शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील सत्ताविसावे अक्षर आणि बारावे व्यंजन.
ठक पु. लुच्चा, फसवा, धूर्त मनुष्य; लबाड; अप्रामाणिक; कपटी; बदमाश. [सं. स्थग्. स्तग्; क. ठक्कनु] (वा.) ठकास ठक भेटणे ह्न जशास तसा भेटणे.
ठग पु. लुच्चा, फसवा, धूर्त मनुष्य; लबाड; अप्रामाणिक; कपटी; बदमाश. [सं. स्थग्. स्तग्; क. ठक्कनु] (वा.) ठकास ठक भेटणे ह्न जशास तसा भेटणे.
ठक न. तटस्थपणा; आश्चर्यामुळे येणारी दृष्टीची एकाग्रता; आश्चर्य; वीरकृत्य; भूल; विस्मृती; दिङ्‌मूढता. (क्रि. लागणे, पडणे.) : ‘उभा जानकीरमण । वधुसहित सुलक्षण । उभयरूपाचें बरवेपण । पाहण्या ठक पाडिलेसें ।’ - वेसीस्व १०.१२१.
ठक वि. तटस्थ. [सं. स्थग]
ठक स्त्री. थकवा. (झाडी)
ठकठक स्त्री. ठणठण किंवा टकटक असा ठोकण्याचा आवाज; दणका; किटकिट; धूमधडाका; त्रासदायक भुणभुण किंवा बडबड. [ध्व.]
ठकठकणे अक्रि. ठक ठक असा आवाज करणे (हातोडीने ठोकून इ.).
ठकठका क्रिवि. हातोड्याने एखादी वस्तू ठोकली असता होणाऱ्या आवाजासारखा आवाज होऊन.
ठकठका वि. ठोकण्याचा कानठळ्या बसवणारा (आवाज).
ठकठके न. पक्ष्यांनी भिऊन उडून जावे म्हणून बनवलेले, मोठा आवाज करणारे एक लाकडी यंत्र; खटखटे. [ध्व.]
ठकठाकुर पु. ठाकुर व त्यांच्यासारखे इतर लोक : ‘राया लागतिते राएं घेतले : एर राजेराउति ठकठाकुरीं घेतले :’ - लीचपू ३१.
ठकडा पु. भुलवणारा; मोठा ठक : ‘म्हणती ठकडा रे कान्हा ।’ - तुगा २३०.
ठकडी पु. भुलवणारा; मोठा ठक : ‘म्हणती ठकडा रे कान्हा ।’ - तुगा २३०.
ठकडे पु. भुलवणारा; मोठा ठक : ‘म्हणती ठकडा रे कान्हा ।’ - तुगा २३०.
ठकड्या पु. भुलवणारा; मोठा ठक : ‘म्हणती ठकडा रे कान्हा ।’ - तुगा २३०.
ठकडेपणा न. फसवेगिरी : ‘तें ठकडेपण श्रीपती । न चले मजप्रति सर्वथा ।’ - एभा २९·७२८.
ठकणा   पहा : ठकडा: ‘कोण मिळाली ठकणी.’ - अफला ७८.
ठकणी   पहा : ठकडा: ‘कोण मिळाली ठकणी.’ - अफला ७८.
ठकणूक स्त्री. फसवणूक; फसगत; लबाडीने केलेली नागवणूक.
ठकणे अक्रि. १. फसणे; फसले जाणे; दगा होणे; निराशा होणे; बुडणे (धंद्यात); चुकणे : ‘माझी ठकली वो बुद्धि ।’ - कक १·५·१४२. २. ठाकणे; उभा राहणे : ‘न ठके निषेध आड । न पडे विधीची भीड ।’ ह्र माज्ञा १६·१८८. ३. घडणे; होणे; प्राप्त होणे : ‘नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल ।’ - ज्ञा ६·३३५. ४. राहणे; स्थिर होणे; वास्तव्य करणे; असणे : ‘तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें ।’ - ज्ञा १०·१६६. ५. थांबणे; बंद पडणे : जरीं राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तिही होये । श्राद्ध न ठके ।’ - ज्ञा १७·१८६. ६. संपणे; अंतरणे; सरणे. ७. (चुकीचे) थकणे; दमणे; श्रम होणे किंवा पावणे. [सं. स्थग्, स्तक्], ८. थक्क होणे; स्तिमित होणे; आश्चर्य वाटणे. ९. थांबणे : ‘काइ मोकलां हिं चवडां । न ठके चि पूंसा ।’ - ज्ञा १८·३९०. [सं. स्थग्]
ठकणे सक्रि. दगा देणे; नाडणे; ठार मारणे (बेसावध असता, सापाच्या दंशाने किंवा चोरांनी हल्ल्यात.). (को.) [हिं. ठकना; सं. स्थग्]
ठकणे उक्रि. ठकविणे : ‘म्हणशील मना इंद्र म्यां ठकीला’ - बबागा १२७.
ठकधंदा पु. फसवेगिरी; सोदेगिरी; लुच्चेगिरी. [क. ठक्कु]
ठकवणी पु. फसवेगिरी; सोदेगिरी; लुच्चेगिरी. [क. ठक्कु]