शब्दकोशातील शब्द शोधा (रेग्युलर एक्स्प्रेशनला परवानगी आहे)
च्याद्वारे सुरुवात चा समावेश अचूक शब्द
शब्द समानार्थी व्याख्या

कू

न.

पिंगळ्याचा एक स्वर. पहा : की

कूं

अ.

एखादी व्यथा झाली असताना मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चं, हू, इस्, उस्, हुश् याप्रमाणे). (क्रि. म्हणणे, करणे) पहा : हाय [ध्व.]

कूं

अ.

एखादी व्यथा झाली असताना मनुष्याच्या तोंडून निघणारा दुःखोद्गार (चं, हू, इस्, उस्, हुश् याप्रमाणे). (क्रि. म्हणणे, करणे) पहा : हाय [ध्व.]

कूंचा

पहा : कुंचा : ‘ब्रह्मतेजाचा कूंचा ढळें । मुगुटावरी ।’ - शिव १११.

कूंजणे

अक्रि.

शब्द करणे (पक्षी वगैरेंनी) : ‘जे कूंजते कोकिल वनीं ।’ - ज्ञा ६·४५. [सं. कूजन्]

कूंजद

स्त्री.

दोन्ही बाजूंना तीळ लावून तयार केलेली पोळी.

कूंस

पहा : कुसूं १, २, ३ (को.)

कूआ

पहा : कूवा

कूक

स्त्री.

बांग; साद; आरव (कोंबडा इत्यादींची). [ध्व.]

कूकणे

अक्रि.

आरवणे; ओरडणे; शब्द करणे : ‘जो नारायणु नाभीकमळीं कूके ।’ - दाव २६८.

कूकू

न.

कुत्र्यास बोलवण्याचा शब्द; यूयू. [ध्व.]

कूच

पु.

चर. जमिनीतून चर खणून वर आच्छादन घालून पुढे सरकत जाण्याचा मोर्चाचा एक प्रकार : ‘दोन चार दिवसांमध्ये इकडून कूच खणोन मोर्चेपुढे चालविले.’ - पेद ३०·१६७.

कूच

न.

१. प्रयाण; मजल (सैन्याची); तळाची उठावणी; तळ हलविणे : ‘हल्ली हैद्राबादेहून नबाबाची चार कुचें टिपूच्या मोकाबल्यावर जाहली.’ - ऐलेसं ८·४३२५; २. (सामा.) प्रयाण; गमन; प्रस्थान; निघून जाणे. (क्रि. करणे) : ‘हेळापट्‌टण लक्षुनियां पंथ । कूच मुक्काम साधीतसे ।’ - नव

कूच

वि.

निरर्थक; निरुपयोगी. उदा. कुचकामाचे, कुचकामाचा [हिं.]

कूच दरकूच

मजल दर मजल; सारख्या मजला करीत : ‘आम्ही आपले दोस्तीवर नजर देऊन कूच - बकूच रवाना होऊन गेलो असो.’ - पया ४८६.

कूचट

क्रिवि.

मजल दर मजल : ‘सोडितो दखन कूचट आले नीट काम मोठे जबरा केलें ।’ - ऐपो ४३५. [फा. कुच्]

कूचबकूच

मजल दर मजल; सारख्या मजला करीत : ‘आम्ही आपले दोस्तीवर नजर देऊन कूच - बकूच रवाना होऊन गेलो असो.’ - पया ४८६.

कूज

स्त्री.

नाश; विलय; कुजणे.

कूजकू

न.

कोकिळेचे गाणे; पक्ष्याने केलेला गोड आवाज. [सं.]

कूजणे

उक्रि.

मंजुळ ध्वनी करणे : ‘जे कूजती कोकिल वनीं ।’ - ज्ञा ६·४५०.