शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी अक्षरमालेतील तेविसावे अक्षर व व्यंजनमालेतील आठवे व्यंजन. याचा उच्चार मराठीत दोन प्रकारे होतो. १. तालव्य–जल. जप इ. २. दंततालव्य–जरा, जवळ इ. असे दोन प्रकारचे उच्चार होतात.
वि. (संस्कृत शब्दापुढे जोडल्यावर) उत्पन्न झालेला; जन्मलेला. उदा. पंकज, गोत्रज इ. [सं.]
जइत न. जय. (गो.) [सं. जी = जिंकणे]
जइंती स्त्री. जयंती, वाढदिवस : ‘तेयांतें आधिली दिसीं जइंती जाली होती ।’ –लीचपू ४९३. [सं. जयंती]
जई स्त्री. १. जेथे भिंत छपरास मिळते त्या ठिकाणी आतील बाजूस राहिलेली जागा; येथे काही वस्तू ठेवता येतात; तसेच कित्येकदा विटांचा थर बाहेरील बाजूस काढून अशी जागा मुद्दाम केलेली असते. २. विहीर पडू नये म्हणून धर लागेपर्यंत खणलेली जमीन (बे.) : ‘लाटा नव्यानं जईवर येऊन फुटू लागल्या.’ –भेटीगाठी १२. [सं. जाति]
जै स्त्री. १. जेथे भिंत छपरास मिळते त्या ठिकाणी आतील बाजूस राहिलेली जागा; येथे काही वस्तू ठेवता येतात; तसेच कित्येकदा विटांचा थर बाहेरील बाजूस काढून अशी जागा मुद्दाम केलेली असते. २. विहीर पडू नये म्हणून धर लागेपर्यंत खणलेली जमीन (बे.) : ‘लाटा नव्यानं जईवर येऊन फुटू लागल्या.’ –भेटीगाठी १२. [सं. जाति]
जईक वि. कष्टी; क्षीण.
जईनच वि. क्रिवि. १. (अशिष्ट) कारणापुरते; बेताचे. २. पुष्कळ; विपुल; भरपूर.
जईनमसन वि. क्रिवि. १. (अशिष्ट) कारणापुरते; बेताचे. २. पुष्कळ; विपुल; भरपूर.
जईनमईन वि. क्रिवि. १. (अशिष्ट) कारणापुरते; बेताचे. २. पुष्कळ; विपुल; भरपूर.
जईपट्टी स्त्री. (सोनारी) तगडावरील (धातूच्या पत्र्यावरील) बाजूची उभी पट्टी. (बे.)
जईफ वि. वृद्ध; कष्टी; क्षीण; अशक्त : ‘आम्हीं जईफ झालों आहों बहुत दिवस वांचत नाही.’ –मइसा १·२८. [अर्.]
जयफ वि. वृद्ध; कष्टी; क्षीण; अशक्त : ‘आम्हीं जईफ झालों आहों बहुत दिवस वांचत नाही.’ –मइसा १·२८. [अर्.]
जैफ वि. वृद्ध; कष्टी; क्षीण; अशक्त : ‘आम्हीं जईफ झालों आहों बहुत दिवस वांचत नाही.’ –मइसा १·२८. [अर्.]
जईभ   चिलखताचा एक प्रकार.
जैभ   चिलखताचा एक प्रकार.
जईं क्रिवि. जेव्हा, ज्यावेळी : ‘कृपा करूनि धाडिला जइं मदीय बंधु स्वये ।’ –मोकृष्ण ५८·५. [सं. यदा]
जइं क्रिवि. जेव्हा, ज्यावेळी : ‘कृपा करूनि धाडिला जइं मदीय बंधु स्वये ।’ –मोकृष्ण ५८·५. [सं. यदा]
जउ   पासून सुरुवात होणारे शब्द जो किंवा जौ मध्ये पहा : जोळी, जौळी.
जऊ   पासून सुरुवात होणारे शब्द जो किंवा जौ मध्ये पहा : जोळी, जौळी.
जक पु. १. पराभव; धक्का; थप्पड; तंबी : ‘एवढी जक खडर्यावर हजरतीस बसली.’ –मइसा ५·१६. [अर. दक्क], २. (नाविक) एखाद्या लाकडास फूट गेल्यास मजबुतीसाठी दिलेले दोरीचे चार–सहा फेरे.
जकड स्त्री. १. ताण, ओढ. (क्रि. ताणणे, आवळणे.) २. गारठ्याने आखडणे. (हा शब्द बांधणे, टाकणे, धरणे, राखणे या शब्दाशी जोडून योजतात).
जखज स्त्री. १. ताण, ओढ. (क्रि. ताणणे, आवळणे.) २. गारठ्याने आखडणे. (हा शब्द बांधणे, टाकणे, धरणे, राखणे या शब्दाशी जोडून योजतात).