शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

किं

सना.

१. कोण, कोणचा, काय. हा शब्द बहुव्रीही समासात नेहमी येतो. २. किंवा; अथवा : ‘नातरि रसेंवीणु वाणी । किं चंद्रेवीणु रजनी ।’ – शिव ५३९. [सं. किम्]

किंक

स्त्री.

किंकाळी; आरोळी. (क्रि. फोडणे, मोकळणे.) (को.) [ध्व.]

किंकट

पु.

एका किंवा अनेक हत्तींचा चीत्कार, आरोळी. [सं.]

किंकट

वि.

(कीकट = बिहार देश यावरून) रानटी; ओसाड; नापीक (देश).

किंकटणे

अक्रि.

१. हत्तीने चीत्कार करणे : ‘मस्त हस्त किंकाटती ।’ – दावि ४९६. २. आरोळी मारणे : ‘मग पाहतां ते कृष्ण उपासक । हरिनामें किंकाटती ।’ – हरि ३३·११७. [सं. किंक]

किंकणी

स्त्री.

१. लहान घंटा; क्षुद्र घंटा (बैलाच्या गळ्यातील); पट्ट्यांमधील किंवा स्त्रियांचा कमरपट्टा अथवा इतर दागिने यांमधील घुंगुरु, घागऱ्या. २. किंकाळी (क्रि. फोडणे, मोकलणे.) ३. पिलू या फळाचे बी. [सं. किंकिणी]

किंकणेल

न.

पिलू झाडाच्या फळाचे तेल; एक औषधी तेल : ‘रोज किंकणेल तिवसाच्या फळाचे तेल घ्यावे.’ – निऔ ४५; ‘किंकनेल तेल म्हणून आमचे संग्रही आहे, ते वातास लावल्यास गुण येतो.–ब्रच २५६.

किंकनेल

न.

पिलू झाडाच्या फळाचे तेल; एक औषधी तेल : ‘रोज किंकणेल तिवसाच्या फळाचे तेल घ्यावे.’ – निऔ ४५; ‘किंकनेल तेल म्हणून आमचे संग्रही आहे, ते वातास लावल्यास गुण येतो.–ब्रच २५६.

किंकर

पु.

१. चाकर; सेवक; दास : ‘नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ।’ – तुगा २५३२. [सं.]

किंकर

स्त्री.

देवबाभळीचे किंवा वेड्या बाभळीचे झाड. याची फुले सुवासिक असून याच्यापासून गोंद व इतर पदार्थ होतात.

किंकरी

स्त्री.

देवबाभळीचे किंवा वेड्या बाभळीचे झाड. याची फुले सुवासिक असून याच्यापासून गोंद व इतर पदार्थ होतात.

किंकरे

न.

(सुतार) लाकडास भोक पाडण्याचे उपकरण; उळी; पटाशी; विंधणे.

किंकर्तव्यमूढ

वि.

काय करावे हे समजेनासे झाले आहे असा. [सं.]

किंकळणे

अक्रि.

१. हत्तीने चीत्कार करणे : ‘मस्त हस्त किंकाटती ।’ – दावि ४९६. २. आरोळी मारणे : ‘मग पाहतां ते कृष्ण उपासक । हरिनामें किंकाटती ।’ – हरि ३३·११७. [सं. किंक]

किंकळी

स्त्री.

हत्तीचा चीत्कार, (त्यावरून सामान्यतः) आरोळी. (क्रि. फोडणे, मोकलणे.)

किंकाट

पु.

हत्ती किंवा घोडा यांचा आवाज, शब्द : ‘हत्ती किंकाट करिताती ।’ – दावि २४४; किंकाळी. [ध्व.]

किंकाटणे

अक्रि.

१. हत्तीने चीत्कार करणे : ‘मस्त हस्त किंकाटती ।’ – दावि ४९६. २. आरोळी मारणे : ‘मग पाहतां ते कृष्ण उपासक । हरिनामें किंकाटती ।’ – हरि ३३·११७. [सं. किंक]

किंकार

पु.

मोराचा टाहो : ‘मयोर नाचती किंकारी ।’ – मुसभा २·२४.

किंकार

वि.

चक्राकार.

किंकाळणे

अक्रि.

१. हत्तीने चीत्कार करणे : ‘मस्त हस्त किंकाटती ।’ – दावि ४९६. २. आरोळी मारणे : ‘मग पाहतां ते कृष्ण उपासक । हरिनामें किंकाटती ।’ – हरि ३३·११७. [सं. किंक]