शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कु

उपसर्ग.

वाईटपणा दाखविणारे, अपकर्ष सुचविणारे अव्यय. हे समासात नामांच्या पूर्वी योजतात : ‘आणि कुकर्मी संगति न व्हावी ।’ – ज्ञा २·२६६. [सं.]

कु

स्त्री.

पृथ्वी. (समासात) कुगती = पृथ्वीची गती, कुज्या = पृथ्वीच्या परिघ खंडाची ज्या. [सं.]

कुंक

स्त्री.

कोंबड्याचे आरवणे. [ध्व.]

कुंकड

पु.

कोंबडा. [सं. कुक्कुट]

कुंकड

न.

पिंजाऱ्याचे कापूस पिंजण्याचे साधन.

कुंकडकुंभा

पहा : कुंकटकुंभा (खा.)

कुंकणे

अक्रि.

१. कोंबड्याचे आरवणे; केकाटणे : ‘वृक जंबुक नगरा आत । दिवसां चौंबारा कुंकात ।’ – एभा ६·२८४. २. डुकराचे ओरडणे. [ध्व.]

कुंकमपत्र

न. स्त्री.

मुंज, लग्न अथवा इतर मंगलप्रसंगीची निमंत्रणपत्रिका; हिच्यावर शुभचिन्हदर्शक कुंकुम शिंपडतात. [सं.]

कुंकवाचाधनी

नामधारी, सामर्थ्यहीन नवरा, मालक : ‘इंदु - मला कुंकवाला धनी पाहिजे.’ - भाबं ९०.

कुंकवालाधनी

नामधारी, सामर्थ्यहीन नवरा, मालक : ‘इंदु - मला कुंकवाला धनी पाहिजे.’ - भाबं ९०.

कुंकाणे

अक्रि.

कोकलणे; ओरडणे : ‘आडवाचि उडे मग कुकात ।’ – निगा ३०; ‘भुंकती गाढव कुंकाति डुकर ।’ – दावि ३५८. [ध्व.]

कुंकुम

पु.

१. केशर : ‘मोतियांचे घोषें । रांविलें कुंकुमरसे ।’ - शिव १७. २. कुंकू; पिंजर. ३. पुन्नाग वृक्ष; कमळ; शेंदरी. याच्यापासून कुंकुमचूर्ण तयार करतात. कपड्याला नारिंगी रंग देण्यासाठी या चूर्णाचा उपयोग होती. (को.) (एका जातीचा वृक्ष) : ‘कुंकुम-केसरीजवली : कर्पूरक

कुंकुमकेशर

न.

१. रासतुरा; सोनमोहोर, गुलमोहोर; एक झाड व त्याचे फूल. (को.) २. कुंकू. ३. केशर [सं.]

कुंकुमतिलक

पु.

कुंकवाचा टिळा. हिंदू स्त्रिया सौभाग्यचिन्ह म्हणून कपाळावर लावतात तो कुंकवाचा टिळा. [सं.]

कुंकुमपिंजरी

स्त्री.

केशराची पूड : ‘कापूर कस्तुरी परिमळ द्रव्ये चांग : अक्षता कुंकुमपिंजरी’ - रुस्व २८१०.

कुंकुमरेखा

स्त्री.

कपाळावर ओढलेली कुंकवाची रेघ, चिरी. [सं.]

कुंकुमरेषा

स्त्री.

कपाळावर ओढलेली कुंकवाची रेघ, चिरी. [सं.]

कुंकुमागर

पु.

तांबडा चंदन; रक्तचंदन. [सं.]

कुंकुमागरू

पु.

तांबडा चंदन; रक्तचंदन. [सं.]

कुंकू

न.

हळदीच्या कुड्याला लिंबू, टाकणखार इत्यादीची पुटे देऊन रंगवून त्याची केलेली लाल पूड. हे कुंकू स्त्रिया आपल्या कपाळाला लावतात. : ‘बायकांना जसें कुंकू तसें पुरुषांना स्वातंत्र्य.’ - द्रौ ५६ [सं. कुंकुम] (वा.) कुंकू अधिक होणे, कुंकू वाढणे - कुंकू कमी होणे, संप