शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील सव्विसावे अक्षर आणि अकरावे व्यंजन.
पु. अक्षरशत्रू; मूर्ख; ढ. (वा.) ट फ करणे - एखाद्या विषयाचे फार थोडे ज्ञान होणे : ‘विद्यालयांतून जे संस्कृतज्ञ बाहेर पडतात त्यांना ट फ करण्याचें सामर्थ्य आलें न आलें कीं लगेच कोणत्याही शास्त्रावर व्याख्यान, निबंध वगैरे सुरू झालेच.’ – नि.ट फ करीत वाचणे - अडखळत किंवा चुका करीत वाचणे; एकेक अक्षर लावून वाचणे (नवीन शिकणारा असे वाचतो). ट लाट जुळविणे - १. यमकासाठी अक्षराला अक्षर जुळविणे. २. कमी प्रतीचे काव्य, कविता करणे : ‘असे ढ पुढें येणार आहेत हें जर त्या कवीला माहीत असतें तर त्यानेंहि ट ला ट जुळविण्याचे श्रम घेतले नसते.’ – मूना.
टऊर वि. खोडकर; टवाळ; उनाड (मूल). पहा : टौर
टक पु. १. औषधाचा एक भाग; डोस. (खा.) २. भाग; हिस्सा. ३. कपडा शिवण्याची एक तऱ्हा; टीप. (क्रि. घालणे). ४. चूण (आडवी). ५. पिंड : ‘टका कावळा शिवला नाहीं.’ – ऐको ४६९.
टक स्त्री. १. कपाळशूळ; कपाळ उठणे. (क्रि. लागणे). २. एकाग्र दृष्टी; एकसारखी दृष्टी. (क्रि. लावणे, लागणे.) : ‘डोळीया पडलें टक ।’ – बगाथा २३४. ३. टकळी; गुऱ्हाळ. ४.अखंड आवाज (अभ्यास, ओरड, रडे, गाणे, पाऊस पडणे इ.चा); सातत्य; अखंडता. ५. टकळी; गुऱ्हाळ. ६. सवय. (व.), ७. संकट. [सं.तक् = तग धरणे]
टक न. १. आश्चर्यामुळे होणारी एकाग्रता; स्थिर दृष्टी; नवल; अत्यंत आश्चर्य; भूल. (क्रि. पडणे) : ‘मागधासी पडलें टक । तटस्थ ठेला मुहूर्त एक ।’ – एरुस्व ११·४५. २. (ल.) मौन; मुग्धपणा (आश्चर्याने) : ‘वर्णितां थोरांसि पडलें टक ।’ – भवि २७·८. [सं.टक्]
टकटक स्त्री. १. अखंडपणा; सातत्य. २. कंटाळवाणे भाषण; बडबड; टकळी; वटवट. ३. सतत पिरपिर; चिरचिर; रडणे (मुलांचे). (क्रि. लावणे, लागणे.). ४. चालू घड्याळाचा एकसारखा ध्वनी. ५. चकचक; चकाकी; तकाकी (सापाची). ६. भणभण. (अहि.)
टकटक वि. सतत; एकसारखे (पाहणे). [ध्व.]
टकटक वि. क्रिवि. १. अनिमेष दृष्टीने; एकसारखे रोखून; नजर न हलवता; न खळता : ‘दाजी टकटका पाहत होता.’ – राकाघाका २१६. २. (कानशिले इ.) शिलशिलण्याने, उडण्याने. (क्रि. करणे).
टकटका वि. क्रिवि. १. अनिमेष दृष्टीने; एकसारखे रोखून; नजर न हलवता; न खळता : ‘दाजी टकटका पाहत होता.’ – राकाघाका २१६. २. (कानशिले इ.) शिलशिलण्याने, उडण्याने. (क्रि. करणे).
टकटकणे अक्रि. टवटवी येणे; फुलणे; खुलणे; ताजेतवाने होणे; जोमदार दिसणे (फुले, चेहरा) : ‘मन मरत नाही.... चेचून चेचूनही टकटकत राहतं डोळयांत....’ – मुखवटे १३६. २. कानशिले उडणे, ठणकणे.
टकटकी स्त्री. टवटवी; प्रफुल्लितपणा; तुकतुकी (चेहऱ्याची).
टकटकीत वि. टवटवीत; तुकतुकीत; प्रफुल्ल; सतेज; ताजातवाना (चेहरा, पदार्थ); लख्ख.
टकणे उक्रि. १. मिळणे; येणे; लागणे. २. साधणे; प्राप्त होणे; करता येणे; साध्य होणे : ‘हे अगाध निष्ठा परिपूर्ण । बाळ्या भोळ्या न टके जाण ।’ – एभा २·५१७. ३. तर्काने जाणणे. [हिं.; सं. तग्]
टकणे अक्रि. १. एकसारखे सकाम दृष्टीने पाहणे; टक लावून पाहणे. २. शकणे; करू शकणे. ३. टिकणे; स्थिर राहणे : ‘असो न टकें माझें ध्यान ।’ – एभा २८·६१७. [सं. टक्], ४. विरोध होणे. [सं. स्तक्], ५. अडणे; बंद पडणे : ‘जैं यमनियम टकति । तैं इंद्रियें सैरा विचरति ।’ – ज्ञा १·२४८. ६. आश्चर्यचकित, थक्क होणे : ‘गेले टकौनि अवघे पटचित्ररूपें ।’ – गरा २७१. ७. सोडवणे. ८. प्राप्त होणे. ९. टाकणे.
टकणे सक्रि. १. चिकटणे; जवळ जाणे. २. मिळणे. [सं. तग्]
टकणे   पहा : ठाकणे
टकबंदी स्त्री. १. पिकांचे व गावकऱ्यांचे रक्षण. गाव वसाहतीस आणण्याच्या तीन मुख्य कामांतील एक. २. दर टक्यास (प्रत्येक १२० चौरस बिघ्यास) अमुक रक्कम अशी जमिनीची टक्केवारीने मोजणी करून कायमचा ठरविलेला धारा.
टकबंदी वि. १. (टका = १६ शिवराई) टक्यांमध्ये ठरविलेले, हिशेब केलेले, ठेवलेले; (नेहमीप्रमाणे रुपयांत न ठेवलेले) हिशेब, रोखे. २. टक्क्याच्या हिशेबाने ठरविलेली, अजमास केलेली (जमीन).
टकमक स्त्री. १. टवटवी; बहर : ‘तारुण्याचिया टकमका : सर्वांगें एकमेकां : बांधतीं जालीं :’ – उगी ३८·३१०. २. निश्चल दृष्टी. पहा : टक, ३. गोलाकार, भोपळ्यासारखी फळे येणारी एक वेल. ४. चोहुकडे; खालवरही. – तंजा.
टकमक पु. पर्वताचा उंच, कठीण, तुटलेला, वरून खाली पाहिले असता डोळे फिरतील असा सुळका किंवा कडा; अगदी उभा कडा.
टकमक क्रिवि. निश्चलपणे; चकित होऊन. (क्रि. पाहणे) : ‘टकमक पाहत होते प्रभुमुखचंद्राकडेचि मग्न चातकसे ।’ – मोउद्योग ७·९८.
टकमका क्रिवि. निश्चलपणे; चकित होऊन. (क्रि. पाहणे) : ‘टकमक पाहत होते प्रभुमुखचंद्राकडेचि मग्न चातकसे ।’ – मोउद्योग ७·९८.
टकमकी स्त्री. गोलाकार, भोपळ्यासारखी फळे येणारी एक वेल.