शब्द समानार्थी व्याख्या
उद्गा. नापसंती किंवा तिरस्कार दाखविणारे अव्यय. जसे : − छिः छि : इ.
  १. मराठी वर्णमालेतील बाविसावे अक्षर आणि सातवे व्यंजन. २. जुन्या कागदपत्रात मुसलमानी तारखेसाठी चिन्ह म्हणून योजिले जात असे. उदा. छ५ मोहरम = मोहरमची पाचवी तारीख. ३. पोथीच्या अखेरीस समाप्तिदर्शक चिन्ह म्हणूनही याचा वापर करतात.
छई स्त्री. मानमोडीचा गुरांचा रोग. [हिं.]
छक पु. (लोहारी) वस्तू पकडण्यासाठी जबड्याच्या आकृतीसारखी पकड; चक.
छकड स्त्री. १. थप्पड; चपराक. (क्रि. मारणे.) २. (ल.) दुर्दैवाचा फेरा; तोटा (व्यापारात). (क्रि. बसणे, येणे.) ३. लुच्चेगिरी; कपट; फसवणूक. (क्रि. देणे.) ४. वादविवाद; झगडा; झोंबी; तंटा. ‘शास्त्रीय पद्धतीतील हेत्वानुमानांची केवळ बुद्धिग्राह्य नीरस छक्कड सुटल्याचे कोणासही… वाईट वाटणार नाही.’ − गीर ४६२. ५. पैशाचा तगादा. (क्रि. बसणे.) [सं. चक्], ६. गाण्याचा एक प्रकार; लावणी : ‘डफावर थाप मारून छकड म्हणतो.’ − नाकरु ३·७४.
छक्कड स्त्री. १. थप्पड; चपराक. (क्रि. मारणे.) २. (ल.) दुर्दैवाचा फेरा; तोटा (व्यापारात). (क्रि. बसणे, येणे.) ३. लुच्चेगिरी; कपट; फसवणूक. (क्रि. देणे.) ४. वादविवाद; झगडा; झोंबी; तंटा. ‘शास्त्रीय पद्धतीतील हेत्वानुमानांची केवळ बुद्धिग्राह्य नीरस छक्कड सुटल्याचे कोणासही… वाईट वाटणार नाही.’ − गीर ४६२. ५. पैशाचा तगादा. (क्रि. बसणे.) [सं. चक्], ६. गाण्याचा एक प्रकार; लावणी : ‘डफावर थाप मारून छकड म्हणतो.’ − नाकरु ३·७४.
छकडभेद पु. अव. युक्त्या; कपट; डावपेच. [सं. शकटभेद; हिं.]
छक्कडभेद पु. अव. युक्त्या; कपट; डावपेच. [सं. शकटभेद; हिं.]
छकडा पु. स्त्री. १. एकबैली गाडी (दारुगोळा, खजिना, तंबू, डेरे वगैरे न्यावयाची). २. तट्ट्या घातलेली गाडी. ३. रेंगीपेक्षा किंचित मोठी गाडी; रेडू; पायटांगी; रेकला; एक्का. (व.) [सं. शकट]
छकडी पु. १. एकबैली गाडी (दारुगोळा, खजिना, तंबू, डेरे वगैरे न्यावयाची). २. तट्ट्या घातलेली गाडी. ३. रेंगीपेक्षा किंचित मोठी गाडी; रेडू; पायटांगी; रेकला; एक्का. (व.) [सं. शकट]
छकडी वि. मोहक; नखरेल : ‘एवढ्या सुंदर छकड्या पोरींना.’ − गजरा २९.
छकडी स्त्री. १. एकबैली गाडी (दारुगोळा, खजिना, तंबू, डेरे वगैरे न्यावयाची). २. तट्ट्या घातलेली गाडी. ३. रेंगीपेक्षा किंचित मोठी गाडी; रेडू; पायटांगी; रेकला; एक्का. (व.) [सं. शकट]. ४.सहांचे माप किंवा गट; समुदाय (कागद, फाशावरील सहा ठिपके, आंबे, रुपये इ.); तिफाशी सोंगट्यांतील सहाचे दान. [सं. षट्‌क]
छकडे न. लहान मुलाचे लाडके नाव; छबुकडे : ‘तंव लहान मुलें आले छकडे ।’ − दावि ३८०.
छकणे उक्रि. १. खोडणे; रेघ मारणे (व्यापाऱ्याच्या वहीमधील बाब). २. फसणे; ठकणे. ३. आश्चर्यचकित होणे; गोंधळून जाणे; दिपणे. [सं. चक् = प्रतिघात करणे]
छकल न. स्त्री. तुकडा; खाप; फाक; फोड. [सं. शकल]
छक्कल न. स्त्री. तुकडा; खाप; फाक; फोड. [सं. शकल]
छकली न. स्त्री. तुकडा; खाप; फाक; फोड. [सं. शकल]
छक्कली न. स्त्री. तुकडा; खाप; फाक; फोड. [सं. शकल]
छकवणी स्त्री. फसवणूक; हुलकावणी. (क्रि. दाखविणे.)
छकावणी स्त्री. फसवणूक; हुलकावणी. (क्रि. दाखविणे.)
छकवाछकवी स्त्री. १. खोडणे; रेघ मारणे; बदलणे; शुद्ध करणे. २. फसविणे; मूर्ख बनविणे; धाब्यावर बसविणे.
छकाछकी स्त्री. १. चकमक; झटापट. २. थाटाची मेजवानी. (व.)
छकुडी स्त्री. मुलीला लाडिकपणाने दिलेले नाव.
छक्क वि. १. आश्चर्यचकित, आश्चर्यभरित; विस्मित; भ्रांत. २. अतिशय अशक्त. (व.) [सं. चकित]
छक्कडधापडी स्त्री. आंधळी कोशिंबीर (खेळ).