.)
कोंकेर न. पाथरवटाचे हत्यार (दगड काढण्याचे). (गो.)
कोंकेरी स्त्री. एक पक्षी; पाणकोंबडा : ‘काळी कोंकेरी भातात लपून...’ - आआशे १६९. पहा : कोंकारी
कोंग न. १. ढोंग; सोंग (दारिद्र्य, दुःख, वेड इ. चे). (क्रि. घेणे, करणे, लावणे.) : ‘जो न्यायासनावर चढला कीं दुष्यंत राजाप्रमाणें त्या गांवचाच नाहीं असें बळानें कोंग मात्र करतो...’ - निमा ६२५. [क.], २. कुबड; कुबड्या. पहा : कोक [क.]
कोंध न. १. ढोंग; सोंग (दारिद्र्य, दुःख, वेड इ. चे). (क्रि. घेणे, करणे, लावणे.) : ‘जो न्यायासनावर चढला कीं दुष्यंत राजाप्रमाणें त्या गांवचाच नाहीं असें बळानें कोंग मात्र करतो...’ - निमा ६२५. [क.]
कोंगटे न. वस्त्र; पांघरूण : ‘तेयावरी पासौडी पांगुरले : वरि जाडीचे कोंगटें :’ - लीच २·७८.
कोंगते न. घुंगट, बुरखा : ‘उजवेया हाता सोरठिस जाडीचे कोंगते घालुनि...’ - स्थापो २८.
कोंगल्ल वि. वाकडेतिकडे; कोंग. (गो.) [क. कोंक - ग.]
कोंगळी स्त्री. विळा; कोयती; गवत कापण्याची कात्री. [क. कोंग = वाकडी विळी]
कोंगा पु. १. पाणथळ शेतात राहून भाताची नासाडी करणारा प्राणी. (गो.) २. एक लहान मासा. [ध्व.], ३. (ल.) मूर्ख माणूस.
कोंगा वि. रोंग्या; रोगी; कुबडा. [क. कोग]
कोंगाडा पु. (ल.) मूर्ख माणूस.
कोंगाडा वि. रोंग्या; रोगी; कुबडा. [क. कोग]

शब्द समानार्थी व्याख्या
कोंगाडी पु. (ल.) मूर्ख माणूस.
कोंगाडी वि. रोंग्या; रोगी; कुबडा. [क. कोग]
कोंगाटी वि. अव्यवस्थित राहणारा : ‘माणसानं कोंगाट्यासारखं राहावं असं आहे की काय?’ - लव्हाळी २६१.
कोंगाडी वि. सोंगाड्या; ढोंगी; बहुरूपी; कोंग सोंग करणारा : ‘कोंडाण्यास कोंगाड्याचे सोंग घेऊन...’ - सूर्य ५६. [क.]
कोंगी वि. सोंगाड्या; ढोंगी; बहुरूपी; कोंग सोंग करणारा : ‘कोंडाण्यास कोंगाड्याचे सोंग घेऊन...’ - सूर्य ५६. [क.]
कोंगीग्या वि. सोंगाड्या; ढोंगी; बहुरूपी; कोंग सोंग करणारा : ‘कोंडाण्यास कोंगाड्याचे सोंग घेऊन...’ - सूर्य ५६. [क.]
कोंगाळा वि. लांब, वाकडे आकडे ज्या झाडास येतात असे (चिंचेचे झाड).
कोंगाळे न. लांबट, वाकडी चिंच (फळ व झाड); कोंगाळी चिंच; चिंचेचा आकडा. (को.) [क. कोंग = वाकडे]
कोंगे न. मधाचे लांबट पोळे. [क. कोंगे = आकडी]
कोंच कोंच   थोडे, थोडे. (व.) [सं. कुच् = थोडा होणे, करणे]
कोंजट   पहा : कोंझट, कोंझा
कोंजळी स्त्री. ओंजळ; पसा (दोन हातांचा).
कोंजा   १. खोल डोळ्याचा (माणूस.) २. खोल गेलेला व बारीक (डोळा). ३. (ल.) तुसडा; तिरसट. ४. संकुचित. [सं. कुचित]
कोंझा   १. खोल डोळ्याचा (माणूस.) २. खोल गेलेला व बारीक (डोळा). ३. (ल.) तुसडा; तिरसट. ४. संकुचित. [सं. कुचित]
कोंझट   १. खोल डोळ्याचा (माणूस.) २. खोल गेलेला व बारीक (डोळा). ३. (ल.) तुसडा; तिरसट. ४. संकुचित. [सं. कुचित]
कोंटा पु. कोपरा. (हैद्रा.)
कोट्टा पु. बी; कोय; बाठा. (तंजा.) [क. कोट्टे]
कोंड पु. १. गोल कुंपण; वई; गावकूस : ‘इंद्रियग्रामींचें कोंड ।’ - ज्ञा २·२४२. (को.) २. शपथ घेणाऱ्याच्या भोवती काढलेले वर्तुळ. ३. गोटीकरिता केलेले वर्तुळ; गल. ४. वर्तुळाकार वस्ती; खेड्यातील एक स्वतंत्र वस्ती (ही एकाच जातीची असते); आळी; वाडी. ५. एकाच्या वहिवाटीतील जमीन, शेत. ६. नदीतील डोह (राजा. कु.) डबके; फोंड; कुंड. (गो.) ७. कोंडमारा; गुदमरा : ‘बहू पाहतां अंतरी कोंड होतो ।’ - राम करुणाष्टके ७. ८. एक खेळ. वर्तुळातील खेळ्यांना बाहेरचे गडी बाहेर काढू पाहतात (वाघ - मेंढीप्रमाणे.) (ठा.)
कोंड स्त्री. १. कोंडी; बंद केलेली जागा किंवा घर; तुरुंग. [सं. कुंड] (वा.) कोंड पडणे - संकट येणे. कोंड होणे - कोंडमारा होणे; कोंडले जाणे. २. नदीतील डोह, डबके. [क.]
कोंडका पु. लाकडाचा ओंडका, गाठ. पहा : कोंडके
कोंडकी स्त्री. १. बगीच्यात पाणी साठवण्याकरिता केलेला लहानसा खड्डा, हौद. २. मिठागर. ३. भाताचे खाचर (बांध घालून तयार केलेले.). पहा : कोंडके
कोंडके न. १. डोंगरातील आडवळणाची जागा; गुहा; दरी : ‘पर्वताच्या कोडक्यांत गाव असल्यामुळें...’ - खेया ३७. (को.) २. बांध घातलेला वाफा (पाणी राखून ठेवण्यासाठी). ३. पहा : कोंडकी. ४. दाराची खिटी; कुत्रे. पहा : कोरडिके. ५. (ओतकाम) भांडे चरकावर धरण्यासाठी लावण्याचा लाकडी ठोकळा.
कोंडडाव पु. (गोट्या) कोंडीचा डाव. यात निरनिराळी घरे व रेघा आखून खेळ खेळतात.
कोंडण स्त्री. कोंडण्याची जागा; गोठा; कोंडवाडा : ‘ऐशा विचाराचे घालून कोंडणीं । काय चक्रपाणी निजलेती ।’ - तुगा १·१५४२.
कोंडणी स्त्री. कोंडलेली अवस्था; गुंतून, अडकवून पडलेली, बंदिस्त स्थिती; गुंतून, बांधून पडणे (शब्दशः व लक्षणेने).

शब्द समानार्थी व्याख्या
कोंडणे उक्रि. १. चोहीकडून बंदिस्त करणे; अडकवून ठेवणे; अडविणे; बंद करणे (माणूस खोलीत घालून, नदीला बांध घालून इ.). २. (ल.) घोटाळ्यात घालणे, आणणे, गांगरविणे; कुंठित करणे; निरुपाय करणे (वाद इ. मध्ये). ३. गुंतणे; अडकून पडणे : ‘न कोंडे रसनेचिया चाडा । न पडे क्षुधेचा पांगडा ।’ - एभा ११·९३६.
कोंडपाणी न. (भूगोल) १. गुंफित प्रवाहांच्या परिसरातील साचलेले पाणी. २. अत्यंत अरुंद नागमोडी वळणाच्या व चंद्रकोराकृती सरोवरांच्या परिसरात अधूनमधून साचणारे पाणी. ३. नद्यांवरील धरणांच्या उगमस्थानाकडील भागात अडवलेले, कृत्रिम जलाशयातील पाणी.
कोंडबार पु. कुंचबणा; कोंडमारा : ‘कुमारां कीजे कोंडबार ।’ - उगी ६१४.
कोंडमार पु. १. कोंडून ठेवून मारणे; लहान खोलीत घालून गुदमरविणे. २. भांडणात, वादात, चढाओढीत प्रतिपक्षीयाने केलेली अडवणूक, कोंडी, ३. संकटात, अडचणीत आणून नकोसे करणे. ४. चहूकडून कोंडल्यामुळे होणारी अवस्था; अगतिकत्व; कुचंबणा.
कोंडमारा पु. १. कोंडून ठेवून मारणे; लहान खोलीत घालून गुदमरविणे. २. भांडणात, वादात, चढाओढीत प्रतिपक्षीयाने केलेली अडवणूक, कोंडी, ३. संकटात, अडचणीत आणून नकोसे करणे. ४. चहूकडून कोंडल्यामुळे होणारी अवस्था; अगतिकत्व; कुचंबणा.
कोंडली स्त्री. गाडगे; मडके. (चंद्रपुरी)
कोंडले न. पातळ पदार्थ राहण्यासाठी सभोवार भात इ. पदार्थ लावून जे ताटात (जेवताना) करतात ते अळे; कुंड (कु.) [सं. कुंड]
कोंडवरा वि. खोल; खोलगट (भांडे इ.). (राजा.) [क. कोडे]
कोंडवाड न. स्त्री. पु. गुरांचा गोठा. (को.) गुरे कोंडण्यासाठी केलेली कोंडी; गावात अगर शेतात शिरून नासाडी करणारी गुरे कोंडून ठेवण्याची सरकारी जागा; गधेघाट. ह्यांच्या सुटकेसाठी मालकाला रोजचा त्याचा खर्च व दंड भरावा लागतो.
कोंडवाडा न. स्त्री. पु. गुरांचा गोठा. (को.) गुरे कोंडण्यासाठी केलेली कोंडी; गावात अगर शेतात शिरून नासाडी करणारी गुरे कोंडून ठेवण्याची सरकारी जागा; गधेघाट. ह्यांच्या सुटकेसाठी मालकाला रोजचा त्याचा खर्च व दंड भरावा लागतो.
कोंडळी स्त्री. लाकडी फावडे; धान्य मळताना पातीतून उडून गेलेली कणसे गोळा करण्याचे साधन.
कोंडळे न. कडे; वर्तुळ; कोंडाळे : ‘मग जमदग्नीनें विचारिलें । मृत्तिकेचे कोंडळें केलें ।’ - कालिकापुराण २२·२६.
कोंडा पु. १. धान्याचे मूळ, सालपट, तूस इ. : ‘देवा कळणा अथवा कोंडा ।’ - तुकाराम (नवनीत ४४८). २. (ल.) ताप निवाल्यानंतर अंगावरून निघणारा एक प्रकारचा भुसासारखा पदार्थ, सालपटे, मळ (क्रि. जाणे.) २. खपली, पापुद्रा. (वा.) कोंड्याचा मांडा करणे - १. सुगरणपणा अंगी असणे. २. अगदी निकृष्ट परिस्थितीतही चांगले कार्य करून दाखविणे; साध्या गोष्टीच्या मदतीनेही चांगल्या गोष्टी करणे. ३. (ल.) अडून न बसणे; गोड करून घेणे; समाधानी राहणे. ४. चिवा; एक प्रकारचा लहान बांबू. [क.], ५. पहा : कोयंडा. ६. मल्याळी तऱ्हेची वेणी व तिचा साज. (तंजा.)
कोंडाउर पु. एका जातीचा साप.
कोंडा पाऊस   पावसाची बुरबुर, रिपरिप; तुषारयुक्त पाऊस.
कोंडापाणी न. अन्नपाणी : ‘नका देऊ तिळमात्र कोंडापाणी ।’ - ऐपो २३५.
कोंडाभोंडा पु. १. कोंडा, भूस इ. पदार्थ. २. (ल.) कोरडे, नीरस, वाळलेले अन्न; कदान्न.
कोडामांडा पु. कोंडा, भूस यांसारखे बारीकसारीक पदार्थ : ‘माशांना खाऊ घालायचा कोंडामांडा भरलेला असे.’ - किरिस्ताव १२.
कोंडाळणे अक्रि. १. गरगर फिरणे; सैरावैरा धावणे; कोंडलेल्या जागेत इकडे तिकडे फिरणे; वाहणे (वारा). २. घिरट्या घेत जाणे; वाताहात होणे; उधळणे (गवताच्या काड्या, धूळ). ३. भोवरे करीत वाहणे; गिरक्या घेत जाणे (नदी). ४. घोटाळणे; गांगरणे (मन). ५. पुढेमागे जाणे; सैरावैरा धावणे (निबिड अरण्यातल्याप्रमाणे.) ६. कोंदणे; गुदमरणे. (ना.)
कोंडाळे न. १. वर्तुळ; वेटोळे; वाटोळी जागा; आळे. २. माणसांनी वर्तुळाकृती बसणे; भोवती बसणे. ३. थालीपीठ; कोंडोळे. ४. आळे (क्रि. करणे.) (गो.) ५. गट; टोळके.
कोंडी पु. खोंडा; दोन ओढ्यातील जमिनीचा भाग [सं. कुंड]
कोंडी स्त्री. १. जिच्यात काही व्यवहार होऊ शकत नाही अशी परिस्थिती : ‘एका धनाढ्य व्यापाऱ्याने बाजारात कोंडी निर्माण केली.’ - विजी १५. २. जाच; बंधन; कडक शिस्त : ‘जातींची संख्या व कोंडी बेसुमार वाढली.’ - गांगा १७. ३. कोंडलेली जागा; कोंडवाडा. ४. ब्राह्मणांना दक्षिणा देण्याच्या वेळी त्यांना बसण्याकरिता केलेले आवार; रमणा. ३. (आट्यापाट्या) गडी जेथे दोन्हीकडून अडवून धरतात ती पाटी (पाटीवरचा गडी व मुरदुंग्या यांनी अडविलेली.) ४. नदीच्या बंधाऱ्याची जागा. ५. मीठ बनविण्याची लहान मिठागरे. (को.) ६. अडचणीची परिस्थिती. (वा.) कोंडी करणे - कोंडणे; वेष्टणे; घेरणे : ‘पहिल्या बाजीरावाने भोपाळवर कोंडी करून निजामाच्या घोड्यांना पळसाचा पाला खाण्याची पाळी आणली.’ - के १९·३·१९४०. कोंडी फुटणे - अडचणीची परिस्थिती संपणे; संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग किंवा उपाय सापडणे : ‘ही कोंडी फुटणार कशी तेच मला कळत नव्हते.’ - पिंपेर २५. कोंडी फोडणे - अडचणीतून बाहेर पडणे. कोंडी येणे - कोंडून ठेवणे. कोंडीत पकडणे - पेचात धरणे; अडचणीत आणणे : ‘एकट्याला कोंडीत पकडून त्याच्याकडून त्यांनी होकार मिळविला.’ - रथ १३५.
कोंडी   स्त्री. (सोनार) सरीचा अथवा ठुशीचा भाग. (बे.)
कोंडीव वि. १. कोंडलेले; बंद केलेले (पाणी, वारा, जागा). २. बंदीत ठेवलेला (माणूस, प्राणी).
कोंडुली स्त्री. दही विरजण्याचे लहान मडके : ‘सदानंदाची लहान कोंडुली धुतली.’ - शाआ १११.

शब्द समानार्थी व्याख्या
कोंडुळे   पहा : कोडुळे
कोंडे न. १. पणती; चिकोरी; पणतोली. २. पाणसाप (बेडूक खाणारा). (को.)
कोंडेकड न. नवीन तांदळाच्या कोंड्याचे लहान पापड केळीच्या सोपटाच्या किंवा कोहळ्याच्या पाण्यात याचे पीठ भिजवतात. (कुलाबा)
कोंडो पु. १. बांबू. २. जमीन मोजण्याचे माप. (गो.) पहा : कोंडा
कोंड्या पु. माडी, ताडी ठेवायचा भोपळा. हा ताडीच्या झाडाला टांगून ठेवतात. २. एक झाड.
कोंढ्या पु. माडी, ताडी ठेवायचा भोपळा. हा ताडीच्या झाडाला टांगून ठेवतात. २. एक झाड.
कोंड्यामुरूम पु. भुसभुशीत, ठिसूळ मुरूम.
कोंढ न. १. कुंपण; गावकुसू : ‘इंद्रियग्रामीचे कोंढ । - राज्ञा २·२३७. २. कोंदण. ३. (ल.) खोल : ‘डोळे कोंढनी जाती ।’ - ज्ञाप्र ८२३.
कोंढ पु. कुंड.
कोंढाण न. कोंदण; डोळ्यांची खोबण.
कोंढाळे   पहा : कोंडाळे
कोंढी स्त्री. १. मिठागर; खाचर. २. पहा : कुंडी, कोंडी
कोंता वि. कोणता; काय : ‘याच्यात बाईचाभी कोंता कसूर आहे?’ - अजून १३.
कोंद स्त्री. भाजलेले तीळ कुटून त्यात गूळ घालून तयार केलेले पुरण, लाडू इ. : ‘तिळाच्या कोंदेंची पोळी.’ - पाक ५४.
कोंद पु. तांदळाचा कोंडा. (व.)
कोंदट वि. चोहोकडून हवा येण्याला प्रतिबंध असलेली; आडोशाची; कोंडमाऱ्याची (खोली, जागा).
कोंदाट वि. चोहोकडून हवा येण्याला प्रतिबंध असलेली; आडोशाची; कोंडमाऱ्याची (खोली, जागा).
कोंदटणे   पहा : कोंदणे : ‘अचानक आकाश कोंदटले.’ - स्मृचापा १६१.
कोंदण न. १. अलंकारावर रत्ने बसविण्यासाठी केलेले घर, बैठक, जेडा : ‘सौंदर्य हे साधुवृत्तीच्या कोंदणांत अधिकच सुंदर दिसतें.’ - नीति ८६. [क. कुंदन = सोने]
कोंदणपट्टी स्त्री. रत्ने बसविण्याकरिता तयार केलेली सोन्याची तारपट्टी, पत्रा.
कोंदणे उक्रि. १. जोराने आत भरणे, दाबणे, कोंबणे; खच्चून, ठासून भरणे. (धुराने घर, मेघांच्या गडगडाटाने आकाश, आनंदातिशयाने मनुष्य इ.) : ‘इहीं दोहीचि परि संसारू । कोंदला असे ॥’ - ज्ञा १५·४७६. २. बंद होणे; छिद्र, भोक बुजणे.
कोंदाकोंदी स्त्री. दाटी; खेचाखेच; भीड; गर्दी : ‘माझारीचि कोंदाकोंदी ।’ - ज्ञा १५·१५६.
कोंदाट स्त्री. विपुलता; पूर्णता; दाटी : ‘कर्पूरकर्दळीची गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें ।’ - ज्ञा ११·२५०.
कोंदाट वि. पहा : कोंदट
कोंदाटणे उक्रि. गच्च भरणे; एके ठिकाणी गर्दी करणे; ठासून भरणे; कोंबणे : ‘तेजें कोंदाटलिया दिसा । जयाचेनि ॥’ - ज्ञा १·१३९.

शब्द समानार्थी व्याख्या
कोंदाटणे अक्रि. पहा : कोंदणे
कोंदी स्त्री. कोन; भिंतीची सांध किंवा जोड. बहुधा सांधीकोंदी असा जोडशब्द येतो.
कोंधाट   पहा : कोंदाट : ‘कर्पूरकदलिचीं गर्भपूटें । उकलति कर्पूराचेनि कोंधाटे ।’ - राज्ञा ११·२४६.
कोंधाटणे अक्रि. कोंदाटणे, कोंदणे : ‘तेजें कोंधाटलिया दिशा । जेयाचेनि ॥’ - राज्ञा १·१३९.
कोंना पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]
कोंनी पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]
कोंने पु. स्त्री. न. पेरे; हातापायांच्या नखात मळ वगैरे शिरून तो भाग कुजल्यासारखा होतो, सुजतो व ठणका लागतो तो विकार. (चि.) [सं. कोण]
कोंब पु. १. कोम; झाडाचा धुमारा (केळीच्या कांद्यापासून निघणारा पासंबा) : ‘बाळार्क कंदा निघाले कोंब । तैसे रत्नमणींचे खांब ।’ - मुसभा २·८. २. अंकुर; मोड : ‘विपरीत ज्ञानाचा कोंब फुटे ।’ - विउ ३·७. ३. पालखीचा वाकलेला दांडा : ‘एकीकडे दांडीयाचा कोंबु तेणें खांदी घेतला :’ - गोप्र ८२. (गो.) [सं. कंबी] (वा.) कोंब फुटणे - १. कोंब येणे. २. (ल.) आशा उत्पन्न होणे.
कोंबट   वि. कोमट; उबट; किंचित उष्ण; साधारण ऊन. (शरीर, वस्तू इ. स लावतात. हवेच्या संदर्भात हा शब्द वापरत नाहीत.) [सं. कोण]
कोंबडका पु. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारा. (शेतकी शेतकरी १९३७)
कोंबडकी स्त्री. कुक्कुटपालन. (शेतकी शेतकरी १९३७)
कोंबडखाना पु. कोंबड्या ठेवायची जागा; एकंदर कोंबड्या : ‘सगळा कोंबडखाना विकून झिपऱ्याकरिता चांदीचा करगोटा आणणार होती.’ - आआशे ३१.
कोंबडतुरा पु. तांबडा देठ व तुरा असणारे एकप्रकारचे तण.
कोंबडनखी स्त्री. एक प्रकारची औषधी मुळी.
कोंबडबाउल पु. अंडी विकत घेणारा : ‘मघाशी कोंबडबाउल आला होता.’ - सराई २२.
कोंबडसाद स्त्री. कोंबडा आरवण्याची वेळ; पहाट.
कोंबडा पु. १. एक पाळीव पक्षी; कुक्कुट. याचा रंग चित्रविचित्र असून डोक्याला तुरा असतो व गळ्याला कल्ले असतात. याचे मांस खातात. २. फुगडीचा एक प्रकार; मुलींचा एक खेळ. ३. (ल.) केसांचा फुगा. ४. चंद्राभोवती पडलेले खळे. ५. राजगिऱ्याच्या वर्गातले एक फुलझाड.
कोंबडी वि. आकड्याच्या जुगारातील परिभाषा : ‘आंगठा म्हणजे एक, कोंबडी दोन.’ - मक १९६१·३१.
कोंबडे न. १. कोंबड्याचे लहान पिल्लू. २. ढगातील तांबूस पट्टे; पाऊस पडण्याचे चिन्ह. (वा.) दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - मुद्दाम पदरचे खर्चून भांडणे लावणे. कोंबडे आरणे - पहाटेची वेळ होणे.
कोंबणे उक्रि. १. ठासून भरणे; गच्च भरणे. ठासणे. २. बदडणे; कुबलणे.
कोंबणे अक्रि. १. कोमेजणे; वाळणे; निस्तेज होणे. २. कोंब, अंकुर फुटणे, मोड येणे.
कोंबरा पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.
कोंबारा पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.
कोंबरी पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.
कोबरी पु. कोंब; अंकुर : ‘मुळीं सुवासना निघती आरा । घेऊनी फुटती कोंबारा ।’ - ज्ञा १५·१८४. ‘पारूच्या जिवाला कोंबार फुटल्यागत झालं.’ - खळाळ ९०.

शब्द समानार्थी व्याख्या
कोंबा पु. कोंबडा. (गो. को.)
कोंबाकोंबी स्त्री. थोड्या जागेत पुष्कळ भरणे; थोड्या वेळात पुष्कळ करणे : ‘सगळ्या अभ्यासाची कोंबाकोंबी सुरू झाली.’ - कोसला २०९.
कोंबी स्त्री. लहान कोंब. पहा : कोंब
कोंबू न. एक वाद्य.
कोंबो पु. कोंबा. (को.) पहा : कोंबडा
कोंभ पु. १. अंकुर. पहा : कोंब : कां रत्नबीजा निघाले कोंभा’ - ज्ञा ६·२५३. २. स्तंभ, खांब : ‘डोळे फिरवी गरगरां दांत खाया करकरा कोंभाचि कचकावळा ।’ ॥ भज १२८. ३. डांग; वन; अरण्य; एकांत जागा; सांधी कुंदी : ‘उदैजेति परबिंबीं । कळि कोळिगा राहिला कोंभीं ।’ - ऋ ९०.
कोम पु. अंकुर. पहा : कोंब : कां रत्नबीजा निघाले कोंभा’ - ज्ञा ६·२५३.
कोंभणे अक्रि. अंकुर येणे; कोंब येणे; कोबेणे; उत्पन्न होणे : ‘तव दोर्दंडी कां जैसें । आकाश कोंभैलें ।’ - ज्ञा ११·२६६.
कोंभरा   पहा : कोंब
कोंभारा   पहा : कोंब
कोंभा पु. १. ठोसा; गुद्दा; कोपरखळी; प्रहार : ‘गुडग्याच्या कोंभ्यानं दाराच्या फळ्या आत लोटल्या.’ - शिळान १. (व. ना.) २. माडाचा रोपा. (को.)
कोंभाळा पु. एक प्रकारचा वेल : ‘झाडावर कोंभाळ्याचा वेल चढला होता.’ - जैत ६५.
कौकव पु. तारा. [फा.]
कौकवित   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटल   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटळ   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटाल   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटाळ   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटाल्या   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटाळणे   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटाळी   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौवटाळीण   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटीळ   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौठ   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौठी   हे शब्द ‘कव’ खाली पहा.

शब्द समानार्थी व्याख्या
कौडळ   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडा   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडागहू   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडी   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडीचुंबक   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडीटंक   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौडीपूत   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौड्या घोणस   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौड्या साप   हे शब्द ‘कव’ खाली पहा.
कौटाळ्यविद्या स्त्री. कौटाळ; जादू; जारणमारण; चेटूक. (कुण.)
कौटिल्य न. १. वाकडेपणा; वक्रता. २. (ल.) कपट; दुष्टपणा; कवटाळ; ठकबाजी : ‘राणीचें आनंदीबाईच्या सवाई निष्ठुराचरण व कौटिल्य; खंडूजीचा मत्सरी स्वभाव...’ - नि ५४४. ३. चाणाक्षपणा; धूर्तता ४. चाणक्य ऋषी - चंद्रगुप्त मौर्य या राजाचा मंत्री. याचा अर्थशास्त्रावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे.
कौटुंबिक वि. कुटुंबाचा; कुटुंबाशी संबंध असलेला. जसे :- कौटुंबिक सुख.
कौठीचाफा पु. एक सुगंधी फुलझाड; त्याचे फूल.
कौतिक न. १. आश्चर्य; कुतूहल; जिज्ञासा; नवल; विस्मय; आश्चर्य उत्पन्न करणारी कोणतीही गोष्ट (मनुष्य, वस्तू, कृत्य, गोष्ट, देखावा इ.). २. प्रेम; ममतेने, आनंदाने धरणे; लाड करणे; कुरवाळणे (मूल किंवा वस्तू); अतिशय प्रीती, अभिमान धरणे; लालनपालन; नाजूक रीतीने वागविणे; फार काळजी घेणे. (क्रि. (कौतुकाने) राखणे, ठेवणे, करणे, असणे.) ३. मौज; खेळ; विनोद; प्रदर्शन; गाणे, नाचणे इ. : ‘उत्तर निज तुरगांतें द्याया अरुणासी कौतुक पिटाळी ।’ - मोविराट ४·८१. ४. मनोरंजन; करमणूक; ख्यालीखुशाली. [सं.]
कौतुक न. १. आश्चर्य; कुतूहल; जिज्ञासा; नवल; विस्मय; आश्चर्य उत्पन्न करणारी कोणतीही गोष्ट (मनुष्य, वस्तू, कृत्य, गोष्ट, देखावा इ.). २. प्रेम; ममतेने, आनंदाने धरणे; लाड करणे; कुरवाळणे (मूल किंवा वस्तू); अतिशय प्रीती, अभिमान धरणे; लालनपालन; नाजूक रीतीने वागविणे; फार काळजी घेणे. (क्रि. (कौतुकाने) राखणे, ठेवणे, करणे, असणे.) ३. मौज; खेळ; विनोद; प्रदर्शन; गाणे, नाचणे इ. : ‘उत्तर निज तुरगांतें द्याया अरुणासी कौतुक पिटाळी ।’ - मोविराट ४·८१. ४. मनोरंजन; करमणूक; ख्यालीखुशाली. [सं.]
कौतुकास्पद वि. कौतुक करावे असे वाटण्यासारखा; आनंदमिश्रित अभिमान वाटावा असा.
कौतुकी वि. खेळ्या; मौज करणारा; आनंदी; उल्हासी.
कौतूहल   पहा : कौतुक १, २, ३, कुतूहल [सं.]
कौदरी स्त्री. चवेणीचे झाड : ‘मोह, साग, कौदरी, पळस... वगैरे झाडे गर्द लागली असून...’ - मंजु १२७.
कौन वि. (दलाली) नऊ ही संख्या.
कौनट पु. कोपरा : ‘म्हणोनि माहालक्षमिचा कौनटावरि आले’ - लीचउ १२.
कौनबौ वि. १.चमत्कारिक; भीतिदायक; भयंकर; हिडिस परंतु अगम्य व अनिश्चित असा (पदार्थ, माणूस वगैरे). २. पहा : काण्णूबाण्णू
कौनी पु. (कुस्ती) दस्त उतारावरील तोड. प्रतिपक्षाचा आपल्या मानेवरील हात आपल्या डाव्या हाताने खाली दाबून मान उचलणे.
कौपीन न. स्त्री. १. लंगोटी; छाटी; (क्रि. नेसणे.) : ‘मुळीं मुडले मुंडन । बंदी बंदाची कौपीन ।’ - तुगा ४०२०. २. कफनी : ‘माझ्या खोलीत दुसरी एक कौपीन आहे ती घालून इकडे ये.’ - सूर्योदय १५९. [सं.] (वा.) कौपीन करणे - लंगोट बंद होणे.
कौबेरी स्त्री. उत्तर दिशा. [सं. कुबेर]

शब्द समानार्थी व्याख्या
कौम स्त्री. १. रूढी; प्रथा : ‘नवीनच कौम पैदा होत आहे.’ - विजी १६६. २. वंश; जात; जमात; लोक. [फा.]
कौमारत्व न. बालपण; पाच ते दहा पर्यंतचे वय; कुमारपण : ‘एथ कौमारत्व दिसे ।’ - ज्ञा २·१०९. [सं.]
कौमुदी स्त्री. चांदणे; चंद्रप्रकाश. [सं.]
कौर पु. मोसंबी; नारिंग.
कौल न. घराच्या छपरावर आच्छादनासाठी घातलेले मातीचे पन्हळ (चपटे, नळीवजा, मंगलोरी). [सं. कोलक] (वा.) घरावर कौल राहू न देणे - एखादे कुटुंब समूळ नष्ट करणे.
कौल पु. १. वचन; आश्वासन; अभय; संरक्षणाची हमी : ‘मी तुला कौल देतो, सरदारकी देतो’ - श्रीयो १·४२२. २. जमिनीची लागवड करण्यासाठी किंवा व्यापार करणाऱ्याला सरकार जे अभयपत्र, करार, कबुलायतीचा कागद देते तो. सरकारी करारनामा; कबुलायत; कौलनामा : ‘तुम्हांस चि. रा. माधवराव नारायण याचा कौल.’ - मइसा १२·१३७. ३. जहाजांना सर्व समुद्रातून फिरण्याचा मुख्य सत्तेने दिलेला परवाना. ४. परवाना; अभयपत्र. (शत्रूला आपल्या प्रांतातून जाण्यासाठी दिलेले); माफी देणे; सूट देणे : ‘दंगेखोर गनीम आपण जेर झालों असें जाणून दगाबाजीनें कौल घेतो, म्हणून जवळ बोलावूं नये. - मराआ ३६. ५. ईश्वरी वचन; ईश्वराची आशा मिळविणे; प्रश्न; साक्ष; प्रसाद; देवाजवळ गाऱ्हाणे सांगून त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाही हे विचारताना देवाच्या अंगाला लावायचे तांदूळ, सुपाऱ्या, फूल इ.; देवाची संमती : ‘इंद्रियांचे पेटे भला कौल देती ।’ - तुगा ४०८. ६. अभिप्राय; मत; कल (क्रि. मागणे, देणे.) [फा.] (वा.) कौलास येणे - शरण येणे; तह करायला कबूल होणे : ‘झालें मोंगल बेजार मरूं लागले आले कौलाला ।’ - ऐपो २३६.
कौलअहद पु. वचन; कौल : ‘त्यावरून म्यां त्याजला कौलअहद दिधला.’ - मइसा ६·५७०. [का. कोल + अहद]
कौलकरार पु. लेखी करारमदार; कबुली; ठराव; वचन; आश्वासन; अटींना संमती. [फा.]
कौलकरारदाद पु. वचन : ‘हज्रतसाहेबाचा तरी कौलकरारदाद आपल्यास आहे कीं तुमचे जागीरपैकीं एक चावर कसोदगी करणें नाहीं.’- इमं ६७.
कौलगी पु. कर्नाटकातील पाळेगारांच्या पदरचा फडणीस. असे कौलगी त्या त्या पाळेगारांच्या मुलखात कर्णिक - कुलकर्ण्यासारखे नेमलेले असत.
कौलनामा पु. १. सरकारने शेतकऱ्याला करून दिलेले करारपत्र; लेखी करार; कबुलायत. २. (कायदा) भाडेपट्टा.
कौलपत्रक न. गावातील कमी साऱ्याच्या जमिनींचा हिशेब असलेले पत्रक.
कौलप्रसाद पु. १. गुरवाने देवतेचे अनुमोदन मिळविण्याकरिता अंगाला लावलेले कळे, फुले वगैरे खाली पडून प्रश्न विचारणाऱ्याला दिलेले उत्तर अथवा प्रसाद. (को.) २. कौल मागताना लावलेली फुले वगैरे. (क्रि. लावणे, लागणे). पहा : कौल ५
कौलव न. (ज्यो.) एका करणाचे नाव. प्रत्येक चांद्रमासात ६, १३, २०, २७ या तिथींच्या पूर्वार्धात हे करण असते. तसेच २, ९, १६, २३ या तिथींच्या उत्तरार्धात हे करण असते. करणाचा स्वामी मित्र. याचे फल शुभ आहे.
कौला पु. एक भाजी. कौल्याची भाजी कोकणात प्रसिद्ध आहे. हे झुडूप वीतभर उंच वाढत असून रानात पावसाळ्यात उगवते. याची भाजी श्रावण सोमवारी अवश्य खावी असे म्हणतात.
कौला पु. न. एक मोठ्या जातीचे नारिंग. याची साल आतील फोडीयुक्त भागापासून, गरापासून सुटी निघते. सालीला कडवट वास येतो. [हिं.]
कौले पु. न. एक मोठ्या जातीचे नारिंग. याची साल आतील फोडीयुक्त भागापासून, गरापासून सुटी निघते. सालीला कडवट वास येतो. [हिं.]
कौलागम न. मंत्रशास्त्र. [सं. कौल = शाक्तपंथ + आगम]
कौलाफोक वि. कोवळा आणि सरळ (झाड, वनस्पती, रोपटा); तरुण व ताठ (मनुष्य, सौंदर्यलक्षण).
कौलार न. कौले घातलेले छप्पर.
कौलारु न. कौले घातलेले छप्पर.
कौला लसलसीत   कोवळा लुसलुशीत; नाजूक; नवीन; ताजा; कोवळा; जोमदार आणि टवटवीत (झुडूप, फळ). [सं. कोमल + लस् = लसित]
कौलावण स्त्री. १. सरकारी कौल; परवाना मिळविण्यासाठी द्यायची पट्टी, किंमत, फी. २. (नाविक) गलबताचा नोर; गलबतातून जाण्यायेण्यासाठी पडणारे मूल्य.
कौलासणे सक्रि. विसर्जन करणे : ‘गणपती मुहूर्ती होत होत्या त्या देवालये पुस्करणीस कौलासावयास जात होत्या.’ - आंपव्य ३.
कौलिक वि. वंशपरंपरागत; वडिलोपार्जित; वारसाने आलेले. [सं. कुल]

शब्द समानार्थी व्याख्या
कौलिक पु. वि. १. शाक्त पंथातील एक व्यक्ती अथवा तो पंथ. २. (सामा.) मांत्रिक; वाममार्गी; चेटक्या. ३. कपट. [सं.]
कौलिक पु. व्याध; जाळे वापरून सावज पकडणारा; पारधी : ‘एके दिनीं कौलिक पारधीतें ।’ -वामन व्याधाख्यान १. [सं. कौल]
कौली स्त्री. सरकारकडून कौल घेऊन प्रथमतः लागवडीला आणलेली जमीन.
कौली वि. सरकारातून ज्याचा कौल घेतला आहे असे (शेत, झाड इ.).
कौली पु. १. एक प्रकारची आखूड व दाट उगवणारी वनस्पती. ही बहुधा मळे जमिनीत फार होते. (चि. कु.)
कौलीप्रक्षेप पु. (स्था.) पाणी वाहून जाण्यासाठी भिंतीच्या पुढे आलेला कौलारू छपराचा भाग.
कौलीमक्तेदार पु. कौलाने शेत करणारा.
कौलू स्त्री. जुनाट पाणथरी; लघ्वांतर त्वचा ग्रंथी कठीण होणे.
कौशबर्दार   दरबारात जाताना बाहेर काढून ठेवलेले जोडे सांभाळणारा नोकर.
कौशल न. १. कुशलता; तरबेजपणा; चातुर्य; पारंगतता; हातोटी; हुन्नर. २. सुख; कल्याण; सुरक्षितता; निश्चितता. [सं.]
कौशल्य न. १. कुशलता; तरबेजपणा; चातुर्य; पारंगतता; हातोटी; हुन्नर. २. सुख; कल्याण; सुरक्षितता; निश्चितता. [सं.]
कौशा पु. १. रक्षक; रक्षणकर्ता; पाठीराखा; वाली; कड घेणारा. २. सूड उगवणारा.
कौशिक कानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.
कौशीकानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.
कौसीकानडा पु. (संगीत) गायनशास्त्रातील एक राग. गानसमय रात्रीचा तिसरा प्रहर. हा कानड्याचा एक प्रकार आहे.
कौशेय वि. रेशमी (वस्त्र, सूत). [सं.]
कौसल न. गुप्त मसलत; कट; अनिष्ट कारस्थान; कपटी योजना; कवटाळ; कवसाळ. (क्रि. करणे.) : ‘म्हणे काय कौंसाल केलें सतीनें ।’ - रामसुतात्मज (द्रौपदीवस्त्रहरण १९२).
कौसाल न. गुप्त मसलत; कट; अनिष्ट कारस्थान; कपटी योजना; कवटाळ; कवसाळ. (क्रि. करणे.) : ‘म्हणे काय कौंसाल केलें सतीनें ।’ - रामसुतात्मज (द्रौपदीवस्त्रहरण १९२).
कौसाल वि. १. कसबी; कुशल (माणूस, योजना इ.) : ‘नाना कौसाल रचना । केली धर्मांचिया स्थापना ।’ - कालिकापुराण १६·६६. २. कपटी; कुभांडखोर : ‘तुकयाबंधु स्वामि कानड्या कौसाल्या रे ।’ - तुगा १४०. [सं. कौशल्य]
कौसाल पु. कौशल्य; कुशलता : ‘तीयेतें स्वीकरी श्रीचक्रपाणी हे कौसाल्य कृपेचे ।’ - मुप्र १४९६.
कौसाल्य पु. कौशल्य; कुशलता : ‘तीयेतें स्वीकरी श्रीचक्रपाणी हे कौसाल्य कृपेचे ।’ - मुप्र १४९६.
कौसाळ वि. कुशल; चतुर : ‘तूं माय जननी कांसवी कौसाळ ।’ - नागा. ६०९.
कौसुंभ वि. १. कुसुंब्याच्या रंगाने रंगलेला. २. कुसुंब्यासंबंधी. [सं.]
कौस्तुभ पु. समुद्रमंथनातील चौदा रत्नांपैकी एक; श्रीविष्णूच्या कंठातील मणी; अलंकार : ‘कंठीं कौस्तुभमणि विराजित ।’ - तुगा १. [सं.]
कौस्तुभी स्त्री. घोड्याच्या गळ्याखाली लोंबणारी पोळी. - अश्वप १·९९. [सं. कौस्तुभ]

शब्द समानार्थी व्याख्या
कौस्तुकी स्त्री. घोड्याच्या गळ्याखाली लोंबणारी पोळी. - अश्वप १·९९. [सं. कौस्तुभ]
कौळमार्गी वि. वाममार्गी; मांत्रिक.
कौळिक स्त्री. कावीळ. हा रोग झाल्यास डोळे पिवळे पडतात आणि सर्वत्र पिवळे दिसते. : ‘जाणिजे कौळिक ।’ - भाए ७४६.
कौळिक पु. कोळी; भिल्ल; व्याध; निषाद : ‘मातीयेचा द्रोण केला । तो कौळिका भावो फळला ।’ - एभा १·४३. [सं. कोल]
कौळिकाचारू पु. मांत्रिकाचे कृत्य; जादूटोणा : ‘उपदेशूनि कौळिकाचार । केंवि मातें करविसी ।’ - मुआदि २७·११६.
कौळी स्त्री. एक झुडूप; कावळी. [सं. काकनासा]
कौक्ष वि. ओटीपोटासंबंधी; पोटासंबंधी; कुक्षीसंबंधी. [सं. कुक्षि]
कौक्षेपक न. खड्‌गाचा एक प्रकार. [सं.]
कौंतिक पु. भालेकरी. [सं. कुंत = भाला]
कौंती स्त्री. भाला; एक हत्यार. [सं. कुंत]
कौंदा पु. भुस्सा.
कौंभणे अक्रि. पहा : कौंभणे : ‘कैवल्यद्रुम कौंभिला ।’ - भाए ३.
कौंस पु. वर्तुळाच्या परिघाचा कोणताही भाग. [फा. कौस = धनुष्य]
कौंस न. दर्भ.
क्याच न. लाकडाचा मधला भाग, गाभा. (बे.) [क. कच्चु]
क्याट न. एक प्रकारचे रेशीम (लुगड्यांचा व्यापारात रुढ). (कर.)
क्याटी न. बावन तोळ्यांचे वजन : ‘क्याटीचे वजन बावन तोळे असते.’ - मुंव्या ११९.
क्यातखुरपे न. दाते व पाठीकडे धार असलेला कोयता, खुरपे (बे.) [क. कत्ति = कोयता]
क्यारी स्त्री. १. गर्जना : ‘जिंतले रे जिंतले भणौनि देयारी क्यारी ।’ - मुप्र २५०२. २. भातजमीन; खाचर; भोवती उंच कडा असलेला वाफा. ३. पुष्पवाटिका; वाफा (बागेतील फुलांचा). [गु.] [सं. केदार]
क्यारडी स्त्री. १. भातजमीन; खाचर; भोवती उंच कडा असलेला वाफा. २. पुष्पवाटिका; वाफा (बागेतील फुलांचा). [गु.] [सं. केदार]
क्याल न. केळीचे काल, गाभा (कु.). पहा : काल [सं. कदल]
क्युसेक पु. (एका मिनिटाला एक घनफूट एवढ्या) प्रवाहाच्या आकारमानाचे एकक, युनिट.
क्युरीबिंदू पु. (भौ.) ज्या तापमानाला चुंबकीय गुणधर्म बदलतात तो बिंदू. उदा. ७६८⁰ से. या तपमानाला लोखंडाचे चुंबकत्व नष्ट होते.