शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कठीण

– न. वि.

१. अवघड; अशक्यप्राय; दुष्कर. २. संकटपूर्ण; आपद्‌ग्रस्त; कष्टप्रद (गोष्ट, बनाव, प्रसंग) : ‘कठिण समय येतां कोण कामास येतो.’– र १०. ३. घट्ट; बळकट; टणक; नरम नव्हे असे; जे तोडण्यास बळ लागते असे : ‘मृदु आणि कठिन । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।’– राज्ञा २·११५. ४. कर

कडचा रविवार

(कधीच न येणारा); जी गोष्ट कधीच करायची नसते ती करायची असे वरवर दाखविण्यासाठी ठरविलेला दिवस.

कडधन

न.

द्विदल जातीय, डाळी करण्याचे धान्य. (मूग, मठ, उडीद, तूर, मसूर, हरभरा, पावटा, वाटाणा इ.) : ‘दीड विद्या अडीच पांड जमिन गिलाबस (गिमवस) कडधन …’ – समोरा ४·६०. [सं. काष्ठ + धान्य]

कडमडी

स्त्री. पु.

१. तापापूर्वी किंवा त्यानंतर येणारी कणकण (क्रि. येणे, भरणे). पहा : कडंगी, कडांगी : ‘आंगास तीच्या कडमोड आला ।’ – सारुह २·६९. २. दुखणे गेल्यानंतर वाटणारा हल्लकपणा; रोगाच्या झटक्यानंतर येणारी ग्लानी. (क्रि. राहणे, येणे, होणे.) ३. गळू पाय, डोळे, दात यांची होण

कडमोड

स्त्री. पु.

१. तापापूर्वी किंवा त्यानंतर येणारी कणकण (क्रि. येणे, भरणे). पहा : कडंगी, कडांगी : ‘आंगास तीच्या कडमोड आला ।’ – सारुह २·६९. २. दुखणे गेल्यानंतर वाटणारा हल्लकपणा; रोगाच्या झटक्यानंतर येणारी ग्लानी. (क्रि. राहणे, येणे, होणे.) ३. गळू पाय, डोळे, दात यांची होण

कडसनी

स्त्री.

धाकदपटशा; तंबी; दटावणी; काच : ‘तेथें द्वैतबुद्धीची कडसणी ।’ – परमा २·१९. (ना.) [सं. कृष्]

कडसार

वि.

कडवट. (गो.) पहा : कडसर

कडियाळ

न. स्त्री.

१. साखळी; गोल कडे; कडी : ‘जैसे लोहाचें कडियाळें ।’ – हरि १७·१८४. २. कटिलगाम (घोड्याचा) : ‘तुझे तोंडी मी कडियाळें घालुनि ।’ – पंच ४·६. ३. (ल.) वेढा; वेष्टण : ‘जाहली चवदाही भुवनासि कडियाळीं ।’ – ज्ञा ११·३१७. ४. माळ; हार; जाळी; जाळीचा अंगरखा : ‘लेइली मोतियां

कायस्छ

पु.

कायस्थ; एक हिंदू जात. यांचा धंदा लेखकाचा - विशेषतः विक्रीसाठी काढलेल्या ग्रंथाच्या नकला करण्याचा असे. हे उत्तर हिंदुस्थानचे रहिवासी आहेत. यांना कायस्थ असे जरी म्हणतात तरी दक्षिणेकडील कायस्थ प्रभूंशी यांचा काही संबंध नाही. कायस्थ प्रभू हे क्षत्रिय आहेत. [स

कारेतां

न.

कारले. (को. कु.)

काष्टी

स्त्री.

लंगोटी (उपहासाने म्हणतात). (कु. गो.) पहा : कासोटी

काहिली

स्त्री.

तापाने किंवा उन्हामुळे अंगाची होणारी तगमग. तळमळ, त्रास. (क्रि. होणे.) (वा.) काहिल उडणे, काहिली उडणे, काहली उडणे - भडका होणे; अतिशय संताप येणे : ‘ती बातमी ऐकून राजांच्या अंगाची काहिली उडाली.’ - श्रीयो २. ८१. काहिल होणे, काहिली होणे, काहली होणे - आग होणे, भ

१. देवनागरी लिपीतील १६ वे अक्षर. मराठी वर्णमालेतील पहिले व्यंजन. मराठीत साधारणतः प्रश्नवाचक शब्दातला प्रारंभिक नित्य घटक. जसे :– की, काय, कोण, कुठे, कधी, कसा, केव्हा, केवढा, किती इ. २. यम; विष्णू; अग्नी इ. देवता. ३. मन, अंतःकरण, आत्मा. ४. पक्षिविशेष; पक्ष

कँकर रोग

(कृषी) कागदी लिंबाच्या पानावर, कांद्यांवर तसेच फळांवर सूक्ष्म जंतूंमुळे पडणारे वाटोळे, बारीक, तपकिरी रंगाचे डाग.

कँटन

पु.

(भूगोल.) स्वित्झर्लंड व फ्रान्समधील लहान प्रादेशिक विभाग. ह्याच शब्दावरून लष्करी वसाहत या अर्थाचा कँटोनमेंट हा शब्द तयार झाला आहे. [इं.]

कँडलशक्ती

स्त्री.

प्रकाश मोजण्याची पट्टी. २. कँडलशक्ती म्हणजे एका मेणबत्तीचा पडणारा प्रकाश.

कँडेला

स्त्री.

प्रकाशशक्तीचे माप.

कंक

पु.

१. बगळा; करकोचा; क्रौंच. बाणाच्या शेवटी याची पिसे लावीत असत : ‘कंक गोमायु मांसभक्षक ।’ – मोआदि. २. अज्ञातवासात धर्मराजाने (पांडव) धारण केलेले नाव. ३. क्षत्रिय. यावरून मराठ्यातील एक आडनाव. उदा. येसाजी कंक. [सं.]

कंक

वि.

खंक; फटिंग.

कंकण

पु. न.

१. बांगडी; चुडा : ‘पुरुषाहातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥’ - तुगा ९७७. २. बायकांच्या हातातील सोन्याचा बांगडीसारखा पण रुंद असा दागिना; बांगडी : ‘नाग मुदी कंकण ।’ - अमृ ९·१२. ३. यज्ञदीक्षा घेतेवेळी यजमान आपल्या हातात पिवळा दोरा बांधतो तो : ‘तें यज्ञकंक