शब्द समानार्थी व्याख्या
खिउदा स्त्री. भूक : ‘म्हणे मज खिउदा लागली मोटी ।’ - क्रिपु १२·८०. [सं. क्षुधा]
खिओबणे अक्रि. खवळणे : ‘मग अब्राहावोंथें खिओबले ।’- क्रिपु ८·७७. [सं. क्षोभ]
खिक्   दाबलेले हसू बाहेर पडताना होणारा आवाज. [ध्व.]
खिकी स्त्री. चेष्टा; टवाळी. (क्रि. करणे.)
खिक्या स्त्री.अव. निंदेची, उपहासाची भाषणे, बोलणी; उपहास, चेष्टा करणे. (क्रि. घालणे, करणे.) : ‘ऐशा करुनियां खोक्या धिःकारे बोलती ।’ - निगा ३१५. [ध्व.]
खिख्या स्त्री.अव. निंदेची, उपहासाची भाषणे, बोलणी; उपहास, चेष्टा करणे. (क्रि. घालणे, करणे.) : ‘ऐशा करुनियां खोक्या धिःकारे बोलती ।’ - निगा ३१५. [ध्व.]
खिखियाट पु. निंदक : ‘खिखियाटु परीयटु निवटुनी ।’ - गरा ७५.
खिखी स्त्री. खदखदा हसणे; ही ही करून हासणे.
खिखी क्रिवि. खदखदा; फिदीफिदी. [ध्व]
खिच पु. खिडची : ‘जें काळाचा खिच उशिटा ।’ - ज्ञा ८·१४४.
खिच वि. गच्च. (गो.)
खींच्च वि. गच्च. (गो.)
खिचकट स्त्री. खेचाखेच. (गो.)
खिचकटांवचे सक्रि. गर्दी करणे. (गो.)
खिचकुला पु. मुले व मुली मिळून खेळतात तो भातुकलीचा खेळ.
खिचच्चे उक्रि. गच्च धरणे. (गो.)
खिचट न. खिचडी, मिसळ : ‘तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें ।’ - ज्ञा १४·२७३.
खिचटे न. खिचडी, मिसळ : ‘तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें ।’ - ज्ञा १४·२७३.
खिचडा पु. १. करड तांदूळ इ. भरडून, शिजवून गुराला खायला द्यायचे खाद्य. २. सजगुऱ्याचा सडून केलेला भात. ३. तांदूळ व डाळ यांचे शिजवलेले मिश्रण. ४. ताबुताच्या दिवसात फकिराला घालायचे मिश्र धान्य, मिसळ. ५. दाटी, गर्दी.
खिचडावचे सक्रि. खिजवणे; चिडवणे. (गो.)
खिचडी स्त्री. १. तांदूळ व डाळ एकत्र शिजवून केलेला पदार्थ; साबुदाण्यात भुईमुगाच्या दाण्याचे कूट मिसळून शिजवून केलेला पदार्थ. २. पंचभेळ (निरनिराळी धान्य किंवा भिन्नभिन्न नाणी इ.); सरमिसळ. ३. गीतांबील. ४. (ल.) ज्या गावातील जमिनीचा एक भाग धारेकऱ्याने व एक भाग खोताने धारण केला आहे असा गाव. ५. गर्दी, दाटी. [क. किच(च्च)डी]
खिचडीबिचडी स्त्री. अंदाधुंदी; गोंधळ. [खिचडीचे द्वि.]
खिचडी वांगी अव. तुरीच्या डाळीचे पीठ, चण्याचे पीठ व वांगी यांची भाजी.
खिचडे न. एकत्र शिजवलेल्या, भरडलेल्या तांदळाचे आणि कोंड्याचे जनावरांना घालायचे आंबोण. पहा : खिचडा १
खिचणे अक्रि. मागे हटणे, सरणे; एका बाजूला अथवा मार्गाबाहेर होणे. २. (ल.) (वचन अथवा उद्देश यांपासून) फिरणे, चळणे. [सं. कृष् = कर्ष]