शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील अठ्ठाविसावे अक्षर आणि तेरावे व्यंजन.
पु. स्त्री. पहा : डह
डई   पहा : ढई
डऊ पु. नारळाच्या करवंटीचे केलेले पात्र. पहा : डव, डहू
डऊली स्त्री. खर्चाचे अंदाजपत्रक.
डक न. जाड कापडाचा एक प्रकार : ‘त्याच्या अंगात पांढऱ्याशुभ्र डकचा कोट असे.’ - बाविबु. [इं.]
डक पु. हजेरीपट.
डकडक क्रिवि. १. वस्तूचा सांधा, जोड शिथिल किंवा नादुरुस्त झाल्यामुळे हलण्याच्या होणाऱ्या आवाजासारखा आवाज; डगडग; डुगडुग; खिळखिळा; करकरा. (क्रि. जाणे, हलणे, वाजणे.). २. झपाट्याने : ‘जेवित जेवतांही पाहे । झोंपी जाये डकडकां ।’ - एभा २५·८४. ३. डगडगत; लडखडत. ४. डुलत; पेंगत. [ध्व.डक द्वि.]
डकाडक क्रिवि. १. वस्तूचा सांधा, जोड शिथिल किंवा नादुरुस्त झाल्यामुळे हलण्याच्या होणाऱ्या आवाजासारखा आवाज; डगडग; डुगडुग; खिळखिळा; करकरा. (क्रि. जाणे, हलणे, वाजणे.). २. झपाट्याने : ‘जेवित जेवतांही पाहे । झोंपी जाये डकडकां ।’ - एभा २५·८४. ३. डगडगत; लडखडत. ४. डुलत; पेंगत. [ध्व.डक द्वि.]
डकडका क्रिवि. १. वस्तूचा सांधा, जोड शिथिल किंवा नादुरुस्त झाल्यामुळे हलण्याच्या होणाऱ्या आवाजासारखा आवाज; डगडग; डुगडुग; खिळखिळा; करकरा. (क्रि. जाणे, हलणे, वाजणे.). २. झपाट्याने : ‘जेवित जेवतांही पाहे । झोंपी जाये डकडकां ।’ - एभा २५·८४. ३. डगडगत; लडखडत. ४. डुलत; पेंगत. [ध्व.डक द्वि.]
डकाडका क्रिवि. १. वस्तूचा सांधा, जोड शिथिल किंवा नादुरुस्त झाल्यामुळे हलण्याच्या होणाऱ्या आवाजासारखा आवाज; डगडग; डुगडुग; खिळखिळा; करकरा. (क्रि. जाणे, हलणे, वाजणे.). २. झपाट्याने : ‘जेवित जेवतांही पाहे । झोंपी जाये डकडकां ।’ - एभा २५·८४. ३. डगडगत; लडखडत. ४. डुलत; पेंगत. [ध्व.डक द्वि.]
डकाक क्रिवि. १. वस्तूचा सांधा, जोड शिथिल किंवा नादुरुस्त झाल्यामुळे हलण्याच्या होणाऱ्या आवाजासारखा आवाज; डगडग; डुगडुग; खिळखिळा; करकरा. (क्रि. जाणे, हलणे, वाजणे.). २. झपाट्याने : ‘जेवित जेवतांही पाहे । झोंपी जाये डकडकां ।’ - एभा २५·८४. ३. डगडगत; लडखडत. ४. डुलत; पेंगत. [ध्व.डक द्वि.]
डकडकणे अक्रि. खिळखिळे होणे; डगडगणे; डळमळणे; डुलणे; लटलटणे (खांब, भिंत, इमारत); हलणे; करकरणे (ढिला सांगाडा); गदगद हलणे; थरथर कापणे (स्थूल शरीर). [सं. दध्]
डकडकीत   पहा : डगडगीत
डकणे अक्रि. १. चिकटणे; लटकून राहणे. पहा : डगणे [सं. दंश-दष्ट], २. ओकणे; उलटी, वांती होणे. (व.) [ध्व.]
डकरणे अक्रि. १. ढेकर देणे. (ना.), २. शक्तीचा गर्व वाहणे; अहंभाव दर्शविणे. (व.) [ध्व. हिं. डकराना]
डकर्‌ना अक्रि. १. डरकाळी फोडणे. २. वळू हंबरणे. ३. व्यर्थ भटकणे. ४. फुशारकी मारणे. (झाडी) [हिं.डकारना]
डकल वि. माहीत; ठाऊक; अवगत. (क्रि. असणे). (कु.)
डकलवार पु. १. मांग गारोडी. २. व्हलर; होलार; मांगांचा गुरु. (माण.)
डक्कलव्हलर पु. १. मांग गारोडी. २. व्हलर; होलार; मांगांचा गुरु. (माण.)
डकला पु. नदीच्या कोरड्या पात्रात पाणी भरता यावे म्हणून खोदलेला खळगा, झरा; डहुरा; डबके; लहानसा डवरा.
डकली स्त्री. दिव्यात तेल घालायची आंब्याच्या कोयीची, करवंटीची केलेली पळी. पहा : डवली
डकवण न. चिकटविण्यासाठी उपयोगी पडणारी वस्तू; खळ; गोंद; डिंक; सरस; चीक; चिकटा.
डकवाडकव स्त्री. चिकटविण्याची क्रिया.
डकवणे उक्रि. चिकटवणे; डकवणे : ‘पूर्व पश्चिम दिशांना त्या त्या नावाच्या पाट्या डकवल्या होत्या.’ - बनगर ९.