शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील चोविसावे अक्षर आणि नववे व्यंजन. याचे ज या वर्णाप्रमाणे दोन उच्चार आहेत. एक तालव्य. उदा. झिंगणे, झेब्रा व दुसरा दंतमूलीय. उदा. झटणे, झगा.
झउल वि. (अशिष्ट) लफंगा; थापेबाज. (ना.)
झक स्त्री. १. मासा. २. (ल.) वाईट गोष्ट; निंद्य कर्म. [सं.झष् = मासा] (वा.) झक मारणे - (अशिष्ट) १. ढोबळ चूक करणे; मूर्खाप्रमाणे वागणे. २. निंद्य कर्म, व्यभिचार इ. करणे; लोकसंप्रदायाविरुद्ध वागणे. ३. करू नये ती गोष्ट केली असे कबूल करणे किंवा कबूल करून तिच्याबद्दलचा दोष आपल्या पदरात घेणे.झक मारीत पडणे - निरुपयोगी, निष्फळ होऊन पडणे. (एखादी गोष्ट) झक मारीत करणे, झक मारीत जाणे, झक मारीत देणे, झक मारीत येणे, झकत करणे, झक्कत करणे, झकत जाणे, झकत देणे, झकत येणे; झक्कत जाणे, झक्कत देणे, झक्कत येणे - इच्छा नसताही नाइलाज म्हणून करणे - जाणे इ.; आपसुख करणे इ.: ‘या भरवसेनें दवडिलें लुब्धा । येईल झकमारू म्हणोनि ।’ - दावि ४४०. पहा : झकत, झक मारीत राहणे - भीक मागणे; नाइलाज म्हणून हात चोळीत बसणे; बोंबलत राहणे : ‘मागें दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील.’ - ऐलेसं १·१७७.झक मारून झुणका खाणे - झक मारणे; मूर्खपणा करणे. (कर.), ४. झाक; चमक; दिपविणारा प्रकाश : ‘झक पडे नयनीं । जाय निघोनि ।’ - दावि १७८.
झक्क स्त्री. १. मासा. २. (ल.) वाईट गोष्ट; निंद्य कर्म. [सं.झष् = मासा] (वा.) झक मारणे - (अशिष्ट) १. ढोबळ चूक करणे; मूर्खाप्रमाणे वागणे. २. निंद्य कर्म, व्यभिचार इ. करणे; लोकसंप्रदायाविरुद्ध वागणे. ३. करू नये ती गोष्ट केली असे कबूल करणे किंवा कबूल करून तिच्याबद्दलचा दोष आपल्या पदरात घेणे.झक मारीत पडणे - निरुपयोगी, निष्फळ होऊन पडणे. (एखादी गोष्ट) झक मारीत करणे, झक मारीत जाणे, झक मारीत देणे, झक मारीत येणे, झकत करणे, झक्कत करणे, झकत जाणे, झकत देणे, झकत येणे; झक्कत जाणे, झक्कत देणे, झक्कत येणे - इच्छा नसताही नाइलाज म्हणून करणे - जाणे इ.; आपसुख करणे इ.: ‘या भरवसेनें दवडिलें लुब्धा । येईल झकमारू म्हणोनि ।’ - दावि ४४०. पहा : झकत, झक मारीत राहणे - भीक मागणे; नाइलाज म्हणून हात चोळीत बसणे; बोंबलत राहणे : ‘मागें दौलत किल्ले स्वामींचे स्वामी घेतील. कर्जदार झक मारीत राहतील.’ - ऐलेसं १·१७७.झक मारून झुणका खाणे - झक मारणे; मूर्खपणा करणे. (कर.)
झक वि. झक्क; भपकेदार; चकचकीत; झगझगीत; लख्ख : ‘झळकत झक झक घनदामिनी ।’ - दावि ४९६. [सं.चकास्]
झककण क्रिवि. एकदम चमकून; तेज पाडून; लकाकत.
झककन क्रिवि. एकदम चमकून; तेज पाडून; लकाकत.
झककर क्रिवि. एकदम चमकून; तेज पाडून; लकाकत.
झकदिनी क्रिवि. एकदम चमकून; तेज पाडून; लकाकत.
झकदिशी क्रिवि. एकदम चमकून; तेज पाडून; लकाकत.
झककणे अक्रि. झळकणे; झकाकणे; चकाकणे : ‘शेषफणांची आकृती । हिरेजडीत झककती ।’ - हरिवि ३४·११८. [झकचे द्वि.]
झकझक स्त्री. चकाकी; तेज; चमक; लकाकी; झळक (अग्नि, तारे वगैरेची).
झकझक वि. लखलखीत; चकचकीत; प्रकाशमान; झळकणारे. [झकचे द्वि.]
झकझकी स्त्री. चकाकी; तेज; चमक; लकाकी; झळक (अग्नि, तारे वगैरेची).
झकझकी वि. लखलखीत; चकचकीत; प्रकाशमान; झळकणारे. [झकचे द्वि.]
झकझक क्रिवि. लखलख करीत; चकचकत; झळकत.
झकझका क्रिवि. लखलख करीत; चकचकत; झळकत.
झकझकणे अक्रि. चकाकणे; झगझगणे; लखलखणे; चमकणे.
झकझकाट पु. लखलखाट; चकचकीतपणा; चकचकाट; अतिशय प्रकाश.
झकझकीत वि. चकाकणारे; तेजस्वी; झळकणारे; लखलखणारे.
झकटणे अक्रि. १. घसटणे; (जाताना, येताना) घासून जाणे; चाटून जाणे. २. झगडणे; भांडणे; कलह करणे. पहा : झगडणे.
झकडी क्रिवि. चांगली; उत्तम : ‘आकडी घालूं झकडी पैंजन फकडी । सबा म्हनी राया । आकडी घालू आमी साजनी बाया ।’ - लोसाको
झकणे अक्रि. १. विस्मित होणे; मोहून जाणे; फसणे; दिपून जाणे; थक्क होणे; चकणे : ‘येती ना द्विज केवलान्वय झके कृष्णापुढें द्वारके ।’ - आसुच १८. २. मोहून, भुरळून, हुरळून, गोंधळून जाणे; चुकणे; भटकणे; मार्ग सोडून जाणे; बहकणे; फसणे : ‘देखोदेखी गुरु करिती । शिष्य शिणती । गुरुची परिक्षा नेणती । झकोनि जाती ।’ - दाविधा १३५.
झकत क्रिवि. निरुपाय म्हणून; झकमारीत; नाइलाजाने. हा शब्द सर्व क्रियापदांचा गुण दाखवितो आणि पुरुष व वस्तू यांना लागतो : ‘मी झक्कत टोपली सुपे उचलली’ - शेलूक ७९. [सं. झक्‌]
झक्कत क्रिवि. निरुपाय म्हणून; झकमारीत; नाइलाजाने. हा शब्द सर्व क्रियापदांचा गुण दाखवितो आणि पुरुष व वस्तू यांना लागतो : ‘मी झक्कत टोपली सुपे उचलली’ - शेलूक ७९. [सं. झक्‌]