शब्द समानार्थी व्याख्या
  मराठी वर्णमालेतील एकोणतिसावे अक्षर आणि चौदावे व्यंजन.
वि. अशिक्षित; अज्ञानी; अक्षरशत्रू. २. मठ्ठ; मूर्ख; व्यवहारचातुर्य नसलेला.
ढई स्त्री. १. जोराचा व नेटाचा प्रयत्न; त्रास घेणे; नेट; अवसान. २. काळजीपूर्वक लक्ष देणे. ३. (पै–पाहुण्यांनी) पुष्कळ दिवस ठिय्या देणे; लोचटपणाने चिकटून राहणे. (क्रि. देणे). ४. बुडी. (क्रि. देणे, मारणे.) (व.)
ढऊर स्त्री. भाताचे एक वाण, प्रकार. (झाडी)
ढक पु. १. एकदम आवाज होऊन ढासळणारा भाग (इमारत, नदीतीर, टेकडी इ. चा). २. अशा ढासळण्यामुळे पडलेला ढीग.
ढकढक क्रिवि. १. डळमळत; इकडेतिकडे हलत (खांब, इमारत इ.). २. झुलत; खालीवर होत; झोक जात (चालताना, उंटावर बसले असता). ३. डुलत; डुलकी घेत; उघडझाक करीत. [ध्व.]
ढगढक क्रिवि. १. डळमळत; इकडेतिकडे हलत (खांब, इमारत इ.). २. झुलत; खालीवर होत; झोक जात (चालताना, उंटावर बसले असता). ३. डुलत; डुलकी घेत; उघडझाक करीत. [ध्व.]
ढकढग क्रिवि. १. डळमळत; इकडेतिकडे हलत (खांब, इमारत इ.). २. झुलत; खालीवर होत; झोक जात (चालताना, उंटावर बसले असता). ३. डुलत; डुलकी घेत; उघडझाक करीत. [ध्व.]
ढगढग क्रिवि. १. डळमळत; इकडेतिकडे हलत (खांब, इमारत इ.). २. झुलत; खालीवर होत; झोक जात (चालताना, उंटावर बसले असता). ३. डुलत; डुलकी घेत; उघडझाक करीत. [ध्व.]
ढकढगा क्रिवि. १. डळमळत; इकडेतिकडे हलत (खांब, इमारत इ.). २. झुलत; खालीवर होत; झोक जात (चालताना, उंटावर बसले असता). ३. डुलत; डुलकी घेत; उघडझाक करीत. [ध्व.]
ढगढगा क्रिवि. १. डळमळत; इकडेतिकडे हलत (खांब, इमारत इ.). २. झुलत; खालीवर होत; झोक जात (चालताना, उंटावर बसले असता). ३. डुलत; डुलकी घेत; उघडझाक करीत. [ध्व.]
ढकढक क्रिवि. गटगट (क्रि. पिणे).
ढकल स्त्री. १. निष्काळजीपणाने, कसेतरी, वरवर केलेले काम; चालढकलीचे काम. २. एखादे काम लांबणीवर, दिरंगाईवर टाकणे; आज उद्या असे करीत लांबवणे. ३. आग्रह; बळजबरी; ढकलणे : ‘ढकल करून कैसे धाडले द्वारकेसी ।’ –सारुह ७·२५.
ढकलगाडा पु. खेळगाडी; खेळातली गाडी. (झाडी)
ढकलगाडी स्त्री. १. लोटत, ढकलत न्यावयाची, चाके असलेली गाडी. २. (ल.) प्रपंच; आयुष्य; नोकरी.
ढकलगुजर पु. स्त्री. १. कसातरी उदरनिर्वाह करणे (संकटात, अडचणीत); दिवस कंठणे. २. चालढकल.
ढकलगुजरण पु. स्त्री. १. कसातरी उदरनिर्वाह करणे (संकटात, अडचणीत); दिवस कंठणे. २. चालढकल.
ढकलगुजराण पु. स्त्री. १. कसातरी उदरनिर्वाह करणे (संकटात, अडचणीत); दिवस कंठणे. २. चालढकल.
ढकलगुजारा पु. स्त्री. १. कसातरी उदरनिर्वाह करणे (संकटात, अडचणीत); दिवस कंठणे. २. चालढकल.
ढकलगुजारी पु. स्त्री. १. कसातरी उदरनिर्वाह करणे (संकटात, अडचणीत); दिवस कंठणे. २. चालढकल.
ढकलचंद वि. १. निष्काळजी; बेजबाबदारीने काम करणारा; घाईने कसेतरी काम उरकणारा; ढकलपट्टी करण्याचा स्वभाव आहे असा. २. आपले काम दुसऱ्यावर टाकणारा; कामचुकार.
ढकलनंद वि. १. निष्काळजी; बेजबाबदारीने काम करणारा; घाईने कसेतरी काम उरकणारा; ढकलपट्टी करण्याचा स्वभाव आहे असा. २. आपले काम दुसऱ्यावर टाकणारा; कामचुकार.
ढकलपंच्यांशी वि. १. निष्काळजी; बेजबाबदारीने काम करणारा; घाईने कसेतरी काम उरकणारा; ढकलपट्टी करण्याचा स्वभाव आहे असा. २. आपले काम दुसऱ्यावर टाकणारा; कामचुकार.
ढकलापा वि. १. निष्काळजी; बेजबाबदारीने काम करणारा; घाईने कसेतरी काम उरकणारा; ढकलपट्टी करण्याचा स्वभाव आहे असा. २. आपले काम दुसऱ्यावर टाकणारा; कामचुकार.
ढकल्या वि. १. निष्काळजी; बेजबाबदारीने काम करणारा; घाईने कसेतरी काम उरकणारा; ढकलपट्टी करण्याचा स्वभाव आहे असा. २. आपले काम दुसऱ्यावर टाकणारा; कामचुकार.