शब्द समानार्थी व्याख्या
न. १. आकाश; (समासात) खगोल, खग्रास. २. स्वर्ग; शून्य; पोकळी : ‘तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी ।’ - ज्ञा १६·३९. ३. इंद्रिय. २. देहछिद्रे (तोंड, नाक, डोळे, नाकपुड्या इ.) [सं.]
खइणे अक्रि. खोवणे; खोचणे.
खईं क्रिवि. कोठे. (कु.)
खकडे क्रिवि. कोठे. (कु.)
खकरनिखर वि. चांगले वाईट. [निखरचे द्वि.]
खकाण वि. १. घाणेरडी; अस्वच्छ (जागा, पदार्थ, इमारत, जमीन इ.). २. वाईट; खराब; दरिद्री; गचाळ. [अर. खाक = धूळ]
खकान वि. १. घाणेरडी; अस्वच्छ (जागा, पदार्थ, इमारत, जमीन इ.). २. वाईट; खराब; दरिद्री; गचाळ. [अर. खाक = धूळ]
खकाण न. पु. १. केर; (पुस्तकांवर, लाकडी सामानावर साचलेली) धूळ. (क्रि. बसणे, येणे, उडणे, उधळणे.) २. (तंबाखूची, तपकिरीची, मिरच्यांची) पूड. (क्रि. उधळणे.) ३. गाळसाळ; केरकचरा; धुरळा. (माप करताना मालातील धुरळा वजा करतात त्याबद्दल हा शब्द वापरतात.) ४. क्षुल्लक; क्षुद्र : ‘म्हणून रॉय तेवढे चांगले, बाकीचा खकाणा असे त्यांच्याबाबत कोणी म्हणेल काय?’ - आआआ ९५. [अर. खाक = धूळ]
खकाना न. पु. १. केर; (पुस्तकांवर, लाकडी सामानावर साचलेली) धूळ. (क्रि. बसणे, येणे, उडणे, उधळणे.) २. (तंबाखूची, तपकिरीची, मिरच्यांची) पूड. (क्रि. उधळणे.) ३. गाळसाळ; केरकचरा; धुरळा. (माप करताना मालातील धुरळा वजा करतात त्याबद्दल हा शब्द वापरतात.) ४. क्षुल्लक; क्षुद्र : ‘म्हणून रॉय तेवढे चांगले, बाकीचा खकाणा असे त्यांच्याबाबत कोणी म्हणेल काय?’ - आआआ ९५. [अर. खाक = धूळ]
खकाणा न. पु. १. केर; (पुस्तकांवर, लाकडी सामानावर साचलेली) धूळ. (क्रि. बसणे, येणे, उडणे, उधळणे.) २. (तंबाखूची, तपकिरीची, मिरच्यांची) पूड. (क्रि. उधळणे.) ३. गाळसाळ; केरकचरा; धुरळा. (माप करताना मालातील धुरळा वजा करतात त्याबद्दल हा शब्द वापरतात.) ४. क्षुल्लक; क्षुद्र : ‘म्हणून रॉय तेवढे चांगले, बाकीचा खकाणा असे त्यांच्याबाबत कोणी म्हणेल काय?’ - आआआ ९५. [अर. खाक = धूळ]
खकाण वि. नापीक; ओसाड : ‘पृथ्वीचा एक कोपरा पिकला आणि तीन खकाण राहिले म्हणजे सगळ्या भोरड्या पिकलेल्या भागावर आदळतात.’ - गांगा १२१
खकाया वि. अधाशी. (झाडी.)
खकावला वि. अतृप्त. (झाडी.)
खग पु. १. पक्षी : ‘आतां मोडून ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें ।’ - ज्ञा १२·५८४. २. आकाशातील ज्योती (सूर्य, नक्षत्र, ग्रह इ.). [सं. ख = आकाश. ग = गमन करणारा.]
खगनायक पु. पक्ष्यांचा राजा; गरुड; विष्णूचे वाहन : ‘ध्वजस्तंभीं ज्याचे खगपति सदा राहत असे ।’ - सारुह ८·१२०. [सं.]
खगपती पु. पक्ष्यांचा राजा; गरुड; विष्णूचे वाहन : ‘ध्वजस्तंभीं ज्याचे खगपति सदा राहत असे ।’ - सारुह ८·१२०. [सं.]
खगपति पु. पक्ष्यांचा राजा; गरुड; विष्णूचे वाहन : ‘ध्वजस्तंभीं ज्याचे खगपति सदा राहत असे ।’ - सारुह ८·१२०. [सं.]
खगा पु. वळवाचा पाऊस.
खगान्तक पु. ससाणा.
खगोल पु. १. नक्षत्रखचित अंतरीक्ष; भूगोलाच्या भोवतालचे तारे ज्या गोलाच्या अंतर्वक्र पृष्ठाला चिकटवले आहेत असे वाटते ती पोकळी; आकाशातील गोल (ग्रह, तारे इ.). २. ज्योतिष (शास्त्र). ३. (ल.) ग्रहादी जाणण्यासाठी केलेले गोलाकार यंत्र.
खगोल गतिशास्त्र   (ज्यो.) ग्रहगोलांच्या गतीचा त्यांच्या एकमेकांच्या गतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र.
खगोल विज्ञान   (ज्यो.) ग्रहगोलांच्या गतीचा त्यांच्या एकमेकांच्या गतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र.
खगोलदर्शनागार न. (भौ.) ग्रह आणि नक्षत्रे यांच्या गती व कक्षा दाखवणारे संयंत्र ठेवलेली इमारत. [सं.]
खगोलीय वि. (भूशा.) अवकाशातील ग्रह, तारे, नक्षत्रे इत्यादींविषयी.
खग्राशा वि. १. उसनवारी घेतलेले पैसे, विश्वासाने स्वाधीन केलेला माल खाऊन फस्त करणारा; लुच्चा; ठक; लुबाडणारा; हरामखोर. २. खादाड; अधाशी; अतिशय उधळ्या. ३. तोटा येणारे (काम); बुडीत (धंदा).